ख्रिस्ती असण्याची आपली जाणीव कधीही नजरेआड होऊ नये
ख्रिस्ती असण्याची आपली जाणीव कधीही नजरेआड होऊ नये
“परमेश्वराचे असे म्हणणे आहे . . . की तुम्ही माझे साक्षी आहा.”—यशया ४३:१०.
१. यहोवा कोणत्या प्रकारच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो?
राज्य सभागृहात असताना एखाद्यावेळी आपल्या सर्व बांधवांवर एक नजर टाका आणि विचार करा. या उपासनेच्या ठिकाणी तुम्हाला कोणकोण दिसतात? कदाचित, अगदी तल्लीन होऊन बायबलमधील सूज्ञ मार्गदर्शन ऐकणारे तरुणतरुणी तुम्हाला दिसतील. (स्तोत्र १४८:१२, १३) किंवा, तुमचे लक्ष कुटुंबप्रमुखांकडे जाईल, की जे कौटुंबिक जीवनाची सतत पायमल्ली करणाऱ्या या जगात राहात असतानाही देवाला संतुष्ट करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. काही वयस्क बांधवही तुम्हाला नक्कीच आढळतील, जे उतार वयाच्या सर्व आव्हानांना तोंड देऊन सातत्याने देवाला केलेली समर्पणाची प्रतिज्ञा पूर्ण करत आहेत. (नीतिसूत्रे १६:३१) या सर्वांचे यहोवावर मनापासून प्रेम आहे. आणि त्याने देखील यांना आपल्यासोबत नातेसंबंध जोडण्यास योग्य लेखले आहे. देवाच्या पुत्राने या गोष्टीला दुजोरा दिला. त्याने म्हटले: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही.”—योहान ६:३७, ४४, ६५.
२, ३. ख्रिस्ती असण्याची सतत जाणीव बाळगणे सोपे का नाही?
२ ज्यांना यहोवाची संमती व आशीर्वाद लाभला आहे अशा लोकांपैकी आपण आहोत याचा आपल्याला आनंद वाटत नाही का? पण ‘शेवटल्या काळातील या कठीण दिवसांत’ ख्रिस्ती असण्याची आपली जाणीव कधीही नजरेआड न होऊ देणे २ तीमथ्य ३:१) हे खासकरून अशा तरुणांच्या बाबतीत घडण्याची शक्यता आहे की जे ख्रिस्ती कुटुंबातच लहानाचे मोठे झाले आहेत. अशाच एका तरुणाने कबूल केले: “मी ख्रिस्ती सभांना जायचो, पण व्यक्तिशः माझी कोणतीच आध्यात्मिक ध्येये नव्हती; यहोवाची सेवा करण्याची अशी निश्चित इच्छा नव्हती.”
तितके सोपे नाही. (३ काहीजणांना यहोवाची सेवा करण्याची मनापासून इच्छा तर असते, पण समवस्कांचा दबाव, जगिक प्रभाव आणि पापमय प्रवृत्तींमुळे त्यांचे लक्ष विचलित होते. आपल्यावर दबाव येतो तेव्हा हळूहळू ख्रिस्ती असण्याची ती जाणीव नाहीशी होऊ लागते. उदाहरणार्थ, नैतिकतेविषयी बायबलचे स्तर या आधुनिक जगात कालबाह्य झाले आहेत किंवा ते व्यवहारात आणण्याजोगे नाहीत असे बऱ्याचजणांचे मत आहे. (१ पेत्र ४:४) काहींना वाटते की देवाने सांगितले आहे त्याप्रमाणेच त्याची उपासना केली पाहिजे असे काही नाही. (योहान ४:२४) इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात पौलाने या जगाच्या ‘आत्म्याविषयी’ अर्थात, जगात प्रचलित असलेल्या प्रवृत्तीविषयी सांगितले. (इफिसकर २:२) हा आत्मा, यहोवाची ओळख नसलेल्या लोकांची विचारसरणी अनुसरण्याचा दबाव आपल्यावर आणतो.
