तारण, केवळ कार्यांमुळे नव्हे तर अपात्री कृपेमुळे
तारण, केवळ कार्यांमुळे नव्हे तर अपात्री कृपेमुळे
“विश्वासाच्याद्वारे तुमचे तारण झालेले आहे . . . कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही.”—इफिसकर २:८, ९.
१. वैयक्तिक कामगिरीच्या संबंधात खरे ख्रिस्ती सर्वसामान्य लोकांपेक्षा कशाप्रकारे वेगळे आहेत आणि का?
आजच्या काळात लोक स्वतःच्या कर्तृत्वाविषयी खूप अभिमान बाळगतात आणि त्याविषयी फुशारकी मारण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा उचलतात. खरे ख्रिस्ती मात्र वेगळे आहेत. ते स्वतःच्या कार्यांकडे—मग ती खऱ्या उपासनेच्या संबंधात केलेली कार्ये असली तरीसुद्धा, त्यांकडे लक्ष वेधण्याचे टाळतात. यहोवाचे लोक सामूहिक रित्या जे साध्य करतात त्याविषयी ते आनंद व्यक्त करतात, पण व्यक्तिगत योगदानाकडे ते लक्ष वेधत नाहीत. यहोवाच्या सेवेत, वैयक्तिक कामगिरीपेक्षा योग्य हेतूंना अधिक महत्त्व आहे या गोष्टीची त्यांना जाणीव आहे. ज्या कोणाला शेवटी सार्वकालिक जीवनाचे दान देण्यात येईल ते त्याने स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर मिळवलेले नसेल, तर विश्वासाद्वारे व देवाच्या अपात्री कृपेमुळे ते त्याला मिळालेले असेल.—लूक १७:१०; योहान ३:१६.
२, ३. पौलाने कशाविषयी बढाई मारली व का?
२ प्रेषित पौलाला या गोष्टीची चांगली जाणीव होती. त्याच्या ‘शरीरातल्या एका काट्यापासून’ मुक्तता मिळण्याकरता तीन वेळा प्रार्थना केल्यावर यहोवाने त्याला असे उत्तर दिले की: “माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ति पूर्णतेस येते.” यहोवाच्या निर्णयाचा नम्रपणे स्वीकार करून पौलाने म्हटले: “ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन.” पौलाच्या या नम्र मनोवृत्तीचे अनुकरण करण्यास आपण उत्सुक असले पाहिजे.—२ करिंथकर १२:७-९.
३ पौलाने अतिशय उल्लेखनीय ख्रिस्ती कार्ये केली होती तरीसुद्धा, त्याला जाणीव होती की आपण केलेली कार्ये ही आपल्या स्वतःच्या खास क्षमतेमुळे केलेली नव्हती. त्याने विनम्रपणे कबूल केले: “मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहुन लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी.” (इफिसकर ३:८) पौलाच्या शब्दांतून स्वतःची बढाई मारण्याची किंवा ‘पाहा मी किती धार्मिक आहे’ अशी वृत्ती दिसून येत नाही. “देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.” (याकोब ४:६; १ पेत्र ५:५) आपण पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण करून, आपल्या बांधवांतल्या लहानतल्या लहान बांधवापेक्षाही स्वतःला नम्रपणे कमी समजतो का?
“एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना”
४. कधीकधी इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजणे कठीण का वाटू शकते?
४ प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना असा सल्ला दिला: “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीहि करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना.” (फिलिप्पैकर २:३) असे करणे कठीण वाटू शकते, खासकरून आपण जबाबदारीच्या पदावर असू तर. कदाचित, आजच्या जगात अतिशय प्रबळ असलेल्या स्पर्धात्मक वृत्तीचा आपल्यावर थोड्याफार प्रमाणात का होईना प्रभाव पडल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. कदाचित लहानपणी आपल्याला घरात आपल्या भावंडांशी अथवा शाळेत वर्गसोबत्यांशी स्पर्धा करण्यास शिकवण्यात आले असेल. कदाचित शाळेचा सर्वात उत्तम खेळाडू अथवा सर्वात हुशार विद्यार्थी बनण्याचा आपल्यावर सतत दबाव आणण्यात आला असेल. अर्थात, कोणतेही चांगले काम करताना आपली सगळी शक्ती पणाला लावून ते करणे हे कौतुकास्पद आहे. पण खरे ख्रिस्ती स्वतःकडे लक्ष वेधण्याच्या हेतूने नव्हे, तर त्या कार्यातून स्वतःला व इतरांनाही फायदा व्हावा म्हणून असे करतात. पण इतरांची प्रशंसा मिळवण्याकरता नेहमी दुसऱ्यांपेक्षा एक पाऊल पुढे असण्याचा प्रयत्न करण्याची वृत्ती धोकेदायक ठरू शकते. ती कशी?
