व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

निर्गम २३:१९ मध्ये म्हटले आहे: “करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.” या आदेशावरून आपण कोणता धडा शिकतो?

मोशेच्या नियमशास्त्रातील हा आदेश बायबलमध्ये तीनदा आढळतो. यावरून आपल्याला, जे उचित आहे त्याबद्दल यहोवाचा दृष्टिकोन, त्याचा कनवाळूपणा आणि कोमलता यांबद्दल शिकायला मिळते. खोट्या उपासनेबद्दल त्याला किती घृणा आहे यावरही हा आदेश जोर देतो.—निर्गम ३४:२६; अनुवाद १४:२१.

एखाद्या करडाला अथवा कोणत्याही इतर पिल्लाला त्याच्या आईच्या दुधात शिजवणे, यहोवाने बनवलेल्या निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाणे ठरेल. देवाने, आईचे दूध पिल्लाचे पोषण करून त्याची वाढ व्हावी म्हणून पुरवले आहे. एखाद्या पिल्लाला त्याच्या आईच्या दुधात शिजवणे म्हणजे, “पालक आणि पाल्य यांमध्ये देवाने जे नाते ठरवले आहे व पवित्र केले आहे त्याबद्दल घोर अनादर दाखवणे,” असे एका विद्वानाने म्हटले.

शिवाय, पिल्लाला त्याच्या आईच्या दुधात शिजवण्याची प्रथा, पाऊस पाडण्याकरता केली जाणारी मूर्तीपूजक लोकांमधली प्रथा असावी, असे काहींचे म्हणणे आहे. जर असे असेल तर मग, या आदेशामुळे इस्राएली लोकांचे, त्यांच्या आजूबाजूच्या राष्ट्रांच्या निरर्थक व निर्दयी धार्मिक प्रथांपासून संरक्षण झाले असावे. मोशेच्या नियमशास्त्राने इस्राएलांना त्यांच्या आजूबाजूच्या राष्ट्रांच्या चालीरीतींचे अनुकरण न करण्याविषयी स्पष्ट इशारा दिला.—लेवीय २०:२३.

या विशिष्ट नियमातून आपल्याला यहोवाच्या कोमल दयेचा देखील प्रत्यय येतो. खरे तर, नियमशास्त्रात अशाप्रकारचे अनेक नियम होते जे प्राण्यांविरुद्ध क्रूरता न दाखवण्याबाबतीत तसेच निसर्ग नियमाच्या विपरीत न वागण्याबद्दल होते. जसे की, एखाद्या पिल्लाचे अर्पण आपल्या आईबरोबर निदान सात दिवस पूर्ण व्हायच्या आधी करू नये; किंवा, आई व तिचे पिल्लू यांचा एकाच दिवशी वध करू नये; किंवा घरट्यातून आईला आणि तिच्या अंड्यांना किंवा पिल्लांना एकत्र घेऊ नये, अशाप्रकारचे आदेश नियमशास्त्रात होते.—लेवीय २२:२७, २८; अनुवाद २२:६, ७.

नियमशास्त्र, आज्ञांचा व प्रतिबंधात्मक आदेशांचा जटिल संग्रह नव्हता, हे स्पष्ट होते. नियमशास्त्राचे अनेक फायदे आहेत; त्यांपैकी एक म्हणजे या नियमशास्त्रातील नियमांमागील तत्त्वे आपल्यामध्ये, नैतिकतेची जाणीव वाढवतात. कारण या नैतिकतेवरून यहोवाचे अद्‌भुत गुण प्रदर्शित होतात.—स्तोत्र १९:७-११. (w०६ ४/१)

[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Timothy O’Keefe/Index Stock Imagery