व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पहिला इतिहास पुस्तकातील ठळक मुद्दे

पहिला इतिहास पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

पहिला इतिहास पुस्तकातील ठळक मुद्दे

यहुद्यांना बॅबिलोनच्या बंदिवासातून आपल्या मायदेशी येऊन सुमारे ७७ वर्षे ओलांडली होती. सुभेदार जरुब्बाबेलने बांधलेल्या मंदिराला ५५ वर्षे झाली होती. यहुदी लोक एका अतिशय महत्त्वपूर्ण कारणासाठी परतले होते; जेरुसलेममध्ये खऱ्‍या उपासनेची पुनःस्थापना करण्याकरता ते परतले होते. परंतु, लोकांमध्ये यहोवाच्या उपासनेबद्दल उत्साह राहिला नव्हता. त्यामुळे त्यांना उत्तेजन देण्याची तातडीने गरज होती आणि अगदी हेच, बायबलमधील पहिला इतिहास या पुस्तकात दिले आहे.

पहिला इतिहास पुस्तकात, वंशावळीच्या अहवालाव्यतिरिक्‍त सुमारे ४० वर्षांच्या कालावधीचा अर्थात राजा शौलाच्या मृत्यूपासून राजा दावीदाच्या मृत्यूपर्यंतचा अहवाल दिला आहे. याजक एज्राने सा.यु.पू. ४६० साली हे पुस्तक लिहिले असावे, असे मानले जाते. पहिले इतिहास पुस्तक आपल्यासाठी लक्षवेधक आहे कारण ते, मंदिरातील उपासनेविषयी सूक्ष्मदृष्टी आणि मशिहाच्या वंशावळीची सविस्तर माहिती देते. देवाच्या प्रेरित वचनाचा एक भाग या नात्याने त्यातील संदेश आपला विश्‍वास मजबूत करते आणि बायबलची आपली समज वाढवते.—इब्री लोकांस ४:१२.

नावांचा महत्त्वपूर्ण अहवाल

(१ इतिहास १:१–९:४४)

एज्राने गोळा केलेली वंशावळीची सविस्तर माहिती निदान तीन कारणांसाठी तरी आवश्‍यक आहे: केवळ अधिकृत पुरुषच याजक म्हणून सेवा करतील याची खात्री करण्यासाठी, वंशपरंपरेने मिळणारा वारसा ठरवण्यास मदत मिळण्यासाठी आणि मशीहाच्या वंशावळीचा अहवाल जपून ठेवण्यासाठी. ही वंशावळी यहुद्यांच्या अगदी सुरुवातीपासून म्हणजे अगदी पहिल्या पुरुषापासून सुरू होते. त्यातील दहा पिढ्यांची वंशावळ आदामापासून नोहापर्यंतची आहे आणि आणखी दहा पिढ्यांची वंशावळ अब्राहामापर्यंतची आहे. इश्‍माएलचे पुत्र, अब्राहामाची उपपत्नी कटूरा हिचे पुत्र आणि एसावाचे पुत्र यांची माहिती दिल्यावर, अहवालात इस्राएलच्या १२ पुत्रांच्या वंशावळीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.—१ इतिहास २:१.

यहुदाच्या वंशजांची भरपूर माहिती देण्यात आली आहे कारण त्यांच्यातूनच राजा दावीदाचा राजसी वंश येतो. अब्राहामापासून दाविदापर्यंत १४ पिढ्या आणि इस्राएलांना बॅबिलोनला पाठवण्यापर्यंतच्या आणखी १४ पिढ्या आहेत. (१ इतिहास १:२७, ३४; २:१-१५; ३:१-१७; मत्तय १:१७) एज्रा मग यार्देनच्या पूर्वेकडील वंशांतील संतानांची आणि लेवी पुत्रांच्या वंशावळीची सूची करतो. (१ इतिहास ५:१-२४; ६:१) यानंतर, यार्देन नदीच्या पश्‍चिमेकडील इतर वंशांतल्या काहींचा संक्षिप्त अहवाल आणि बन्यामिन कुळाची सविस्तर माहिती एज्रा आपल्याला देतो. (१ इतिहास ८:१) बॅबिलोनच्या दास्यत्वातून परत आलेल्या जेरुसलेमच्या पहिल्या निवासींची नावे देखील या पुस्तकात देण्यात आली आहेत.—१ इतिहास ९:१-१६.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:१८—शेलहचा पिता कोण होता, केनान की अर्पक्षद? (लूक ३:३५, ३६) अर्पक्षद शेलहचा पिता होता. (उत्पत्ति १०:२४; ११:१२) लूक ३:३६ मधील “केनान” हा शब्द “खाल्डी” या शब्दाचा अपभ्रंश असावा. हे जर खरे असेल, तर मग मूळ लेखात असे असायला हवे: “खाल्डी अर्पक्षदाचा पुत्र.” किंवा कदाचित, केनान आणि अर्पक्षद ही नावे एकाच व्यक्‍तीची असावीत. “केनानाचा . . . पुत्र” हा वाक्यांश काही हस्तलेखांमध्ये नाही, या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.—लूक ३:३६, NW तळटीप.

