व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“त्यांच्या विश्‍वासासाठी त्यांचा छळ करण्यात आला”

“त्यांच्या विश्‍वासासाठी त्यांचा छळ करण्यात आला”

“त्यांच्या विश्‍वासासाठी त्यांचा छळ करण्यात आला”

उत्तर इटलीतील चर्नोब्यो शहरातील एका बागेत, ज्या लोकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करण्यात आले होते अशा लोकांची स्मारके उभारण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ ज्यांचे अनावरण करण्यात आले त्यापैकी एक स्मृतिशिला नार्सिसो रीट यांना समर्पित करण्यात आली आहे. रीट यांचा जर्मनीत जन्म झाला होता. त्यांचे आईवडील दोघेही इटालियन होते. १९३० च्या दशकात रीट यहोवाचे साक्षीदार बनले. हिटलरच्या राजवटीत, यहोवाच्या साक्षीदारांनी खरा देव यहोवा याच्यापेक्षा हिटलरला वर्चस्व देण्यास नकार दिल्यामुळे त्यांचा छळ करण्यात आला.

रीट छळछावण्यांत टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या प्रती आणत आहेत, हे जेव्हा गेस्टापोंना समजले तेव्हा रीट चर्नोब्योला पळून गेले. तेथे त्यांना टेहळणी बुरूज नियतकालिकाचे इटालियन भाषेत शब्दांकन करून जवळपास राहणाऱ्‍या आपल्या बंधूभगिनींना ते देण्यास सांगण्यात आले. पूर्ण उत्साहाने काम करणाऱ्‍या रीट यांच्याकडे लोकांचे सहज लक्ष गेले. एका एसएस ऑफिसरने व त्याच्या लोकांनी रीटच्या घरावर धाड टाकून त्यांना अटक केली आणि त्यांच्याजवळ सापडलेला “गुन्हेगारीचा” पुरावा, अर्थात दोन बायबल आणि काही पत्रे जप्त केली. रीट यांना जर्मनीत हद्दपार करण्यात आले, डाकाऊ छळछावणीत टाकण्यात आले आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात यायच्या काही काळाआधी त्यांना फाशी देण्यात आली. चर्नोब्योतील स्मृतिशिला म्हणते: “त्यांच्या विश्‍वासासाठी त्यांचा छळ करण्यात आला.”

नात्सी छळात बळी पडलेले नार्सिसो रीट आणि शेकडो इतर साक्षीदारांचा विश्‍वास, आजच्या ख्रिश्‍चनांना हे उत्तेजन देतो, की त्यांनी यहोवाशी विश्‍वासू राहिले पाहिजे. यहोवा, त्यांच्या उपासनेस पात्र असा अख्ख्या विश्‍वातील एकमात्र गौरवशाली देव आहे. (प्रकटीकरण ४:११) येशूने म्हटले: “नीतिमत्त्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य.” अशा लोकांच्या कार्यांबद्दल देव त्यांची आठवण करेल आणि त्यांच्या धैर्यशील भूमिकेबद्दल त्यांना प्रतिफळ देईल.—मत्तय ५:१०; इब्री लोकांस ६:१०. (w०५ ६/१५)