आपली मुले—मोलाची संपत्ती
आपली मुले—मोलाची संपत्ती
“पाहा, संतति ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे.”—स्तोत्र १२७:३.
१. पहिले मानवी बाळ कशाप्रकारे जन्माला आले?
पहिला पुरुष व स्त्री यांना विशिष्टप्रकारे निर्माण करून यहोवा देवाने किती अद्भूत घटना घडवून आणल्या याचा विचार करा. पिता आदाम आणि माता हव्वा या दोघांचा अंश असलेला एक लहानसा जीव हव्वेच्या उदरात वाढू लागला आणि कालांतराने एक नवीन व्यक्ती—पहिले मानवी बाळ जन्माला आले. (उत्पत्ति ४:१) आजपर्यंत, गर्भधारणा व बाळाचा जन्म या घटना आपल्याला आश्चर्यचकित करतात. बरेचजण तर याला एक चमत्कार म्हणतात.
२. गर्भवती स्त्रीच्या उदरात जे घडून येते त्याला एक चमत्कार का म्हणता येईल?
२ पिता व माता यांच्या संयोगामुळे, मातेच्या शरीरात निर्माण झालेली मूळ पेशी, जवळजवळ २७० दिवसांच्या अवधीत वाढत जाऊन अब्जावधी पेशी असलेल्या बाळाच्या शरीरात रूपांतरीत होते. २०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती त्या मूळ पेशीतच असते. ही अद्भूत माहिती मानवांच्या आकलनापलीकडे असली तरी, याच माहितीच्या आधारावर अत्यंत गुंतागुंतीची रचना असलेल्या या पेशी अगदी अचूक प्रकारे विकसित होतात आणि एका नव्या सजीव व्यक्तीची निर्मिती होते!
३. नव्या जिवंत मानवाचा जन्म देवच घडवून आणू शकतो ही गोष्ट बरेच विचारशील लोक का मान्य करतात?
३ तुमच्या मते, या बाळाला मुळात कोण निर्माण करतो? साहजिकच, ज्याने प्रथम जीवनाची निर्मिती केली तोच. बायबलमधील स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “परमेश्वर हाच देव आहे हे जाणा; [“आम्ही स्वतः नव्हे तर,” NW] त्यानेच आम्हाला उत्पन्न केले.” (स्तोत्र १००:३) आईवडिलांनो, तुमचे लाडके, गोजिरवाणे बाळ तुम्ही आपल्या वैयक्तिक सामर्थ्याने निर्माण केले नाही. अमर्याद बुद्धी असलेला देवच एका नव्या सजीव मानवी व्यक्तीची अद्भुत निर्मिती घडवून आणू शकतो. हजारो वर्षांपासून विचारशील व्यक्तींनी आईच्या उदरात वाढणाऱ्या बाळाचे श्रेय महान निर्माणकर्त्याला दिले आहे. तुम्हीही त्यालाच श्रेय देता का?—स्तोत्र १३९:१३-१६.
४. मानवांमध्ये असलेला कोणता दोष कधीही यहोवाच्या ठायी असू शकत नाही?
४ पण यहोवा एक भावनाशून्य निर्माणकर्ता आहे का? स्त्रीपुरुष ज्याद्वारे संतती उत्पन्न करू शकतील अशी केवळ एक प्रक्रिया त्याने निर्माण केली आहे का? काही मानव भावनाशून्य असतात, पण यहोवा तसा मुळीच नाही. (स्तोत्र ७८:३८-४०) स्तोत्र १२७:३ येथे बायबल म्हणते: “पाहा, संतति ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे.” हे धन म्हणजे काय आणि आपली मुले धन आहेत हे आपण कशावरून म्हणू शकतो याविषयी आता थोडा विचार करू या.
धन व देणगी
५. मुलांना वारसा का म्हणता येईल?
५ धन असे भाषांतर केलेल्या मूळ भाषेतील शब्दाचा अर्थ खरे तर वारसा असा होतो. आपल्यामागे आपल्या मुलांना वारसा मिळावा म्हणून आईवडील खूप कष्ट करतात. हा वारसा पैशाच्या, जमीनजुमल्याच्या किंवा एखाद्या मोलवान वस्तूच्या रूपात असू शकतो. काहीही असो, तो आईवडिलांच्या प्रेमाचा पुरावा असतो. बायबल म्हणते की देवाने आईवडिलांना मुलांच्या रूपात एक वारसा दिला आहे. प्रेमाने दिलेली एक भेट. तुमची मुले ही विश्वाच्या निर्माणकर्त्याने तुम्हाला दिलेली भेट आहेत असा तुमचा त्यांच्याविषयी दृष्टिकोन आहे का? हे तुमच्या कृतींवरून दिसून येते का?
