व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुलाच्या हृदयापर्यंत पोहंचणे

मुलाच्या हृदयापर्यंत पोहंचणे

मुलाच्या हृदयापर्यंत पोहंचणे

मुलांना लढाई लढाई खेळताना तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला वाईट वाटते का? आज अगदी लहान मुलांच्या खेळण्यात देखील तुम्हाला अशाप्रकारची दृश्‍ये सहज पाहायला मिळतील कारण हिंसाचार मनोरंजनाच्या जगातही शिरला आहे. युद्धाच्या खेळण्यांऐवजी शांतीदायक खेळ खेळायला तुम्ही मुलांना कशाप्रकारे मदत करू शकाल? आफ्रिकामध्ये अनेक वर्षांपासून यहोवाच्या साक्षीदारांची मिशनरी म्हणून सेवा करणाऱ्‍या वॉलट्राऊटने एका लहान मुलाला अगदी अशीच मदत करण्याचा मार्ग शोधून काढला.

युद्धामुळे वॉलट्राऊटला, ती जेथे राहत होती तो देश सोडून आफ्रिकेतल्या दुसऱ्‍या एका देशात जाऊन राहावे लागले. तेथे तिने पाच वर्षांच्या एका मुलाच्या आईबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला. ती जेव्हा जेव्हा या मुलाच्या आईला भेटायला जायची तेव्हा तेव्हा ती या मुलाला एका लहान प्लॅस्टिकच्या बंदुकीशी खेळताना पाहायची. या मुलाकडे हेच एक खेळणे होते. वॉलट्राऊटने कधी त्याला कोणत्याही निशाणावर बंदूक रोखताना पाहिले नाही तर बंदूक उघडून ती पुन्हा बंद करणे, जणू काय तो बंदूकीत गोळी घालतोय, ह्‍यातच तो गुंगलेला असल्याचे ती पाहायची.

वॉलट्राऊट त्याला म्हणाली: “वर्नर, मी तुझ्या देशात का राहतेय माहीत आहे तुला? मी युद्धामुळे तुझ्या देशात राहते. तुझ्या हातात आहे ना, तशा बंदूकीनं लोकांना गोळ्या मारणाऱ्‍या वाईट लोकांपासून मी दूर पळून आलेय. हे असं गोळ्या मारणं चांगलं आहे का?”

“नाही. वाईट आहे.” असे वर्नरने दुःखाने उत्तर दिले.

वॉलट्राऊट त्याला म्हणाली: “अगदी बरोबर. मी तुला आणि तुझ्या आईला दर आठवडी भेटायला का येते माहीत आहे तुला? कारण यहोवाच्या साक्षीदारांची इतरांना, देव आणि आपल्या शेजाऱ्‍यांबरोबर शांतीने राहण्यास मदत करण्याची इच्छा आहे.” वर्नरच्या आईची संमती मिळाल्यावर वॉलट्राऊटने त्याला म्हटले: “तू मला ही बंदूक दिलीस ना, तर मी ती फेकून देईन आणि तुझ्यासाठी चार चाकांचा एक ट्रक नक्की आणून देईन.”

वर्नरने आपली बंदूक तिच्या हवाली केली. त्याला त्याचा ट्रक मिळेपर्यंत चार आठवडे थांबावे लागले. पण त्याला जेव्हा, त्याचा लाकडी ट्रक मिळाला तेव्हा त्याने अगदी आनंदाने तो घेतला.

तुम्ही तुमच्या मुलांबरोबर बोलण्यासाठी वेळ काढता का? युद्धात वापरल्या जाणाऱ्‍या शस्त्रांची नक्कल करणारी खेळणी फेकून देण्यास ते प्रवृत्त होतील अशाप्रकारे त्यांच्या हृदयापर्यंत पोहंचण्याचा तुम्ही प्रयत्न करता का? असे केल्यास तुम्ही त्यांना असे एक बाळकडू द्याल ज्याचा फायदा त्यांना आयुष्यभर होईल. (w०६ ५/१)