व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही देवाच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडू इच्छिता का?

तुम्ही देवाच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडू इच्छिता का?

तुम्ही देवाच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडू इच्छिता का?

“आपण . . . आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडीत आहो.”—२ करिंथकर ३:१८.

१. मोशेने काय पाहिले आणि त्यानंतर काय घडले?

कोणत्याच मनुष्याने कधी अनुभवला नसेल असा तो अद्‌भुत साक्षात्कार होता. सिनाय पर्वतावर मोशे एकटा होता आणि त्याची एक अनोखी विनंती मान्य करण्यात आली होती. जे कोणत्याही मनुष्याने कधी पाहिले नव्हते ते, अर्थात यहोवाचे वैभव पाहण्याची त्याला संधी देण्यात आली. अर्थात, मोशेने यहोवाला प्रत्यक्ष पाहिले नाही. देवाचे स्वरूप इतके तेजोमय आहे की कोणताही मनुष्य त्याला पाहून जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे, यहोवा एका देवदूताकरवी मोशेसमोरून गेला व तेथून निघून जाईपर्यंत त्याने मोशेला आपल्या “हाताने” झाकले. मग देवाच्या वैभवाच्या या साक्षात्काराचा उर्वरीत प्रकाश यहोवाने मोशेला पाहू दिला. शिवाय, यहोवा मोशेशी एका देवदूताच्या माध्यमाने बोलला देखील. यानंतर काय घडले याविषयी बायबल असे वर्णन करते: “मग मोशे सीनाय पर्वतावरून . . . उतरून येत असता परमेश्‍वराशी संभाषण केल्यामुळे [त्याच्या] चेहऱ्‍यातून तेजाचे किरण निघत” होते.—निर्गम ३३:१८-३४:७, २९.

२. ख्रिश्‍चनांनी देवाच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडण्याच्या संदर्भात प्रेषित पौलाने काय लिहिले?

तुम्ही मोशेबरोबर त्या पर्वतावर आहात अशी कल्पना करा. सर्वसमर्थ परमेश्‍वराचे वैभवी तेज पाहणे आणि त्याची वचने ऐकणे खरोखर किती रोमांचक असावे! आणि नियमशास्त्राच्या कराराचा मध्यस्थ, मोशे याच्यासोबत सिनाय पर्वतावरून चालत येणे हा केवढा मोठा बहुमान ठरला असता! पण काही अर्थांनी, मोशेने देवाचे वैभव प्रतिबिंबित केले त्यापेक्षाही श्रेष्ठ मार्गाने खरे ख्रिस्ती देवाचे वैभव प्रतिबिंबित करतात हे तुम्हाला माहीत होते का? हे विचारप्रवर्तक सत्य प्रेषित पौलाने लिहिलेल्या एका पत्रात आपल्याला आढळते. त्याने लिहिले की अभिषिक्‍त ख्रिस्ती ‘आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडतात.’ (२ करिंथकर ३:७, ८, १८) एका अर्थाने, पृथ्वीवर राहण्याची आशा असलेले ख्रिस्ती देखील देवाचे वैभव प्रतिबिंबित करतात.

ख्रिस्ती कशाप्रकारे देवाच्या गौरवाचे प्रतिबिंब पाडतात

३. मोशेही ओळखू शकत नव्हता अशा मार्गांनी आपण कशाप्रकारे यहोवाला ओळखतो?

पण आपण देवाच्या वैभवाचे प्रतिबिंब कसे पाडू शकतो? आपण तर मोशेप्रमाणे यहोवाला पाहिलेले किंवा त्याचा आवाज ऐकलेला नाही. पण खरे पाहता, मोशेही ओळखू शकत नव्हता अशा पद्धतीने आज आपण यहोवाला ओळखतो. मोशेच्या मृत्यूनंतर जवळजवळ १,५०० वर्षांनंतरच येशू मशीहा या नात्याने प्रकट झाला. त्याअर्थी येशू कशाप्रकारे नियमशास्त्राची पूर्णता करेल व मानवांना पाप व मृत्यू यांच्या कष्टदायक जाचापासून मुक्‍त करेल हे मोशेला माहीत नव्हते. (रोमकर ५:२०, २१; गलतीकर ३:१९) शिवाय, यहोवाचा महान उद्देश, त्याच्याशी निगडीत असलेले मशीही राज्य आणि या राज्याकरवी येणार असलेले परादीस यांविषयी मोशेला अतिशय मर्यादित आकलन होणे शक्य होते. तर आज आपण यहोवाचे वैभव शाब्दिक अर्थाने आपल्या डोळ्यांनी पाहात नाही तर बायबलच्या शिकवणुकींच्या आधारावर आपल्या विश्‍वासाच्या डोळ्यांनी पाहतो. शिवाय, आपण यहोवाचा आवाज त्याच्या देवदूताच्या माध्यमाने नव्हे तर बायबलच्या द्वारे, विशेषतः येशूच्या शिकवणुकींचे व सेवाकार्याचे अतिशय सुरेख वर्णन करणाऱ्‍या शुभवर्तमान वृत्तांतून ऐकला आहे.