२:१५—दावीद इशायाचा सातवा पुत्र होता का? नाही. इशायाला आठ पुत्र होते आणि दावीद शेंडंफळ होता. (१ शमुवेल १६:१०, ११; १७:१२) इशायाचा एक पुत्र निपुत्रिकच मरण पावला. त्या पुत्राच्या नावाचा वंशावळीवर काही परिणाम पडणार नसल्यामुळे एज्राने त्याचे नाव वगळले.

३:१७—लूक ३:२७ मध्ये यखन्याचा पुत्र शलतीएल याला नेरीचा पुत्र का म्हटले आहे? यखन्या शलतीएलाचा पिता होता. परंतु नेरीने आपली कन्या यखन्याला पत्नी म्हणून दिली. त्यामुळे लूकने जसे योसेफाला, मरीयाचा पिता एली याचा पुत्र म्हटले तसेच नेरीच्या जावयाला त्याने नेरीचा पुत्र म्हटले.—लूक ३:२३.

३:१७-१९—जरुब्बाबेल, पदाया आणि शलतीएल यांचे आपापसात काय नाते होते? जरुब्बाबेल पदायाचा पुत्र होता आणि पदाया शलतीएलचा भाऊ होता. पण कधीकधी बायबल, जरुब्बाबेलास शलतीएलचा पुत्र असे संबोधते. (मत्तय १:१२; लूक ३:२७) कदाचित पदाया मरण पावल्यानंतर शलतीएलाने जरुब्बाबेलास लहानाचे मोठे केले असावे. किंवा कदाचित शलतीएल निपुत्रिक मरण पावल्यामुळे पदायाने नियमशास्त्रानुसार, शलतीएलाच्या विधवा पत्नीशी लग्न केले आणि या दोघांचा पहिला पुत्र जरुब्बाबेल असावा.—अनुवाद २५:५-१०.

५:१, २—योसेफाला ज्येष्ठत्वाचा हक्क मिळाला म्हणजे काय मिळाले? योसेफाला ज्येष्ठत्वाचा हक्क मिळाला म्हणजे त्याला वारशाचे दोन हिस्से मिळाले. (अनुवाद २१:१७) त्यामुळे तो एफ्राईम व मनश्‍शे या दोन कुळांचा पिता बनला. इस्राएलचे इतर पुत्र केवळ एकाच कुळाचा पिता बनले.

आपल्याकरता धडे:

१:१–९:४४. खऱ्‍या लोकांची वंशावळी शाबीत करते की खऱ्‍या उपासनेची संपूर्ण व्यवस्था मिथ्यकथेवर नव्हे तर वस्तुस्थितीवर आधारित आहे.

४:९, १०. याबेसने यहोवाला अशी कळकळीची विनंती केली, की आपल्या क्षेत्राचा शांतीमय पद्धतीने विस्तार व्हावा जेणेकरून अधिकाधिक देव-भीरू लोकांना तेथे वास्तव्य करता येईल. यहोवाने याबेसाची ही विनंती पूर्ण केली. आपणही जेव्हा शिष्य बनवण्याच्या कार्यात आवेशाने भाग घेतो तेव्हा देवाच्या उपासकांमध्ये वाढ व्हावी म्हणून यहोवाला मनापासून प्रार्थना केली पाहिजे.

५:१०, १८-२२. राजा शौलाच्या दिवसांत, यार्देनाच्या पूर्वेकडील वंशांनी, दुप्पट पेक्षा अधिक संख्येने असलेल्या हगरी लोकांना हरवले. कारण, पूर्वेकडील वंशांतील शूरवीरांनी यहोवावर भरवसा ठेवला आणि त्याच्या मदतीवर अवलंबून राहिले. आपल्यापेक्षा अधिक संख्येने असलेल्या आध्यात्मिक शत्रूंविरुद्ध लढा देत असताना आपणही यहोवावर पूर्ण भरवसा ठेवू या.—इफिसकर ६:१०-१७.

