यहोवाला प्रसन्न करणाऱ्या देणग्या
यहोवाला प्रसन्न करणाऱ्या देणग्या
ही कहाणी इतकी रोचक नाही. राणी अथल्याने कावेबाजपणे व हत्या करून सिंहासन बळकावले होते. सिंहासनाच्या सर्व वारशांची हत्या झाली आहे अशी चुकीची समजूत करून घेऊन ती स्वतःला राणी बनवते. पण दुसरी एक स्त्री अर्थात यहोशेबा हिचे यहोवा आणि त्याच्या नियमशास्त्रावर अफाट प्रेम होते. ती निर्भीडपणे एका राजपुत्राला म्हणजे योवाशला लपवून ठेवते. यहोशेबा आणि तिचा पती महायाजक यहोयादा, योवाशला सहा वर्षांपर्यंत मंदिरातील कोठडीत लपवून ठेवतात.—२ राजे ११:१-३.
योवाश सात वर्षांचा होतो तेव्हा महायाजक यहोयादा, कावेबाजपणे सिंहासनावर विराजमान झालेल्या राणी अथल्याची सिंहासनावरून उचलबांगडी करण्याकरता त्याने आखलेल्या योजनेची सुरुवात करण्यास तयार होतो. लपवून ठेवलेल्या योवाशला तो सर्वांसमक्ष आणतो आणि राज्याचा खरा राजा म्हणून त्याच्या डोक्यावर मुकूट घालतो. त्यानंतर राजदरबारातील रक्षक, दुष्ट राणी अथल्या हिला मंदिराच्या बाहेर नेऊन ठार मारतात. तेव्हा लोकांना किती हायसे वाटते व आनंद होतो! यहोयादा व यहोशेबा यांचा, त्यांच्या कार्यांद्वारे यहुदा राज्यात खऱ्या उपासनेची पुनःस्थापना करण्याकरता सिंहाचा वाटा होता. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी, मशीहा ज्या वंशातून येणार होता त्या दावीदाचा राजसी वंश चालू ठेवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.—२ राजे ११:४-२१.
नव्याने राजा बनलेल्या योवाशला देखील देव संतुष्ट होईल अशाप्रकारे कार्य करायचे होते. यहोवाच्या मंदिराची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. यहुदावर फक्त मीच राज्य करणार अशी फाजील महत्त्वकांक्षा अथल्याने बाळगल्यामुळे, मंदिराकडे फक्त दुर्लक्षच झाले नव्हते तर त्याची लूटालूटही झाली होती. त्यामुळे, योवाशने मंदिराची पुनःबांधणी करून तेथे शुद्ध उपासनेची पुन्हा सुरुवात करण्याचा निर्धार केला. यहोवाच्या मंदिराच्या पुनर्वसनासाठी लागणारा खर्च गोळा करण्याकरता त्याने विनाविलंब एक हुकूम काढला. तो म्हणाला: “समर्पण केलेला जेवढा पैसा परमेश्वराच्या मंदिरी येतो, म्हणजे गणती करिताना प्रत्येक माणसाकडून घेतलेला पैसा. प्रत्येक मनुष्याचे नवसाच्या संबंधाने याजक मोल ठरवील तो पैसा आणि लोक परमेश्वराच्या मंदिरात खुशीने आणीत तो सर्व पैसा, याजकांनी आपल्या ओळखीच्या लोकांपासून घ्यावा आणि मंदिरात जी काय मोडतोड झाली असेल तिची दुरुस्ती करावी.”—२ राजे १२:४, ५.