४. (क) अभिषिक्‍त ख्रिस्ती देवाच्या वैभवाचे प्रतिबिंब कशाप्रकारे पाडतात? (ख) ज्यांना पृथ्वीवरील जीवनाची आशा आहे ते देवाच्या वैभवाचे प्रतिबिंब कसे पाडू शकतात?

आज ख्रिस्ती, देवाच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडतात याचा अर्थ त्यांच्या चेहऱ्‍यातून तेजस्वी किरण निघतात असे नाही. पण ते यहोवाच्या वैभवी व्यक्‍तिमत्त्वाबद्दल व उद्देशांबद्दल लोकांना सांगतात तेव्हा त्यांचे चेहरे नक्कीच तेजस्वी दिसतात. आपल्या या काळाविषयी संदेष्टा यशया याने असे भाकीत केले की देवाचे लोक “अन्य राष्ट्रात [यहोवाचा] महिमा प्रगट करितील.” (यशया ६६:१९) शिवाय, २ करिंथकर ४:१, २ यात आपण असे वाचतो: “ही सेवा आम्हांला देण्यात आली आहे, म्हणून . . . आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करीत नाही; तर सत्य प्रगट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सद्‌सद्विवेकाला आपणास पटवितो.” या ठिकाणी पौल विशेषतः “नव्या कराराचे सेवक” अर्थात अभिषिक्‍त ख्रिश्‍चन यांच्या संदर्भात बोलत होता. (२ करिंथकर ३:६) पण त्यांच्या सेवेमुळे अशा असंख्य लोकांवर परिणाम झाला आहे की ज्यांना पृथ्वीवर सार्वकालिक जीवन जगण्याची आशा प्राप्त झाली आहे. दोन्ही गटांच्या सेवेतून ते यहोवाच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडतात. पण केवळ ते जे शिकवतात त्याच्याकरवीच नाही तर आपल्या वर्तनावरूनही ते देवाच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडतात. सर्वसमर्थ देवाच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडण्याची आपल्यावर केवळ जबाबदारीच नाही तर हा एक मोठा बहुमान आहे!

५. आपली आध्यात्मिक सुबत्ता कशाचा पुरावा आहे?

आज, देवाच्या राज्याची वैभवी सुवार्ता येशूने भाकीत केल्याप्रमाणे सर्व जगात गाजवली जात आहे. (मत्तय २४:१४) सर्व राष्ट्रांच्या, वंशांच्या, व भाषांच्या व्यक्‍तींनी या सुवार्तेचा उत्साहाने स्वीकार करून देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याकरता अनेक परिवर्तन केले आहेत. (रोमकर १२:२; प्रकटीकरण ७:९) आरंभीच्या ख्रिश्‍चनांप्रमाणे त्यांनी जे पाहिले व ऐकले आहे त्याविषयी लोकांना सांगण्याचे ते थांबवू शकत नाहीत. (प्रेषितांची कृत्ये ४:२०) ६० लाख पेक्षा जास्त लोक आज देवाचे वैभव प्रतिबिंबित करत आहेत. मानव इतिहासात पूर्वी कधीही इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी देवाचे वैभव प्रतिबिंबित केले नव्हते. तुम्ही या लोकांमध्ये सामील आहात का? यहोवाच्या लोकांची आध्यात्मिक सुबत्ता अगदी निर्विवादपणे हे शाबीत करते की त्याचा आशीर्वाद व संरक्षण त्यांच्यावर आहे. आज अतिशय प्रभावशाली अशा शक्‍ती आपला विरोध करत आहेत, पण यहोवाचा आत्मा आपल्यावर आहे याचा हा आणखी एक पुरावा आहे. असे आपण का म्हणू शकतो हे आता पाहूया.