६. मानवांना संतती उत्पन्न करण्याची क्षमता देण्यामागे देवाचा काय उद्देश होता?
६ हा वारसा देण्यामागचा यहोवाचा उद्देश असा होता की ही पृथ्वी आदाम व हव्वा यांच्या संततीने भरावी. (उत्पत्ति १:२७, २८; यशया ४५:१८) कोट्यवधी देवदूतांपैकी प्रत्येकाला ज्याप्रमाणे यहोवाने स्वतः निर्माण केले त्याप्रमाणे त्याने प्रत्येक मानवाला स्वतः निर्माण केले नाही. (स्तोत्र १०४:४; प्रकटीकरण ४:११) त्याऐवजी, देवाने मानवांना, स्वतःसारखेच गुण असलेली संतती उत्पन्न करण्याच्या क्षमतेसह निर्माण केले. आपले गुण असलेल्या एका नव्या व्यक्तीला जगात आणून तिचे पालनपोषण करण्याचा किती अद्भूत विशेषाधिकार आईवडिलांना लाभला आहे! हा मौल्यवान वारसा तुम्हाला दिल्याबद्दल, पालक या नात्याने तुम्ही यहोवाचे आभार मानता का?
येशूच्या उदाहरणावरून शिका
७. काही पालकांच्या वागणुकीच्या विपरीत, येशूने ‘मनुष्यजातीबद्दल’ आपलेपणा आणि दया कशी दाखवली?
७ दुःखाची गोष्ट म्हणजे, सगळेच पालक आपल्या मुलांना देवाने दिलेली देणगी समजत नाहीत. कित्येकजण आपल्या मुलांशी दयाळूपणे वागत नाहीत. अशाप्रकारे वागणारे पालक यहोवाच्या किंवा त्याच्या पुत्राच्या मनोवृत्तीचे अनुकरण करत नाहीत. (स्तोत्र २७:१०; यशया ४९:१५) याउलट, येशूला लहान मुलांबद्दल किती आपलेपणा वाटत होता याचा विचार करा. या पृथ्वीवर मानवी रूपात येण्याअगोदरच, स्वर्गात एक शक्तिशाली आत्मिक व्यक्ती असताना येशू “मनुष्यजातीच्या ठायी . . . आनंद पावे” असे बायबल सांगते. (नीतिसूत्रे ८:३१) त्याला मानवांबद्दल इतके प्रेम होते की आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून त्याने त्याचे जीवन खंडणी म्हणून अर्पण केले.—मत्तय २०:२८; योहान १०:१८.
८. येशूने आईवडिलांकरता उत्तम आदर्श कसा पुरवला?
८ पृथ्वीवर असताना, येशूने आईवडिलांकरता विशेषतः उत्तम आदर्श पुरवला. त्याने काय केले हे लक्षात घ्या. इतर कार्यांत व्यग्र असताना व मानसिक तणावाखाली असतानाही त्याने मुलांसाठी वेळ दिला. बाजारपेठेत खेळणाऱ्या मुलांकडे त्याने लक्ष दिले आणि त्यांच्या वागणुकीच्या काही वैशिष्ट्यांच्या आधारावर त्याने आपल्या शिष्यांना शिकवले. (मत्तय ११:१६, १७) जेरूसलेमला शेवटल्या वेळी जाताना येशूला माहीत होते की तेथे गेल्यावर त्याला यातना सोसून मृत्यूला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे लोकांनी आपल्या लहान मुलांना त्याच्याकडे आणले तेव्हा येशूच्या शिष्यांनी, त्याला आणखी मानसिक ताण येऊ नये म्हणून मुलांना तेथून घालवून देण्याचा प्रयत्न केला. पण येशू आपल्या शिष्यांवर रागावला. तो त्यांना म्हणाला: “बाळकास माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका.” लहान मुलांच्या सहवासात येशूला किती “आनंद” वाटायचा हे यावरून दिसून येते.—मार्क १०:१३, १४.
