तुम्ही सर्व गोष्टींत विश्वासू आहात का?
तुम्ही सर्व गोष्टींत विश्वासू आहात का?
“जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयीहि विश्वासू आहे.”—लूक १६:१०.
१. कोणत्या एका बाबतीत यहोवा विश्वसनीय आहे?
एखाद्या मोठ्या झाडाची जमिनीवर पडणारी सावली तुम्ही पाहिली असेल. दिवस जसजसा वर जातो तसतसे या सावलीला काय होते याकडे कधी तुम्ही लक्ष दिले का? सावलीचा आकार व दिशा बदलत राहते! मनुष्याचे संकल्प आणि आश्वासने सावलीसारखेच सतत बदलत असतात. पण यहोवा देव मात्र काळासोबत बदलत नाही. शिष्य याकोबाने त्याला ‘ज्योतिमंडळाचा पिता’ असे संबोधले व त्याच्याविषयी असे म्हटले: ‘तो फिरण्याने छायेत जात नाही.’ (याकोब १:१७) यहोवा निश्चल आहे आणि अगदी लहानसहान बाबींतही पूर्णतः खात्रीलायक आहे. “तो विश्वसनीय देव आहे.”—अनुवाद ३२:४.
२. (क) आपण विश्वासू आहोत किंवा नाही हे ठरवण्याकरता स्वतःचे परीक्षण का केले पाहिजे? (ख) विश्वासूपणासंबंधी आपण कोणते प्रश्न विचारात घेतले पाहिजे?
२ आपल्या उपासकांनी खात्रीलायक असण्याच्या बाबतीत यहोवाचा कसा दृष्टिकोन आहे? दाविदासारखाच, ज्याने त्यांच्याविषयी म्हटले: “देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावे म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते. सात्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल.” (स्तोत्र १०१:६) होय, यहोवा आपल्या सेवकांच्या विश्वासूपणामुळे आनंदित होतो. म्हणूनच प्रेषित पौलाने लिहिले: “कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे.” (१ करिंथकर ४:२) पण विश्वासू असण्याचा काय अर्थ होतो? जीवनाच्या कोणकोणत्या क्षेत्रांत आपण विश्वासू असले पाहिजे? आणि ‘सात्विक मार्गाने चालल्यामुळे’ आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील?
विश्वासू असण्याचा अर्थ
३. आपण विश्वासू आहोत किंवा नाही हे कशावरून दिसून येते?
३ इब्री लोकांस ३:५ म्हणते: “मोशे सेवक ह्या नात्याने विश्वासू होता.” मोशेला विश्वासू का म्हणण्यात आले? निवासमंडपाच्या बांधकामात व त्यातील सर्व वस्तू व्यवस्थित ठेवण्याच्या बाबतीत, “मोशेने तसे केले म्हणजे परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने तसे केले.” (निर्गम ४०:१६) यहोवाचे उपासक या नात्याने आपण त्याची सेवा करताना त्याच्या सर्व आज्ञांचे पालन करण्याद्वारे आपला विश्वासूपणा दाखवतो. अर्थातच, कठीण परीक्षांना किंवा खडतर प्रसंगांना तोंड देताना यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा यात समावेश आहेच. पण फक्त मोठ्या परीक्षाप्रसंगांना यशस्वीपणे तोंड दिल्यानेच आपण विश्वासू ठरत नाही. येशूने म्हटले: “जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयीहि विश्वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीहि अन्यायी आहे.” (लूक १६:१०) तेव्हा, क्षुल्लक भासणाऱ्या गोष्टींतही आपण विश्वासू राहिले पाहिजे.
४, ५. “अगदी थोडक्याविषयी” आपण विश्वासू राहतो त्यावरून काय दिसून येते?
४ दैनंदिन जीवनात “अगदी थोडक्याविषयी” आज्ञाधारक राहणे दोन कारणांमुळे महत्त्वाचे आहे. पहिले म्हणजे, यहोवाच्या सार्वभौमत्वाबद्दल आपला काय दृष्टिकोन आहे हे यावरून दिसून येते. पहिले मानवी जोडपे, आदाम व हव्वा यांच्या एकनिष्ठतेची परीक्षा घेणाऱ्या प्रसंगाचा विचार करा. त्यांना दिलेली आज्ञा मुळीच कठीण नव्हती. एदेन बागेत त्यांना खाण्याच्या निरनिराळ्या वस्तू उपलब्ध होत्या; फक्त एकाच म्हणजे “बऱ्यावाइटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फळ” खाण्याची त्यांना मनाई होती. (उत्पत्ति २:१६, १७) या साध्याशा आज्ञेचे त्यांनी विश्वासूपणे पालन केले असते तर आपण यहोवाच्या शासनाचे समर्थन करतो हे ते दाखवू शकले असते. आपण जेव्हा दैनंदिन जीवनात यहोवाच्या सूचनांचे पालन करतो तेव्हा आपण दाखवतो की आपण यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या पक्षाचे आहोत.
