ते बहिऱ्यांना सुवार्ता ऐकवतात
ते बहिऱ्यांना सुवार्ता ऐकवतात
“ते आध्यात्मिक चैतन्य आणतात!” नवलकरनेरो, मॅडरिड, स्पेन मधील एका वरिष्ठ नागरिक गृहाचे संचालक यांनी अलिकडेच, त्यांच्या केंद्राला भेट देणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांचे वर्णन वरील शब्दांत केले. कोणत्या कारणामुळे त्यांनी असे वर्णन केले?
रोझस डेल कमिनो केंद्रांतील पुष्कळ जणांना श्रवणदोष आहे. पण, साक्षीदारांनी स्पॅनिश संकेत भाषा शिकण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते आता या केंद्रांतील सदस्यांबरोबर संवाद साधू शकतात. बायबलमधील गोष्टी शिकण्याची इच्छा असलेल्यांना मदत करण्यासाठी साक्षीदार आपला वेळ खर्च करत आहेत हे पाहून संचालकांनी त्यांची प्रशंसा केली. राज्याच्या सुवार्तेचा सकारात्मक परिणाम केंद्रांतील सदस्यांवर पडत असल्याचे त्यांनी पाहिले. शिवाय, केंद्रांतील सदस्य देखील ज्यांना नीट दिसत नाही व ऐकू येत नाही तेही साक्षीदारांच्या भेटींबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
युलोहिओ, हे केंद्रांतील एक सदस्य आहेत. ते आंधळे व बहिरे आहेत. ते सध्या यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करीत आहेत. एके दिवशी, अभ्यास चाललेला असताना, एक वृद्ध गृहस्थ साक्षीदारांजवळ आले आणि त्यांनी त्यांना एक कविता दिली जी, केंद्रांतील सदस्यांनी साक्षीदारांबद्दल त्यांना वाटत असलेली कृतज्ञता व्यक्त करणारी होती. या कवितेचे शीर्षक होते: “साक्षीदार असणे.” या कवितेतल्या काही ओळी अशा होत्या: “त्यांचे जीवन अर्थपूर्ण, शिस्तीचे आहे. यहोवाकडून त्यांना आनंदी ज्ञान मिळते. ते लोकांच्या घरोघरी वारंवार जातात कारण त्यांचा यहोवावर भरवसा आहे.”
होय, यहोवावरील याच भरवशाने संपूर्ण जगभरातील अनेक साक्षीदारांना संकेत भाषा शिकून त्यांच्या देशांतील श्रवणदोष असलेल्यांना मदत करण्यास प्रवृत्त केले आहे. अशाप्रकारे ते, बायबलमधील हा सांत्वनदायक संदेश लोकांना सांगत आहेत. (w०५ ११/१)