९. शब्दांपेक्षा आपल्या कृती जास्त महत्त्वाच्या का असतात?
९ आपण येशूच्या उदाहरणावरून शिकू शकतो. लहान मुले आपल्याजवळ येतात तेव्हा आपण काय करतो? कधीकधी मुले आपल्याजवळ येतात तेव्हा आपण कामात असतो, मग अशावेळी आपली प्रतिक्रिया काय असते? येशूसारखी असते का? मुलांना आपल्या आईवडिलांकडून मुळात जे हवे असते, ते त्यांना देण्यास येशू उत्सुक होता—त्याचा वेळ आणि लक्ष. “माझे तुझ्यावर प्रेम आहे” असे मुलांना सांगणे महत्त्वाचे आहे, यात शंका नाही. पण शब्दांपेक्षा कृती जास्त बोलक्या असतात. तुम्ही जे बोलता त्यावरूनच नव्हे तर तुमच्या कृत्यांतून तुमचे प्रेम व्यक्त होते. तुम्ही आपल्या मुलांकरता किती वेळ व लक्ष देण्यास तयार आहात, तुम्ही त्यांची किती काळजी घेता यावरून ते दिसून येते. पण हे सर्व करूनही तुम्हाला काही ठळक परिणाम कदाचित दिसून येणार नाहीत, निदान तुम्ही जितक्या लवकर अपेक्षा केली होती तितक्या लवकर ते दिसून येणार नाहीत. धीर धरण्याची गरज आहे. येशू आपल्या शिष्यांशी जसा वागला त्याचे अनुकरण करण्याद्वारे आपण धीर धरायला शिकू शकतो.
येशूचा धीर व प्रेमळपणा
१०. येशूने आपल्या शिष्यांना नम्रतेविषयी कशाप्रकारे शिकवले आणि त्याला लगेच यश आले का?
१० आपल्या शिष्यांमध्ये, एकमेकांपेक्षा वरचढ होण्यासाठी चाललेल्या चढाओढीची येशूला कल्पना होती. एके दिवशी, शिष्यांसोबत कफर्णहूम येथे आल्यावर त्याने त्यांना विचारले: “‘तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता?’ ते गप्प राहिले, कारण सर्वात मोठा कोण ह्याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती.” त्यांना रागाने ताकीद देण्याऐवजी येशूने धीराने त्यांना प्रत्यक्ष उदाहरण त्यांच्यापुढे मांडून नम्रतेविषयी शिकवण्याचा प्रयत्न केला. (मार्क ९:३३-३७) असे केल्यामुळे अपेक्षित परिणाम दिसून आला का? लगेच दिसून आला नाही. सुमारे सहा महिन्यांनंतर याकोब व योहान यांनी आपल्या आईकडून येशूला विनंती केली की त्याच्या राज्यात त्याने आपल्याला महत्त्वाची पदे द्यावीत. पुन्हा एकदा येशूने धीराने त्यांच्या विचारसरणीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.—मत्तय २०:२०-२८.
११. (क) येशूसोबत माडीवरच्या खोलीत आल्यानंतर पारंपरिक प्रथेनुसार येशूच्या प्रेषितांनी काय केले नाही? (ख) येशूने काय केले आणि त्याचे प्रयत्न त्यावेळी सार्थक झाले का?
११ काही काळातच सा.यु. ३३ सालचा वल्हांडण सण आला. येशूने या प्रसंगी एकांतात आपल्या प्रेषितांसोबत १ शमुवेल २५:४१; १ तीमथ्य ५:१०) आपले शिष्य अजूनही प्रतिष्ठित पदांची महत्त्वाकांक्षा बाळगतात हे पाहून येशूला किती वाईट वाटले असेल याची कल्पना करा! तेव्हा येशूने स्वतः प्रत्येक शिष्याचे पाय धुतले आणि इतरांची सेवा करण्याच्या या आपल्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचे त्यांना आग्रहपूर्वक विनवले. (योहान १३:४-१७) त्यांनी यानुसार केले का? बायबल सांगते की नंतर त्या संध्याकाळी “आपणांमध्ये कोण मोठा मानला जात आहे, ह्याविषयीहि त्यांच्यामध्ये वाद झाला.”—लूक २२:२४.
