व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एक भयंकर दुर्घटना

एक भयंकर दुर्घटना

एक भयंकर दुर्घटना

अडीच वर्षांचा ओअन बाथरूममध्ये खेळत असताना, एक भयंकर दुर्घटना घडली. औषधांच्या कपाटापर्यंत कधी त्याचा हात पुरेल असं त्याच्या आईबाबांना स्वप्नातही वाटलं नसेल. पण कसाबसा तो तिथपर्यंत चढला. कपाटातल्या वस्तू पाहताना एका विशिष्ट बाटलीकडे त्याचं लक्ष गेलं. त्यानं ती उघडली आणि त्यातलं औषध पिऊन टाकलं.

बाटलीत एक दाहक ॲसिड होतं. चिमुकल्या ओअनचा मृत्यू झाला. त्याच्या आईबाबांवर आभाळ कोसळलं. सांत्वनाकरता ओअनचे वडील पर्सी, पाळकांकडे गेले. “असं का घडलं?” या प्रश्‍नाचं त्यांना उत्तर हवं होतं. पाळकानं उत्तर दिलं, “देवाला स्वर्गात आणखी एक लहानसा देवदूत हवा होता.” आपल्या लाडक्या मुलाच्या मृत्यूने उद्ध्‌वस्त झालेल्या पर्सीच्या मते हा अन्याय होता. ही दुर्घटना घडावी अशी खरच देवाची इच्छा असावी का? पर्सी अतिशय निराश झाला आणि त्यानं चर्चला जायचं सोडून दिलं.

या घटनेनंतर पर्सी विचार करू लागला: ‘माझ्या ओअनला अजूनही यातना होत असतील का? मला पुन्हा कधी त्याला पाहायला मिळेल का?’

मृत्यू होतो तेव्हा नेमके काय घडते आणि आपल्या प्रिय व्यक्‍तींचा मृत्यू झाल्यानंतर भविष्यात कधी त्यांच्याशी पुन्हा भेट होणे शक्य आहे का, असा कदाचित तुम्हीही विचार केला असेल. देवाचे वचन, बायबल यात या प्रश्‍नांची उत्तरे आहेत. अशाप्रकारच्या दुर्घटनांना तोंड दिलेल्या सर्वांकरता बायबलमध्ये सुस्पष्ट व सांत्वनदायक उत्तरे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यात देवाने प्रतिज्ञा केलेल्या एका अद्‌भूत आशेविषयी माहिती दिली आहे. ही अद्‌भूत आशा आहे, पुनरुत्थान.

या आश्‍चर्यकारक आशेबद्दल आणखी जाणून घेण्याकरता कृपया पुढील लेख वाचावा. (w०५ ५/१)