देवाचे लोक कधीही शांत बसणार नाहीत

६. यहोवाच्या बाजूने उभे राहण्याकरता विश्‍वास व धैर्य असणे का गरजेचे आहे?

तुम्हाला न्यायालयात एखाद्या निगरगट्ट गुन्हेगाराविरुद्ध साक्ष देण्याकरता बोलवले जाते अशी कल्पना करा. तुम्हाला माहीत आहे की हा गुन्हेगार एका शक्‍तीशाली संघटनेचा सूत्रधार असून, तुम्ही त्याचे पितळ उघडे पाडू नये म्हणून तो हर तऱ्‍हेने प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत या गुन्हेगाराविरुद्ध साक्ष देण्याकरता तुमच्याजवळ फक्‍त धैर्यच नव्हे तर हा आत्मविश्‍वासही असणे आवश्‍यक आहे की तुम्हाला अधिकाऱ्‍यांकडून या गुन्हेगारापासून संरक्षण मिळेल. आज आपण अशाच परिस्थितीत आहोत. यहोवाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल साक्ष देताना आपण दियाबल सैतानाच्या विरोधात साक्ष देतो. तो मनुष्यघातक आहे आणि सर्व जगाला ठकविणारा लबाड आहे हे लोकांना सांगून आपण त्याचे पितळ उघडे पाडतो. (योहान ८:४४; प्रकटीकरण १२:९) यहोवाच्या बाजूने व दियाबलाच्या विरोधात उभे राहण्याकरता विश्‍वास व धैर्य असणे गरजेचे आहे.

७. सैतान कितपत प्रभावशाली आहे आणि तो काय करण्याचा प्रयत्न करतो?

अर्थात यहोवा सबंध विश्‍वात सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या सामर्थ्यापुढे सैतान काहीच नाही. तेव्हा आपण ही खात्री बाळगू शकतो की आपण यहोवाची एकनिष्ठतेने सेवा करत राहतो तेव्हा तो आपले संरक्षण करण्यास समर्थ आहे, आणि केवळ समर्थच नाही तर उत्सुकही आहे. (२ इतिहास १६:९) पण, सैतान हा दुरात्म्यांचा व देवापासून दुरावलेल्या जगाचा शासक आहे. (मत्तय १२:२४, २६; योहान १४:३०) त्याला पृथ्वीच्या क्षेत्रात फेकून देण्यात आले आहे आणि तो “अतिशय संतप्त होऊन” यहोवाच्या सेवकांचा कडाडून विरोध करत आहे. तसेच सुवार्तेचा प्रचार करणाऱ्‍या सर्वांचे तोंड बंद करण्यासाठी तो आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या जगाचा वापर करत आहे. (प्रकटीकरण १२:७-९, १२, १७) हे तो कसे करतो? तीन मार्गांनी.

८, ९. आपण चुकीच्या गोष्टींची आवड धरू लागल्यास सैतान याचा कशाप्रकारे फायदा घेऊ शकतो आणि आपण आपले सोबती विचारपूर्वक का निवडावेत?

सैतान ज्याच्याद्वारे आपले लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न करतो, तो पहिला मार्ग म्हणजे जीवनाच्या चिंता. या शेवटल्या काळातील लोक धनलोभी, स्वार्थी आणि सुखविलासाची आवड धरणारे आहेत. त्यांना देवाबद्दल आवड नाही. (२ तीमथ्य ३:१-४) दैनंदिन जीवनाच्या कार्यांत लोक इतके तल्लीन आहेत की बहुतेकजण आपण जी सुवार्ता सांगतो त्याकडे लक्ष देत नाहीत. बायबलमधील सत्य शिकून घेण्यात त्यांना जराही स्वारस्य नाही. (मत्तय २४:३७-३९) ही वृत्ती सहज आपल्यावरही परिणाम करू शकते व आपल्याला आध्यात्मिकरित्या सुस्त बनवू शकते. जर आपण भौतिक वस्तूंबद्दल व सुखविलासाबद्दल आवड निर्माण केली तर देवावरचे आपले प्रेम थंड होईल.—मत्तय २४:१२.

यामुळेच ख्रिस्ती अतिशय विचारपूर्वक आपले सोबती निवडतात. राजा शलमोनाने लिहिले: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०) आपण अशा व्यक्‍तींचीच ‘सोबत धरावी’ की जे देवाचे वैभव प्रतिबिंबित करतात. त्यांची सोबत आपल्याला किती आल्हाददायक वाटते! सभांमध्ये व इतर प्रसंगी आपण आपल्या आध्यात्मिक बंधूभगिनींसोबत एकत्र येतो तेव्हा त्यांचे प्रेम, त्यांचा विश्‍वास, त्यांचा आनंद व त्यांची सुबुद्धी यांमुळे आपल्याला उत्तजन मिळते. अशा हितकारक सहवासामुळे आपली सेवा नेटाने करत राहण्याचा आपला संकल्प अधिकच बळावतो.

