सर्व राष्ट्रांतील लोकांकरता सुवार्ता
सर्व राष्ट्रांतील लोकांकरता सुवार्ता
यहोवाच्या साक्षीदारांच्या २००४/०५ साली झालेल्या “देवाबरोबर चाला” या प्रांतीय अधिवेशनात प्रसिद्ध करण्यात आलेली पुस्तिका वर दाखवण्यात आली आहे. या पुस्तिकेची एक आवृत्ती, ९६ पानांची आहे ज्यात ९२ वेगवेगळ्या भाषांत एक संक्षिप्त संदेश आहे. होता होईल तितक्या लोकांना राज्याची सुवार्ता सांगण्यास मदत करण्याकरता ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. (मत्तय २४:१४) या पुस्तिकेचा वापर केल्यावर सहसा काय घडते, हे पुढील अनुभवांवरून दिसून येते.
• अधिवेशनात ही पुस्तिका प्रसिद्ध झाल्यानंतर, साक्षीदार असलेले एक कुटुंब तीन राष्ट्रीय उद्यानांत गेले. तेथे त्यांना नेदरलँड्स, भारत, पाकिस्तान व फिलिपिन्सचे लोक भेटले. या कुटुंबातील पतीने म्हटले: “या सर्व लोकांना तुटकी-मुटकी इंग्रजी येत होती तरीपण, आम्ही जेव्हा त्यांना त्यांच्या भाषेत संदेश दाखवला तेव्हा ते खूप प्रभावीत झाले; ते आपल्या घरापासून हजारो किलोमीटर दूर होते तरीपण त्यांना त्यांची मातृभाषा ऐकायला मिळाली होती. आपले कार्य विश्वव्यापी आहे तसेच आपल्यात किती ऐक्य आहे हे त्यांना स्पष्ट दिसून आले.”
• एका साक्षीदार भगिनीने, तिच्याबरोबर काम करणाऱ्या एका भारतीय मनुष्याला ही पुस्तिका दाखवली. या पुस्तिकेतल्या सर्व भाषा पाहून त्याला खूप आनंद झाला आणि त्याने आपल्या मातृभाषेतला संदेश वाचला. यामुळे त्याच्याबरोबर बायबलवर चर्चा सुरू झाली. फिलिपिन्समधील एका स्त्रीला जेव्हा तिच्या मातृभाषेतला संदेश वाचायला मिळाला तेव्हा तिने यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आणखी जाणून घेण्याची इच्छा दाखवली.
• कॅनडात, एक नेपाळी स्त्री एका साक्षीदार भगिनीबरोबर बायबलचा अभ्यास फोनवर करायला तयार झाली; ती साक्षीदार भगिनीला आपल्या घरात बोलवू इच्छित नव्हती. परंतु, साक्षीदार भगिनीने तिला पुस्तिकेतल्या नेपाळी भाषेतल्या संदेशाविषयी सांगितले तेव्हा तिने भगिनीला लगेच घरी बोलवले. तिला आपल्या डोळ्यांनी तिच्या मातृभाषेतला हा संदेश पाहायचा होता. तेव्हापासून या स्त्रीच्या घरीच बायबल अभ्यास होतो. (w०५ १२/१)