व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘नऊ वर्षांच्या सॅम्युएलमुळे’

‘नऊ वर्षांच्या सॅम्युएलमुळे’

‘नऊ वर्षांच्या सॅम्युएलमुळे’

व्ये सवावा दक्षिण पोलंडमध्ये राहते. ज्या ज्या वेळी यहोवाचे साक्षीदार तिच्या घरी जात त्या त्या वेळी ती, त्यांचे आभार मानायची आणि अगदी अदबीने त्यांना सांगायची की तिला त्यांचा संदेश ऐकण्यात काही रस नाही. एके दिवशी, नऊ वर्षांचा सॅम्युएल आपल्या आईबरोबर तिच्या घरी गेला. यावेळेला व्येसवावाने संदेश ऐकायचे ठरवले आणि तिने पृथ्वीचे परादीस होईल हा विषय असलेले मासिक स्वीकारले.

येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी जवळ आला असल्यामुळे सॅम्युएल व्येसवावाला या खास प्रसंगाचे आमंत्रण देऊ इच्छित होता. त्यामुळे तो आपल्या आईबरोबर पुन्हा व्येसवावाच्या घरी छापील आमंत्रण पत्रिका घेऊन गेला. सॅम्युएल चांगला पोशाख घालून आल्याचे पाहिल्यावर व्येसवावा, जरा थांबा असे म्हणून आत गेली आणि थोड्याच वेळात चांगले कपडे घालून बाहेर आली. मग तिने सॅम्युएलचे बोलणे ऐकले, आमंत्रण स्वीकारले व विचारले: “मी एकटीनं यावं की माझ्या नवऱ्‍यालाही सोबत आणावं?” मग ती पुढे म्हणाली: “माझा नवरा आला नाही तरी, मी जरूर येईन. सॅम्युएल तू मला बोलवत आहेस म्हणून मी नक्की येईन.” आणि ती खरोखरच आली. सॅम्युएलला तिला पाहून खूप आनंद झाला.

स्मारकविधीच्या भाषणाच्या वेळी सॅम्युएल तिच्या शेजारी बसला आणि भाषणात चर्चा केली जाणारी शास्त्रवचने तिला बायबलमधून दाखवू लागला. यामुळे ती खूप प्रभावीत झाली. तिला हा स्मारकविधी खूप आवडला. इतके गहन विषय किती साध्या सोप्या भाषेत मांडले त्याबद्दल तिने आभारही व्यक्‍त केले. शिवाय, मंडळीतल्या बंधूभगिनींनी तिचे कसे प्रेमळ, उबदार स्वागत केले ते पाहूनही ती खूप प्रभावीत झाली. तेव्हापासून व्येसवावा आध्यात्मिक गोष्टींबद्दल आवड दाखवू लागली आहे व यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना देखील नियमितरीत्या उपस्थित राहू लागली आहे. अलिकडेच तिने म्हटले: “पूर्वी तुम्ही माझ्या घरी यायचा तेव्हा मी तुमचं ऐकून घ्यायचे नाही, याची मला आता लाज वाटते. पण ह्‍या वेळेस मी नऊ वर्षांच्या सॅम्युएलमुळे खरं तर तुमचा संदेश ऐकायला तयार झाले, हे मी कबूल करते.”

पोलंडमधील सॅम्युएलसारखे यहोवाचे इतर अनेक लहान साक्षीदार यहोवाची आपल्या तोंडाने, आपल्या पेहरावाने आणि आपल्या वर्तनाने स्तुती करतात. तुम्ही किशोरवयीन असाल तर तुम्ही देखील प्रामाणिक लोकांना विश्‍वसनीय आध्यात्मिक मूल्यांमध्ये आवड घेण्यास प्रवृत्त करू शकता. (w०६ ९/१)