१०. देवाचे वैभव प्रतिबिंबित करणाऱ्‍यांविरुद्ध सैतानाने थट्टेचा कसा उपयोग केला आहे?

१० आणखी एक मार्ग ज्याद्वारे सैतान सर्व ख्रिश्‍चनांना देवाचे गौरव प्रतिबिंबित करण्यापासून रोखू इच्छिते, तो म्हणजे थट्टा. सैतान या कुयुक्‍तीचा उपयोग करतो याबद्दल आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. येशू ख्रिस्त या पृथ्वीवर सेवाकार्य करत असताना त्याची थट्टा करण्यात आली—लोक त्याच्यावर हसले, त्यांनी त्याला तुच्छ लेखले, त्याची टर उडवली, त्याचा अपमान केला, एवढेच काय तर ते त्याच्यावर थुंकले. (मार्क ५:४०; लूक १६:१४; १८:३२) सुरवातीच्या ख्रिश्‍चनांचीही थट्टा करण्यात आली. (प्रेषितांची कृत्ये २:१३; १७:३२) आधुनिक काळातील यहोवाच्या सेवकांनाही अशाचप्रकारच्या दुर्वर्तनाला तोंड द्यावे लागते. प्रेषित पेत्राने सांगितल्यानुसार एका अर्थाने, त्यांना ‘खोटे संदेष्टे’ म्हणण्यात येईल. पेत्राने भाकीत केले: “स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण . . . सर्व कांही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.” (२ पेत्र ३:३, ४) देवाच्या लोकांची असे म्हणून थट्टा केली जाते, की ते वास्तवाला धरून चालत नाहीत. बायबलच्या नैतिक दर्जांना कालबाह्‍य समजले जाते. बऱ्‍याच लोकांच्या मते आपण जो संदेश घोषित करतो तो निव्वळ मूर्खपणा आहे. (१ करिंथकर १:१८, १९) ख्रिस्ती असल्यामुळे कदाचित शाळेत, कार्यस्थळी आणि कधीकधी कुटुंबातही आपल्याला थट्टा सहन करावी लागू शकते. पण आपण यामुळे निराश न होता, आपल्या प्रचार कार्याद्वारे देवाचे वैभव प्रतिबिंबित करत राहतो कारण येशूप्रमाणेच आपल्यालाही हे माहीत आहे की देवाचे वचन हे सत्य आहे.—योहान १७:१७.

११. ख्रिश्‍चनांचे तोंड बंद करण्यासाठी सैतानाने छळाचा कशाप्रकारे उपयोग केला आहे?

११ आपले तोंड बंद करण्याच्या प्रयत्नात ज्या तिसऱ्‍या कुयुक्‍तीचा दियाबल वापर करतो ती आहे विरोध किंवा छळ. येशूने आपल्या अनुयायांना म्हटले: “तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करितील.” (मत्तय २४:९) खरोखर यहोवाचे साक्षीदार या नात्याने पृथ्वीच्या अनेक भागांत आपल्याला भयानक छळ सोसावा लागला आहे. जे देवाची सेवा करतात आणि जे दियाबल सैतानाची सेवा करतात त्यांच्यामध्ये द्वेष अथवा वैर उत्पन्‍न होईल हे यहोवाने फार पूर्वीच भाकीत केल्याचे आपल्याला माहीत आहे. (उत्पत्ति ३:१५) तसेच आपल्याला हे देखील माहीत आहे की परीक्षांना तोंड देऊनही आपण विश्‍वासू राहतो तेव्हा आपण यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या न्याय्यतेला समर्थन देत असतो. ही जाणीव बाळगल्यामुळे सर्वात कठीण परिस्थितीतही आपण खंबीर राहू शकतो. देवाचे वैभव प्रतिबिंबित करण्याचा आपला निर्धार असल्यास कोणत्याही प्रकारचा छळ आपले तोंड कायमचे बंद करू शकणार नाही.

१२. सैतानाच्या विरोधाला तोंड देऊन विश्‍वासू राहताना आपण आनंद का मानावा?

