व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चिन्हे ओळखणे खरोखरच महत्त्वाचे आहे!

चिन्हे ओळखणे खरोखरच महत्त्वाचे आहे!

चिन्हे ओळखणे खरोखरच महत्त्वाचे आहे!

“पहिल्यांदा मला वाटलं, की आमचा मुलगा ॲन्ड्रियास याचं साधं डोकं दुखत आहे. पण मग त्याला भूक लागेनाशी झाली आणि त्याला खूप ताप आला. त्याचं डोकं जास्तच दुखायला लागलं तेव्हा मला काळजी वाटायला लागली. माझा नवरा घरी आल्यावर आम्ही ॲन्ड्रियासला डॉक्टरांकडे नेलं. त्यांनी त्याला तपासून पाहिलं आणि ॲन्ड्रियासला तत्काळ इस्पितळात पाठवलं. ॲन्ड्रियासला साधी डोकेदुखी नव्हती. त्याला मेनिन्जायटीस (मेंदूचा दाह) झाला होता. त्याला वेळीच उपचार मिळाले व तो लगेच बरा झाला.”—गर्ट्रूट, जर्मनीतील एक माता.

गर्ट्रूटसारखा अनुभव कदाचित अनेक पालकांना आला असावा. ते आपल्या मुलाच्या तब्येतीत दिसणाऱ्‍या चिन्हांवरून सांगू शकतील की त्यांचे मूल आजारी आहे. सर्वच आजार गंभीर नसले तरीसुद्धा, आपल्या मुलाच्या तब्येतीत दिसणाऱ्‍या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास पालकांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. चिन्हलक्षणे पाहून उचित हालचाल केल्याने परिस्थितीत बराच फरक पडू शकतो. ही खरोखरच एक गंभीर बाब आहे.

आरोग्याच्या व्यतिरिक्‍त इतर बाबतीतही ही गोष्ट खरी आहे. याचे एक सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे, २००४ सालच्या डिसेंबर महिन्यात हिंद महासागराच्या आसपासच्या भागात आलेली सुनामी. ऑस्ट्रेलिया व हवाई सारख्या ठिकाणी असलेल्या सरकारी संघटनांना, उत्तर सुमात्रात भयंकर भूकंप होईल हे समजले होते आणि या भूकंपाचे किती भयंकर परिणाम होतील हेही त्यांना माहीत होते. पण, भूकंपाचा परिणाम ज्या क्षेत्रात होणार होता त्या क्षेत्रातील लोकांना धोक्याची सूचना देण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता किंवा सूचनेनुसार कार्य करण्याकरता सोय नव्हती. परिणामतः, २,२०,००० पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला.

अधिक महत्त्वपूर्ण चिन्हे

येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना त्याने त्याच्या श्रोत्यांना चिन्हे पाहून त्यानुसार कार्य करण्याकरता एक धडा शिकवला. तो अधिक महत्त्वपूर्ण चिन्हाविषयी बोलत होता. बायबल त्याविषयी असे म्हणते: “परूशी व सदूकी ह्‍यांनी येऊन येशूची परीक्षा पाहण्याकरिता, आम्हाला आकाशातून काही चिन्ह दाखवा, अशी त्याच्याकडे मागणी केली. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्ही संध्याकाळी म्हणता, उघाड होईल, कारण आभाळ तांबूस आहे; आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज झड लागेल, कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हाला आभाळाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे तुम्हाला ओळखता येत नाहीत?”—मत्तय १६:१-३.

“काळाची लक्षणे” असे जेव्हा येशूने म्हटले तेव्हा त्याने असू सूचित केले, की त्याच्या पहिल्या शतकातील यहुदी श्रोत्यांनी, ते ज्या काळात जगत होते त्या काळाचे भान राखायला हवे होते. यहुदी व्यवस्थीकरणावर लवकरच असे एक संकट कोसळणार होते ज्याचा या यहुदी लोकांवर परिणाम होणार होता. येशूने आपला मृत्यू व्हायच्या काही दिवस आधी आपल्या शिष्यांना आणखी एका चिन्हाविषयी अर्थात त्याच्या उपस्थितीच्या चिन्हाविषयी सांगितले. तेव्हा त्याने जे सांगितले ते आज आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. (w०५ १०/१)