तुम्ही कितपत आनंदी आहात?
तुम्ही कितपत आनंदी आहात?
‘मी कितपत आनंदी आहे?’ असा प्रश्न कदाचित तुम्ही स्वतःला विचाराल. तुम्ही आणि इतर जण या प्रश्नाचे उत्तर कसे देतील हे शोधण्याचा काही समाज शास्त्रज्ञ कसोशीने प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांचे हे काम वाटते तितके सोपे नाही. एखाद्या व्यक्तीच्या जीवनातला आनंद मोजणे, एका पुरुषाला आपल्या पत्नीबद्दल किती प्रेम आहे किंवा मृत्यूमुळे एखादे कुटुंब किती प्रमाणात दुःखी झाले हे मोजण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. भावनांचे अचूक मापन करणे शक्य नाही. परंतु, शास्त्रज्ञांना एका मूलभूत सत्याची जाणीव आहे. ती ही, की सर्व मानवांमध्ये आनंदण्याची क्षमता आहे.
आपल्यामध्ये आनंदण्याची क्षमता असूनही गंभीर समस्यांमुळे आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उदाहरणार्थ, काही शहरात एड्सला बळी पडलेल्यांची संख्या इतकी वाढली आहे की त्यांना पुरण्यासाठी जागा उरलेली नाही. तेथील अधिकाऱ्यांनी, अलिकडे मरण पावलेल्यांना जुन्या कबरीतच पुरण्याची परवानगी दिली आहे. आफ्रिकेच्या काही भागात तर, शवपेटी बनवण्याचाच पुष्कळ लोकांचा धंदा आहे. आणि तुम्ही कोठेही राहत असला तरी, ज्यांना गंभीर आजार झाले आहेत आणि ज्या लोकांचे नातेवाईक किंवा मित्र मरण पावले आहेत अशा लोकांचे उदास चेहरे तुम्ही पाहिले असतील.
सधन राष्ट्रांविषयी काय? तेथे, आर्थिक परिस्थिती रातोरात बदलू शकते. आर्थिकरीत्या सुरक्षित असलेल्या लोकांकडून त्यांची सुरक्षा एकाएकी हिरावून घेतली जाते. त्यांच्यावर अचानक आलेली ही परिस्थिती झेलण्यास ते तयार नसतात. संयुक्त संस्थानांत पुष्कळ निवृत्त लोकांची पेन्शन बंद झाल्यामुळे त्यांना पुन्हा काम करावे लागत आहे. साठवलेला सर्व पैसा बहुतेकदा औषधपाण्यावर खर्च होतो. एक वकील म्हणतात: “असे लोक जेव्हा, अगडबंब खर्च कसा चालवायचा आणि औषधाच्या खर्चाबाबत माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात तेव्हा त्यांच्यावर आलेली ही अवस्था पाहून मला खूप वाईट वाटतं. पुष्कळदा मला त्यांना सांगावं लागतं, की त्यांना त्यांचं घर विकावं लागेल.” पण मग ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे अशा लोकांबद्दल काय? त्यांना कसलेही दुःख नसते का?
काही लोक नामवंत गीतकार रिचर्ड रॉजर्ससारखे असतात. त्याच्याविषयी असे म्हटले होते: “फार तुरळक असे लोक आहेत, की जे पुष्कळ लोकांना सूख देतात.” रिचर्डच्या गीतांमुळे दुसरे लोक आनंदी झाले पण तो मात्र नैराश्याच्या गर्तेत बुडाला होता. अनेक लोकांना पैसा आणि प्रसिद्धी हवीहवीशी वाटते. आणि रिचर्डने या दोन्ही गोष्टी साध्य केल्या होत्या. पण आनंद? एका चरित्रकाराने रिचर्डविषयी असे लिहिले: “[रॉजर्सने] आपल्या कामात कमालीचे यश मिळवले, समाजात प्रतिष्ठा मिळवली, आणि दोनवेळा त्याला पुलीट्झर पारितोषिकही मिळाले. पण खासगी जीवनात तो सहसा दुःखी व निराश असायचा.”
पैसा आणि संपत्ती यांतून सूख किंवा आनंद शोधणाऱ्यांना बहुतेकदा हुलकावणी मिळते, हे कदाचित तुमच्याही पाहण्यात आले असावे. कॅनडा, टोरंटो येथील द ग्लोब ॲण्ड मेल या वृत्तपत्रकाच्या गुंतवणूक पत्रकाराने, पुष्कळ सधन लोकांना भोगावा लागत असलेला “एकाकीपणा आणि रिक्तपणा” याचे वर्णन केले. एका आर्थिक सल्लागाराच्या मते, श्रीमंत आईवडील जेव्हा आपल्या मुलांना, पॉकेटमनी म्हणून पुष्कळ पैसा देतात किंवा त्यांना महागड्या वस्तू आणून देतात तेव्हा “हे बहुतेकदा, दुःखाला आमंत्रण असते.”
आनंद मिळवण्याचा काही ठोस आधार?
एखाद्या फुलाचे झाड जसे चांगल्या मातीत, भरपूर पाणी आणि पोषक वातावरणात बहरते तसेच विशिष्ट परिस्थिती मनुष्याला आनंदी बनवू शकते, हे मानसशास्त्रज्ञांना उमगले आहे. या विशिष्ट परिस्थितीत, बऱ्यापैकी आरोग्य, अर्थपूर्ण काम, पुरेसे अन्न, वस्र, निवारा, मनातील सृजनात्मक इच्छा पूर्ण होणे आणि खरे मित्र या सर्वांचा समावेश होतो.
वरील परिस्थितींचा, एखाद्याच्या आनंदावर प्रभाव पडू शकतो, याजशी तुम्हीही कदाचित सहमत असाल. पण याहूनही आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. ती गोष्ट म्हणजे यहोवा देवाविषयीचे ज्ञान. पण हे ज्ञान एखाद्याला आनंदी कसे बनवू शकते? यहोवा देव आपला निर्माणकर्ता आहे. आणि त्याने आपल्याला आनंदी राहण्याची क्षमता दिली आहे. तेव्हा, कोणत्या गोष्टींमुळे आपण खरोखर आनंदी होऊ शकतो, हे त्याला चांगल्याप्रकारे माहीत आहे. आपण जगाच्या पाठीवर कोठेही राहत असलो तरी, आपण कायमचे आनंदी कसे होऊ शकतो याबद्दल तो मार्गदर्शन देतो. या मार्गदर्शनाविषयी पुढच्या लेखात चर्चा करण्यात आली आहे. (w०६ ६/१५)
[४ पानांवरील चित्र]
फुलांनी बहरलेल्या झाडाप्रमाणे आपला आनंदही योग्य परिस्थितीत बहरू शकतो
[३ पानांवरील चित्राचे श्रेय]
© Gideon Mendel/CORBIS