४. ख्रिस्ती या नात्याने आपली ओळख राखण्याच्या महत्त्वावर येशूने कशाप्रकारे जोर दिला?
४ पण आपण तरुण असो वा वृद्ध, यहोवाचे समर्पित सेवक या नात्याने आपली ख्रिस्ती ओळख नष्ट होणे हे अत्यंत खेदजनक ठरेल. ख्रिस्ती असण्याची योग्य जाणीव ही यहोवाच्या स्तरांवर आणि त्याच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांवर आधारित आहे. काही झाले तरी शेवटी आपल्याला त्याच्याच प्रतिरूपात निर्माण करण्यात आले आहे. (उत्पत्ति १:२६; मीखा ६:८) ख्रिस्ती या नात्याने आपली ओळख वस्त्रांसारखी आहे असे बायबल सांगते. ती सर्वांना दिसून आली पाहिजे. आपल्या काळाच्या संदर्भात येशूने असा इशारा दिला होता: “पाहा, जसा चोर येतो, तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य.” * (प्रकटीकरण १६:१५) आपले ख्रिस्ती गुण व आचारविचार टाकून, सैतानी जगाशी आपण निश्चितच समरूप होऊ इच्छित नाही. असे घडल्यास, आपल्याजवळ “वस्त्रे” नाहीत अशी स्थिती होईल. साहजिकच हे अतिशय खेदजनक व लज्जास्पद ठरेल.
५, ६. आध्यात्मिक स्थैर्य अत्यावश्यक का आहे?
५ ख्रिस्ती असण्याची जाणीव सदोदीत बाळगणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर या जाणिवेचा बराच प्रभाव पडतो. तो कसा? यहोवाच्या उपासकांपैकी एखाद्याच्या मनात ही सुस्पष्ट जाणीव नसेल तर त्याचे आध्यात्मिक जीवन दिशाहीन बनेल, त्याच्यासमोर कोणतीही निश्चित ध्येये नसतील. अशा अनिश्चितपणाच्या स्थितीविषयी बायबल वारंवार इशारा देते. शिष्य याकोबाने अशी ताकीद दिली: “संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यांत चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये.”—याकोब १:६-८; इफिसकर ४:१४; इब्री लोकांस १३:९.
६ तर मग आपली ही ख्रिस्ती ओळख आपण कशी कायम राखू शकतो? विश्वातील सार्वभौम प्रभूचे उपासक या नात्याने आपल्याला किती अतुलनीय बहुमान मिळाला आहे याची जाणीव आपण कशी वाढवू शकतो? पुढील मार्ग कृपया विचारात घ्या.
आपली ख्रिस्ती ओळख कायम राखा
७. आपले परीक्षण करण्याची यहोवाला विनंती करणे का अगत्याचे आहे?
७ यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाची जोपासना करा. स्तोत्र २५:१४; नीतिसूत्रे ३:३२) आपल्या ख्रिस्ती ओळखीविषयी आपल्या मनात अस्वस्थ करणारे प्रश्न उद्भवल्यास देवासोबतचे आपले नाते खरोखर किती अर्थपूर्ण आहे, किती घनिष्ट आहे याविषयी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. स्तोत्रकर्त्याने यहोवाला अगदी योग्य विनंती केली: “हे परमेश्वरा, मला कसास लाव, माझी पारख कर; माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पाहा.” (स्तोत्र २६:२) अशाप्रकारचे परीक्षण करणे अगत्याचे का आहे? कारण आपल्या मनातल्या हेतूंचे व सर्वांत गुप्त इच्छाआकांक्षांचे आपण स्वतः योग्यरित्या अवलोकन करू शकत नाही. केवळ यहोवाच आपल्या आतील मनुष्याला, अर्थात, आपले हेतू, विचार व भावनांना पूर्णपणे समजू शकतो.—यिर्मया १७:९, १०.
कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीजवळ असलेली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे त्याचा किंवा तिचा देवासोबत असलेला वैयक्तिक नातेसंबंध. (८. (क) यहोवाकडून पारखले जाण्यामुळे आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो? (ख) ख्रिस्ती या नात्याने प्रगती करण्यास तुम्हाला कशाप्रकारे साहाय्य मिळाले आहे?
८ आपली पारख करण्याची यहोवाला आपण विनंती करतो तेव्हा आपण त्याला आपल्यावर परीक्षा येऊ देण्याचे निवेदन करत असतो. तो कदाचित असे प्रसंग आपल्यावर येऊ देईल की ज्यांवरून आपले खरे हेतू व मनोवृत्ती उघडकीस येईल. (इब्री लोकांस ४:१२, १३; याकोब १:२२-२५) अशा परीक्षांचे आपण स्वागत केले पाहिजे कारण त्यांमुळे आपल्याला यहोवाप्रती आपली गाढ निष्ठा प्रदर्शित करण्याची संधी मिळते. आपण “कशातही उणे न होता अगदी पूर्ण” आहोत किंवा नाही हे या परीक्षांमुळे दिसून येते. (याकोब १:२-४, पं.र.भा.) आणि हे घडत असतानाच आध्यात्मिकरित्या आपला विकास होतो.—इफिसकर ४:२२-२४.
९. बायबल सत्याची व्यक्तिशः खात्री करणे अगत्याचे का आहे? समजावून सांगा.
९ बायबलमधील सत्याची व्यक्तिशः खात्री करून घ्या. शास्त्रवचनांच्या ज्ञानाचा ठोस आधार असल्याशिवाय यहोवाचे सेवक असण्याची आपली जाणीव कमजोर होऊ शकते. (फिलिप्पैकर १:९, १०) तरुण असो वा वृद्ध, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने या गोष्टीची व्यक्तिशः खात्री करून घेतली पाहिजे की आपण जे मानतो ते खरोखर बायबलमध्ये प्रकट केलेल्या सत्याला धरून आहे. पौलाने आपल्या सहविश्वासू बांधवांना असा आग्रह केला: “सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा.” (१ थेस्सलनीकाकर ५:२१) देवभीरू कुटुंबांतील तरुण ख्रिश्चनांनी हे ओळखले पाहिजे की केवळ त्यांचे आईवडील विश्वासात असल्यामुळे ते आपोआपच खरे ख्रिस्ती बनत नाहीत. खुद्द शलमोनाच्या पित्याने, दाविदाने त्याला “आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर,” असा सुज्ञ सल्ला दिला. (१ इतिहास २८:९) आपल्या पित्याने यहोवावर कसा विश्वास उत्पन्न केला याचे केवळ शलमोनाने निरीक्षण करून चालणार नव्हते. त्याला व्यक्तिशः यहोवाची ओळख करून घेण्याची गरज होती आणि त्याने असेच केले. त्याने देवाला अशी याचना केली: “या प्रजेसमोर वर्तण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे.”—२ इतिहास १:१०.
१०. योग्य हेतूने प्रामाणिक प्रश्न विचारण्यात काही गैर का नाही?
१० मजबूत विश्वास हा ज्ञानाच्या आधारावर उभारला जातो. पौलाने म्हटले: ‘विश्वास वार्ता [ऐकल्याने] होतो.’ (रोमकर १०:१७) असे म्हणण्यामागे काय तात्पर्य होते? पौल असे सांगू इच्छित होता, की देवाच्या वचनातील माहिती आत्मसात केल्याने यहोवावर, त्याच्या प्रतिज्ञांवर आणि त्याच्या संघटनेवर असलेला आपला विश्वास व भरवसा वाढतो. बायबलविषयी प्रामाणिक प्रश्न विचारल्यामुळे आपल्या विश्वासाला पुष्टी देणारी उत्तरे आपल्याला मिळतात. शिवाय, रोमकर १२:२ येथे पौलाने असा सल्ला दिला: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून [“याची खात्री करून घ्यावी,” NW] घ्यावे.” हे आपण कसे साध्य करू शकतो? “सत्याचे ज्ञान” मिळवून. (तीत १:३) यहोवाचा आत्मा आपल्याला कठीण विषय देखील समजून घेण्यास मदत करू शकतो. (१ करिंथकर २:११, १२) एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही तेव्हा आपण देवाच्या मदतीकरता प्रार्थना केली पाहिजे. (स्तोत्र ११९:१०, ११, २७) यहोवाची इच्छा आहे की आपण त्याचे वचन समजून घ्यावे, त्यावर विश्वास ठेवावा व त्याचे पालन करावे. योग्य हेतूने विचारलेले प्रामाणिक प्रश्न त्याला आवडतात.
