व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सात्त्विकपणे चालल्यामुळे मिळणारे आशीर्वाद

सात्त्विकपणे चालल्यामुळे मिळणारे आशीर्वाद

सात्त्विकपणे चालल्यामुळे मिळणारे आशीर्वाद

“परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.” —नीतिसूत्रे १०:२२.

१, २. भविष्याच्याच विचारांत पूर्णपणे गढून जाण्यापासून आपण का सांभाळले पाहिजे?

 एका अमेरिकन तत्त्वज्ञान्याने एकदा म्हटल्याप्रमाणे, “भविष्याचा आपण फार जास्त विचार केला, तर आपल्याला वर्तमानाचे भान राहणार नाही.” काही लहान मुलांच्या बाबतीत असे घडते. मोठे झाल्यावर आपल्याला काय काय करायला मिळेल याचा त्यांना इतका ध्यास लागलेला असतो की बालपणातही किती मौज आहे याकडे ते लक्षच देत नाहीत. याची जाणीव त्यांना बालपण निघून गेल्यावर होते.

कधीकधी यहोवाचे उपासक देखील अशाप्रकारच्या विचारसरणीला बळी पडू शकतात. हे कशाप्रकारे घडू शकते ते पाहा. देवाने या पृथ्वीवर आपले राज्य आणण्याचे वचन दिले आहे आणि आपण त्या नव्या जगाची आतूरतेने वाट पाहात आहोत. आजारपण, म्हातारपण, कष्ट, दुःख काहीही नसेल, असा तो काळ पाहण्याची आपल्याला उत्कंठा लागलेली आहे. अर्थात, देवाच्या राज्याची वाट पाहणे योग्यच आहे. पण जर आपण भविष्यातल्या शारीरिक आशीर्वादांचाच केवळ विचार करत राहिलो आणि त्यामुळे जर आपल्याला सध्याच्या काळातले आध्यात्मिक आशीर्वाद दिसेनासे झालेत तर काय घडू शकते? ही अत्यंत दुःखाची गोष्ट ठरेल! आपण सहज देवाच्या कार्यातला आपला उत्साह गमावून बसू. देवाचे राज्य आपण कल्पना केली होती तितक्या लवकर न आल्यामुळे, अर्थात, आपली ‘आशा लांबणीवर पडल्यामुळे आपले अंतःकरण कष्टी’ होऊ शकते. (नीतिसूत्रे १३:१२) जीवनात कठीण प्रसंग किंवा समस्या येताच आपण खचून जाऊ. निराशेच्या गर्तेत सापडू. समस्यांशी दोन हात करण्याऐवजी, कुरकूर करायला लागू. पण सध्याच्या काळातही जे आशीर्वाद आपल्याला लाभले आहेत, त्यांवर जर आपण मनन केले, तर हे सर्व काही टाळता येण्यासारखे आहे.

३. या लेखात आपण कशावर लक्ष केंद्रित करणार आहोत?

नीतिसूत्रे १०:२२ यात म्हटले आहे: “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.” यहोवाचे आधुनिक काळातले सेवक आध्यात्मिकरित्या समृद्ध स्थितीत आहेत. या आशीर्वादाबद्दल आपल्याला आनंद होत नाही का? आता आपण या आध्यात्मिक समृद्धीच्या काही पैलूंवर आणि वैयक्‍तिकरित्या आपण त्यांची कितपत कदर करतो यावर विचार करू या. यहोवाने ‘सात्विकपणे चालणाऱ्‍या धार्मिक मनुष्यावर’ कोणकोणत्या मार्गांनी आपल्या कृपेचा वर्षाव केला आहे यावर मनन केल्यामुळे आपल्या स्वर्गीय पित्याची आनंदाने सेवा करत करण्याचा आपला संकल्प आणखीनच दृढ झाल्याशिवाय राहणार नाही.—नीतिसूत्रे २०:७.

आजच्या काळात ‘समृद्धी देणारे आशीर्वाद’

४, ५. तुम्हाला स्वतःला बायबलमधली कोणती शिकवणूक सर्वात मोलाची वाटते आणि का?