लोकांनी पण सढळ हाताने देणगी दिली. परंतु याजक मंदिराची डागडूजी करण्याची आपली जबाबदारी पूर्ण मनाने पार पाडत नव्हते. त्यामुळे, राजाने यात जातीने लक्ष घालण्याचे ठरवले आणि सर्व देणग्या एका खास पेटीत गेल्या पाहिजेत, अशी आज्ञा दिली. त्याने यहोयादाला या कामावर नेमले. याविषयीचा अहवाल असे म्हणतो: “यहोयादा याजकाने एक पेटी घेऊन तिच्या झाकणास एक भोक पाडिले आणि ती यहोवाच्या मंदिरात येणाऱ्याच्या उजव्या हाताकडे वेदीजवळ ठेविली. यहोवाच्या मंदिरात जेवढा पैसा येत असे तेवढा द्वाररक्षक याजक त्या पेटीत टाकीत. नंतर पेटीत पुष्कळ पैसा झाला आहे असे पाहून राजाचा चिटणीस व मुख्य याजक येऊन तो यहोवाच्या मंदिरात मिळालेला पैसा थैल्यात बांधून तोलत असत. तो पैसा तोलून जे यहोवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम पाहण्यासाठी नेमिलेले होते त्यांच्या २ राजे १२:९-१२, NW.
हवाली तो करत; ते तो यहोवाच्या मंदिराचे काम करणारे सुतार व बांधकाम करणारे, गवंडी व पाथरवट यास देत, तसेच इमारती लाकूड व घडलेले चिरे विकत घेण्यास व मंदिरात मोडतोड झाली होती तिची दुरुस्ती करण्यात खर्चित.”—लोकांनी पूर्ण मनाने प्रतिसाद दिला. यहोवाच्या उपासना मंदिराची पुनःस्थापना झाली आणि परिणामस्वरूप त्याची उपासना प्रतिष्ठित पद्धतीने सुरु झाली. अशाप्रकारे गोळा केलेली पै न पै नेक कामासाठी उपयोगात आणण्यात आली होती. स्वतः राजा योवाशने जातीने या कामाची दखल घेतली होती.
आज, यहोवाची दृश्य संस्था, सर्व देणगीरुपी पैसा यहोवाच्या उपासनेची वृद्धी होण्याकरता उपयोगात आणला जात आहे यावर जातीने लक्ष देते. आणि सर्व खरे ख्रिश्चन प्राचीन इस्राएलांप्रमाणे पूर्ण मनाने या व्यवस्थेला प्रतिसाद देतात. कदाचित तुम्ही देखील, गेल्या सेवा वर्षात राज्याच्या वाढीसाठी वापरण्यात आलेल्या पैशात आपली देणगी टाकली असावी. तुम्ही दिलेल्या पैशाचा कोणकोणत्या गोष्टींसाठी उपयोग करण्यात आला हे आपण पाहू या.
प्रकाशन
अभ्यास व वितरण यांसाठी पुढील प्रकाशने संपूर्ण जगभरात छापण्यात आली:
• पुस्तके: ४,७४,९०,२४७
• पुस्तिका: ६८,३४,७४०
• माहितीपत्रके: १६,७८,५४,४६२
• कॅलेंडर: ५४,०५,९५५
• नियतकालिके: १,१७,९२,६६,३४८
• पत्रिका: ४४,०९,९५,७४०
• व्हिडिओ: ३१,६८,६११
आफ्रिका, उत्तर, मध्य व दक्षिण अमेरिका, आशिया, युरोप आणि पॅसेफिकमधील द्वीप राष्ट्रे, अशा एकूण १९ देशांत छापण्याचे काम केले जाते.
“माझं नाव कॅटलिन मे. मी आठ वर्षांची आहे. माझ्याजवळ २८ डॉलर (१,२६० रु.) आहेत. छपाईयंत्रांच्या खर्चासाठी हे पैसे देण्याची माझी इच्छा आहे. तुमची छोटी बहीण, कॅटलिन.”
“नवीन छपाईयंत्रांविषयी आमच्या कुटुंबात चर्चा झाली. आमच्या मुलांनी (वय ११ आणि ९) त्यांनी साठवलेल्या पैशातून काही पैसे देणगी देण्याचं ठरवलं आहे. आमच्या देणगीसोबत त्यांचीही देणगी पाठवण्यास आम्हाला आनंद होत आहे.”