९:२६, २७. लेवी द्वारपाळांवर खूप मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. मंदिरातील पवित्र भागाच्या दरवाज्याच्या चाव्या त्यांना देण्यात आल्या होत्या. ते दररोज अगदी विश्‍वासूपणे फाटके उघडत असत. आपल्या क्षेत्रातील लोकांना जाऊन भेटण्याची व त्यांना यहोवाची उपासना करायला मदत करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आली आहे. तेव्हा आपणही या लेवी द्वारपाळांसारखे भरवसालायक व विश्‍वसनीय ठरू नये का?

दावीद राजा म्हणून राज्य करतो

(१ इतिहास १०:१–२९:३०)

या कथेची सुरुवात, राजा शौल आणि त्याचे तीन पुत्र गिलबोवा डोंगरात पलिष्ट्यांविरुद्ध लढत असताना ठार होतात या वर्णनाने होते. इशायाचा पुत्र दावीद याला यहुदा वंशाचा राजा नेमले जाते. सर्व कुळाचे वीरपुरुष हेब्रोनास येतात आणि त्याला इस्राएलचा राजा बनवतात. (१ इतिहास ११:१-३) त्यानंतर लगेच तो जेरुसलेमवर कब्जा करतो. इस्राएली लोक जेरुसलेममध्ये कराराचा कोश, ‘जयजयकार करीत, रणशिंग, . . . सतार व वीणा यांचा नाद काढीत समारंभाने’ आणतात.—१ इतिहास १५:२८.

दावीद खऱ्‍या देवाचे एक मंदिर बांधण्याची इच्छा व्यक्‍त करतो. पण तो सन्मान शलमोनाला दिला जाईल असे सांगून यहोवा त्याच्याशी एका राज्याचा करार करतो. दावीद जेव्हा इस्राएलच्या शत्रूंना नेस्तनाबूत करण्याची मोहीम चालू ठेवतो तेव्हा यहोवा त्याला एका मागोमाग एक विजय देत राहतो. एका बेकायदशीर शिरगणतीमुळे ७०,००० लोकांचा मृत्यू होतो. यहोवासाठी एक वेदी बांधण्याची आज्ञा देवदूताकडून मिळाल्यावर दावीद अर्णान यबूसी याच्याकडून जागा विकत घेतो. त्या जागेवर यहोवाचे एक “अत्यंत भव्य” मंदिर बांधण्याकरता तो “पुष्कळ तयारी” सुरू करतो. (१ इतिहास २२:५) दावीद लेव्यांच्या सेवांची व्यवस्था करतो; शास्त्रवचनांत इतरत्र कोठेही लेव्यांच्या सेवांविषयीचे इतके सविस्तर वर्णन देण्यात आलेले नाही. दावीद राजा आणि इस्राएली लोक सढळ हाताने मंदिरासाठी देणगी देतात. चाळीस वर्षे राज्य केल्यावर ‘आयुष्य, धन व मान यांनी संपन्‍न होऊन व चांगला वृद्ध होऊन दावीद मृत्यू पावतो आणि त्याचा पुत्र शलमोन त्याच्या जागी राजा होतो.’—१ इतिहास २९:२८.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

११:११—या वचनात ठार मारलेल्यांची संख्या ३०० आहे पण दुसरे शमुवेल २३:८ मधील त्याच अहवालात ८०० आहे, असे का? दावीदाच्या तीन बलाढ्य शूरवीरांचा नायक याशबाम किंवा योशेब-बश्‍शेबेथ होता. इतर दोन शूरवीर एलाजार व शम्मा हे होते. (२ शमुवेल २३:८-११) दोन अहवालांतील फरक यासाठी असावा, कारण हे अहवाल एकाच मनुष्याने केलेल्या वेगवेगळ्या कार्यांना सूचित करत असावेत.

११:२०, २१—दावीदाच्या तीन प्रमुख शूरवीर नायकांसमोर अबीशयाचे पद काय होते? अबीशय दावीदाच्या सेवा करणाऱ्‍या तीन शूरवीरांपैकी नव्हता. परंतु, २ शमुवेल २३:१८, १९, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतरात म्हटल्यानुसार, तो ३० योद्ध्‌यांचा नायक होता आणि निश्‍चितच प्रसिद्ध होता. अबीशयचे नावलौकिक त्या तीन प्रमुख शूरवीरांइतकेच होते कारण त्याने याशबामासारखेच एक शूर कृत्य केले होते.

१२:८—कोणत्या अर्थाने गादी योद्ध्‌यांचे चेहरे ‘सिंहासारखे’ होते? हे वीरपुरूष दावीदाबरोबर जंगलात होते. त्यांचे केस लांब वाढले होते. त्यांच्या केसाळ आयाळामुळे ते हिंस्र व सिंहासारखे दिसत होते.