५. स्पर्धात्मक वृत्तीवर नियंत्रण न ठेवल्यास काय घडू शकते?
५ स्पर्धात्मक अथवा अहंकारी वृत्तीवर नियंत्रण न ठेवल्यास, ती एका व्यक्तीला हळूहळू अनादरशील व उद्धट बनवू शकते. अशी व्यक्ती इतरांची कौशल्ये व विशेषाधिकार यांमुळे त्यांचा हेवा करू लागण्याची शक्यता आहे. नीतिसूत्रे २८:२२ म्हणते: “दुष्ट दृष्टीचा मनुष्य धन मिळविण्याची उतावळी करितो, आपणास दारिद्र्य येईल हे त्याला समजत नाही.” गर्विष्ठ वृत्तीमुळे, कदाचित तो अशी पदे मिळवण्याचा प्रयत्न करू लागेल, ज्यांसाठी तो योग्य नाही. आणि आपले वागणे योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी तो कदाचित कुरकूर करू लागेल व इतरांची टीका करू लागेल. अशा प्रवृत्ती ख्रिश्चनांनी खरे तर टाळल्या पाहिजेत. (याकोब ३:१४-१६) तर अशा रितीने, ही व्यक्ती आत्मकेंद्रित वृत्ती उत्पन्न करण्याचा धोका पत्करते.
६. स्पर्धात्मक वृत्तीबद्दल बायबलमध्ये कोणता इशारा देण्यात आला आहे?
६ म्हणूनच बायबल ख्रिश्चनांना असा आग्रह करते: “आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.” (गलतीकर ५:२६) प्रेषित योहानाने एका अशा ख्रिस्ती बांधवाबद्दल सांगितले की जो अशा वृत्तीला बळी पडला. योहानाने म्हटले: “मी मंडळीला थोडेसे लिहिले; परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करीत नाही. ह्यामुळे मी आलो तर तो जी कृत्ये करितो त्यांची आठवण देईन; तो आम्हाविरुद्ध द्वेषबुद्धीने बाष्कळ बडबड करितो.” एका ख्रिस्ती व्यक्तीबद्दल असे म्हणण्याची पाळी आल्यास, ती किती दुःखाची गोष्ट ठरेल!—३ योहान ९, १०.
७. आजच्या व्यावसायिक जगातील स्पर्धात्मक वातावरणात ख्रिस्ती व्यक्तीने काय टाळावे?
७ अर्थात, एका ख्रिस्ती व्यक्तीला सर्व प्रकारच्या स्पर्धा पूर्णपणे टाळता येतील असा विचार करणे वास्तववादी ठरणार नाही. उदाहरणार्थ, त्याच्या व्यवसायात कदाचित त्याला आपल्यासारखीच उत्पादने अथवा सेवा पुरवणाऱ्या इतर व्यक्तींसोबत अथवा कंपन्यांसोबत आर्थिक स्पर्धा करावी लागत असेल. पण अशा परिस्थितीतसुद्धा, ख्रिस्ती व्यक्तीने आपला व्यवसाय आदर, प्रीती व विचारशीलतेने करावा. त्याने बेकायदेशीर अथवा ख्रिश्चनांना न शोभणाऱ्या प्रथांना संमती देऊ नये आणि स्पर्धात्मक व्यक्ती म्हणून नाव कमावू नये. कोणत्याही क्षेत्रात प्रथम क्रमांकावर असणे हे त्याच्या जीवनाचे ध्येय असू नये. जर जगिक कार्यांबाबत असे म्हणता येते तर मग उपासनेच्या क्षेत्रात हे किती महत्त्वाचे आहे!
“दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे”
८, ९. (क) ख्रिस्ती वडील एकमेकांशी स्पर्धा का करत नाहीत? (ख) पहिले पेत्र ४:१० हे वचन देवाच्या सर्व सेवकांकरता का समर्पक आहे?
