पुनरुत्थान—तुमच्या जीवनाशी संबंधित असलेली शिकवणूक
पुनरुत्थान—तुमच्या जीवनाशी संबंधित असलेली शिकवणूक
‘नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी . . . आशा मी देवाकडे पाहून धरितो.’—प्रेषितांची कृत्ये २४:१५.
१. पुनरुत्थानाचा मुद्दा सन्हेद्रिनात कशामुळे उपस्थित झाला?
सा.यु. ५६ साली आपल्या तिसऱ्या मिशनरी यात्रेच्या समाप्तीला प्रेषित पौल जेरूसलेममध्ये होता. रोमनांनी त्याला अटक केल्यानंतर त्याला सन्हेद्रिन या यहुद्यांच्या उच्च न्यायालयात हजर होण्याची परवानगी देण्यात आली. (प्रेषितांची कृत्ये २२:२९, ३०) त्या न्यायालयातील सदस्यांकडे पौलाने पाहिले तेव्हा त्याला दिसले की त्यांच्यापैकी काहीजण सदूकी होते तर काही परुशी. या दोन गटांत एक मुख्य फरक होता. सदूकी पुनरुत्थान मानत नव्हते, तर परुशी ते मानत होते. या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पौलाने असे घोषित केले: “बंधुजनहो, मी परूशी व परूश्यांचा पुत्र आहे; आमची आशा व मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्यांसंबंधाने माझी चौकशी होत आहे.” असे म्हणून पौलाने त्या सभेला गोंधळात टाकले!—प्रेषितांची कृत्ये २३:६-९.
२. पुनरुत्थानावरील आपल्या विश्वासाचे समर्थन करण्यास पौल का सुसज्ज होता?
२ बऱ्याच वर्षांपूर्वी दमिष्काच्या वाटेवर असताना पौलाला एक दृष्टान्त झाला होता आणि या दृष्टान्तात त्याला येशूची वाणी ऐकू आली. पौलाने येशूला विचारलेही होते: “प्रभुजी, मी काय करावे?” तेव्हा येशूने उत्तर दिले होते, “उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.” दमिष्कात आल्यावर पौलाला हनन्या नावाच्या एका ख्रिस्ती शिष्याने शोधून काढले व त्याने पौलाला सांगितले, “आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरविले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे; आणि त्या नीतिमान पुरुषाला [पुनरुत्थित येशूला] पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी.” (प्रेषितांची कृत्ये २२:६-१६) साहजिकच, पुनरुत्थानावरील आपल्या विश्वासाचे समर्थन करण्यास पौल अगदी सुसज्ज होता.—१ पेत्र ३:१५.
पुनरुत्थानाच्या आशेची जाहीर घोषणा
३, ४. पौल पुनरुत्थानाच्या शिकवणुकीचा कट्टर समर्थक होता असे का म्हणता येईल आणि त्याच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?
३ नंतर पौलाला सुभेदार फेलिक्स याच्यापुढे नेण्यात आले. त्याप्रसंगी, पौलाविरुद्धच्या खटल्यात यहुद्यांच्या वतीने बोलणाऱ्या तिर्तुल्ल नावाच्या वकीलाने पौलावर एका पंथाचा पुढारी व बंड उठविणारा असल्याचा आरोप लावला. आपली बाजू मांडताना पौलाने स्पष्टपणे सांगितले: “मी आपणाजवळ इतके कबूल करितो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखात आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी आमच्या पूर्वजांच्या देवाची सेवा करितो.” मग मुख्य मुद्द्याकडे वळून तो म्हणाला: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा ते धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरितो.”—प्रेषितांची कृत्ये २३:२३, २४; २४:१-८, १४, १५.
