अन्यायी दुनिया
अन्यायी दुनिया
आपण एका अन्यायी दुनियेत राहत आहोत, याजशी तुम्ही सहमत आहात का? निश्चितच असाल. खरे पाहता, आपण कितीही निपुण असलो आणि कितीही सुज्ञपणे आपल्या जीवनातील योजना आखल्या तरी, आपल्याला धन, यश किंवा अन्न मिळेलच याची खात्री नसते. बहुतेकदा, प्राचीन काळातील सुज्ञ राजा शलमोन याने म्हटल्याप्रमाणेच घडते. त्याने म्हटले: “ज्ञानांस अन्न व बुद्धीमंतांस धन आणि निपुणांस अनुग्र प्राप्त होत नाही.” का? कारण, “समय व प्रसंग हे सर्वांना घडतात,” असे शलमोन म्हणतो.—उपदेशक ९:११, पं.र.भा.
‘अकस्मात अरिष्टे येऊन पडतात तेव्हा’
होय, “समय व प्रसंग” याचा बहुतेकदा, चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी असणे, असा अर्थ होतो. आपण अगदी काळजीपूर्वक आखलेले बेत उधळून टाकले जातात आणि आपण गोंजारत असलेल्या आशांची राखरांगोळी होते. शलमोनाप्रमाणे आपण ‘अकस्मात अरिष्टे येतात तेव्हा जाळ्यात सापडणाऱ्या माशांप्रमाणे, आणि पाशात अडकणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे’ होतो. (उपदेशक ९:१२, पं.र.भा.) उदाहरणार्थ, लक्षावधी लोक आपल्या कुटुंबासाठी अन्न मिळावे म्हणून शेतात राबराब राबतात; आणि तेव्हाच त्यांच्यावर अचानक ‘अरिष्टे’ येतात. पाऊस पडतो आणि पुरात त्यांच्या सर्व पिकांची नासाडी होते.
इतरजण त्यांना मदत करायचा प्रयत्न करतात खरे परंतु ‘अरिष्टांत’ सापडलेल्यांना मदत करणाऱ्या समाजातील इतर लोकांची मदत बहुतेकदा न्यायसंगत नसते. उदाहरणार्थ, अलिकडील एका वर्षी दुष्काळविरुद्ध लढा देताना, “[आफ्रिकाच्या] संपूर्ण खंडाला, आखाती युद्धासाठी जितका पैसा खर्च केला त्याच्या केवळ एक पंचमांश पैसा मदत म्हणून मिळाला,” असे एका अग्रगामी मदत एजंन्सीने सांगितले. धनसंपन्न राष्ट्रांनी, एका संपूर्ण खंडात दुष्काळग्रस्त भागांतील लोकांच्या यातना व दुःख दूर करण्याकरता जितका पैसा खर्च केला त्याच्या पाचपट अधिक पैसा फक्त एका राष्ट्रातील एका युद्धासाठी खर्च केला. हा अन्यायच नाही का? तसेच, पुष्कळ लोकांच्या पायांशी सुख लोळण घेत असताना पृथ्वीवरील ४ रहिवाशांपैकी १ रहिवासी आजही द्रारिद्र्यात जीवन कंठित आहे किंवा लाखो मुले, दर वर्षी टाळता येऊ शकणाऱ्या आजाराला बळी पडत आहेत; हा अन्याय नव्हे का? निश्चितच!
अर्थात, ‘अरिष्टे अचानक येतात’ तेव्हा फक्त ‘समय व प्रसंगच’ घडत नसतात. आपल्या कह्यात नसलेल्या
बलाढ्य शक्तींचे आपल्या जीवनावर वर्चस्व असते; या शक्तीच आपल्यावर राज्य करतात. असेच २००४ सालच्या उन्हाळ्यात अलेनियातील बेसलन येथे घडले. शेकडो लोक आणि बहुतेक लहान मुले दहशतवादी व सुरक्षा दल यांच्यात चाललेल्या निर्घृण चकमकीत ठार मारले गेले. मारल्या गेलेल्या या मुलांचा आपल्या शाळेचा पहिला दिवस होता. हे खरे आहे, की या दुःखद घटनेत कोण मरण पावले आणि कोण वाचले, हा बहुतांशी योगायोग होता; पण या ‘अरिष्टास’ मात्र मानवी झगडे मूलतः कारणीभूत होते.पण मग जगात असा अन्याय चालूच राहील का?
“ही तर जगाची रीतच आहे. आपल्या वाडवडिलांपासून ही रीत चालत आली आहे आणि ती अशीच चालत राहणार आहे,” असे अन्यायांविषयी बोलताना काहीजण म्हणतात. या लोकांच्या मते, जे सशक्त आहेत ते नेहमी अशक्तांवर जुलूम करतील आणि जे धनाढ्य आहेत ते गरीबांचे शोषण करतील. त्यांचे असेही म्हणणे आहे, की मानवजात पृथ्वीवर अस्तित्वात आहे तोपर्यंत तिच्यावर “समय व प्रसंग” येतच राहतील.
पण हे असे असायला हवे आहे का? आपल्या मेहनतीचे रास्त प्रतिफळ मिळण्याकरता लोक आपल्या क्षमतांचा डोळस व सुज्ञपणे उपयोग करू शकतील का? एका अन्यायी जगाचा कायमचा कायापालट करण्याचे कोणामध्ये सामर्थ्य आहे का? या विषयावर पुढील लेख काय म्हणतो ते पाहा. (w०५ ११/१)
[२ पानांवरील चित्राचे श्रेय]
मूखपृष्ठ: मूल घेऊन बसलेला मनुष्य: UN PHOTO १४८४२६/McCurry/Stockbower
[३ पानांवरील चित्राचे श्रेय]
MAXIM MARMUR/AFP/Getty Images