देवाला संतुष्ट करण्याचा निश्चय करा
११. (क) कोणती स्वाभाविक इच्छा आपल्याकरता पाशरूप ठरू शकते? (ख) साथीदारांच्या दबावाला तोंड देण्याचे धैर्य आपण कसे मिळवू शकतो?
११ मनुष्याला नव्हे तर देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गटासोबत आपल्याला ओळखले जावे, स्वीकारले जावे अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे. सर्वांना मित्रांची गरज असते, आणि आपले मित्र आपल्याला स्वीकारतात या जाणिवेने आपल्याला समाधान वाटते. किशोरवयात, तसेच जीवनात नंतरही साथीदारांचा दबाव अतिशय प्रभावशाली नीतिसूत्रे १:११-१९) एखादा ख्रिस्ती जेव्हा साथीदारांच्या अशा अयोग्य दबावाला बळी पडतो तेव्हा तो सहसा आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करू लागतो. (स्तोत्र २६:४) प्रेषित पौलाने इशारा दिला: “या युगाबरोबर समरुप होऊ नका.” (रोमकर १२:२) अयोग्य वर्तनात सामील होण्याच्या दबावाला तोंड देण्यासाठी लागणारी आंतरिक शक्ती यहोवा आपल्याला पुरवतो.—इब्री लोकांस १३:६.
असू शकतो. या दबावामुळे कधीकधी आपण इतरांचे अनुकरण करण्यासाठी किंवा त्यांची मर्जी राखण्यासाठी काहीही करायला तयार होतो. पण साथीदार किंवा मित्र नेहमीच आपल्या हिताचा विचार करत नाहीत. कधीकधी त्यांना एखादी चुकीची गोष्ट करण्यासाठी दुसऱ्यांची साथ हवी असते. (१२. देवावर भरवसा ठेवण्याचा प्रश्न येतो तेव्हा कोणते तत्त्व आणि कोणाचे उदाहरण आपल्याला खंबीर राहण्यास मदत करू शकते?
१२ साथीदारांच्या दबावामुळे जेव्हा ख्रिस्ती असण्याविषयीची आपली जाणीव कमजोर होऊ लागते तेव्हा आपण एक गोष्ट आठवणीत ठेवली पाहिजे. ती अशी, की लोक आपल्या विषयी काय विचार करतात किंवा बहुतेकजण काय करतात याचा विचार करण्यापेक्षा यहोवाला एकनिष्ठ राहणे जास्त महत्त्वाचे आहे. निर्गम २३:२ यातील तत्त्वाचे पालन केल्यास आपण सुरक्षित राहू शकतो: “दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणाऱ्या बहुजनसमाजास अनुसरू नको.” बहुतेक सहइस्राएली बांधवांनी यहोवा आपल्या प्रतिज्ञा पूर्ण करेल किंवा नाही याविषयी शंका घेतली तेव्हा कालेबने लोकांच्या मागे जाण्यास ठामपणे नकार दिला. त्याला पूर्ण खात्री होती की देवाच्या प्रतिज्ञा भरवशालायक आहेत आणि अशी भूमिका घेतल्याबद्दल त्याला उत्तम प्रतिफळ मिळाले. (गणना १३:३०; यहोशवा १४:६-११) देवासोबतचा आपला नातेसंबंध कायम राखण्यासाठी तुम्ही बहुतेक लोकांच्या मताविरुद्ध वागण्यास कालेबसारखेच तयार आहात का?