४ जवळजवळ दोन वर्षांनंतर फेलिक्सच्या जागेवर आलेल्या पुर्क्य फेस्त याने कैदेत असलेल्या पौलाची न्यायचौकशी करण्याकरता राजा हेरोद अग्रिप्पा यास निमंत्रण दिले. फेस्ताने राजाला माहिती दिली की “जो जिवंत आहे असे पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू” याच्याविषयी पौलावर आरोप करणाऱ्यांमध्ये वाद झाला होता. आपल्या बचावात पौलाने विचारले: “देव मेलेल्यांना उठवितो हे तुम्हापैकी कित्येकास अविश्वसनीय का वाटावे?” मग प्रेषितांची कृत्ये २४:२७; २५:१३-२२; २६:८, २२, २३) खरोखर, पौल पुनरुत्थानाच्या शिकवणुकीचा कट्टर समर्थक होता! पौलाप्रमाणे आपणही, पुनरुत्थान अवश्य होईल असे पूर्ण खात्रीने घोषित करावे. पण लोकांकडून आपण कशाप्रकारच्या प्रतिक्रियेची अपेक्षा करू शकतो? पौलाला जशी प्रतिक्रिया मिळाली तशीच आपल्यालाही मिळाल्यास नवल वाटू नये.
त्याने असे घोषित केले, “देवापासून साहाय्य प्राप्त झाल्यामुळे मी आजपर्यंत लहान मोठ्यांस साक्ष देत राहिलो आहे; आणि ज्या गोष्टी होणार आहेत म्हणून संदेष्ट्यांनी व मोशेने सांगितले, त्याखेरीज मी दुसरे काही सांगत नाही; त्या अशा की, ख्रिस्ताने दुःख सोसणारे व्हावे आणि त्यानेच मेलेल्यातून उठणाऱ्यांपैकी पहिले होऊन आमच्या लोकांस व परराष्ट्रीयांसहि प्रकाश प्रकट करावा.” (५, ६. (क) पुनरुत्थानाचे समर्थन करणाऱ्या प्रेषितांना लोकांकडून कशी प्रतिक्रिया मिळाली? (ख) पुनरुत्थानाविषयीची आपली आशा व्यक्त करताना, कोणती गोष्ट महत्त्वाची आहे?
५ याआधी, पौलाच्या दुसऱ्या मिशनरी यात्रेदरम्यान (सुमारे सा.यु. ४९-५२ साली) त्याने अथैने शहरास भेट दिली तेव्हा जे घडले होते यावर विचार करा. तेथील लोक अनेक दैवतांची उपासना करीत होते. पौलाने त्यांच्याशी तर्कवाद केला व देवाने नियुक्त केलेल्या एका माणसाद्वारे सबंध पृथ्वीवरील लोकांचा धार्मिकतेने न्याय करण्याचा त्याचा जो उद्देश आहे त्याकडे लक्ष देण्याचे पौलाने लोकांना आवाहन केले. देवाने नियुक्त केलेला हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून येशूच होता. पौलाने त्यांना समजावून सांगितले की देवाने येशूचे पुनरुत्थान करण्याद्वारे याची हमी दिली. यावर लोकांची प्रतिक्रिया काय होती? अहवालात म्हटले आहे: “मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.”—प्रेषितांची कृत्ये १७:२९-३२.
६ हीच प्रतिक्रिया सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या काही काळानंतरच पेत्र व योहानालाही अनुभवायला मिळाली होती. पुन्हा एकदा या विवादात सदूक्यांची मुख्य भूमिका होती. प्रेषितांची कृत्ये ४:१-४ यात या घटनेचा अहवाल अशाप्रकारे दिला आहे: “ते लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदूकी हे चालून आले; कारण ते लोकांना शिक्षण देऊन, येशूच्या द्वारे मेलेल्यांतून पुन्हा उठणे आहे असे, प्रसिद्धपणे सांगत होते, ह्याचा त्यांना संताप आला.” पण सर्वांचीच अशी वाईट प्रतिक्रिया नव्हती. “वचन ऐकणाऱ्यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार झाली.” यावरून हेच स्पष्ट होते, आपण पुनरुत्थानाच्या आशेविषयी बोलतो तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असू शकतात. हे लक्षात ठेवून, या शिकवणुकीवरचा आपला स्वतःचा विश्वास मजबूत करणे महत्त्वाचे आहे.
विश्वास व पुनरुत्थान
७, ८. (क) पहिल्या शतकातील करिंथच्या मंडळीला लिहिलेल्या पत्रात, विश्वास कशाप्रकारे व्यर्थ ठरू शकतो? (ख) पुनरुत्थानाची आशा खरे ख्रिस्ती वेगळे असल्याचे कसे दाखवते?
