चांगल्याने वाईटावर विजय कसा मिळवला जाईल?
चांगल्याने वाईटावर विजय कसा मिळवला जाईल?
राजा दावीद एक चांगला मनुष्य होता. त्याचे देवावर गहिरे प्रेम होते. तो न्यायी व गरिबांबद्दल प्रेमळ काळजी बाळगणारा होता. पण याच चांगल्या राजाने एकदा आपल्या एका विश्वासू माणसाच्या पत्नीशी व्यभिचार केला. बथशेबाला त्याच्याकडून दिवस गेले आहेत हे समजल्यावर त्याने तिच्या नवऱ्याची हत्या करण्याचा कट रचला. त्यानंतर आपले पाप झाकण्यासाठी त्याने बथशेबाबरोबर विवाह केला.—२ शमुवेल ११:१-२७.
मनुष्यामध्ये चांगले करण्याची क्षमता आहे हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. मग, ते इतकी दुष्कृत्ये का करतात? बायबल याची अनेक मूलभूत कारणे सांगते. ते हेही सांगते, की देव ख्रिस्त येशूमार्फत दुष्टाईचा कायमचाच खात्मा कसा करेल.
दुष्कृत्ये करण्याकडे कल
दुष्कृत्यांमागचे एक कारण स्वतः राजा दावीदाने दाखवले. त्याचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले तेव्हा त्याने आपल्या कार्यांबद्दल आपणच जबाबदार आहोत हे कबूल केले. त्याने मग खेदाने असे म्हटले: “पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे.” (स्तोत्र ५१:५) मातांना पाप करणारी मुले व्हावीत असा देवाचा कधीच उद्देश नव्हता. परंतु, हव्वेने आणि नंतर मग आदामाने देवाविरुद्ध बंड करण्याची निवड केली तेव्हा त्यांनी पापरहित मुले उत्पन्न करण्याची क्षमता गमावली. (रोमकर ५:१२) अपरिपूर्ण मानववंश जसजसा वाढत गेला तसतसे हे स्पष्ट होत गेले, की “मानवाच्या मनांतल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात;” म्हणजेच मानवाचा बाळपणापासूनच दुष्कृत्ये करण्याकडे कल असतो.—उत्पत्ति ८:२१.
या प्रवृत्तीवर आपण आळा बसवला नाही तर आपल्या हातून “जारकर्म, . . . वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद,” यासारखी दुष्कृत्ये आणि इतरही गलतीकर ५:१९-२१) राजा दावीद शारीरिक कमजोरीपुढे कमी पडला आणि त्याने व्यभिचार केला; याचा परिणाम कलहांत झाला. (२ शमुवेल १२:१-१२) अनैतिक गोष्टींकडे त्याचे मन झुकत होते तेव्हा तो स्वतःला आवरू शकत होता. त्याऐवजी तो बथशेबाचा विचार करीत राहिला. शिष्य याकोबाने नंतर ज्या कृत्याचे वर्णन केले तेच दावीदाने केले. शिष्य याकोबाने लिहिले: “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहांत पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते.”—याकोब १:१४, १५.
हानीकारक वर्तन घडू शकते की ज्याचे वर्णन बायबलमध्ये “देहाची कर्मे” असे केले आहे. (मागच्या लेखांत ज्यांचा उल्लेख करण्यात आला होता जसे की मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या हत्या, बलात्कार आणि लुटालूट ही, लोक जेव्हा चुकीच्या इच्छांना आपल्यावर वर्चस्व गाजवू देतात तेव्हा काय घडते याची टोकाची उदाहरणे आहेत.