बायबलचे अचूक ज्ञान. ख्रिस्ती धर्मजगतातले बहुतेक पंथ आपला बायबलवर विश्‍वास असल्याचे सांगतात. पण बायबल नेमके काय शिकवते याबाबतीत त्यांचे एकमत नाही. बरेचदा तर एकाच पंथातल्या सदस्यांचेही बायबलच्या एखाद्या शिकवणुकीविषयी वेगवेगळे मत असते. पण यहोवाच्या सेवकांमध्ये परिस्थिती किती वेगळी आहे! आपण निरनिराळ्या राष्ट्रांतून व संस्कृतींतून आलेलो असलो तरी आपण अशा देवाची उपासना करतो की ज्याला आपण नावाने ओळखतो. तो कोणी रहस्यमय त्रियेक देव नाही. (अनुवाद ६:४; स्तोत्र ८३:१८; मार्क १२:२९) तसेच, देवाला सबंध विश्‍वावर सर्वोच्च अधिकार गाजवण्याचा हक्क आहे किंवा नाही याविषयीचा सैतानाने उठवलेला वाद लवकरच कायमचा मिटवला जाणार आहे हे ही आपल्याला माहीत आहे. आणि देवाला पूर्णपणे एकनिष्ठ राहण्याद्वारे आपल्यापैकी प्रत्येकजण हे दाखवू शकतो की या वादविषयात आपण कोणाचा पक्ष घेतला आहे. ज्यांचा मृत्यू झाला आहे ते कोणत्या स्थितीत आहेत याविषयीही आपल्याला सत्य माहीत आहे. मानवांना नरकाच्या अग्नीत तळमळत ठेवणाऱ्‍या देवाच्या दहशतयुक्‍त भीतीतून आपण मुक्‍त झालो आहोत.—उपदेशक ९:५, १०.

शिवाय, हे जाणूनही आपल्याला किती आनंद होतो की आपण उत्क्रांतीच्या सिद्धान्तानुसार अपघाताने अस्तित्वात आलो नाही! तर आपण देवाची सृष्टी आहोत. त्याने आपल्याला त्याच्या स्वरूपात निर्माण केले आहे. (गलतीकरांस १:२६; मलाखी २:१०) स्तोत्रकर्त्याने देवाची या शब्दांत स्तुती केली: “भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्ये अद्‌भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.”—स्तोत्र १३९:१४.

६, ७. जीवनशैलीत बदल केल्यामुळे आशीर्वाद मिळण्याविषयी स्वतःचा किंवा इतर कोणाचा अनुभव सांगा.

नुकसान करणाऱ्‍या सवयी व आचरणापासून मुक्‍ती. सिगारेट ओढणे, दारू पिणे आणि लैंगिक दुराचरण करणे किती धोकेदायक आहे याबद्दल प्रसारमाध्यमांतून बरीच माहिती प्रसारित केली जाते. पण या धोक्याच्या सूचनांकडे सहसा कोणीही लक्ष देत नाही. पण एखादी प्रामाणिक मनाची व्यक्‍ती जेव्हा हे शिकते, की देवाला या सर्व गोष्टींचा वीट आहे आणि आपण या गोष्टी करतो तेव्हा त्याच्या मनाला खेद होतो तेव्हा ती व्यक्‍ती काय करते? ती व्यक्‍ती अशाप्रकारची वाईट कामे सोडून देते! (यशया ६३:१०; १ करिंथकर ६:९, १०; २ करिंथकर ७:१; इफिसकर ४:३०) अर्थात ही व्यक्‍ती इतर कोणत्या कारणापेक्षा, मुख्यतः यहोवा देवाला संतुष्ट करण्यासाठी हे पाऊल उचलते; पण असे केल्यामुळे तिला सुधारलेले आरोग्य आणि मनाची शांती यांसारखे अतिरिक्‍त फायदेही मिळतात.

वाईट सवयी सोडून देणे बऱ्‍याच जणांना फार जड जाते. तरीपण दर वर्षी हजारो लोक असे करत आहेत. ते आपले जीवन यहोवाला समर्पित करून पाण्यात बाप्तिस्मा घेण्याद्वारे हे जाहीर करतात की त्यांनी देवाला न आवडणाऱ्‍या सर्व गोष्टी आपल्या जीवनातून कायमच्या काढून टाकल्या आहेत. हे पाहून आपल्या सर्वांना किती प्रोत्साहन मिळते! ज्यामुळे आपले नुकसान होऊ शकते अशा पापी आचरणाच्या आहारी पुन्हा कधीही न जाण्याचा आपला निर्धार आणखीच पक्का होतो.