५ दुसरे कारण म्हणजे, “अगदी थोडक्याविषयी” आपण कसे वागतो याचा, ‘पुष्कळाविषयी’ आपली वागणूक कशी असेल अर्थात आपल्यासमोर मोठ्या परीक्षा येतील तेव्हा आपण कसे वागू यावर प्रभाव पडतो. याबाबतीत, दानीएल व त्याचे तीन विश्वासू इब्री साथीदार—हनन्या, मीशाएल व अजऱ्या यांच्याबाबतीत काय घडले त्याचा विचार करा. सा.यु.पू. ६१७ साली त्यांना बॅबिलोन येथे बंदिवान करून नेण्यात आले. अगदी कोवळ्या वयातच, कदाचित किशोरवयात असताना ही मुले राजा नबुखदनेस्सरच्या राजदरबारात दाखल झाली. तेथे “राजा खात असे त्या मिष्टान्नांतून व पीत असे त्या द्राक्षारसातून त्यांचे नित्य खाणेपिणे चालून तीन वर्षेपर्यंत त्यांचे संगोपन व्हावे; ही मुदत संपल्यावर त्यांनी राजाच्या हुजुरास यावे, अशी राजाने आज्ञा केली.”—दानीएल १:३-५.
६. दानीएल व त्याच्या तीन इब्री साथीदारांना बॅबिलोनी राजदरबारात कोणत्या परीक्षेला तोंड द्यावे लागले?
६ पण बॅबिलोनच्या राजाने पुरवलेल्या मिष्टान्नामुळे या चार इब्री मुलांसमोर एक समस्या निर्माण झाली. राजाच्या मिष्टान्नात मोशेच्या नियमशास्त्रात मनाई केलेले काही खाद्यपदार्थ होते. (अनुवाद १४:३-२०) कदाचित प्राण्यांना मारल्यावर त्यांचे रक्त नीट वाहू दिले जात नसेल, आणि अशाप्रकारचे मांस खालल्याने देवाच्या नियमशास्राचे उल्लंघन झाले असते. (अनुवाद १२:२३-२५) कदाचित हे अन्न मूर्तींना अर्पण केलेले असण्याचीही शक्यता आहे कारण बॅबिलोनी उपासकांत सहभोजन घेण्याआधी असे करण्याची प्रथा होती.
७. दानीएल व त्याच्या तीन मित्रांच्या आज्ञाधारकपणातून काय दिसून आले?
७ साहजिकच, बॅबिलोनी राजाच्या राजघराण्यात आहारासंबंधीच्या नियमांना फारसे महत्त्व नव्हते. पण दानीएल व त्याच्या मित्रांनी, देवाने इस्राएलांना दिलेल्या नियमशास्त्रात मनाई केलेल्या वस्तू खाऊन स्वतःला भ्रष्ट करायचे नाही असा आपल्या मनाशी निर्धार केला होता. या गोष्टीचा संबंध त्यांच्या देवाप्रती एकनिष्ठ व विश्वासू राहण्याशी होता. त्यामुळे, त्यांनी आपल्याला शाकाहारी भोजन व पाणी दिले जावे अशी विनंती केली आणि त्यांची ही विनंती मान्य करण्यात आली. (दानीएल १:९-१४) आज कदाचित काहीजणांना त्या मुलांनी जे केले त्यात काही विशेष आहे असे वाटणार नाही. पण देवाच्या आज्ञेचे पालन करून त्यांनी यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या वादात आपण कोणता पक्ष घेतला आहे हे दाखवले.
८. (क) तीन इब्री मुलांच्या एकनिष्ठतेची परीक्षा घेणारा कोणता कठीण प्रसंग उद्भवला? (ख) या परीक्षेचा काय परिणाम झाला आणि यावरून काय दिसून येते?
