व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलबद्दलची आवड पाहून त्यांची प्रशंसा होते

बायबलबद्दलची आवड पाहून त्यांची प्रशंसा होते

बायबलबद्दलची आवड पाहून त्यांची प्रशंसा होते

मरियाना, एक यहोवाची साक्षीदार आहे. ती दक्षिण इटलीत राहते. ती १८ वर्षांची आहे. आणि उच्च शाळेतले हे तिचे शेवटले वर्ष आहे. तिच्या शाळेत इतरही अनेक तरुण साक्षीदार शिकत आहेत.

मरियाना लिहिते: “काही वर्षांपासून आम्ही काही जण मधल्या सुटीत शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे यातून दिवसाचे बायबल वचन वाचू लागलो आहोत. आम्हाला दुसरी कुठली जागा मिळाली नाही म्हणून आम्ही शिक्षकांच्या खोलीसमोरच्या दालनात उभे राहून वचन वाचायचो. तिथं म्हणावी तशी शांतता नव्हती. येणाऱ्‍या-जाणाऱ्‍या प्रत्येक शिक्षकाचं लक्ष आमच्याकडे जायचं आणि काही तर आम्ही काय करत आहोत हे पहायला थांबायचे. यामुळे आम्हाला त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरं द्यायला संधी मिळायची. दररोज एक तरी शिक्षक हमखास थांबायचे. अनेक शिक्षकांनी, बायबल वचनावर आम्ही करत असलेली चर्चा थांबून ऐकली आहे व आम्हा साक्षीदारांना आध्यात्मिक गोष्टींबद्दल किती आवड आहे यावर आमची प्रशंसा केली आहे. एकदा, आमच्या शाळेचे साहाय्यक प्राचार्य आम्हाला, शिक्षकांच्या खोलीत आत बसून चर्चा करा, असे म्हणाले.

“दैनिक वचनाची चर्चा करण्यासाठी आम्हाला कुठे जमावे लागते हे पाहून माझ्या एका शिक्षकांनी प्राचार्यांना जाऊन विचारले, की आम्ही मुलं एखाद्या वर्गात जाऊन चर्चा करू शकतो का, कारण वर्गात मधल्या सुटीत शांतता असते. प्राचार्यांनी याला परवानगी दिली. आम्ही मांडत असलेल्या उत्तम उदाहरणाबद्दल माझ्या शिक्षकांनी संपूर्ण वर्गासमोर आमची स्तुती केली. यहोवानं आम्हाला दिलेल्या मोठ्या सुहक्काबद्दल आम्हाला खरोखरच खूप आनंद वाटतो.” (w०५ ८/१५)