अज्ञानामुळे कधीकधी दुष्कृत्ये केली जातात
प्रेषित पौलाच्या अनुभवावरून आपल्याला, लोक दुष्कृत्ये का करतात त्याचे दुसरे कारण मिळते. पौलाचा मृत्यू होईपर्यंत त्याने, मृदू, प्रेमळ स्वभावाचा मनुष्य म्हणून नाव कमावले होते. त्याने आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींच्या सेवेसाठी स्वतःला निःस्वार्थपणे वाहून घेतले होते. (१ थेस्सलनीकाकर २:७-९) परंतु, त्याला शौल या नावाने ओळखले जायचे तेव्हा तो याच गटाच्या लोकांना “धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्याविषयींचे फूत्कार टाकीत होता.” (प्रेषितांची कृत्ये ९:१, २) आरंभीच्या ख्रिश्चनांविरुद्ध केल्या जाणाऱ्या दुष्कृत्यांना पौलाने संमती देऊन त्यांच्यात भाग का घेतला? “मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले,” असे तोच नंतर म्हणतो. (१ तीमथ्य १:१३) होय, पौलाला पूर्वी ‘देवाविषयी आस्था होती; परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नव्हती.’—रोमकर १०:२.
पौलाप्रमाणे अनेक प्रामाणिक लोक, देवाच्या इच्छेविषयी अचूक ज्ञानाअभावी दुष्कृत्यांत सामील झाले आहेत. उदाहरणार्थ, येशूने आपल्या अनुयायांना इशारा दिला: “तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहो असे वाटेल, अशी वेळ येत आहे.” (योहान १६:२) यहोवाच्या आधुनिक साक्षीदारांना येशूच्या शब्दांची सत्यता पटत आहे. अनेक देशांत त्यांचा छळ केला जात आहे व देवाची सेवा करण्याचा दावा करणाऱ्या लोकांनी तर त्यांची हत्या देखील केली आहे. अशाप्रकारच्या चुकीच्या आवेशाने खरा देव संतुष्ट होत नाही हे स्पष्ट आहे.—१ थेस्सलनीकाकर १:६.
दुष्टाईचा जनक
दुष्टाई प्रामुख्याने कोणामुळे अस्तित्वात आहे त्याची ओळख येशूने करून दिली. येशूला ठार मारण्यासाठी त्याच्या मागे हात धुवून लागलेल्या धार्मिक नेत्यांना बोलताना त्याने म्हटले: “तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता.” (योहान ८:४४) तो सैतानच होता ज्याने स्वार्थापोटी आदाम आणि हव्वेला देवाविरुद्ध बंड करण्यास चेतवले. या बंडाळीमुळे पाप आले आणि अशाप्रकारे सर्व मानवजातीवर मृत्यू ओढवला.
सैतानाने ईयोबाला जे काही केले त्यावरून त्याची घातकी प्रवृत्ती आणखी दिसून आली. यहोवाने सैतानाला ईयोबाची सत्वनिष्ठा कसास लावण्याची परवानगी दिली तेव्हा, ईयोबाची सर्व संपत्ती हिरावून घेतल्यानंतरही त्याच्या ईयोब १:९-१९) अलिकडच्या दशकांत, मानवजातीने, मानव अपरिपूर्णतेमुळे व अज्ञानामुळे आणि मानवांच्या कारभारांत सैतानाच्या लुडबूड करण्यामुळे दुष्टाईत कमालीची वाढ अनुभवली आहे. बायबल प्रकट करते, की दियाबलाला ‘खाली पृथ्वीवर टाकण्यात आले, व त्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले.’ याच भविष्यवाणीने अचूकपणे भाकीत केले की सैतान पृथ्वीवरून दुसरीकडे कुठे हलू शकत नसल्यामुळे ‘पृथ्वीवर अनर्थ ओढवला आहे.’ सैतान लोकांना दुष्कृत्ये करण्याची बळजबरी करू शकत नसला तरी तो ‘सर्व जगाला ठकविण्यात’ वस्ताद आहे.—प्रकटीकरण १२:९, १२.