८ उपासनेच्या बाबतीत ख्रिश्चनांची वृत्ती कशी असावी हे पुढील देवप्रेरित शब्दांवरून दिसून येते: “प्रत्येकाने गलतीकर ६:४) मंडळीतल्या वडिलांना माहीत आहे की त्यांच्यात कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही; त्यामुळे ते एकमेकांशी सहकार्य करतात आणि एकजुटीने कार्य करतात. मंडळीच्या उभारणीकरता प्रत्येकजण कोणत्या न कोणत्या प्रकारे हातभार लावू शकतो याबद्दल त्यांना आनंद वाटतो. यामुळे आपसांत फूट पाडणारी स्पर्धा ते टाळतात आणि मंडळीकरता उत्तम आदर्श पुरवतात.
आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.” (९ वयोमान, अनुभव, किंवा नैसर्गिक क्षमता असल्यामुळे काही वडील कदाचित इतरांपेक्षा जास्त कार्यक्षम असू शकतात. किंवा कदाचित त्यांच्याजवळ जास्त आकलनशक्ती असू शकते. त्यामुळे यहोवाच्या संघटनेत वडिलांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. दोन व्यक्तींमध्ये तुलना करण्याऐवजी ते पुढील सल्ला आठवणीत ठेवतात: “प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी” अथवा एकमेकांच्या सेवेकरता लावा. (१ पेत्र ४:१०) खरे पाहता हे वचन यहोवाच्या सर्व सेवकांकरता समर्पक आहे कारण सर्वांनाच कमीजास्त प्रमाणात अचूक ज्ञानाचे दान मिळाले आहे आणि सर्वांनाच ख्रिस्ती सेवेत सहभाग घेण्याचा विशेषाधिकार आहे.
१०. आपली पवित्र सेवा केवळ कोणत्या अटीवर यहोवाला संतोषदायक वाटेल?
१० आपली पवित्र सेवा यहोवाला तेव्हाच संतोषदायक वाटते, की जेव्हा आपण स्वतःला इतरांपेक्षा वरचढ करण्याकरता नव्हे, तर प्रेमाने व भक्तिभावाने प्रवृत्त होऊन सेवा करतो. म्हणूनच खऱ्या उपासनेला पाठिंबा देण्याकरता आपण जे काही कार्य करतो त्याविषयी संतुलित दृष्टिकोन असणे महत्त्वाचे आहे. कोणीही दुसऱ्या व्यक्तीचे हेतू अचूकपणे ओळखू शकत नाही, पण यहोवा ‘हृदये तोलून पाहतो.’ (नीतिसूत्रे २४:१२; १ शमुवेल १६:७) तेव्हा आपण सर्वजण वेळोवेळी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, ‘यहोवाची सेवा मी कोणत्या हेतूने करत आहे?’—स्तोत्र २४:३, ४; मत्तय ५:८.
आपल्या कार्याविषयी योग्य दृष्टिकोन
११. आपल्या सेवाकार्यासंबंधी कोणते वाजवी प्रश्न विचारले जाऊ शकतात?
११ यहोवाची संमती मिळवण्याकरता आपले हेतूच सर्वात महत्त्वाचे आहेत, तर मग यहोवाच्या सेवेतील कार्यांकडे आपण कितपत लक्ष द्यावे? ज्याअर्थी आपण आपली सेवा योग्य हेतूने करतो, त्याअर्थी आपण किती सेवा केली याचा हिशेब ठेवण्याची खरोखर गरज आहे का? हे प्रश्न वाजवी आहेत कारण आपल्याला यहोवाच्या सेवेपेक्षा आकड्यांना जास्त महत्त्व देण्याची इच्छा नाही. आपल्या ख्रिस्ती सेवेत, महिन्याअखेरीस चांगला अहवाल देणे ही मुख्य काळजी असू नये.
१२, १३. (क) आपण आपल्या क्षेत्र सेवेचा अहवाल का सादर करतो? (ख) प्रचार कार्याचा एकंदर अहवाल पाहिल्यावर आपल्याला आनंद का वाटतो?