बांधकाम
यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यांसाठी लागणाऱ्या काही बांधकाम प्रकल्पांची माहिती पुढे दिली आहे:
• मर्यादित साधनसंपत्ती असलेल्या देशांतील राज्य सभागृहे: २,१८०
• संमेलन गृहे: १५
• शाखा: १०
• पूर्ण-वेळेच्या सेवेत असलेले आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक: २,३४२
“या रविवारी आमच्या नव्या राज्य सभागृहात पहिली सभा होती. आपला पिता यहोवा देव याची स्तुती करण्यासाठी आम्हाला एक योग्य जागा मिळाली, म्हणून आम्हाला किती आनंद झाला. राज्य सभागृहं बांधून आमच्या गरजा पूर्ण केल्याबद्दल आम्ही यहोवाचे आणि तुमचेही आभार मानतो. खरंच, आमचे राज्य सभागृह आमच्या वस्तीतलं एक भूषण आहे.”—चिली.
“यहोवाच्या संस्थेकडून मिळणाऱ्या मदतीबद्दल बंधूभगिनींना खरोखरच खूप कृतज्ञता वाटते. अजूनही आम्ही, बांधकामासाठी आलेल्या बंधूभगिनींबरोबर घालवलेल्या त्या आनंदाच्या क्षणांची चर्चा करतो.”—माल्डोवा.
“आम्ही पतीपत्नीनं नुकतंच आमच्या लग्नाचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्तानं आम्ही एकमेकांना काय भेट देऊ शकतो, यावर विचार करत असताना, यहोवा आणि त्याच्या संघटनेला काही देणगी देण्याचं ठरवलं. कारण, त्यांची मदत नसती तर कदाचित आमचा विवाह यशस्वी झाला नसता. आम्ही पाठवलेला पैसा, एखाद्या गरीब राष्ट्रात बांधल्या जाणाऱ्या राज्य सभागृहासाठी वापरण्यात यावा, अशी आमची इच्छा आहे.”
“नुकतंच मला, माझ्या नावावर असलेली संपत्ती मिळाली. माझ्या ‘गरजा’ फार कमी आहेत आणि त्याहून कमी माझ्या ‘इच्छा’ असल्यामुळे मी, माझ्या नावावर आलेला पैसा, राज्य सभागृहांच्या बांधकामासाठी वापरावा अशी इच्छा करतो. कारण, अजूनही पुष्कळ राष्ट्रांत राज्य सभागृहांची खरोखरच खूप गरज आहे.”
विपत्तीकालीन मदत
या शेवटल्या दिवसांत, संकटे केव्हा कोसळतील हे सांगता येत नाही. अनेक यहोवाचे साक्षीदार, ज्या ठिकाणी विपत्ती आली त्या ठिकाणातील बंधूभगिनींना मदत करता येईल म्हणून जादा देणग्या देतात. विपत्तीकालीन साहाय्याकरता देण्यात आलेल्या देणग्या विश्वव्यापी कार्याकरता वापरल्या जातात. यहोवाच्या साक्षीदारांनी कोणकोणत्या ठिकाणी विपत्तीत बळी पडलेल्यांना मदत केली त्या ठिकाणांची नावे खाली देण्यात आली आहेत:
• आफ्रिका
• आशिया
• कॅरिबियन प्रदेश
• पॅसिफिकची द्वीपे
“वादळांमुळे झालेली हानी भरून काढण्याकरता तुम्ही पाठवलेल्या मदतीबद्दल मी आणि माझे पती तुमचे खूप आभार मानतो. आम्ही आमच्या घराला नवीन छप्पर बसवू शकलो. तुम्ही इतक्या त्वरेने पाऊल उचलले त्याबद्दल आम्ही खरोखरच तुमचे आभार मानतो.”
“माझं नाव आहे कॉनर. मी ११ वर्षांचा आहे. सुनामीमुळे किती नाश झाला होता हे मी पाहिलं तेव्हा मला मदत करावीशी वाटली. मी पाठवत असलेल्या या मदतीचा माझ्या बंधूभगिनींना फायदा होईल, अशी मी आशा करतो.”
