व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“बायबल लेखनांचे ज्ञात असलेले सर्वात प्राचीन लेख”

“बायबल लेखनांचे ज्ञात असलेले सर्वात प्राचीन लेख”

“बायबल लेखनांचे ज्ञात असलेले सर्वात प्राचीन लेख”

पंचवीस वर्षांपूर्वी, इस्राएली संशोधकांनी एक आश्‍चर्यकारक शोध लावला. जेरुसलेमच्या हिन्‍नोम दरीतील उतारांवरील एका गुहेत जिथे मृतांना पुरले जायचे तेथे त्यांना चांदीच्या दोन लहान गुंडाळ्या सापडल्या ज्यावर बायबलचे लेखन होते. या गुंडाळ्या, सा.यु.पू. ६०७ मध्ये बॅबिलोनने जेरुसलेमचा नाश करण्याआधीच्या आहेत. त्यात, गणना ६:२४-२६ मध्ये लिहिण्यात आलेल्या आशीर्वादांचा काही भाग उतरवण्यात आला आहे. दोन्ही गुंडाळ्यांत यहोवाचे व्यक्‍तिगत नाव यहोवा हे कित्येकदा तरी या लेखांमध्ये आले आहे. हे लेख, “बायबल लेखनांचे ज्ञात असलेले सर्वात प्राचीन लेख आहेत ज्यात हिब्रू बायबलमधून काही उतारे लिहिण्यात आले आहेत.”

परंतु, काही विद्वानांनी या गुंडाळ्यांच्या तारखांविषयी शंका व्यक्‍त करून असे प्रतिपादन केले, की या गुंडाळ्या सा.यु.पू. दुसऱ्‍या शतकात लिहिण्यात आल्या होत्या. या अगदी लहान गुंडाळ्यांचा मूळ फोटोग्राफ चांगल्या प्रतीचा नसल्यामुळे बारीकसारीक गोष्टींचे जवळून परीक्षण करता येत नसल्यामुळे विद्वानांमध्ये अशाप्रकारे मतभेद झाले होते. पण या गुंडाळ्या केव्हा बनवण्यात आल्या याबाबतीत झालेला मतभेद सोडवण्याकरता एक उपाय शोधण्यात आला; विद्वानांच्या एका गटाने एक नवीन अभ्यास हाती घेतला. गुंडाळ्यांची हाय-रेझोल्यूशन डिजिटल चित्रे घेण्यासाठी त्यांनी आधुनिक फोटोग्राफिक व कंप्युटर-इमेजिंग तंत्रज्ञानाचा उपयोग केला. या नवीन विश्‍लेषणाचे निकाल अलिकडेच छापण्यात आले. विद्वानांचा गट कोणत्या निष्कर्षास पोहंचले?

सर्वात आधी, विद्वान या गोष्टीवर जोर देतात, की पुरातत्त्वीय माहिती, बॅबिलोनच्या बंदिवासातील आधीच्या तारखेशी मिळतीजुळती आहे. पुराभिलेख पाहणी अर्थात अक्षरांचा आकार, पद्धत, स्थिती, रांग, हे सर्व त्याच काळाकडे अर्थात सा.यु.पू. सातव्या शतकाच्या शेवटच्या काळाकडे अंगुली दर्शवतात. आणि सर्वात शेवटी, शब्दांचे विज्ञान अर्थात शुद्धलेखन याचे परीक्षण करताना, या गटाने असा निष्कर्ष काढला: ‘गुंडाळ्यांतील शुद्धलेखन माहिती, लेख कोरण्यात आलेल्या तारखांच्या संबंधाने असलेल्या पुरातत्त्वीय व पुराभिलेख पुराव्यांशी मिळते.’

केटेफ हिन्‍नोम कोरीव लेख असेही म्हटल्या जाणाऱ्‍या या चांदीच्या गुंडाळ्यांच्या अभ्यासाचे सार बुलेटीन ऑफ द अमेरिकन स्कूल्स ऑफ ओरियंटल्स रिसर्च नावाच्या मासिकाने या चांदीच्या गुंडाळ्यांच्या अभ्यासाचे सार पुढीलप्रमाणे दिले: “बहुतेक विद्वान ज्या निष्कर्षास आले त्यास आणखी पुष्टी देऊन आम्ही असे म्हणू शकतो, की या गुंडाळ्यांवरील कोरीव लेख, बायबल लेखनांचे ज्ञात असलेले सर्वात प्राचीन लेख आहेत.” (w०६ १/१५)

[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]

गुहा: Pictorial Archive (Near Eastern History) Est.; कोरीव लेख: Photograph © Israel Museum, Jerusalem; courtesy of Israel Antiquities Authority