१२ यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास संघटित (इंग्रजी) हे पुस्तक काय म्हणते याकडे लक्ष द्या: “येशू ख्रिस्ताच्या आरंभीच्या अनुयायांनी प्रचार कार्यातील प्रगतीचा अहवाल सादर करण्यास महत्त्व दिले. (मार्क ६:३०) बायबलमधील प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक आपल्याला सांगते की पेन्टेकॉस्टच्या दिवशी शिष्यांवर पवित्र आत्मा ओतण्यात आला तेव्हा जवळजवळ १२० व्यक्ती उपस्थित होत्या. लवकरच शिष्यांची संख्या ३,०००, मग ५,००० अशारितीने वाढू लागली. (प्रेषितांची कृत्ये १:१५; २:५-११, ४१, ४७; ४:४; ६:७) या प्रगतीचे वृत्त मिळाल्यावर त्या शिष्यांना किती उत्तेजन मिळाले असेल!” याच कारणामुळे आज यहोवाचे साक्षीदार, येशूच्या भविष्यवाणीनुसार जगभरात केल्या जात असलेल्या कार्याचा अचूक अहवाल नोंदून ठेवतात. येशूने म्हटले होते: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) त्याच्या या शब्दांनुसार जागतिक क्षेत्रात जे काही साध्य केले जात आहे ते या अहवालांवरून लक्षात येते. प्रचार कार्याचा प्रसार करण्याकरता कोठे मदतीची गरज आहे, कोणत्या प्रकारचे साहित्य आणि ते किती प्रमाणात आवश्यक आहे हे देखील या अहवालांवरून लक्षात येते.
१३ अशारितीने, प्रचार कार्याचा अहवाल दिल्यामुळे, आपल्याला राज्याची सुवार्ता अधिक परिणामकारक रितीने मार्क १२:४२, ४३) तुमच्या अहवालाशिवाय एकंदर कार्याचा अहवाल अपूर्ण राहील, हे कधीही विसरू नका.
साध्य करण्यास मदत मिळते. शिवाय, आपले बांधव जगातल्या निरनिराळ्या ठिकाणी जे कार्य करत आहेत त्याविषयी ऐकल्यावर आपल्याला प्रोत्साहन मिळत नाही का? सबंध पृथ्वीवर होत असलेल्या वाढीची व विस्ताराची वृत्ते ऐकल्यावर आपण आनंदित होतो, आपल्याला अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि या कार्यावर यहोवाचा आशीर्वाद आहे याची खात्री पटते. आणि या जागतिक अहवालात आपला वैयक्तिक अहवाल देखील समाविष्ट आहे ही जाणीव किती समाधानदायक आहे! एकंदर आकड्यांपेक्षा आपल्या अहवालातील आकडे अर्थातच लहान आहेत, पण यहोवा त्यांना क्षुल्लक लेखत नाही. (१४. प्रचार व शिकवण्याच्या कार्याव्यतिरिक्त यहोवाच्या सेवेत आणखी कशाचा समावेश आहे?
१४ अर्थात, यहोवाचा समर्पित सेवक या नात्याने आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक साक्षीदाराने केलेल्या बऱ्याच गोष्टी अहवालावर लिहिलेल्या नसतात. उदाहरणार्थ, नियमित वैयक्तिक बायबल अभ्यास, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे व त्यांत सहभाग घेणे, विश्वासातील आपल्या बांधवांना त्यांच्या गरजेप्रमाणे मदत करणे, जागतिक राज्य कार्याला आर्थिक सहयोग देणे इत्यादी. तर क्षेत्र सेवेचा अहवाल, प्रचार कार्यातील आपला आवेश टिकवून ठेवण्यास व सुस्त होण्याचे टाळण्यास आपल्याला मदत करण्याकरता महत्त्वाचा असला तरीसुद्धा त्याकडे आपण योग्य दृष्टिकोनातूनच पाहावे. आपला अहवाल आध्यात्मिक अर्थाने परवाना पत्रासारखा नाही, की ज्याच्या आधारावर आपल्याला जीवनाकरता योग्य ठरवले जाईल.
“चांगल्या कामात तत्पर”
१५. केवळ कार्ये आपल्याला तारण देऊ शकत नसली तरीसुद्धा कार्य करणे आवश्यक का आहे?
१५ साहजिकच, केवळ कार्ये केल्यामुळे आपल्याला तारण मिळू शकत नसले तरीसुद्धा कार्य करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच, ख्रिश्चनांना, “चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक” म्हणण्यात आले आहे आणि त्यांना “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष” देण्याचे प्रोत्साहन देण्यात येते. (तीत २:१४; इब्री लोकांस १०:२४) बायबल लेखक, याकोब अगदी साध्या शब्दांत हा मुद्दा आणखी स्पष्ट करतो: “जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे तसा विश्वासहि क्रियांवांचून निर्जीव आहे.”—याकोब २:२६.
१६. कार्यांपेक्षाही महत्त्वाचे काय आहे, पण आपण कशाविषयी सांभाळून राहावे?