१२ तुम्ही जगाच्या आकर्षणांचा प्रतिकार करून, थट्टा व छळ सहन करतानाही विश्‍वासू राहता का? मग तुम्ही आनंदी असू शकता. येशूने आपले अनुकरण करणाऱ्‍यांना असे आश्‍वासन दिले: “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरूद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.” (मत्तय ५:११, १२) तुमचे धीर धरणे या गोष्टीचा पुरावा आहे की यहोवाचा सामर्थ्यशाली आत्मा तुमच्यावर आहे व तो तुम्हाला त्याचे वैभव प्रतिबिंबित करण्याची शक्‍ती देतो.—२ करिंथकर १२:९.

यहोवाच्या मदतीने धीर धरणे

१३. आपण नेटाने आपले ख्रिस्ती सेवाकार्य करत राहण्यामागचे मुख्य कारण कोणते?

१३ आपण धीर धरून सेवाकार्य करत राहतो यामागचे मुख्य कारण म्हणजे आपले यहोवावर प्रेम आहे आणि त्याचे वैभव प्रतिबिंबित करण्यास आपल्याला आनंद वाटतो. सहसा लोक ज्यांच्यावर प्रेम करतात व ज्यांचा आदर करतात त्यांचे अनुकरण करतात. आपल्या अनुकरणास जर कोणी सर्वात योग्य आहे तर तो आहे यहोवा देव. त्याच्या महान प्रेमामुळेच त्याने आपल्या पुत्राला या पृथ्वीवर सत्याविषयीची साक्ष देण्याकरता व आज्ञाधारक मानवांना सुटका देण्याकरता पाठवले. (योहान ३:१६; १८:३७) देवाप्रमाणेच आपलीही इच्छा आहे की सर्व प्रकारच्या लोकांनी पश्‍चात्ताप करून तारण मिळवावे; म्हणूनच आपण त्यांना प्रचार करतो. (२ पेत्र ३:९) ही इच्छा, तसेच देवाचे अनुकरण करण्याचा आपला निर्धार, आपल्याला नेटाने सेवाकार्य करत राहण्याची व त्याद्वारे त्याचे वैभव प्रतिबिंबित करत राहण्याची प्रेरणा देतो.

१४. आपल्या सेवाकार्यात टिकून राहण्याचे सामर्थ्य यहोवा कशाप्रकारे आपल्याला पुरवतो?

१४ पण शेवटी, ख्रिस्ती सेवाकार्यात टिकून राहण्याचे सामर्थ्य यहोवाकडूनच आपल्याला मिळते. त्याच्या आत्म्याच्या, संघटनेच्या व वचनाच्या द्वारे तो आपले पालनपोषण करतो व आपल्याला शक्‍ती देतो. जे यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करू इच्छितात त्यांना तो ‘धीर देतो.’ तो आपल्या प्रार्थनांचे उत्तर देऊन, परीक्षांना तोंड देण्याकरता आवश्‍यक असलेली सुबुद्धी आपल्याला देतो. (रोमकर १५:५; याकोब १:५) शिवाय, आपल्या सहनशक्‍तीच्या पलीकडे असणारी कोणतीही परीक्षा यहोवा कधीही आपल्यावर येऊ देत नाही. जर आपण यहोवावर भरवसा ठेवला तर तो आपल्याला योग्य मार्ग दाखवेल जेणेकरून आपल्याला पुढेही त्याचे वैभव प्रतिबिंबित करत राहता येईल.—१ करिंथकर १०:१३.

१५. कोणती गोष्ट आपल्याला टिकून राहण्यास मदत करते?

१५ आपल्या सेवाकार्यात आपण टिकून राहतो तेव्हा देवाचा आत्मा आपल्यावर आहे हे दिसून येते. उदाहरणार्थ, तुम्हाला कोणीतरी घरोघर जाऊन विशिष्ट प्रकारच्या ब्रेडची पाकिटे मोफत वाटण्यास सांगितले आहे असे समजा. तुम्हाला हे काम स्वखर्चाने व स्वतःच्या वेळात करायला सांगितले जाते. शिवाय, लवकरच तुम्हाला कळते की ही ब्रेडची पाकिटे बहुतेक लोकांना नको आहेत; तुम्ही ती वाटत असताना काहीजण तुमचा विरोधही करतात. तरीसुद्धा हे काम तुम्ही वर्षानुवर्षे करत राहाल असे तुम्हाला वाटते का? कदाचित नाही. पण सुवार्तेचा प्रचार करण्याकरता मात्र तुम्ही स्वतःचा वेळ, पैसा व शक्‍ती बऱ्‍याच काळापासून, किंबहुना कित्येक दशकांपासून खर्च करत आहात. का? तुम्हाला यहोवावर प्रेम आहे आणि त्याने आपल्या आत्म्याच्याद्वारे तुमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देऊन या कार्यात टिकून राहण्यास तुम्हाला मदत केली आहे म्हणूनच नव्हे का? निश्‍चितच!