तो साजरा केला. माडीवरच्या एका खोलीत ते आले तेव्हा त्याच्या १२ प्रेषितांपैकी एकानेही पारंपरिक प्रथेनुसार इतरांचे धुळीने माखलेले पाय धुण्यास पुढाकार घेतला नाही. हे काम सहसा घरातील सेवक किंवा स्त्री करत असे. (१२. आपल्या मुलांना वळण लावताना आईवडील कशाप्रकारे येशूचे अनुकरण करू शकतात?
१२ तुमची मुले वारंवार सांगितल्यावरही तुमचे ऐकत नाहीत तेव्हा तुम्ही पालक येशूला कसे वाटले असावे ते जाणण्याचा प्रयत्न करता का? प्रेषित स्वतःत सुधारणा करण्याच्या बाबतीत धीमे होते तरीसुद्धा, येशूने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करण्याचे सोडले नाही. त्याने धीर धरल्यामुळे शेवटी त्याच्या प्रयत्नांचे चीज झाले. (१ योहान ३:१४, १८) आईवडिलांनो, येशूच्या प्रेमाचे व धीराचे अनुकरण करा; आपल्या मुलांना वळण लावताना निराश होऊन प्रयत्न करण्याचे कधीही सोडू नका.
१३. मुले प्रश्न विचारायला येतात तेव्हा आईवडिलांनी त्यांना चिडून तेथून घालवून का देऊ नये?
१३ आपले आईवडील आपल्यावर प्रेम करतात आणि आपल्यात रस घेतात याची मुलांना जाणीव झाली पाहिजे. येशूला आपल्या शिष्यांचे विचार जाणून घेण्याची उत्सुकता होती त्यामुळे त्यांचे प्रश्न तो लक्ष देऊन ऐकत असे. विशिष्ट विषयांवर त्यांचे मत काय आहे हे तो त्यांना विचारत असे. (मत्तय १७:२५-२७) होय, चांगल्याप्रकारे शिकवण्याकरता लक्षपूर्वक ऐकणे आणि मनस्वी आस्था बाळगणे गरजेचे आहे. मुले प्रश्न विचारायला येतात तेव्हा चिडून, “जा म्हटलं ना! मी कामात आहे, दिसत नाही का?” असे म्हणून त्यांना कधीही घालवून देऊ नका. आईवडील खरोखरच कामात असतील तर आपण नंतर याविषयी बोलू असे त्यांनी मुलांना सांगितले पाहिजे. आणि नंतर आठवणीने त्या विषयावर मुलांशी बोलण्याची पालकांनी खात्री केली पाहिजे. असे केल्यामुळे मुलाला जाणीव होईल की आईवडिलांना खरोखरच आपल्याबद्दल आस्था आहे आणि यामुळे मूल आपल्या आईवडिलांजवळ जास्त मोकळेपणाने भावना व्यक्त करेल.
१४. आपल्या मुलांबद्दल प्रेम व्यक्त करण्याच्या बाबतीत आईवडील येशूकडून काय शिकू शकतात?
१४ आईवडिलांनी आपल्या मुलांना प्रेमाने जवळ घेणे योग्य आहे का? पुन्हा एकदा आईवडील येशूकडून शिकू शकतात. बायबल सांगते की “त्याने [मुलांना] कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.” (मार्क १०:१६) त्या लहान मुलांची काय प्रतिक्रिया असावी असे तुम्हाला वाटते? नक्कीच त्यांना आनंद झाला असेल आणि येशू त्यांना आवडू लागला असेल! आईवडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांबद्दल खरी आपुलकी व प्रेम व्यक्त केल्यास तुम्ही त्यांना शिस्त लावण्याचा व शिकवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते तुम्हाला अधिक चांगला प्रतिसाद देतील.
किती वेळ द्यावा हा प्रश्न
१५, १६. मुलांच्या संगोपनाच्या संदर्भात एक लोकप्रिय संकल्पना कोणती आहे आणि ती कशामुळे उत्पन्न झाली?
१५ आईवडिलांनी आपल्या मुलांना भरपूर वेळ व लक्ष देण्याची खरोखरच गरज आहे का याविषयी काहीजण शंका व्यक्त करतात. मुलांच्या संगोपनाच्या संदर्भात दर्जेदार वेळ अशी एक संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. या संकल्पनेच्या समर्थकांचे असे मत आहे की आईवडिलांनी मुलांना बराच वेळ देण्याची गरज नाही, पण जो काही वेळ ते आपल्या मुलांसोबत घालवतात तो अर्थपूर्ण व पूर्वनियोजित असला पाहिजे. दर्जेदार वेळाची संकल्पना खरोखरच चांगली आहे का, ती लहान मुलांच्या हिताचा विचार करून पुढे आणण्यात आली आहे का?