१३. ख्रिस्ती या नात्याने आपली ओळख जाहीर करणे सुज्ञतेचे का आहे?
१३ आपली ख्रिस्ती ओळख जाहीर करा. स्वतःचा बचाव करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शत्रूवर प्रभावीरित्या हमला करणे असे म्हणतात. ही गोष्ट ख्रिस्ती असण्याच्या आपल्या जाणिवेचे रक्षण करण्याच्या बाबतीत खरी ठरते. एज्राच्या काळात विश्वासू इस्राएली लोकांनी यहोवाच्या इच्छेनुसार वागण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना विरोध झाला, पण त्यांनी म्हटले: “आम्ही स्वर्गाच्या व पृथ्वीच्या देवाचे दास आहो.” (एज्रा ५:११) विरोध करणाऱ्यांच्या प्रतिक्रियांचा व टीकेचा जर आपण स्वतःवर परिणाम होऊ दिला, तर आपण भीतीने अक्रियाशील होऊ. सर्वांची मर्जी राखण्याचा प्रयत्न केल्यास आपण परिणामकारकरित्या कार्य करू शकणार नाही. तेव्हा भयभीत होऊ नका. आपण यहोवाचे साक्षीदार आहोत हे स्पष्टपणे इतरांना सांगणे नेहमी चांगले असते. आदरपूर्वक पण सुस्पष्टरित्या तुम्ही इतरांना, ख्रिस्ती या नात्याने तुमचे आदर्श, विश्वास आणि भूमिका काय आहे हे समजावू शकता. नैतिकतेच्या बाबतीत तुम्ही यहोवाच्या उच्च स्तरांचे पालन करण्याचा निश्चय केला आहे हे इतरांना कळू द्या. आपण कोणत्याही परिस्थितीत आपली ख्रिस्ती सत्त्वनिष्ठा सोडणार नाही हे इतरांना समजू द्या. आपल्या नैतिक आदर्शांचा तुम्हाला अभिमान आहे हे त्यांना दिसू द्या. (स्तोत्र ६४:१०) ख्रिस्ती जीवनातील तुमची ही खंबीर भूमिका इतरांना दिसून आल्यास यामुळे तुम्हाला अधिक सामर्थ्य मिळेल, तुमचे संरक्षण होईल आणि कदाचित यामुळे इतरांना यहोवा व त्याच्या लोकांबद्दल विचारपूस करण्याची प्रेरणा देखील मिळू शकते.
१४. थट्टा किंवा विरोध यांमुळे आपण निराश व्हावे का? स्पष्ट करा.
१४ होय, काहीजण कदाचित तुमची थट्टा करतील किंवा तुमचा विरोध करतील. (यहुदा १८) आपल्या विश्वासांबद्दल इतरांना समजावण्याचा प्रयत्न केल्यावर तुम्हाला त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही तरीसुद्धा निराश होऊ नका. (यहेज्केल ३:७, ८) तुम्ही कितीही दृढनिश्चयाने प्रयत्न केला तरीसुद्धा ज्यांना समजून घेण्याची इच्छाच नाही त्यांना समजावण्यात तुम्हाला कधीच यश येणार नाही. फारोचे उदाहरण आठवणीत ठेवा. कितीतरी पीडा, चमत्कार, अगदी त्याच्या ज्येष्ठ पुत्राच्या मृत्यूनेही, मोशे हा खरोखरच यहोवाच्या वतीने बोलत आहे हे मानण्यास फोरो प्रवृत्त झाला नाही. तेव्हा मनुष्याच्या भीतीने माघार घेऊ नका. देवावर भरवसा व विश्वास ठेवल्याने तुमची भीती नाहीशी होईल.—नीतिसूत्रे ३:५, ६; नीतिसूत्रे २९:२५.
गतकाळापासून शिका, भविष्याकरता पाया घाला
१५, १६. (क) आपल्या आध्यात्मिक वारशात कशाचा समावेश होतो? (ख) देवाच्या वचनाच्या साहाय्याने आपल्या आध्यात्मिक वारशावर मनन केल्याने आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो?