७ पहिल्या शतकात ख्रिस्ती बनलेल्या सर्वांनाच पुनरुत्थानाच्या आशेचा स्वीकार करणे सोपे गेले नाही. ज्यांना या शिकवणुकीचा स्वीकार करणे जड गेले त्यांच्यापैकी काहीजण करिंथच्या मंडळीत होते. त्यांना उद्देशून पौलाने असे लिहिले: “मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला; तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले.” ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी मग पौलाने सांगितले की पुनरुत्थान झाल्यावर येशू “एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला.” या बंधूंपैकी बहुतेकजण अजूनही हयात आहेत याकडेही पौलाने त्यांचे लक्ष वेधले. (१ करिंथकर १५:३-८) त्याने पुढे असा तर्क मांडला: “ख्रिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे? जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तहि उठविला गेला नाही; आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासहि व्यर्थ.”—१ करिंथकर १५:१२-१४.
८ पौलाने जे म्हटले ते अगदी खरे आहे. पुनरुत्थानाची शिकवणूक इतकी महत्त्वाची आहे, की जर पुनरुत्थानास सत्य म्हणून स्वीकारले नाही तर ख्रिस्ती विश्वास व्यर्थ आहे. किंबहुना, पुनरुत्थानाच्या शिकवणुकीचा योग्य उलगडाच खऱ्या व खोट्या ख्रिश्चनांमधील फरक दाखवून देतो. (उत्पत्ति ३:४; यहेज्केल १८:४) म्हणूनच पौलाने पुनरुत्थानाचा, ख्रिस्ती धर्माच्या “प्राथमिक” सिद्धान्तांत समावेश केला. तेव्हा आपण “प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू.” पौलाने म्हटल्याप्रमाणे, “देव होऊ देईल तर हे आपण करू.”—इब्री लोकांस ६:१-३.
पुनरुत्थानाची आशा
९, १०. बायबलमध्ये पुनरुत्थान हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे?
९ पुनरुत्थानावर आपला विश्वास मजबूत करण्यासाठी आपण पुढील प्रश्नांवर पुनर्विचार करू या: पुनरुत्थानाविषयी बायबलमध्ये कोणत्या अर्थाने सांगण्यात आले आहे? पुनरुत्थानाच्या शिकवणुकीमुळे यहोवाच्या प्रेमाचे कशाप्रकारे गौरव केले जाते? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला देवाच्या आणखी जवळ आणतील आणि त्याचवेळी इतरांना शिकवण्याकरताही आपल्याला मदत करतील.—२ तीमथ्य २:२; याकोब ४:८.
१० “पुनरुत्थान” हे एका ग्रीक शब्दाचे भाषांतर असून त्याचा शब्दशः अर्थ “पुन्हा उभे राहणे” असा होतो. यावरून काय कळते? बायबलनुसार, पुनरुत्थानाची आशा म्हणजे असा विश्वास बाळगणे की मृत व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकते. बायबल हेही दाखवते, की एखादी व्यक्ती पृथ्वीवरील जीवनाची आशा बाळगते की स्वर्गातील, या आधारावर तिचे एकतर मानवी रूपात अथवा आत्मिक शरीरात पुनरुत्थान होऊ शकते. पुनरुत्थानाच्या या अद्भूत आशेतून प्रकट होणारी यहोवाची प्रीती, त्याची बुद्धी व सामर्थ्य खरोखर आश्चर्यकारक आहे.
११. देवाच्या अभिषिक्त सेवकांना पुनरुत्थानाची कोणती आशा आहे?
११ येशूचे व त्याच्या अभिषिक्त बांधवांचे पुनरुत्थान झाल्यावर त्यांना स्वर्गातील सेवेकरता योग्य असलेले आत्मिक शरीर लाभते. (१ करिंथकर १५:३५-३८, ४२-५३) ते सर्व मिळून मशिही राज्याचे राजे असतील; या राज्याकरवी पृथ्वीवर परादीस परिस्थिती आणली जाईल. मुख्य याजक येशू याच्या नेतृत्वाखाली अभिषिक्त जन राजे व याजक या नात्याने कार्य करतील. ते नीतिमान नव्या जगात ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणाचे फायदे मानवजातीला मिळवून देतील. (इब्री लोकांस ७:२५, २६; ९:२४; १ पेत्र २:९; प्रकटीकरण २२:१, २) ते घडेपर्यंत, पृथ्वीवर अद्याप जिवंत असलेले अभिषिक्त देवाच्या नजरेत स्वीकारार्ह स्थितीत राहू इच्छितात. त्यांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांना त्यांचे “फळ” मिळते; अर्थात, स्वर्गातील अमर आत्मिक जीवनाकरता त्यांचे पुनरुत्थान केले जाते. (२ करिंथकर ५:१-३, ६-८, १०; १ करिंथकर १५:५१, ५२; प्रकटीकरण १४:१३) पौलाने लिहिले, “जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहो, तर त्याच्या उठण्याच्याहि प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ.” (रोमकर ६:५) पण ज्यांचे पुन्हा एकदा मानव या नात्याने पृथ्वीवर जगण्याकरता पुनरुत्थान होते, त्यांच्याविषयी काय? पुनरुत्थानाची आशा त्यांना कशाप्रकारे देवाच्या जवळ आणू शकते? अब्राहामच्या उदाहरणावरून आपण बरेच काही शिकू शकतो.
