व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगास कोण अन्‍न पुरवेल?

जगास कोण अन्‍न पुरवेल?

जगास कोण अन्‍न पुरवेल?

जागतिक अन्‍नपुरवठा अभियान या संयुक्‍त राष्ट्राच्या, उपासमारी विरुद्ध लढा देणाऱ्‍या प्रतिनिधी संस्थेनुसार जवळजवळ ८० कोटी लोक, बहुधा मुले उपासमारीच्या उंबरठ्यावर उभी आहेत. अलिकडे या संस्थेने म्हटले की या परिस्थितीवर मात करण्यासाठी कित्येक विकसित राष्ट्रे, जी साधनसंपत्ती व लक्ष केंद्रित करू शकले असते ते त्यांनी, दहशतवादासारख्या इतर समस्यांना तोंड देण्याकरता खर्च केले. संसर्गजन्य रोग पसरल्याने ही समस्या आणखीनच गंभीर झाली आहे. आफ्रिकन राष्ट्रांत एड्‌सचा रोग अतिशय झपाट्याने पसरत आहे. या राष्ट्रांबद्दल सदर प्रतिनिधी संस्थेच्या जागतिक शालेय अन्‍नपुरवठा अहवालात असे म्हणण्यात आले: “एड्‌सने पालकांची एक संपूर्ण पिढी नाहीशी केली आहे. आईवडील गमवलेल्या या मुलांना स्वतःची तरतूद करणे भाग पडते, शिवाय, सहसा एका पिढीपासून दुसऱ्‍या पिढीला मिळणारी शेतीवाडी व दैनंदिन जीवनाबद्दलची मूलभूत माहिती त्यांच्यापैकी बहुतेकांना नसते.”

जागतिक अन्‍नपुरवठा अभियान एक मोहीम राबवत आहे, जिचा प्राथमिक हेतू मुलांना शाळेत किमान दिवसातील एक भोजन पुरवण्यास साहाय्य करणे हा आहे. या मोहिमेचा उद्देश फक्‍त मुलांना अन्‍न पुरवणे हा नसून नियमित शिक्षणाच्या माध्यमाने तरुणांमध्ये एचआयव्ही/एड्‌सला आळा घालण्याकरता तयार केलेल्या इतर कार्यक्रमांना चालना देणे हा आहे.

ही मोहीम ज्या ज्या ठिकाणी राबवण्यात आली आहे तेथे मुलांना चांगला आहार, वैयक्‍तिक स्वच्छतेचे प्रशिक्षण व इतर बाबतीत मदत मिळाली आहे. असेही लक्षात आले आहे की जेथे लोकांच्या वर्तनात परिवर्तन झाले तेथे एचआयव्ही/एड्‌सच्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे.

दुःखाची गोष्ट म्हणजे मनुष्याच्या प्रयत्नांचा परिणाम बहुधा अपूर्ण व अनिश्‍चित असतो. पण बायबल उपासमारीच्या समस्येला कायमचे सोडवण्यासाठी एक सांत्वनदायक आशा देते. स्तोत्र ७२:१६ म्हणते “भूमीत भरपूर पीक येवो.” देवाच्या राज्यात यहोवा देवाला लोक म्हणू शकतील: “तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजविली आहे; तू तिला फार फलद्रूप करितोस; . . . भूमि तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवितोस.”—स्तोत्र ६५:९.

[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]

WFP/Y. Yuge