व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जे लीन त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल

जे लीन त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल

जे लीन त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल

“मला वाटते, निसर्गाचे रुप बदलेल, तो पुन्हा बागेसारखा होईल. . . . लगेचच नाही पण अगदी दूर भविष्यात. तेव्हा नवे आकाश व नवी पृथ्वी असेल,” असे झॉन मरी पेल्ट नावाच्या एका फ्रेंच पर्यावरणवादी तज्ज्ञाने म्हटले.

पृथ्वीवरील पर्यावरण व सामाजिक अवस्था पाहून अस्वस्थ होणाऱ्‍या पुष्कळांना, आपल्या पृथ्वीग्रहाचे नंदनवनात रुपांतर झालेले पाहायला निश्‍चितच आवडेल. पण ही इच्छा केवळ २१ व्या शतकातील स्वप्न नाही. कित्येक वर्षांआधी बायबलने पृथ्वीचे पुन्हा नंदनवनात रुपांतर होईल असे वचन दिले. “जे लीन . . . त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल,” आणि “जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाणे होवो,” हे येशूचे शब्द, शास्त्रवचनांतील सर्वांत प्रसिद्ध उताऱ्‍यांतील आहेत. (मत्तय ५:५, पं.र.भा.; ६:१०) परंतु आज, लीन जनांना पृथ्वीचे वतन मिळेल असा सर्वच जण विश्‍वास करत नाहीत. ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍यांना, पृथ्वी नंदनवनासारखी होईल असे वाटत नाही.

नंदनवनाविषयीचा विश्‍वास—मग तो पृथ्वीवरील असो अथवा स्वर्गातील—कॅथलिक चर्चमधून कमी का झाला आहे याचे स्पष्टीकरण ला वी नावाच्या एका फ्रेंच साप्ताहिक मासिकात दिले होते. त्यात असे म्हटले होते: “सुमारे १,९०० वर्षे नंदनवनाची शिकवण कॅथलिक शिकवणींतील प्रमुख शिकवण होती. पण आता ती शिकवण, आध्यात्मिक चिंतन-मननातून, रविवारी चर्चमध्ये केल्या जाणाऱ्‍या उपदेशांतून, धर्मशास्त्राच्या कोर्सेसमधून व कॅटकिझम वर्गांतून नाहीशी झाली आहे.” नंदनवन हा शब्दच ‘रहस्यमय व गोंधळात पाडणारा’ झाला आहे. काही पाळक मुद्दामहून तो शब्द वापरण्याचे टाळतात कारण त्यामुळे, लोकांच्या मनात विनाकारण, ‘पृथ्वीवरील सुखाच्या अनेक कल्पना जागृत होतात,’ असे त्यांचे म्हणणे आहे.

धर्म या विषयाचा विशेष अभ्यास करणाऱ्‍या फ्रेड्रीक लेनवार या समाजशास्त्रज्ञांच्या मते, नंदनवनाच्या संकल्पना “चाकोरीबद्ध प्रतिमांप्रमाणे” झाल्या आहेत. तसेच, इतिहासकार व अनेक पुस्तकांचा लेखक असलेल्या झॉन डेल्यूमो यांना वाटते, की बायबलमध्ये नंदनवनाविषयी दिलेली वचने ही अक्षरशः अर्थाने नव्हे तर लाक्षणिक अर्थाने पूर्ण होतील. ते असे लिहितात: “‘नंदनवनाविषयी आता काय उरले आहे?’ या प्रश्‍नाला ख्रिस्ती धर्मसिद्धांत असे उत्तर देतो: आपल्या तारणकर्त्याच्या पुनरुत्थानामुळे आपण एक दिवस नक्की आपले स्वप्न पूर्ण झालेले पाहू.”

पण पृथ्वीचे नंदनवन होईल असा विश्‍वास करणे आजही उचित आहे का? आपल्या पृथ्वीग्रहाचे भविष्य नेमके काय आहे? भविष्याबद्दलची आशा अंधूक आहे की, आपण ती स्पष्ट पाहू शकतो? पुढील लेखात या प्रश्‍नांची उत्तरे देण्यात आली आहेत. (w०६ ८/१५)