व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही “देवविषयक बाबतीत धनवान” आहात का?

तुम्ही “देवविषयक बाबतीत धनवान” आहात का?

तुम्ही “देवविषयक बाबतीत धनवान” आहात का?

येशू ख्रिस्ताने विचारांना चालना देणारे जे अनेक दृष्टांत दिले त्यांतील एक दृष्टांत एका धनाढ्य जमीनदाराचा आहे. स्वतःचे भवितव्य आणखी सुरक्षित करण्याकरता या मिरासदाराने मोठमोठी कोठारे बांधायचे ठरवले. पण येशूच्या दृष्टांतांत या मनुष्याला ‘मूर्ख’ म्हटले आहे. (लूक १२:१६-२१) अनेक बायबल भाषांतरे हा शब्द वापरतात. इतका कठोर शब्द का वापरण्यात आला?

कारण, या धनाढ्य मनुष्याने योजना बनवताना देवाचा मुळीच विचार केला नव्हता, आणि त्याच्या शेतांतून मिळणाऱ्‍या उत्पादनाचे श्रेय त्याने देवाला दिले नव्हते. (मत्तय ५:४५) त्याऐवजी तो अशी बढाई मारत होता, की “हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.” होय, त्याला वाटत होते, की त्याच्या प्रयत्नांचे फळ “उंच तटासारखे” आहे जे त्याचे संरक्षण करेल.—नीतिसूत्रे १८:११.

अशाप्रकारच्या घमेंडी वृत्तीविरुद्ध इशारा देताना शिष्य याकोबाने लिहिले: “अहो! जे तुम्ही म्हणता की, आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही; तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहा ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते.”—याकोब ४:१३, १४.

हे शब्द किती खरे आहेत; येशूने दिलेल्या दृष्टांतांतील त्या धनाढ्य मनुष्याला असे सांगितले जाते: “अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे, ते कोणाचे होईल?” आपली स्वप्ने पूर्ण झालेली पाहण्याच्या आधीच हा मनुष्य आसमंतात विलीन होणाऱ्‍या वाफेसारखा नाहीसा होणार होता अर्थात मरणार होता. या दृष्टांतामागचा धडा आपल्या लक्षात येतो का? येशूने म्हटले: “जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करितो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.” तुम्ही “देवविषयक बाबतीत धनवान” आहात का? (w०५ १०/१)