खास पूर्ण-वेळेचे सेवक
अनेक ख्रिस्ती सुवार्तिक कार्यात किंवा बेथेलगृहांमध्ये पूर्णवेळ कार्य करतात. काही पूर्ण वेळेच्या सेवकांचा खर्च, स्वेच्छिक अनुदानाकरवी भागवला जातो. अशा पूर्ण-वेळेच्या सेवकांपैकी पुढील काही आहेत:
• मिशनरी: २,६३५
• प्रवासी पर्यवेक्षक: ५,३२५
• बेथेल सदस्य: २०,०९२
“मी [पाच वर्षांचा] सध्या तरी बेथेलमध्ये सेवा करायला जाऊ शकत नसल्यामुळे मी प्रेमाने ही देणगी पाठवू इच्छितो. पण मी मोठा झाल्यावर बेथेलमध्ये जाऊन कष्टाचं काम करेन.”
बायबल शिक्षणाचा प्रसार
येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा” अशी आज्ञा दिली. (मत्तय २८:१९) या आज्ञेनुसार यहोवाचे साक्षीदार २३५ देशांत बायबलच्या संदेशाचा प्रचार करण्यात व तो शिकवण्यात गुंग आहेत. ते, ४१३ भाषांत बायबल साहित्यांचे प्रकाशन व वितरण करतात.
होय, एक ख्रिस्ती व्यक्ती आपल्याकडे असलेला सर्वात अमूल्य वेळ देऊन लोकांना देवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल शिकण्यास मदत करू शकते. आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना मदत करण्याकरता यहोवाच्या साक्षीदारांनी आपला पुरेपूर वेळ आणि शक्ती खर्ची घातली आहे. आर्थिक मार्गानेही त्यांनी उदार मनाने देणग्या दिल्या आहेत आणि त्यांच्या सर्व देणग्या या नाहीतर त्या मार्गाने, यहोवाचे नाव आणि त्याचे उद्देश संपूर्ण पृथ्वीवर घोषित करण्याकरता उपयोगात आणण्यात आल्या आहेत. इतरांना यहोवाबद्दल शिकून घेण्यास मदत करणाऱ्यांच्या प्रयत्नांवर यहोवा सदोदित आशीर्वाद देत राहो. (नीतिसूत्रे १९:१७) स्वखुषीने मदत करण्याचा हा आत्मा पाहून यहोवा प्रसन्न होतो.—इब्री लोकांस १३:१५, १६. (w०५ ११/१)
[१०, ११ पानांवरील चौकट]
दान देण्यासाठी काहीजण निवडत असलेले मार्ग
जगभरात होणाऱ्या कार्यासाठी अनुदान
“जगभरात होणाऱ्या कार्यासाठी अनुदान,” असे लिहिलेल्या दान पेटीत दान टाकण्यासाठी बरेच लोक ठराविक रक्कम बाजूला ठेवतात.—मत्तय २४:१४.
दर महिन्याला मंडळ्या ही रक्कम संबंधित देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाला पाठवतात. पैशाचे स्वेच्छिक दान देखील तुम्ही सरळ Jehovah’s Witnesses, Post Box ६४४०, Yelahanka, Bangalore ५६० ०६४, Karnataka या पत्त्यावर किंवा येथे तुमच्या देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला पाठवू शकता. वरील पत्त्यावर पाठवलेले चेक “वॉच टावर”ला देय असावेत. याशिवाय, दागदागिने किंवा इतर मोलवान वस्तूसुद्धा दान केल्या जाऊ शकतात. विशिष्ट वस्तू देणगी म्हणून दिल्या जात आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्रही त्यासोबत पाठवणे आवश्यक आहे.
सशर्त-दान योजना
संपूर्ण जगभरात चालणाऱ्या कार्याच्या उपयोगासाठी वॉच टावरच्या खात्यात पैसे ठेवले जाऊ शकतात. आणि विनंती केल्यावर ती रक्कम परत केली जाईल. अधिक माहितीसाठी, कृपया वरील पत्त्यावरील ट्रेझर्र्स ऑफिसशी संपर्क साधावा.
धर्मादाय योजना
पैशांची देणगी आणि पैशांची सशर्त देणगी यांव्यतिरिक्त जगभरातील राज्य सेवेच्या लाभाकरता तुम्ही राहता त्या देशानुसार देणगी देण्याचे इतरही मार्ग आहेत. ते असे आहेत:
विमा: वॉच टावर संस्थेला जीवन विमा पॉलिसीचे किंवा रिटायर्मेन्ट/पेन्शन योजनेचे हिताधिकारी बनवले जाऊ शकते.
बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाण-पत्र किंवा वैयक्तिक निवृत्ती खाते स्थानिक बँकेच्या नियमांनुसार वॉच टावर संस्थेला ट्रस्ट म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा मग मृत्यूनंतर ते संस्थेला मिळेल अशी व्यवस्था करू शकता.
स्टॉक्स आणि बाँड्स: स्टॉक्स आणि बाँड्स देखील वॉच टावर संस्थेला थेट दान केले जाऊ शकतात.
जमीन-जुमला: विकाऊ जमीन-जुमला थेट दानाच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो; किंवा निवासी संपत्ती असल्यास, ती संस्थेच्या नावावर करून जिवंत असेपर्यंत तिचा वापर केला जाऊ शकतो. आपला जमीन-जुमला संस्थेच्या नावावर करण्याआधी तुमच्या देशातील शाखा दफ्तराशी संपर्क साधा.
दानाची वार्षिक नेमणूक: दानाची वार्षिक नेमणूक ही अशी व्यवस्था आहे ज्यात वॉच टावर संस्थेच्या नावावर पैसे किंवा सुरक्षितता केली जाते. त्याच्या बदल्यात, दात्याला किंवा दात्याने ठरवलेल्या एका व्यक्तीला आयुष्यभर दर वर्षाला एक नेमलेली रक्कम मिळते. दानाची वार्षिक नेमणूक ज्या वर्षी ठरवली जाते त्या वर्षी दात्याला आय-करात काही सूट मिळते.
इच्छा-पत्र आणि ट्रस्ट: कायदेशीर इच्छा-पत्रामार्फत तुम्ही तुमची संपत्ती किंवा पैसा कायद्याने वॉच टावर संस्थेच्या नावावर करू शकता किंवा वॉच टावर संस्थेला ट्रस्ट ॲग्रीमेंटचे हिताधिकारी बनवून आपले इच्छा-पत्र तयार करू शकता. काही देशांत एखादी धार्मिक संस्था ट्रस्टची हिताधिकारी असल्यास करात काही सवलती प्राप्त होऊ शकतात पण भारताच्या बाबतीत हे लागू होत नाही.
“धर्मादाय योजना” या शब्दांशावरून सूचित होते त्याप्रमाणे अशा प्रकारच्या दानांकरता दात्याला काही प्रमाणात योजना करावी लागते. यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याला धर्मादाय योजनेद्वारे साहाय्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींची मदत करण्यासाठी इंग्रजी व स्पॅनिश भाषेत चॅरिटेबल प्लॅनिंग टू बेनेफिट किंगडम सर्व्हिस वर्ल्डवाईड * हे माहितीपत्रक तयार करण्यात आले आहे. एखादी व्यक्ती आता किंवा मृत्यूनंतर आपल्या मृत्यूपत्रानुसार आपली मालमत्ता भेट म्हणून कोणकोणत्या प्रकारे देऊ शकेल, याबाबतीत अधिक माहिती पुरवण्यासाठी हे माहितीपत्रक लिहिण्यात आले होते. माहितीपत्रक वाचल्यानंतर आणि स्वतःच्या कायदा किंवा कर सल्लागारांचा आणि धर्मादाय योजना कार्यालयाचा सल्ला घेऊन अनेकांना जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला हातभार लावता आला आहे आणि त्याच वेळी असे केल्याने मिळणारे कर फायदे देखील वाढवता आले आहेत.
अधिक माहितीसाठी, तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर पत्रव्यवहाराद्वारे किंवा टेलिफोनद्वारे किंवा तुमच्या देशाचा कारभार पाहणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
धर्मदाय योजना कार्यालय
Jehovah’s Witnesses,
Post Box ६४४०, Yelahanka,
Bangalore ५६० ०६४, Karnataka
Telephone: (०८०) २८४६८०७२
[९ पानांवरील चित्राचे श्रेय]
विश्वासात खंबीर व्हिडिओ: स्टॅलिन: U.S. Army photo
[तळटीप]
^ परि. 62 भारतात उपलब्ध नाही.