८ लहानशा भासणाऱ्या गोष्टीच्या बाबतीतही विश्वासू राहिल्यामुळे दानीएल व त्याच्या तीन मित्रांना एका मोठ्या परीक्षेला तोंड देण्याचे धाडस मिळाले. बायबलमध्ये दानीएलाच्या दानीएल ३:१७, १८) यहोवाने त्यांना सोडवले का? या मुलांना भट्टीत टाकणारे रक्षक जळून मेले पण तीन इब्री मुले मात्र जिवंत बाहेर आली—त्यांना चटकाही लागला नव्हता! पूर्वीपासूनच सर्वप्रसंगी विश्वासू राहिल्यामुळे, भविष्यातील कठीण परीक्षेतही विश्वासू राहण्याची जणू त्यांची तयारी झाली. यावरून, लहानसहान गोष्टींतही विश्वासू राहण्याचे महत्त्व स्पष्ट होत नाही का?
पुस्तकातील ३ रा अध्याय उघडा आणि राजा नबुखेदनस्सर याने उभारलेल्या सोन्याच्या मूर्तीपुढे नमन न केल्यामुळे त्या तीन इब्री मुलांना कशाप्रकारे मृत्यूला सामोरे जावे लागले याविषयी वाचा. त्या चौघांना राजासमोर आणण्यात आले तेव्हा त्यांनी पूर्ण विश्वासाने आपला दृढनिश्चय व्यक्त केला: “ज्या देवाची आम्ही उपासना करितो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवावयाला समर्थ आहे; महाराज, तो आम्हास आपल्या हातातून सोडवील. ते कसेहि असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापिलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही.” (‘अनीतिकारक धनाच्या’ बाबतीत विश्वासूपणा
९. लूक १६:१० येथे लिहिलेल्या येशूच्या शब्दांचा संदर्भ काय होता?
९ जो लहान भासणाऱ्या गोष्टींविषयी विश्वासू असतो तो महत्त्वाच्या गोष्टींविषयीही विश्वासू असतो हे तत्त्व सांगण्याआधी येशूने आपल्या श्रोत्यांना असा सल्ला दिला: “अनीतिकारक धनाने तुम्ही आपणांसाठी मित्र जोडा; ह्यासाठी की, ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीत घ्यावे.” यानंतर त्याने थोडक्याविषयी विश्वासू राहण्याचे तत्त्व सांगितले. पुढे येशू म्हणाला: “तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल? . . . कोणत्याहि चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करिता येत नाही; कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीति करील; अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करिता येत नाही.”—लूक १६:९-१३.
१०. ‘अनीतिकारक धनाचा’ वापर करण्यात आपण विश्वासूपणा कसा दाखवू शकतो?
१० संदर्भानुसार, लूक १६:१० यातील येशूच्या शब्दांचा मुळात संबंध ‘अनीतिकारक धनाशी’ अर्थात आपल्याजवळ असलेल्या भौतिक साधनसंपत्तीशी होता. या धनाला अनीतिकारक म्हटले आहे कारण भौतिक संपत्ती, खासकरून पैसा हा पापी मनुष्याच्या नियंत्रणात आहे. शिवाय, धनसंपत्ती मिळवण्याची इच्छा अनीतिकारक कृत्ये करण्यास प्रवृत्त करू शकते. आपण सुबुद्धीने आपल्या भौतिक संपत्तीचा वापर करण्याद्वारे विश्वासूपणा दाखवतो. स्वार्थी हेतूंकरता हे धन वापरण्याऐवजी राज्याच्या वाढीकरता आणि जे गरजू आहेत त्यांना मदत करण्याकरता आपण त्याचा उपयोग करू इच्छितो. अशाप्रकारे विश्वासू राहण्याद्वारे आपण ‘सार्वकालिक वस्तीचे’ मालक यहोवा देव व येशू ख्रिस्त यांची मैत्री संपादन करतो. ते आपल्याला या सार्वकालिक वस्तीत घेतील अर्थात एकतर स्वर्गात किंवा परादीस पृथ्वीवर आपल्याला सार्वकालिक जीवन देतील.
११. यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याकरता आपण देणग्या स्वीकारतो हे घरमालकांना सांगण्यास आपण का संकोचू नये?
११ राज्याचा संदेश सांगितल्यावर आपण ज्या लोकांना बायबल किंवा बायबल आधारित साहित्य देतो आणि यहोवाच्या लोकांच्या जागतिक कार्याकरता आपण देणग्या स्वीकारतो असे त्यांना सांगतो तेव्हा मुळात आपण त्यांना काय देत असतो याचा विचार करा. खरे तर आपण त्यांना त्यांच्याजवळ असलेल्या भौतिक संपत्तीचा सुबुद्धीने वापर करण्याची संधीच देत नसतो का? लूक १६:१० यातील तत्त्वाचा संबंध मुळात भौतिक संपत्तीच्या वापराशी असला तरीसुद्धा हे तत्त्व जीवनातील इतर क्षेत्रांनाही लागू होते.