१६ अनेक मुलांची मुलाखत घेतलेल्या एका लेखकाने म्हटले की मुलांना “आपल्या आईवडिलांकडून सर्वात जास्त काय हवे आहे, तर आणखी वेळ” आणि “त्यांचे पूर्ण लक्ष.” एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी यासंदर्भात एक विचारप्रवर्तक विधान केले. ते म्हणतात, “[दर्जेदार वेळ] ही संज्ञा खरे तर आईवडिलांना वाटणाऱ्या दोषभावनेतून निर्माण झाली आहे. आपल्या मुलांसोबत कमी वेळ घालवण्याकरता ही काही लोकांनी शोधून काढलेली सबब आहे.” मग आईवडिलांनी आपल्या मुलांसोबत नेमका किती वेळ घालवण्यास हवा?
१७. मुलांना आपल्या आईवडिलांकडून काय हवे आहे?
१७ बायबलमध्ये हे सांगितलेले नाही. पण इस्राएली आईवडिलांना त्यांच्या मुलांसोबत घरात असताना, मार्गाने चालताना, अनुवाद ६:७) यावरून स्पष्ट होते, की आईवडिलांनी दररोज, सतत आपल्या मुलांच्या सहवासात राहून त्यांना शिकवले पाहिजे.
निजताना, उठताना बोलण्याचे प्रोत्साहन देण्यात आले होते. (१८. येशूने आपल्या शिष्यांना प्रशिक्षण देण्याकरता प्रत्येक संधीचा कशाप्रकारे उपयोग केला आणि यातून आईवडील काय शिकू शकतात?
१८ येशूने आपल्या शिष्यांना त्यांच्यासोबत जेवताना, प्रवास करताना व विश्रांती घेतानाही त्यांना प्रशिक्षण दिले, व त्याची ही पद्धत यशस्वी ठरली. त्याने आपल्या शिष्यांना शिकवण्याकरता प्रत्येक संधीचा उपयोग केला. (मार्क ६:३१, ३२; लूक ८:१; २२:१४) त्याचप्रकारे, ख्रिस्ती आईवडिलांनीही जागरूक राहावे व आपल्या मुलांसोबत उत्तम संवाद साधण्याकरता व तो कायम राखण्याकरता तसेच त्यांना यहोवाच्या मार्गाचे शिक्षण देण्याकरता प्रत्येक संधीचा उपयोग करावा.
काय शिकवावे व कशाप्रकारे
१९. (क) मुलांच्या सहवासात वेळ घालवण्याशिवाय आणखी काय महत्त्वाचे आहे? (ख) आईवडिलांनी आपल्या मुलांना सर्वप्रथम काय शिकवले पाहिजे?
१९ मुलांच्या सहवासात केवळ वेळ घालवणे आणि त्यांना शिकवणे हे यशस्वीरित्या त्यांचे संगोपन करण्याकरता पुरेसे नाही. आपण मुलांना काय शिकवतो याचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. हे कसे केले जावे याविषयी बायबल काय सांगते याकडे लक्ष द्या. ते म्हणते, “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे . . . त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव.” मुलांना शिकवण्यासारख्या या “गोष्टी” कोणत्या आहेत? नुकताच ज्यांचा उल्लेख करण्यात आला होता त्याच या गोष्टी आहेत, अर्थात: “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीति कर.” (अनुवाद ६:५-७) येशूने म्हटले की हीच देवाची सर्वात महत्त्वाची आज्ञा आहे. (मार्क १२:२८-३०) आईवडिलांनी सर्वप्रथम मुलांना यहोवाबद्दल शिकवले पाहिजे, केवळ त्याच्यावरच संपूर्ण मनाने व जिवाने प्रेम का करावे आणि केवळ त्याचीच उपासना का करावी हे त्यांना शिकवले पाहिजे.
२०. प्राचीन काळातील आईवडिलांना आपल्या मुलांना काय शिकवण्याची देवाने आज्ञा दिली होती?