पुनरुत्थान व यहोवाशी मैत्री
१२, १३. अब्राहामजवळ पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्याकरता कोणते जबरदस्त कारण होते?
१२ “देवाचा मित्र” असे वर्णन करण्यात आलेला अब्राहाम अतिशय दृढ विश्वास बाळगणारा माणूस होता. (याकोब २:२३) इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रातील ११ व्या अध्यायात विश्वासू स्त्रीपुरुषांच्या यादीत पौलाने अब्राहामच्या विश्वासाविषयी तीन वेळा उल्लेख केला. (इब्री लोकांस ११:८, ९, १७) तिसऱ्यांदा उल्लेख करताना, इसहाकाचे बलिदान देण्याची अब्राहामने कशाप्रकारे आज्ञाधारकपणे तयारी केली आणि यावरून त्याचा विश्वास कसा दिसून आला याविषयी पौल सांगतो. अब्राहामला खात्री होती की इसहाकाद्वारे प्रतिज्ञात संतती उत्पन्न होईल अशी स्वतः यहोवाने हमी दिली होती. त्याअर्थी, इसहाकाचे बलिदान दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला तरीसुद्धा, “मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे, हे [अब्राहामने] मानले.”
१३ पुढील घटनाक्रम दाखवतो की यहोवाने अब्राहामचा दृढ विश्वास पाहिल्यावर इसहाकाऐवजी बलिदान देण्याकरता एका प्राण्याची व्यवस्था केली. तरीपण, इसहाकाचा अनुभव पुनरुत्थानाचे एक रूपक ठरला; पौलाने म्हटल्याप्रमाणे: “त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने [इसहाक अब्राहामला] परत मिळाला.” (इब्री लोकांस ११:१९) पण असे घडण्याआधीही अब्राहामजवळ पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्याकरता एक जबरदस्त कारण होते. अब्राहाम व त्याची बायको, सारा हे दोघे वृद्ध असूनही, यहोवाने त्यांची प्रजनन शक्ती पुनर्जिवित करून त्यांच्याद्वारे त्यांचा पुत्र इसहाक याचा जन्म घडवून आणला नव्हता का?—उत्पत्ति १८:१०-१४; २१:१-३; रोमकर ४:१९-२१.
१४. (क) इब्री लोकांस ११:९, १० यानुसार अब्राहाम कशाची वाट पाहात होता? (ख) नव्या जगात देवाच्या राज्याच्या आशीर्वादांचा उपभोग घेण्याकरता अब्राहामाच्या बाबतीत काय घडले पाहिजे? (ग) आपल्याला देवाच्या राज्याचे आशीर्वाद कसे उपभोगता येतील?