प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे
१२, १३. आपण कोणकोणत्या क्षेत्रांत प्रामाणिकपणे वागू शकतो?
१२ प्रेषित पौलाने लिहिले: “सर्व बाबतीत प्रामाणिक वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव प्रामाणिक आहे अशी आमची खातरी आहे.” (इब्री लोकांस १३:१८, NW) “सर्व बाबतीत” म्हटल्यावर त्यात पैशाच्या वापरासंबंधीच्या बाबीही आल्याच. आपल्यावर असणारे कर्ज व कर आपण तत्परतेने व प्रामाणिकपणे भरतो. का? कारण आपला विवेक आपल्याला तसे करण्यास प्रवृत्त करतो. आणि मुख्यतः देवाबद्दल प्रेम असल्यामुळे व त्याच्या आज्ञांचे पालन करण्याची आपली इच्छा असल्यामुळे आपण असे करतो. (रोमकर १३:५, ६) आपली नाही, अशी एखादी वस्तू आपल्याला सापडली तर आपण काय करतो? ती वस्तू ज्याची आहे त्याला ती परत देण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि ती वस्तू परत देण्याची आपल्याला प्रेरणा कशामुळे मिळाली हे जेव्हा आपण समजावून सांगतो तेव्हा त्यामुळे एक उत्तम साक्ष दिली जाते!
१३ सर्व बाबतीत विश्वासू व प्रामाणिक राहण्याचा अर्थ, आपल्या नोकरीच्या ठिकाणीही आपण प्रामाणिकपणे वागले पाहिजे. असे केल्यामुळे आपण ज्या देवाचे उपासक स्वतःला म्हणवतो त्याच्याकडे लोकांचे लक्ष वेधले जाते. कामचुकारपणा करून आपण कामाचा वेळ ‘चोरत’ नाही. उलट, आपण यहोवासाठी म्हणून, जिवेभावे काम करतो. (इफिसकर ४:२८; कलस्सैकर ३:२३) अंदाजानुसार, एका युरोपीय देशात आजारपणाची रजा मिळण्याकरता डॉक्टरांकडून पत्राची विनंती करणारे एक तृत्यांश लोक मुळात आजारी नसतात. देवाचे खरे सेवक कामावर जाण्याचे टाळण्याकरता खोटी कारणे सांगत नाहीत. कधीकधी, यहोवाच्या साक्षीदारांचा प्रामाणिकपणा व मेहनतीपणा पाहून त्यांचे मालक त्यांना बढती देतात.—नीतिसूत्रे १०:४.
ख्रिस्ती सेवाकार्यात विश्वासूपणा
१४, १५. कोणत्या काही मार्गांनी आपण ख्रिस्ती सेवाकार्यात विश्वासूपणा दाखवू शकतो?
१४ आपल्यावर सोपवण्यात आलेल्या सेवाकार्यात आपण विश्वासूपणा कसा दाखवतो? बायबल म्हणते: “त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.” (इब्री लोकांस १३:१५) क्षेत्र सेवाकार्यात विश्वासूपणा दाखवण्याचा सर्वात प्रमुख मार्ग म्हणजे नियमितपणे त्यात सहभाग घेणे. यहोवाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल कोणाशीही न बोलता एक सबंध महिना आपण का म्हणून जाऊ द्यावा? प्रचार कार्यात नियमित सहभाग घेतल्याने आपण अधिक निपुण व परिणामकारक बनतो.
१५ क्षेत्र सेवेत विश्वासू असण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे टेहळणी बुरूज व आमची राज्य सेवा यातील सूचनांचे पालन करणे. जेव्हा आपण पूर्वतयारी करतो आणि सुचवलेल्या सादरता किंवा इतर समर्पक सादरतांचा उपयोग करतो तेव्हा आपले साक्षकार्य अधिक फलदायी होत नाही का? राज्य संदेशाबद्दल आवड दाखवणारी व्यक्ती भेटल्यास आपण लगेच तिची पुन्हा भेट घेतो का? आणि आस्थेवाईक व्यक्तींसोबत सुरू केलेल्या गृह बायबल अभ्यासांविषयी काय? हे अभ्यास नियमित घेण्याच्या बाबतीत आपण विश्वासू व खात्रीलायक आहोत का? सेवाकार्यात विश्वासू राहिल्याने आपल्याला व जे आपले ऐकतात त्यांनाही जीवन मिळू शकते.—१ तीमथ्य ४:१५, १६.
जगापासून अलिप्त राहणे
१६, १७. आपण जगापासून अलिप्त आहोत हे कोणत्या मार्गांनी दाखवू शकतो?