८. बायबलमधला कोणता सल्ला आनंदी कौटुंबिक जीवनाला हातभार लावतो?

आनंदी कौटुंबिक जीवन. बऱ्‍याच देशांत कौटुंबिक जीवन विस्कळीत होत चालले आहे. घटस्फोटांचे प्रमाण बरेच वाढले आहे आणि बहुतेकदा याचा मुलांच्या मनावर तीव्र भावनिक परिणाम होतो. काही युरोपियन देशांत एकूण कुटुंबांपैकी जवळजवळ २० टक्के कुटुंबे अशी आहेत की ज्यांत एकच पालक आहे. या बाबतीत यहोवाने आपल्याला कशाप्रकारे सात्विकतेच्या मार्गाने चालण्यास मदत केली आहे? इफिसकर ५:२२–६:४ कृपया वाचा आणि देवाचे वचन पती, पत्नी व मुलांना जो उत्तम सल्ला देते त्याकडे लक्ष द्या. तेथे व बायबलमध्ये इतर ठिकाणी याविषयी जे सांगण्यात आले आहे त्याचे पालन केल्यामुळे वैवाहिक बंधन अधिक मजबूत होते. तसेच, आईवडिलांना आपल्या मुलांचे योग्यप्रकारे संगोपन करण्यास साहाय्य मिळते आणि कुटुंबात आपोआपच शांतीसमाधानाचे वातारण येते. हा खरोखरच आनंदी होण्याजोगा आशीर्वाद नाही का?

९, १०. जगातल्या लोकांच्या तुलनेत, भविष्याबद्दल आपला दृष्टिकोन कशाप्रकारे वेगळा आहे?

जगातल्या समस्या लवकरच नाहीशा होतील हे आश्‍वासन. आजच्या जगात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बरीच प्रगती झाली आहे. तसेच बरेच नेते समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. तरीसुद्धा आजच्या जगातल्या समस्या तशाच आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक क्लाउस श्‍वॉब यांनी अलीकडेच असे म्हटले की “जगासमोर असलेल्या आव्हानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि दुसरीकडे पाहता वेळ फार कमी उरला आहे.” त्यांनी “दहशतवाद, पर्यावरणाचा ऱ्‍हास आणि आर्थिक अस्थिरता यांसारख्या संकटांचा उल्लेख केला, की जी कोणत्याही एका राष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाहीत.” श्‍वॉब यांनी शेवटी असे म्हटले: “सबंध जगासमोर जे वास्तव आहे त्याला तोंड देण्याकरता सर्वांनी एकत्र येणे आणि काहीतरी निश्‍चित स्वरूपाची पावले उचलणे आज कधी नव्हे इतके आवश्‍यक बनले आहे.” एकविसावे शतक जसजसे पुढे सरकते तसतसे एकंदरीत पाहता मानवाचे भविष्य फारसे आशादायी दिसत नाही.

१० पण यहोवाने मानवजातीच्या सर्व समस्या सोडवण्यास समर्थ असणारी एक व्यवस्था अस्तित्वात आणली आहे हे जाणून आपल्याला किती आनंद होतो. ही व्यवस्था म्हणजे, देवाचे मशीही राज्य. या राज्याच्या माध्यमाने खरा देव यहोवा ‘लढाया बंद करील’ व “विपुल शांति” आणील. (स्तोत्र ४६:९; ७२:७) अभिषिक्‍त राजा येशू ख्रिस्त, ‘दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर दया करील, दरिद्रयांचे जीव तारील. [आणि] जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील.’ (स्तोत्र ७२:१२-१४) देवाचे राज्य शासन करू लागल्यावर जगात कोठेही अन्‍नधान्याची कमी राहणार नाही. (स्तोत्र ७२:१६) यहोवा, “[आपल्या] डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:४) हे राज्य केव्हाच स्वर्गात स्थापन झाले आहे आणि लवकरच ते या पृथ्वीवरील सर्व कारभार हाती घेण्याकरता आवश्‍यक कारवाई करेल.—दानीएल २:४४; प्रकटीकरण ११:१५.

११, १२. (क) मौजमजा केल्याने खरा आनंद मिळतो का? स्पष्ट करा. (ख) खरा आनंद कशामुळे मिळू शकतो?

