व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्तम आचरण ‘देवाच्या शिक्षणास शोभा आणते’

उत्तम आचरण ‘देवाच्या शिक्षणास शोभा आणते’

उत्तम आचरण ‘देवाच्या शिक्षणास शोभा आणते’

रशियाच्या क्रान्स्नोयारस्क शहरातील मारियाला इतका गोड गळा लाभला आहे, की तिच्या शिक्षिकेने तिला शाळेच्या समूहगायकांमध्ये घातले. त्यानंतर लगेच मारियाने आपल्या एका शिक्षिकेला अगदी आदरपूर्वक सांगितले, की ती काही विशिष्ट गाणी गाऊ शकत नाही. का गाऊ शकत नाही? कारण बायबल आधारित विश्‍वासांमुळे ती धार्मिक अर्थाची गाणी गाऊ शकत नव्हती. हे ऐकून तिच्या शिक्षिकेला कळत नव्हते, की ‘गाण्याद्वारे देवाचे गौरव करण्यात काय चूक आहे?’

त्रैक्य देवाविषयी असलेले गीत आपण का गाणार नाही हे दाखवण्यासाठी मारियाने आपले बायबल काढून दाखवले, की देव आणि येशू ख्रिस्त एक देव नाहीत आणि पवित्र आत्मा देवाची कार्यकारी शक्‍ती आहे. (मत्तय २६:३९; योहान १४:२८; प्रेषितांची कृत्ये ४:३१) मारिया पुढे म्हणते: “याचा शिक्षिकेबरोबरच्या माझ्या नातेसंबंधावर परिणाम झाला नाही. तसं पाहायला गेलं, तर आमच्या शाळेत खूप चांगले शिक्षक आहेत. आम्ही आमचं मत प्रामाणिकपणे सांगतो ते त्यांना आवडतं.”

मारियाने शाळेच्या त्या सबंध वर्षभर, आपल्या शिक्षकांकडून व वर्गमित्रांकडून आदर मिळवला. मारिया म्हणते: “बायबल तत्त्वांनी मला माझ्या जीवनात मदत केली आहे. शाळेच्या शेवटल्या वर्षी मला, प्रामाणिकपणा व सुव्यवस्थितपणा यासाठी पारितोषिक मिळाले आणि माझ्या आईवडिलांना, आपल्या मुलीचे उत्तमरीत्या संगोपन केल्याबद्दल शाळेकडून एक आभारप्रदर्शनाचे पत्र मिळाले.”

ऑगस्ट १८, २००१ रोजी मारियाचा बाप्तिस्मा झाला. ती म्हणते: “मी यहोवा या अद्‌भुत देवाची सेवा करते म्हणून मला खूप आनंद वाटतो!” संपूर्ण जगभरातील तरुण साक्षीदार तीत २:१० वचनात जे म्हटले आहे ते पूर्ण करत आहेत; तिथे म्हटले आहे: ‘सर्व गोष्टीत आपला तारणारा देव ह्‍याच्या शिक्षणास शोभा आणा.’

[३२ पानांवरील चित्र]

मारियाचा बाप्तिस्मा झाल्यानंतर तिच्या आईवडिलांबरोबर

[३२ पानांवरील चित्र]

आभार-प्रदर्शन करणारे पत्र आणि योग्यतापत्र