१४ पौलाने अब्राहामला परदेशी व डेऱ्यात वस्ती करणारा असे म्हटले; “पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या इब्री लोकांस ११:९, १०) देवाचे मंदिर ज्यात होते त्या जेरूसलेम शहरासारखे हे खरेखुरे नगर नव्हते. तर हे एक लाक्षणिक नगर होय. हे नगर म्हणजे देवाचे स्वर्गीय राज्य, ज्यात ख्रिस्त येशू व त्याच्या १,४४,००० सहशासकांचा समावेश होतो. स्वर्गीय गौरव प्राप्त झालेल्या १,४४,००० जणांचे वर्णन, “पवित्र नगरी, नवी यरुशलेम,” ख्रिस्ताची ‘नवरी’ असेही करण्यात आले आहे. (प्रकटीकरण २१:२) १९१४ साली यहोवाने येशूला स्वर्गीय राज्याचा मशीही राजा या नात्याने सिंहासनाधिष्ट केले आणि त्याला त्याच्या वैऱ्यांमध्ये धनीपण करण्याची आज्ञा केली. (स्तोत्र ११०:१, २, पं.र.भा.; प्रकटीकरण ११:१५) या राज्याच्या आशीर्वादांचा उपभोग घेण्याकरता “देवाचा मित्र” अब्राहाम याला पुन्हा जिवंत व्हावे लागेल. तसेच आपल्यालाही या राज्याच्या आशीर्वादांचा उपभोग घ्यायचा असल्यास, आपण एकतर हर्मगिदोनातून बचावलेले किंवा मृतांतून पुनरुत्थान झालेले या नात्याने देवाच्या नव्या जगात जिवंत असलो पाहिजे. (प्रकटीकरण ७:९, १४) पण पुनरुत्थानाची आशा कशावर आधारलेली आहे?
नगराची तो वाट पाहत होता,” असे पौल म्हणाला. (पुनरुत्थान आशेचा आधार—देवाची प्रीती
१५, १६. (क) बायबलमधील सर्वात पहिली भविष्यवाणी कशाप्रकारे पुनरुत्थानाच्या आशेकरता आधार पुरवते? (ख) पुनरुत्थानावरील विश्वास आपल्याला यहोवाच्या जवळ कसा आणू शकतो?
१५ आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्यासोबतचा आपला घनिष्ट नातेसंबंध, अब्राहामसारखा आपला दृढ विश्वास आणि देवाच्या आज्ञांचे पालन करणे यांमुळे यहोवा आपल्याला नीतिमान ठरवतो आणि त्याचे मित्र असे तो आपल्याला लेखतो. यामुळे आपल्याला देवाच्या राज्यापासून फायदा मिळणे शक्य होते. किंबहुना, देवाच्या वचनातील अगदी पहिली भविष्यवाणी जी उत्पत्ति ३:१५ येथे आपण वाचतो, ती पुनरुत्थानाच्या आशेकरता व देवासोबतच्या मैत्रीकरता एक आधार पुरवते. कारण या भविष्यवाणीत केवळ सैतानाचे डोके चिरडण्याविषयीच भाकीत केलेले नाही, तर दुसरीकडे पाहता, देवाच्या स्त्रीच्या संततीची टाच फोडण्याविषयीही भाकीत केले आहे. लाक्षणिक अर्थाने, येशूचे वधस्तंभावर मारले जाणे हे टाच फोडण्यासारखे होते. तिसऱ्या दिवशी त्याचे पुनरुत्थान झाले तेव्हा ही जखम भरून निघाली आणि “मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान,” याच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला.—इब्री लोकांस २:१४.
१६ पौल आपल्याला आठवण करून देतो की “देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” (रोमकर ५:८) या अपात्री कृपेबद्दल कदर बाळगल्याने आपण खरोखर येशूच्या व आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याच्या जवळ येतो.—२ करिंथकर ५:१४, १५.
१७. (क) ईयोबाने कोणती आशा व्यक्त केली? (ख) ईयोब १४:१५ यहोवाविषयी काय प्रकट करते आणि यामुळे तुम्हाला कसे वाटते?
१७ ख्रिस्तपूर्व काळातील एक विश्वासू पुरुष ईयोब हा देखील पुनरुत्थानाची आशा बाळगत होता. त्याला सैतानाच्या हातून अनेक कष्टांना तोंड द्यावे लागले. नावापुरत्या असलेल्या त्याच्या साथीदारांनी तर पुनरुत्थानाचा उल्लेखही केला नाही, पण ईयोबाला या आशेमुळे सांत्वन मिळाले; त्याने असा प्रश्न विचारला: “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?” या प्रश्नाचे स्वतःच उत्तर देत ईयोब म्हणाला: “माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस मी वाट पाहत राहीन.” आपला देव यहोवा याला उद्देशून तो म्हणाला: “तू मला हाक मारिशील व मी तुला उत्तर देईन.” आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याच्या भावनांकडे लक्ष वेधत त्याने म्हटले: “मी जो तुझ्या हातची कृति त्या मजविषयी तुला उत्कंठा लागेल.” (ईयोब १४:१४, १५) होय, यहोवाला त्या काळाची उत्कंठा लागली आहे, जेव्हा विश्वासू जन पुनरुत्थानात पुन्हा जिवंत होतील. आपण अपरिपूर्ण असूनही यहोवाने आपल्याला जी प्रीती आणि अपात्री कृपा दाखवली आहे त्याविषयी मनन करताना आपण आपोआपच त्याच्या जवळ येत नाही का?—रोमकर ५:२१; याकोब ४:८.