११ खऱ्‍या आनंदाची गुरूकिल्ली माहीत असणे. जीवनात खरा आनंद कशामुळे मिळतो? मानसशास्त्राच्या एका तज्ज्ञाने म्हटले की आनंदाचे तीन पैलू आहेत—मौज, सहभागिता (एखाद्या कामाचा किंवा कुटुंबाचा भाग असणे) आणि उद्देश (स्वतःसाठी नव्हे तर एखाद्या जास्त अर्थपूर्ण ध्येयाच्या पूर्तीकरता कार्य करणे). या तीन गोष्टींपैकी, त्यांनी सांगितले की मौज ही सर्वात कमी महत्त्वाची आहे. ते पुढे म्हणाले: “याची लोकांना जाणीव करून दिली जाणे आवश्‍यक आहे कारण आज बहुतेक लोक मौजमजा करणे हाच आपल्या जीवनाचा उद्देश आहे असे मानतात.” बायबलचा याविषयी काय दृष्टिकोन आहे?

१२ प्राचीन इस्राएलच्या राजा शलमोनाने म्हटले: “मी आपल्या मनात म्हटले, चल, हास्यविनोदाने मी तुला अजमावून पाहतो; तर आता तू सुख भोगून घे; पण हेहि व्यर्थ. मी हास्यास म्हटले, तू वेडे आहेस; मी विनोदास म्हटले, तुजपासून काय लाभ?” (उपदेशक २:१, २) बायबलनुसार, मौजमजेतून मिळणारा आनंद क्षणिक असतो. एखाद्या कामात सहभागी झाल्यामुळे आनंद मिळू शकतो का? आपण तर एका अशा कार्यात सहभागी आहोत की ज्यापेक्षा अधिक अर्थपूर्ण दुसरे कार्य असूच शकत नाही, अर्थात देवाच्या राज्याविषयी प्रचार करणे आणि शिष्य बनवणे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) बायबलमध्ये सांगितलेला संदेश आपण इतरांना सांगतो तेव्हा आपण एका अशा कार्यात सहभागी होत असतो की ज्यामुळे आपल्या स्वतःला आणि जे आपले ऐकतील त्यांनाही तारण मिळेल. (१ तीमथ्य ४:१६) “देवाचे सहकारी” बनून कार्य करत असताना, “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे” याचा आपल्याला पदोपदी प्रत्यय येतो. (१ करिंथकर ३:९; प्रेषितांची कृत्ये २०:३५) या कार्यामुळे आपल्या जीवनाला एक उद्देश लाभतो. तसेच आपण हे कार्य केल्यामुळे निर्माणकर्ता यहोवा देव, त्याची निंदा करणाऱ्‍या दियाबल सैतानाला प्रत्युत्तर देऊ शकतो. (नीतिसूत्रे २७:११) खरोखर, यहोवाने आपल्याला दाखवले आहे की त्याची एकनिष्ठपणे उपासना केल्यानेच खरा व टिकणारा आनंद आपल्याला मिळू शकतो.—१ तीमथ्य ४:८.

१३. (क) ईश्‍वरशासित सेवा प्रशाला कोणत्या अर्थाने एक आनंददायक आशीर्वाद आहे? (ख) तुम्हाला ईश्‍वरशासित सेवा प्रशालेमुळे कोणता फायदा झाला आहे?