१६ चांगली कार्ये करणे तर महत्त्वाचे आहेच, पण ही कार्ये करण्यामागचे हेतू त्याहून महत्त्वाचे आहेत. म्हणूनच आपण कोणत्या हेतूने सेवा करतो याविषयी वेळोवेळी आत्मपरीक्षण करण्यात सुज्ञपणा आहे. पण कोणताही माणूस इतरांचे हेतू अचूकपणे ओळखू शकत नाही, त्यामुळे आपण इतरांना दोष लावण्याच्या प्रवृत्तीपासून सांभाळून राहावे. “दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस?” असा प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो. आणि त्याचे स्पष्ट उत्तर असे आहे, की “तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय, तो त्याच्या धन्याचा प्रश्न आहे.” (रोमकर १४:४) यहोवा, आपल्या सर्वांचा धनी आणि त्याने न्याय करण्याकरता नेमलेला ख्रिस्त येशू हे आपला न्याय करतील; केवळ कार्यांच्या आधारावर नव्हे तर आपले हेतू, आपल्याजवळ असलेल्या संधी, आपले प्रेम आणि आपला भक्तिभाव याच्या आधारावर. “तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर” असा जो प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना आदेश दिला होता, त्यानुसार आपण केले आहे किंवा नाही याचा अचूक न्याय केवळ यहोवा व ख्रिस्त येशूच करू शकतात.—२ तीमथ्य २:१५; २ पेत्र १:१०; ३:१४.
१७. आपल्याने होईल तितके करण्याचा प्रयत्न करण्यासोबतच आपण याकोब ३:१७ आठवणीत का ठेवावे?
१७ यहोवा आपल्याकडून अवास्तव अपेक्षा करत नाही. याकोब ३:१७ यानुसार “वरून येणारे ज्ञान” हे इतर गोष्टींसोबतच “सौम्य” आहे. तेव्हा या बाबतीत यहोवाचे अनुकरण करणे सुज्ञतेचा मार्ग ठरणार नाही का आणि हे एक उल्लेखनीय कार्य ठरणार नाही का? आपण स्वतःकडून किंवा आपल्या बांधवांकडून कधीही अवास्तव अपेक्षा करू नये.
१८. आपली कार्ये व यहोवाची अपात्री कृपा यांसंबंधी संतुलित दृष्टिकोन बाळगल्यामुळे आपण कशाची आशा करू शकतो?
१८ जोपर्यंत आपण यहोवाच्या सेवेतील आपल्या कार्यांबद्दल व यहोवाच्या अपात्री कृपेबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगू तोपर्यंत आपण आपला आनंद टिकवून ठेवू शकू; हा आनंद यहोवाच्या सेवकांचे वैशिष्ट्य आहे. (यशया ६५:१३, १४) आपल्या परिस्थितीनुसार आपले वैयक्तिक योगदान कितीही असो, पण यहोवा सामूहिकरित्या आपल्या लोकांवर ज्या आशीर्वादांचा वर्षाव करत आहे त्यांविषयी आपण आनंदी होऊ शकतो. सतत ‘आभारप्रदर्शनासह प्रार्थना व विनंती’ करून आपण देवाला मदतीकरता याचना करावी की त्याने आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार होईल तितके करण्यास साहाय्य करावे. मग निश्चितच, “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति [आपली] अंतःकरणे व [आपले] विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:४-७) होय आपण हे जाणून सांत्वन व प्रोत्साहन मिळवू शकतो, की आपल्याला केवळ कार्यांच्या आधारावर नव्हे तर यहोवाच्या अपात्री कृपेमुळे तारण मिळेल! (w०५ ६/१)
तुम्ही स्पष्ट करू शकता का?
• खरे ख्रिस्ती आपल्या वैयक्तिक कर्तृत्वाविषयी फुशारकी का मारत नाहीत?
• खरे ख्रिस्ती स्पर्धात्मक वृत्ती का बाळगत नाहीत?
• खरे ख्रिस्ती आपल्या क्षेत्र सेवाकार्याचा अहवाल का देतात?
• खरे ख्रिस्ती आपल्या बांधवांना दोषी ठरवण्याचे का टाळतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२७ पानांवरील चित्र]
“माझी कृपा तुला पुरे आहे”
[३०, ३१ पानांवरील चित्रे]
तुमच्या अहवालाशिवाय, एकंदर कार्याचा अहवाल अपूर्ण राहील