व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या प्रिय व्यक्‍तींशी तुम्ही संभाषण करता का?

तुमच्या प्रिय व्यक्‍तींशी तुम्ही संभाषण करता का?

तुमच्या प्रिय व्यक्‍तींशी तुम्ही संभाषण करता का?

पोलीतीका नावाच्या पोलिश साप्ताहिकातील एका वृत्तानुसार, “प्रिय व्यक्‍तींशी सुसंवाद साधण्याची आपली क्षमता चिंताजनक प्रमाणात ऱ्‍हास पावत आहे.” एका अंदाजानुसार, संयुक्‍त संस्थानातील वैवाहिक सोबती एकमेकांशी दिवसभरात केवळ सहा मिनिटे अर्थपूर्ण संभाषण करतात. काही तज्ज्ञांच्या मते जे वैवाहिक जोडीदार एकमेकांपासून कायदेशीररित्या विलग होतात व जे घटस्फोट घेतात त्यांपैकी निम्मे, सुसंवादाच्या अभावामुळेच असे करत असावेत.

पालक व मुले यांच्यातील संभाषणाविषयी काय? वरील वृत्तानुसार, बरेचदा “त्यांच्यातील संभाषण हे संभाषण नसून उलटतपासणी आहे असे वाटते: आज शाळेत काय केले? तुझे मित्र कसे आहेत? वगैरे.” या वृत्तात पुढे म्हटले आहे, “आपली मुले भावनिक नाती जोडायला व जपायला शिकतील तरी कशी?”

सुसंवाद हा आपोआप साधता येत नाही. मग, संभाषण करण्याची आपली क्षमता आपण कशी सुधारू शकतो? ख्रिस्ती शिष्य याकोब आपल्याला हा महत्त्वाचा सल्ला देतो: “प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा.” (याकोब १:१९) तर, दुसऱ्‍या व्यक्‍तीला उभारणीकारक ठरू शकेल अशाप्रकारे संभाषण करण्याकरता लक्षपूर्वक ऐकून घेणे, बोलणाऱ्‍या व्यक्‍तीला मध्येच न अडवणे आणि लगेच निष्कर्ष न काढणे हे महत्त्वाचे आहे. टीका करण्याचे टाळा कारण त्यामुळे संभाषणाला खीळ पडू शकते. शिवाय, येशूने प्रश्‍नांचा अतिशय विचारशीलपणे उपयोग केला; माहिती काढून घेण्यासाठी नव्हे, तर आपल्या श्रोत्याच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याकरता आणि आपसातील बंधन अधिक मजबूत करण्यासाठी.—नीतिसूत्रे २०:५; मत्तय १६:१३-१७; १७:२४-२७.

बायबलमध्ये आढळणाऱ्‍या उत्तम तत्त्वांचा उपयोग करून तुमच्या प्रिय व्यक्‍तींशी संभाषण करण्यास व त्यांच्याशी सुसंवाद साधण्यास पुढाकार घ्या. असे केल्यास, तुमचे प्रेमळ नाते अनेक वर्षांपर्यंत, नव्हे आयुष्यभर फुलेल, बहरेल. (w०५ ६/१)