१३ महत्त्वाचे व परिणामकारक असे प्रशिक्षण. गेरहार्ट हे यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीत वडील या नात्याने सेवा करतात. आपल्या तरुणपणाची आठवण करून ते म्हणतात: “लहानपणी मला नीट बोलायला खूपच त्रास व्हायचा. चारचौघांसमोर बोलताना तर बोबडीच वळायची. मी अडखळत अडखळत बोलायचो. यामुळे माझ्यात एकप्रकारची हीन भावना निर्माण झाली. मी खूप निराश झालो. या समस्येवर मात करण्यासाठी माझ्या आईवडिलांनी मला खास वर्गांना पाठवले, पण त्यांच्या प्रयत्नांचा काही फायदा झाला नाही. माझी समस्या ही शारीरिक नसून खरे तर मानसिक होती. पण यहोवाने एक अतिशय अद्‌भुत तरतूद केली आहे—ईश्‍वरशासित सेवा प्रशाला. या प्रशालेत नाव घातल्यामुळे मला माझा आत्मविश्‍वास परत मिळाला. प्रशालेत जे काही शिकलो त्याचा मी सराव करायचो. यामुळे मला खूपच फायदा झाला. हळूहळू मी न अडखळता बोलायला शिकलो. माझी निराशेची भावना नाहीशी झाली आणि सेवाकार्यात मी जास्त आत्मविश्‍वासाने लोकांशी बोलू लागलो. आता तर मी जाहीर भाषणेही देतो. या प्रशालेच्या माध्यमातून मला एक नवे जीवन दिल्याबद्दल मी यहोवाचे मनापासून आभार मानतो!” यहोवा आपल्याला त्याचे कार्य करण्याकरता ज्याप्रकारे प्रशिक्षित करतो त्याबद्दल आपल्याला आनंद वाटत नाही का?

१४, १५. कठीण प्रसंगी आपल्याला कोणती मदत उपलब्ध आहे? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

१४ यहोवासोबत एक वैयक्‍तिक नाते आणि सबंध जगातील आपल्या बांधवांचा आधार. कॅतरीन जर्मनीमध्ये राहते. आशियात भूकंप झाल्यामुळे सुनामी आल्याची बातमी तिला मिळाली तेव्हा ती भयंकर घाबरली. कारण नेमकी तेव्हाच तिची मुलगी थायलंडला गेलेली होती. ३२ तासांपर्यंत या आईला आपली मुलगी जिवंत आहे किंवा नाही हे कळायला मार्ग नव्हता. दर तासाला मृतांची संख्या वाढत चालली होती. शेवटी कॅतरीनला फोन आला की तिची मुलगी सुरक्षित आहे, तेव्हा कोठे तिचा जीव भांड्यात पडला!

१५ पण ते काही तास कॅतरीनने कसे घालवले? त्या चिंतातूर अवस्थेत तिला कशामुळे साहाय्य मिळाले? ती लिहिते: “मी जवळजवळ तो सबंध वेळ यहोवाला प्रार्थना करत होते. प्रार्थना केल्यामुळे किती मनोबल व शांती मिळू शकते याचा मला वारंवार प्रत्यय आला. शिवाय मंडळीतले प्रेमळ बंधूभगिनी मला प्रोत्साहन देण्याकरता धावून आले.” (फिलिप्पैकर ४:६, ७) कल्पना करा, यहोवाला प्रार्थना करणे शक्य नसते, किंवा प्रेमळ आध्यात्मिक बंधूभगिनींकडून मिळणारे सांत्वन नसते तर तिला या कठीण प्रसंगाला तोंड देणे किती जड गेले असते! यहोवासोबतचे आपले घनिष्ट नाते, तसेच ख्रिस्ती बंधूभगिनींचा सहवास हे अतिशय विलक्षण व मोलवान आशीर्वाद आहेत. आपण कधीही त्यांना क्षुल्लक लेखू नये.

१६. पुनरुत्थानाची आशा किती मोलाची आहे हे दाखवणारा अनुभव सांगा.

१६ ज्या आपल्या प्रिय माणसांचा मृत्यू झाला आहे त्यांना पुन्हा पाहण्याची आशा. (योहान ५:२८, २९) मातीयस नावाचा एक तरुण, यहोवाच्या साक्षीदारांच्या कुटुंबातच लहानाचा मोठा झाला. पण साक्षीदार म्हणून लाभलेल्या आशीर्वादांची जाणीव नसल्यामुळे पंधरा-सोळा वर्षांचा असताना तो ख्रिस्ती मंडळीपासून दूर गेला. अलीकडे त्याने लिहिले: “मला माझ्या वडिलांसोबत गंभीर विषयांवर चर्चा करण्याची संधीच मिळाली नाही. सुरुवातीपासूनच आमचे केवळ वादच व्हायचे. तरीपण मी जीवनात यशस्वी व्हावं असंच बाबांना नेहमी वाटायचं. त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते, पण त्यावेळी मला याची जाणीव नव्हती. १९९६ साली मी त्यांच्या उशाशी बसून, त्यांचा हात धरून, रड रड रडलो. आतापर्यंत माझं जे काही चुकलं त्याबद्दल मी त्यांना क्षमा मागितली आणि माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे त्यांना सांगितलं. पण मी काहीही बोललो तरी आता ते माझं ऐकू शकत नव्हते. कारण अल्पकाळाच्या आजारपणानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. पुनरुत्थानात माझ्या बाबांना पुन्हा भेटायला मी जिवंत राहिलो तर मी तिथं त्यांची माफी मागेन. आता मी एक वडील म्हणून सेवा करतो आणि माझ्या पत्नीला व मला पायनियर सेवा करण्याची सुसंधी मिळाली आहे. हे ऐकून निश्‍चितच त्यांना खूप आनंद होईल.” खरोखर, पुनरुत्थानाची आशा आपल्याकरता किती मोठा आशीर्वाद आहे!

“तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही”

१७. यहोवाच्या आशीर्वादांवर मनन केल्यामुळे आपल्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे?

१७ आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल येशू ख्रिस्ताने म्हटले: “तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” (मत्तय ५:४५) जर यहोवा वाईटांना व अनीतिमानांना आशीर्वाद देऊ शकतो तर मग जे सात्विकतेने चालतात त्यांना तो किती भरभरून आशीर्वाद देईल! स्तोत्र ८४:११ म्हणते: “जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून [परमेश्‍वर] राहणार नाही.” देवावर प्रेम करणाऱ्‍यांची तो किती विशेष काळजी घेतो यावर जेव्हा आपण मनन करतो तेव्हा आपले मन कृतज्ञतेने व आनंदाने भरून येते!

१८. (क) यहोवा आशीर्वादांसोबत आणखी कष्ट देत नाही असे आपण का म्हणू शकतो? (ख) देवाच्या विश्‍वासू सेवकांपैकीही अनेकांना दुःखदायक परिस्थितीला का तोंड द्यावे लागते?

१८ यहोवा “परमेश्‍वराचा आशीर्वाद”—हेच त्याच्या लोकांच्या आध्यात्मिक समृद्धीचे कारण आहे. आणि आपल्याला खात्री आहे की या समृद्धीबरोबर “तो आणखी कष्ट देत नाही.” (नीतिसूत्रे १०:२२) मग देवाच्या विश्‍वासू सेवकांपैकीही बऱ्‍याच जणांवर कठीण प्रसंग व संकटे का येतात? त्यांनाही दुःख व कष्ट का सहन करावे लागते? आपल्यावर दुःखदायक समस्या मुख्यतः तीन कारणांमुळे येतात: (१) आपल्या स्वतःच्या पापपूर्ण स्वभावामुळे. (उत्पत्ति ६:५; ८:२१; याकोब १:१४, १५) (२) सैतान व त्याच्या दुरात्म्यांमुळे. (इफिसकर ६:११, १२) (३) आपण दुष्ट जगात राहात असल्यामुळे. (योहान १५:१९) पण या वाईट गोष्टी घडू देण्याची यहोवा परवानगी देत असला तरी तो या वाईट गोष्टी घडवून आणत नाही. उलट, “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; . . . ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.” (याकोब १:१७) यहोवाचे आशीर्वाद कष्टदायक नाहीत.

१९. जे सात्विकतेने चालतात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील?

१९ देवाच्या अधिकाधिक जवळ गेल्यानेच आपण आध्यात्मिक समृद्धी अनुभवू शकतो. त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्याद्वारे आपण, “खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी” जपून ठेवत असतो. (१ तीमथ्य ६:१२, १७-१९) देव जे नवे जग निर्माण करत आहे त्यात आध्यात्मिक समृद्धीसोबतच शारीरिक आशीर्वादही आपल्याला मिळतील. ते खरे जीवन केवळ अशा लोकांना मिळेल की जे सदोदीत ‘आपला देव परमेश्‍वर ह्‍याची वाणी ऐकतात.’ (अनुवाद २८:२) तर मग आपण दृढ संकल्प करू या व सात्विकतेच्या मार्गावर आनंदाने चालत राहू या. (w०६ ५/१५)

तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• भविष्याच्या विचारांतच गढून जाणे शहाणपणाचे का नाही?

• आज आपल्याला कोणकोणते आशीर्वाद लाभले आहेत?

• देवाच्या विश्‍वासू सेवकांनाही दुःख का सहन करावे लागते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]