१५ आपल्या आध्यात्मिक वारशाचे जतन करा. देवाच्या वचनाचा उपयोग करून आपल्या समृद्ध आध्यात्मिक वारशावर मनन केल्याने ख्रिश्चनांना खूप फायदा होऊ शकतो. आपल्या या वारशात यहोवाच्या वचनातील सत्य, सार्वकालिक जीवनाची आशा, आणि सुवार्तेचे उद्घोषक या नात्याने देवाच्या वतीने बोलण्याचा बहुमान या सर्व गोष्टींचा समावेश आहे. यहोवाच्या साक्षीदारांमध्ये, अर्थात राज्य प्रचाराचे जीवनदायक कार्य ज्यांच्यावर सोपवण्यात आले आहे त्या खास लोकांच्या गटामध्ये तुम्ही आपल्या स्थानाची कदर करता का? आठवणीत असू द्या, स्वतः यहोवा ही खात्री देत म्हणतो, “तुम्ही माझे साक्षी आहा.”—यशया ४३:१०.
१६ तुम्ही स्वतःला असे प्रश्न विचारू शकता: ‘हा आध्यात्मिक वारसा मला किती मौल्यवान वाटतो? देवाची इच्छा पूर्ण करण्यास आपल्या जीवनात सर्वाधिक प्राधान्य देण्याइतपत मला त्याची कदर वाटते का? ज्यामुळे हा वारसा स्तोत्र ९१:१, २) यहोवाच्या संघटनेच्या आधुनिक इतिहासातील उल्लेखनीय घटनांवर पुनर्विचार केल्याने आपल्याला एका गोष्टीची पूर्ण खात्री पटेल. ती अशी, की कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही गोष्ट यहोवाच्या लोकांना या पृथ्वीवरून पूर्णपणे मिटवू शकत नाही.—यशया ५४:१७; यिर्मया १:१९.
गमवावा लागू शकतो अशा कोणत्याही मोहाचा खंबीररित्या प्रतिकार करण्याइतपत मला त्याची कदर वाटते का?’ आपला हा आध्यात्मिक वारसा आपल्यात आध्यात्मिक सुरक्षिततेची भावना निर्माण करतो; ही सुरक्षितता केवळ यहोवाच्या संघटनेतच अनुभवता येते. (१७. आपल्या आध्यात्मिक वारशावर अवलंबून राहण्याव्यतिरिक्त आणखी कशाची गरज आहे?
१७ अर्थात, आपण केवळ आपल्या आध्यात्मिक वारशावर अवलंबून राहू शकत नाही. आपल्यापैकी प्रत्येकाने देवासोबत एक घनिष्ट नातेसंबंध जोडला पाहिजे. फिलिप्पै येथील ख्रिश्चनांचा विश्वास मजबूत करण्याकरता अथक परिश्रम केल्यानंतर पौलाने त्यांना असे लिहिले: “माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहा, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसतानाहि, भीत व कापत आपले तारण साधून घ्या.” (फिलिप्पैकर २:१२) तारणाकरता आपण दुसऱ्या कोणावर अवलंबून राहू शकत नाही.
१८. ख्रिस्ती कार्यांत स्वतःला झोकून दिल्यामुळे ख्रिस्ती असण्याची आपली जाणीव कशाप्रकारे अधिकच तीव्र होते?
१८ ख्रिस्ती कार्यांत स्वतःला झोकून द्या. “एक व्यक्ती जे कार्य करते त्यामुळे तिची ओळख पटते” असे पाहण्यात आले आहे. आज ख्रिश्चनांना देवाच्या स्थापित राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याचे महत्त्वाचे कार्य नेमण्यात आले आहे. पौलाने म्हटले: “ज्याअर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्याअर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो.” (रोमकर ११:१३) आपले प्रचार कार्य आपल्याला जगापासून वेगळे करते आणि यात सहभाग घेतल्यामुळे ख्रिस्ती असण्याची आपली जाणीव आणखी बळकट होते. ख्रिस्ती सभा, उपासना स्थळांचे बांधकाम प्रकल्प, गरजू बांधवांना साहाय्य करणे यांसारख्या इतर ईश्वरशासित कार्यांत स्वतःला झोकून दिल्यामुळे ख्रिस्ती असण्याची आपली जाणीव अधिकच तीव्र होते.—गलतीकर ६:९, १०; इब्री लोकांस १०:२३, २४.