१३:५—या वचनात कोणत्या ठिकाणाचा उल्लेख आहे? या वचनात वापरण्यात आलेल्या शीहोर या शब्दाचा, मिसर देशाशी जवळचा संबंध आहे व त्यामुळे सहसा शीहोर नाईल नदीच्या पूर्वेकडील फाट्याला सूचित करत असावे, असे काहींचे म्हणणे आहे. (यहोशवा १३:३; यशया २३:३; यिर्मया २:१८) परंतु, पुष्कळ विवेचकांच्या मते ते “मिसरच्या नदीचे खोरे” किंवा वादी एल-अरीश अर्थात एक लांब दरी आहे जी वचनयुक्‍त देशाची नैऋत्येकडील सीमा आहे.—गणना ३४:२, ५; उत्पत्ति १५:१८.

१६:३०—यहोवापुढे “कंपायमान” होण्याचा अर्थ काय? येथे लाक्षणिक अर्थाने वापरण्यात आलेला “कंपायमान” हा शब्द, यहोवाबद्दल आदरयुक्‍त भीती व गहिऱ्‍या सन्मानास सूचित करतो.

१६:१, ३७-४०; २१:२९, ३०; २२:१९—जेरुसलेमेत कोश आणल्यापासून मंदिर बांधेपर्यंत इस्राएलात उपासनेची कोणती पद्धत चालू होती? दावीदाने जेरुसलेमला कोश आणून तो त्याने बनवलेल्या तंबूत ठेवला तेव्हा तो कोश अनेक वर्षांपासून निवासमंडपात नव्हता. पण जेरुसलेमला आणल्यानंतर तो त्या तंबूतच होता. निवासमंडप गिबोनात होते जेथे सादोक महायाजक आणि त्याचे भाऊ नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे अर्पणे करीत असत. जेरुसलेममध्ये मंदिर बांधून होईपर्यंत असे चालत होते. मंदिर पूर्ण झाल्यावर, निवासमंडप गिबोनहून जेरुसलेमेत आणण्यात आले आणि मंदिराच्या अतिपवित्र ठिकाणी कोश ठेवण्यात आला.—१ राजे ८:४, ६.

आपल्याकरता धडे:

१३:११. आपले प्रयत्न असफल ठरतात तेव्हा चिडण्याऐवजी व यहोवाला दोष देण्याऐवजी आपण परिस्थिती पडताळून पाहिली पाहिजे आणि कोणत्या गोष्टीमुळे आपले प्रयत्न असफल ठरले ते पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दावीदाने असेच केले. त्याने आपल्या चुकांतून धडा घेतला आणि कालांतराने यशस्वीपणे उचित मार्गाने कोश जेरुसलेमेत आणला. *

१४:१०, १३-१६; २२:१७-१९. आपल्या आध्यात्मिकतेवर प्रभाव पडेल असा कोणताही निर्णय घेताना किंवा पाऊल उचलताना आपण यहोवाला प्रार्थना करून त्याचे मार्गदर्शन विचारले पाहिजे.

१६:२३-२९. यहोवाच्या उपासनेला आपल्या जीवनात प्रथम स्थान असले पाहिजे.

१८:३. यहोवा आपली अभिवचने पूर्ण करणारा देव आहे. दावीदाद्वारे त्याने, अब्राहामाच्या संतानाला संपूर्ण कनान देश अर्थात, “मिसराच्या नदीपासून ते महानदी फरात येथपर्यंतचा प्रदेश” देण्याविषयी दिलेले वचन त्याने पूर्ण केले.—उत्पत्ति १५:१८; १ इतिहास १३:५.

२१:१३-१५. यहोवाने देवदूताला मरी थांबवण्यास सांगितले कारण त्याला आपल्या लोकांची दशा पाहावेना. होय, “त्याचे वात्सल्य मोठे आहे.” *

२२:५, ९; २९:३-५, १४-१६. यहोवाचे मंदिर बांधण्याची आज्ञा त्याला देण्यात आलेली नसली तरीसुद्धा दावीदाने उदार मन दाखवले. का बरे? कारण, त्याने हे जाणले होते, की त्याने जे काही मिळवले होते ते सर्व यहोवाच्या चांगुलपणामुळेच शक्य झाले होते. अशाचप्रकारच्या कृतज्ञ मनोवृत्तीने आपण उदारतेचा आत्मा दाखवण्यास प्रवृत्त झाले पाहिजे.