२० पण आईवडिलांनी मुलांना ‘ज्या गोष्टी’ शिकवाव्यात असे त्यांना सांगण्यात आले आहे, त्यांत केवळ देवावर पूर्ण मनाने प्रेम करण्याचाच समावेश होत नाही. अनुवादाच्या पुस्तकातील याआधीच्या अध्यायाकडे लक्ष दिल्यास, देवाने दगडी पाट्यांवर लिहिलेल्या दहा आज्ञा किंवा नियम मोशेने पुन्हा एकदा इस्राएल राष्ट्राला सांगितले असे आढळेल. या नियमांत लबाडी, चोरी, मानवहत्या व व्यभिचार या गोष्टींची मनाई करणारे नियम आहेत. (अनुवाद ५:११-२२) त्याअर्थी, प्राचीन काळातील आईवडिलांना आपल्या मुलांच्या मनात नैतिक मूल्ये बिंबवण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले होते. आज ख्रिस्ती आईवडिलांनीही आपल्या मुलांना सुरक्षित व आनंदी भविष्याचा उपभोग घेण्यास मदत करण्यासाठी अशाचप्रकारचे शिक्षण दिले पाहिजे.
२१. मुलांच्या मनावर देवाचे वचन “बिंबव” अशी जी सूचना देण्यात आली तिचा काय अर्थ होतो?
२१ “या गोष्टी” किंवा नियम आपल्या लहान मुलांना कशाप्रकारे शिकवावेत हेही पालकांना सांगण्यात आले होते याकडे लक्ष द्या. “त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव” असे त्यांना सांगण्यात आले होते. “बिंबव” या शब्दाचा अर्थ “वारंवार सांगून किंवा बजावून शिकवणे व ठसा पाडणे: प्रोत्साहन देणे किंवा मनावर ठसवणे” असा होतो. तेव्हा एका अर्थाने देवाने आईवडिलांना आपल्या मुलांकरता बायबल शिक्षणाचा सुनियोजित नित्यक्रम आखून त्याद्वारे आपल्या मुलांच्या मनावर आध्यात्मिक गोष्टी ठसवण्याची आज्ञा दिली.
२२. आपल्या मुलांना शिकवण्याकरता इस्राएली पालकांना काय करण्यास सांगण्यात आले होते आणि याचा काय अर्थ होतो?
२२ अशा सुनियोजित नित्यक्रमाकरता आईवडिलांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. बायबल म्हणते: “त्या [“या गोष्टी,” किंवा देवाच्या आज्ञा] आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी अनुवाद ६:८, ९) याचा अर्थ आईवडिलांनी खरोखरच देवाचे नियम आपल्या घराच्या दारावर लिहावेत किंवा मुलांच्या हातावर या नियमांची प्रत बांधावी किंवा डोळ्यांच्या मध्यभागी ठेवावी असा नाही. उलट, येथे असे सांगण्यात आले आहे की आईवडिलांनी सदोदीत देवाच्या शिकवणुकी आपल्या मुलांच्या समोर ठेवाव्यात. मुलांना नियमितरित्या किंवा सातत्याने शिकवले पाहिजे, जेणेकरून देवाच्या शिकवणुकी सतत त्यांच्यासमोर राहतील.
म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाह्यांवर व आपल्या फाटकांवर त्या लिही.” (२३. पुढच्या आठवड्याच्या अभ्यासात कशाविषयी चर्चा केली जाईल?
२३ आईवडिलांनी मुलांना शिकवाव्यात अशा कोणत्या काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत? मुलांना स्वतःचे संरक्षण करण्यास शिकवणे व प्रशिक्षित करणे आजच्या काळात इतके महत्त्वाचे का आहे? आपल्या मुलांना परिणामकारकरित्या शिकवण्याकरता आईवडिलांकडे आता कोणते साधन उपलब्ध आहे? आईवडिलांच्या मनात उद्भवणाऱ्या या व अशा इतर प्रश्नांची उत्तरे पुढील लेखात विचारात घेतली आहेत. (w०५ ४/१)
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• आईवडिलांनी आपल्या मुलांना मौल्यवान का समजावे?
• आईवडील व इतरजण येशूकडून काय शिकू शकतात?
• आईवडिलांनी आपल्या मुलांकरता किती वेळ खर्च करावा?
• मुलांना काय शिकवले पाहिजे आणि त्यांना कशाप्रकारे शिकवले पाहिजे?
[अभ्यासाचे प्रश्न]