स्पष्ट ओळख, वास्तविक आशीर्वाद
१९, २०. (क) ख्रिस्ती असल्यामुळे व्यक्तिशः तुम्हाला कोणते फायदे झाले आहेत? (ख) आपण कोण आहोत याची खरी जाणीव आपल्याला कशामुळे मिळते?
१९ खरे ख्रिस्ती असल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे व आशीर्वाद अनुभवण्यास मिळतात याचा क्षणभर विचार करा. यहोवाकडून व्यक्तिशः ओळखले जाण्याचा बहुमान आपल्याला लाभला आहे. संदेष्टा मलाखी याने म्हटले: “परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांस बोलले; ते परमेश्वराने कान देऊन ऐकले, व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याजसमोर लिहिण्यात आली.” (मलाखी ३:१६) देव आपल्याला त्याचे मित्र म्हणून लेखू शकतो. (याकोब २:२३) आपल्या जीवनात उद्देश, सार्थता, आणि फलदायी ध्येये आहेत. आणि आपल्याला सार्वकालिक भविष्याची आशा देण्यात आली आहे.—स्तोत्र ३७:९.
२० आठवणीत असू द्या, तुमची खरी ओळख आणि मोल हे इतर लोक तुमच्याविषयी काय विचार करतात यावर नव्हे तर देव तुम्हाला कशा दृष्टिकोनातून पाहतो यावर अवलंबून आहे. इतरजण कदाचित आपल्याला अपरिपूर्ण मानवी दर्जांच्या तराजूत तोलतील. पण देवाचे प्रेम आणि त्याला आपल्याबद्दल वाटणारी काळजी यांमुळे आपल्याला आपले खरे मोल कळते—आपण त्याच्या मालकीचे आहोत. (मत्तय १०:२९-३१) शिवाय, देवाबद्दल आपल्याला वाटणारे प्रेम आपण कोण आहोत याची सुस्पष्ट जाणीव आणि आपल्या जीवनाला स्पष्ट दिशा मिळवून देते. “जर कोणी देवावर प्रीती करीत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे.”—१ करिंथकर ८:३.
[तळटीप]
^ परि. 4 कदाचित येशूच्या या शब्दांत जेरूसलेमच्या मंदिरातील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांविषयी अप्रत्यक्ष उल्लेख असावा. रात्रीच्या पहाऱ्याच्या वेळी, हे अधिकारी मंदिरात फेरी मारून सर्व लेवीय पहारेकरी जागे आहेत व आपापल्या ठिकाणी पहारा देत आहेत किंवा नाहीत हे तपासण्यासाठी जात. जर एखादा पहारेकरी झोपलेला आढळला तर त्याला काठीने मारले जायचे आणि त्याची वस्त्रे जाळून टाकली जात. ही एक लज्जास्पद शिक्षा होती.
तुम्हाला आठवते का?
• ख्रिश्चनांनी आपली आध्यात्मिक ओळख कायम ठेवणे का महत्त्वाचे आहे?
• आपण आपली ख्रिस्ती ओळख कशी स्थापित करू शकतो?
• कोणाची मर्जी राखावी असा प्रश्न उद्भवतो तेव्हा कोणत्या गोष्टी आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकतात?
• आपण कोण आहोत याची सतत जाणीव बाळगल्याने ख्रिस्ती या नात्याने आपल्या भविष्यावर कोणता प्रभाव पडू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२१ पानांवरील चित्रे]
ख्रिस्ती कार्यांत स्वतःला झोकून दिल्यामुळे ख्रिस्ती असण्याची आपली जाणीव अधिकच तीव्र होते