१६ देवाला प्रार्थना करताना येशूने आपल्या अनुयायांबद्दल असे म्हटले: “मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेहि योहान १७:१४-१६) तटस्थता, धार्मिक सण व प्रथा पाळणे, अनैतिक वर्तन यांसारख्या महत्त्वाच्या बाबतींत आपण जगापासून अलिप्त राहण्याचा कदाचित दृढ निश्चय केला असेल. पण लहानसहान गोष्टींच्या बाबतींत कसे? आपल्या नकळत आपण जगाच्या प्रभावात येण्याची शक्यता आहे का? उदाहरणार्थ, आपण जागरूक न राहिल्यास आपला पेहराव अगदी सहजपणे असभ्य व अनुचित बनू शकतो. विश्वासू राहण्याकरता आपण पेहराव व वेशभूषेच्या बाबतीत ‘भीडस्तपणा व मर्यादशीलता’ राखली पाहिजे. (१ तीमथ्य २:९, १०) होय, “आम्ही करीत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याहि प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही; तर सर्व गोष्टीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो.”—२ करिंथकर ६:३, ४.
जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करितो. जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (१७ यहोवाचा सन्मान करण्याच्या इच्छेने, आपण मंडळीच्या सभांना जाताना सभ्यतेने पेहराव करतो. संमेलन व अधिवेशने यांत मोठ्या संख्येने आपण जमतो तेव्हाही आपल्या पेहरावाने आपण यहोवाचा सन्मान करू इच्छितो. आपला पेहराव हा आरामदायी असण्यासोबतच सुव्यवस्थित असला पाहिजे. यामुळे आपले निरीक्षण करणाऱ्यांना साक्ष मिळते. पौल व त्याच्या ख्रिस्ती बांधवांच्या कार्याकडे ज्याप्रमाणे देवदूतांनी लक्ष दिले त्याप्रमाणे आपल्या कार्यांकडेही ते लक्ष देतात. (१ करिंथकर ४:९) खरे पाहता, आपण नेहमीच उचित पेहराव केला पाहिजे. काहीजणांना पेहरावाच्या बाबतीत विश्वासूपणा, ही एक क्षुल्लक बाब वाटेल. पण देवाच्या नजरेत ती महत्त्वाची आहे.
विश्वासूपणाचे आशीर्वाद
१८, १९. विश्वासू असण्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील?
१८ खऱ्या ख्रिश्चनांना ‘देवाच्या नानाविध कृपेचे चांगले कारभारी’ म्हणण्यात आले आहे. त्याअर्थी ते ‘देवाने दिलेल्या शक्तीवर’ अवलंबून आहेत. (१ पेत्र ४:१०, ११) शिवाय, कारभारी यानात्याने आपल्यावर असे काहीतरी सोपवले आहे की जे मुळात आपल्या मालकीचे नाही—अर्थात वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त झालेली देवाची कृपा. यात आपले सेवाकार्यही समाविष्ट आहे. स्वतःला चांगले कारभारी शाबीत करताना आपण देवाने पुरवलेल्या शक्तीवर अर्थात ‘पराकोटीच्या सामर्थ्यावर’ अवलंबून राहतो. (२ करिंथकर ४:७) भविष्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेला तोंड देण्याकरता आपल्याला हे किती उत्तम प्रशिक्षण मिळत आहे!
१९ स्तोत्रकर्त्याने म्हटले: “अहो परमेश्वराचे सर्व भक्तहो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा; परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण करितो.” (स्तोत्र ३१:२३) तर मग आपण नेहमी स्वतःला विश्वासू असल्याचे शाबीत करू या व ही खातरी बाळगू या की तो “सर्व माणसांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा” आहे.—१ तीमथ्य ४:१०. (w०५ ७/१५)
तुम्हाला आठवते का?
• आपण “थोडक्याविषयी विश्वासू” का असावे?
• प्रामाणिक असण्याच्या बाबतीत आपण विश्वासू आहोत हे कसे दाखवू शकतो?
• सेवाकार्याच्या संबंधाने आपण विश्वासूपणा कसा दाखवू शकतो?
• जगापासून अलिप्त राहण्याच्या बाबतीत आपण विश्वासू कसे राहू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१८ पानांवरील चित्रे]
जो थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयीही विश्वासू
[२१ पानांवरील चित्र]
‘सर्व बाबतीत प्रामाणिक वागा’
[२१ पानांवरील चित्र]
विश्वासूपणा दाखवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे क्षेत्र सेवेकरता चांगली तयारी करणे
[२२ पानांवरील चित्र]
पेहराव व वेशभूषेच्या बाबतीत मर्यादशील असा