आठवणीत राहील असे कार्य

१६. सेवाकार्यात टिकून राहिल्यामुळे आपल्याला व आपले ऐकणाऱ्‍यांना कोणते प्रतिफळ मिळेल?

१६ नव्या कराराची सेवा हे एक अतुलनीय वरदान आहे. (२ करिंथकर ४:७) त्याचप्रकारे दुसऱ्‍या मेंढरांद्वारे सबंध जगात केली जाणारी ख्रिस्ती सेवा देखील अमूल्य आहे. तुम्ही तुमच्या सेवाकार्यात नेटाने टिकून राहता तेव्हा तुम्ही पौलाने तीमथ्याला लिहिल्याप्रमाणे, ‘स्वतःचे व तुमचे ऐकणाऱ्‍यांचेहि तारण साधाल.’ (१ तीमथ्य ४:१६) याचा अर्थ काय आहे यावर विचार करा. तुम्ही घोषित करत असलेल्या सुवार्तेमुळे लोकांना सर्वकाळ जगण्याची संधी मिळते. ज्यांना तुम्ही आध्यात्मिकरित्या मदत करता त्यांच्यासोबत तुमचे मैत्रीचे घट्ट नाते जुळते. कल्पना करा, ज्यांना तुम्ही देवाबद्दल शिकून घेण्यास मदत केली त्यांच्यासोबत सर्वकाळ परादीसमध्ये राहणे किती आनंददायक असेल! नक्कीच, तुम्ही त्यांना मदत करण्यासाठी जे प्रयत्न केले ते ते कधीही विसरणार नाहीत. हे तुमच्याकरता किती समाधानदायक असेल!

१७. आपला हा काळ मानव इतिहासात अद्वितीय का आहे?

१७ तुम्ही मानव इतिहासाच्या एका अद्वितीय काळात जगत आहात. पुन्हा कधीही ही सुवार्ता, देवापासून दुरावलेल्या माणसांच्या जगात गाजविली जाणार नाही. नोहा अशाच एका जगात राहात होता आणि ते जग त्याच्या डोळ्यांदेखत नाहीसे झाले. देवाच्या इच्छेनुसार नोहाने विश्‍वासूपणे तारू बांधले आणि त्यामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण झाले याबद्दल त्याला किती आनंद वाटला असेल! (इब्री लोकांस ११:७) तुम्हीही असाच आनंद अनुभवू शकाल. कल्पना करा, नव्या जगात जेव्हा तुम्ही शेवटल्या दिवसातल्या आपल्या कार्यांचे अवलोकन कराल तेव्हा तुम्हाला हे जाणून किती समाधान मिळेल, की राज्याच्या वाढीकरता आपल्याकडून जे काही होऊ शकले ते आपण केले.

१८. यहोवा आपल्या सेवकांना कोणते आश्‍वासन व प्रोत्साहन देतो?

१८ तर मग, आपण देवाचे वैभव प्रतिबिंबित करत राहू या. आपण असे केले हे आपण सर्वकाळ आठवणीत ठेवू शकू. यहोवाही आपली कार्ये आठवणीत ठेवतो. बायबल आपल्याला असे प्रोत्साहन देते: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. आमची अशी इच्छा आहे की, तुम्हापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्‍त करावी; म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्‍वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.”—इब्री लोकांस ६:१०-१२. (w०५ ८/१५)

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• ख्रिस्ती कशाप्रकारे देवाचे वैभव प्रतिबिंबित करतात?

• देवाच्या लोकांचे तोंड बंद करण्यासाठी सैतान कोणकोणत्या कुयुक्‍त्‌यांचा उपयोग करतो?

• देवाचा आत्मा आपल्यावर आहे हे कशावरून शाबीत होते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

मोशेच्या चेहऱ्‍यातून तेजस्वी किरणे निघत होती

[१० पानांवरील चित्र]

आपण आपल्या सेवाकार्यातून देवाचे वैभव प्रतिबिंबित करतो