२४:७-१८. दावीदाने बनवलेल्या २४ याजकांच्या विभागणीची व्यवस्था, यहोवाच्या देवदूताने बाप्तिस्मा करणारा योहानाचा पिता जखऱ्‍या याला दर्शन देऊन योहानाच्या जन्माविषयी त्याला सांगितले तेव्हाही चालू होती. “अबीयाच्या वर्गांतील” एक सदस्य यानात्याने जखऱ्‍या तेव्हा, त्याला मिळालेली मंदिरातील सेवा करत होता. (लूक १:५, ८, ९) खरी उपासना इतिहासाशी संबंधित आहे—मिथ्यकथेतील व्यक्‍तींशी नव्हे. आज यहोवाच्या सुसंघटित उपासनापद्धतीच्या बाबतीत आपण एकनिष्ठपणे ‘विश्‍वासू व बुद्धीमान दासाला’ सहकार्य दिले तर आपल्याला खूप आशीर्वाद मिळतील.—मत्तय २४:४५.

“मनोभावे” यहोवाची सेवा करा

पहिला इतिहास पुस्तकात फक्‍त वंशावळीच नाहीत तर, दावीद जेरुसलेमला कोश कसा आणतो, अनेक थोर विजय कसे मिळवतो, मंदिराच्या बांधकामाची तयारी कशी करतो, लेव्यांची व याजकांची विभागणी कशी करतो यांसर्वांचा वृत्तांतही त्यात आहे. पहिला इतिहास पुस्तकात एज्राने जे काही सांगितले त्यामुळे इस्राएलांना निश्‍चितच फायदा झाला असावा. मंदिरात यहोवाची उपासना नव्या उर्मीने करण्यास त्यांना मदत मिळाली असावी.

यहोवाच्या उपासनेला प्रथम स्थान देण्याच्या बाबतीत दावीदाने किती उत्तम उदाहरण मांडले! स्वतःसाठी खास विशेषाधिकार प्राप्त करण्याऐवजी दावीदाने देवाची इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न केला. आपणही “सात्विक चित्ताने व मनोभावे” यहोवाची सेवा केली पाहिजे, या दावीदाच्या सल्ल्याचे पालन करण्याचे आपल्याला उत्तेजन दिले जात आहे.—१ इतिहास २८:९. (w०५ १०/१)

[तळटीपा]

^ परि. 32 कोश जेरुसलेमला आणण्याकरता दावीदाने केलेल्या प्रयत्नांविषयीच्या आणखी माहितीकरता टेहळणी बुरूज जून १, २००५, पृष्ठे १६-१९ पाहा.

^ परि. 36 दावीदाच्या बेकायदेशीर शिरगणतीविषयीच्या आणखी माहितीसाठी टेहळणी बुरूज जून १, २००५, पृष्ठे १६-१९ पाहा.

[८-११ पानांवरील तक्‍ता/चित्रे]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

आदामापासून नोहापर्यंतच्या पिढ्या (१,०५६ वर्षे)

सा.यु.पू. ४०२६ आदाम

१३० वर्षे ⇩

शेथ

१०५ वर्षे ⇩

अनोश

९० वर्षे ⇩

केनान

७० वर्षे ⇩

महललेल

६५ वर्षे ⇩

यारेद

१६२ वर्षे ⇩

हनोख

६५ वर्षे ⇩

मथुशलह

१८७ वर्षे ⇩

लामेख

१८२ वर्षे ⇩

सा.यु.पू. २९७० मध्ये नोहाचा जन्म होतो

नोहापासून अब्राहामापर्यंत पिढ्या (९५२ वर्षे)

सा.यु.पू. २९७० नोहा

५०२ वर्षे ⇩

शेम

१०० वर्षे ⇩

सा.यु.पू. २३७० मध्ये जलप्रलय येतो

अर्पक्षद

३५ वर्षे ⇩

शेलह

३० वर्षे ⇩

एबर

३४ वर्षे ⇩

पेलेग

३० वर्षे ⇩

रऊ

३२ वर्षे ⇩

सरूग

३० वर्षे ⇩

नाहोर

२९ वर्षे ⇩

तेरह

१३० वर्षे ⇩

सा.यु.पू. २०१८ मध्ये अब्राहामाचा जन्म होतो

अब्राहामापासून दावीदापर्यंत: १४ पिढ्या (९११ वर्षे)

सा.यु.पू. २०१८ अब्राहाम

१०० वर्षे

इसहाक

६० ⇩

याकोब

सुमारे ८८ ⇩

यहूदा

पेरेस

हेस्रोन

राम

अम्मीनादाब

नहशोन

सल्मोन

बवाज

ओबेद

इशाय

सा.यु.पू. ११७० मध्ये दावीदाचा जन्म होतो