मनाला शांती मिळाली नाही. त्याने त्याच्या दहाही मुलांचा मृत्यू घडवून आणला. (वाईटाकडे असलेला कल काढून टाकणे
मानव समाजातून जर दुष्टाईचा कायमचा खात्मा केला पाहिजे तर, दुष्टाई करण्याकडे असलेला मानवाचा उपजत झोक, अचूक ज्ञानाचा अभाव आणि सैतानाचा प्रभाव यांना काढून टाकले पाहिजे. सर्वात आधी आपण पाहू या, की दुष्टाई करण्याकडे असलेला मानवाचा उपजत झोक त्याच्या हृदयातूनच कसा काढून टाकता येईल?
कोणताही मानव शल्यचिकित्सक किंवा मानव-निर्मित औषध हे करू शकत नाही. यहोवा देवाने वारशाने आलेल्या पाप आणि अपरिपूर्णतेवर एक उपाय दिला आहे; आणि हा उपाय फक्त अशा लोकांसाठीच आहे की जे तो स्वीकारायला तयार आहेत. प्रेषित योहानाने लिहिले: “येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करिते.” (१ योहान १:७) परिपूर्ण मनुष्य येशूने जेव्हा स्वेच्छेने आपल्या जीवनाचे बलिदान दिले तेव्हा त्याने “स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे.” (१ पेत्र २:२४) येशूचा बलिदानरुपी मृत्यू आदामाच्या दुष्कृत्यांच्या परिणामांना काढून टाकणार होता. पौल म्हणतो, की ख्रिस्त येशूने “सर्वांसाठी मुक्तीचे मोल” दिले. (१ तीमथ्य २:६) होय, ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे मानवजातीसाठी आदामाने गमावलेली परिपूर्णता पुन्हा प्राप्त करण्याकरता मार्ग मोकळा झाला.
परंतु तुम्ही असे विचाराल: ‘येशूच्या मृत्यूने जर सुमारे २,००० वर्षांपूर्वीच मानवजातीसाठी परिपूर्णता पुन्हा प्राप्त करण्याकरता मार्ग मोकळा केला आहे तर मग अजूनपर्यंत दुष्टाई आणि मृत्यू अस्तित्वात का आहेत?’ या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यावर, दुष्टाई मागचे दुसरे कारण अर्थात देवाच्या उद्देशांबद्दलची मानवाची अज्ञानता काढता येईल.
अचूक ज्ञानामुळे चांगुलपणा वाढतो
यहोवा आणि येशू दुष्टाई काढून टाकण्यासाठी आता काय करत आहेत याविषयीचे अचूक ज्ञान घेऊन एक प्रामाणिक व्यक्ती अजाणतेत दुष्कृत्याला संमती देण्यापासून किंवा याहूनही वाईट म्हणजे ‘देवाचा विरोधी’ म्हणून कार्य करण्यापासून स्वतःला वाचवू शकेल. (प्रेषितांची कृत्ये ५:३८, ३९) यहोवा देव, अज्ञानतेत केलेल्या चुका क्षमा करण्यास तयार आहे. अथेन्समध्ये बोलताना प्रेषित पौलाने म्हटले: “अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करितो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे.”—प्रेषितांची कृत्ये १७:३०, ३१.
येशूला मृत्यूतून उठवण्यात आले आहे हे पौलाला स्वानुभवावरून माहीत होते; कारण, पुनरुत्थित येशू स्वतः पौलाशी बोलला आणि त्याने त्याला आरंभीच्या ख्रिश्चनांचा छळ करण्यापासून रोखले. (प्रेषितांची कृत्ये ९:३-७) देवाच्या उद्देशांचे अचूक ज्ञान मिळाल्याबरोबर पौलाने स्वतःत बदल केले आणि ख्रिस्ताचे अनुकरण करून तो मनापासून एक चांगली व्यक्ती बनला. (१ करिंथकर ११:१; कलस्सैकर ३:९, १०) याशिवाय, पौलाने आवेशाने ‘राज्याच्या या सुवार्तेचा’ प्रचार केला. (मत्तय २४:१४) येशूच्या मृत्यूला व पुनरुत्थानाला जवळजवळ २,००० वर्षे पूर्ण झाली आहेत; या काळात ख्रिस्ताने मानवजातीतून पौलासारख्या लोकांना त्याच्याबरोबर त्याच्या राज्यात राज्य करण्यासाठी निवडले आहे.—प्रकटीकरण ५:९, १०.