१८, १९. (क) दानीएल पुन्हा केव्हा जिवंत होईल? (ख) पुढील लेखात आपण कशाविषयी अभ्यास करू?
१८ संदेष्टा दानीएल, ज्याच्याविषयी देवाच्या दूताने, ‘परमप्रिय पुरुष’ असे वर्णन केले, तो आपल्या दीर्घ आयुष्यात शेवटपर्यंत विश्वासूपणे देवाची सेवा करत राहिला. (दानीएल १०:११, १९) सा.यु.पू. ६१७ मध्ये त्याला बंदिवान म्हणून नेण्यात आले तेव्हापासून पारसचा राजा, कोरेश याच्या तिसऱ्या वर्षी म्हणजे सा.यु.पू. ५३६ साली त्याला एक दृष्टान्त झाल्यावर काही काळाने त्याचा मृत्यू होईपर्यंत तो यहोवाला विश्वासू राहिला. (दानीएल १:१; १०:१) कोरेशच्या राज्याच्या त्या तिसऱ्या वर्षादरम्यान, दानीएलाला जागतिक साम्राज्यांच्या वाटचालीचा दृष्टान्त झाला; या वाटचालीचा येणाऱ्या महासंकटात अंत होतो. (दानीएल ११:१–१२:१३) दानीएलाला हा दृष्टान्त पूर्णपणे समजू शकला नाही, त्यामुळे त्याने दृष्टान्त देणाऱ्या देवदूताला विचारले: “हे माझ्या स्वामी, या गोष्टीचा परिणाम काय?” तेव्हा देवदूताने ‘अंतसमयाकडे’ त्याचे लक्ष वेधले व सांगितले की त्या काळात, “जे सुज्ञ आहेत त्यांस [समज] प्राप्त होईल.” स्वतः दानीएलाच्या बाबतीत काय घडेल? देवदूताने सांगितले: “तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील.” (दानीएल १२:८-१०, १३) ख्रिस्ताच्या एक हजार वर्षांच्या राजवटीत दानीएल “नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी” पुन्हा जिवंत होईल.—लूक १४:१४.
१९ आपण प्रथम विश्वासी बनलो त्या काळाच्या तुलनेत आज आपण अंतसमयाच्या अगदी शेवटल्या भागात आणि ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्याच्या सुरुवातीच्या अगदी जवळ येऊन पोचलो आहोत. म्हणून आपण स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘अब्राहाम, ईयोब, दानीएल व इतर विश्वासू स्त्रीपुरुषांना भेटण्यास मी नव्या जगात असेन का?’ यहोवाच्या जवळ राहून, त्याच्या आज्ञांचे पालन केल्यास आपण तेथे असू. पुढील लेखात आपण पुनरुत्थानाच्या आशेचा आणखी बारकाईने अभ्यास करून, पुनरुत्थानात कोणकोण उठतील हे जाणून घेऊ. (w०५ ५/१)
तुम्हाला आठवते का?
• पौलाने पुनरुत्थानाच्या आशेविषयी घोषित केले तेव्हा त्याला कशाप्रकारच्या प्रतिक्रियेला तोंड द्यावे लागले?
• पुनरुत्थानाची आशा कशाप्रकारे खऱ्या व खोट्या ख्रिश्चनांमधला फरक स्पष्ट करते?
• अब्राहाम, ईयोब व दानीएल यांनी कशाप्रकारे पुनरुत्थानावर विश्वास व्यक्त केला?
[अभ्यासाचे प्रश्न]
[८ पानांवरील चित्र]
सुभेदार फेलिक्स याच्यासमोर चौकशी चालली असताना पौलाने पुनरुत्थानाच्या आशेवरती आपल्या दृढ विश्वास व्यक्त केला