गत शतकांमध्ये आणि अजूनही यहोवाचे साक्षीदार आवेशाने येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन करीत आहेत. येशूने अशी आज्ञा दिली आहे: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” मत्तय २८:१९, २०) या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्यांना ख्रिस्ताच्या स्वर्गीय सरकाराच्या शासनात पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा आहे. येशूने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) हे ज्ञान प्राप्त करण्यास मदत करणे हे, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी करू शकत असलेले सर्वात महान सत्कार्य आहे.
(ही राज्य सुवार्ता स्वीकारणारे त्यांच्याभोवती दुष्टाईचा गराडा असला तरीसुद्धा “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” यांसारखे गुण प्रदर्शित करतात. (गलतीकर ५:२२, २३) येशूप्रमाणे ते देखील “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड” करत नाहीत. (रोमकर १२:१७) ते व्यक्तिगतरीत्या ‘बऱ्याने वाइटाला जिंकण्याचा’ प्रयत्न करीत राहतात.—रोमकर १२:२१; मत्तय ५:४४.
दुष्टाईवर शेवटचा विजय
मानव कधीही स्वबळावर दियाबल सैतान जो दुष्टाईचा जनक आहे त्याच्यावर विजय प्राप्त करू शकणार नाहीत. लवकरच, यहोवा सैतानाचे डोके फोडण्यासाठी येशूचा उपयोग करील. (उत्पत्ति ३:१५; रोमकर १६:२०) सर्व राजकीय व्यवस्थांचे “चूर्ण करून त्यांस नष्ट” करण्यासाठी देखील यहोवा येशूला सांगेल. यांतील बहुतेक राजकीय व्यवस्थांनीच संपूर्ण इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर दुष्कृत्ये केली आहेत. (दानीएल २:४४; उपदेशक ८:९) या न्यायाच्या दिवसांत जे सर्व “आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत . . . [त्यांना] युगानुयुगाचा नाश ही शिक्षा . . . मिळेल.”—२ थेस्सलनीकाकर १:८-१०; सफन्या १:१४-१८.
सैतान आणि त्याची कड घेणाऱ्यांचा नाश झाल्यावर येशू, बचावलेल्यांना पृथ्वीला पुन्हा आपल्या मूळ अवस्थेत आणण्यास स्वर्गातून मदत करेल. तसेच पुनःस्थापित पृथ्वीवर जिवंत राहण्यास लायक असलेल्यांचे येशू ख्रिस्त पुनरुत्थान करेल. (लूक २३:३२, ३९-४३; योहान ५:२६-२९) असे करताना तो दुष्कृत्यांमुळे मानवजातीला सहन करावे लागलेले परिणाम काढून टाकेल.
येशूची सुवार्ता ऐकण्यास यहोवा लोकांना बळजबरी करणार नाहीत. पण जीवनाकडे जाणारे ज्ञान घेण्याची संधी मात्र तो लोकांना देत आहे. तेव्हा, या संधीचा तुम्ही आता फायदा घ्यावा हे अगत्याचे आहे! (सफन्या २:२, ३) असे केल्यास तुम्ही, तुमच्या आताच्या जीवनात विरजण घालणाऱ्या दुष्टाईवर मात करण्यास शिकू शकता. ख्रिस्त दुष्टाईवर सर्वात शेवटचा विजय कसा मिळवेल हेही तुम्हाला पाहायला मिळेल.—प्रकटीकरण १९:११-१६; २०:१-३, १०; २१:३, ४. (w०६ १/१)
[५ पानांवरील मथळा]
अचूक ज्ञानाच्या अभावामुळे शौलाने दुष्कृत्यांना संमती दिली
[७ पानांवरील मथळा]
देवाविषयीचे अचूक ज्ञान प्राप्त करण्यास मदत करणे हे, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी करू शकत असलेले सर्वात महान सत्कार्य आहे