व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

न्यायाधीश बोध घेऊ शकतो का?

न्यायाधीश बोध घेऊ शकतो का?

न्यायाधीश बोध घेऊ शकतो का?

स्लाडयाना, क्रोएशिया येथील एक यहोवाची साक्षीदार, हिला आर्थिक बाबींसंबंधी काही कामासाठी ठरलेल्या वेळेनुसार न्यायालयात हजर राहायचे होते. ती अगदी वेळेवर न्यायाधीशाच्या समोर उपस्थित झाली. परंतु, खटल्याच्या दुसऱ्‍या पक्षातील लोक यायला उशीर झाला. स्लाडयाना साक्ष देण्याकरता खूप उत्सुक होती; त्यामुळे सर्वजण वाट पाहत आहेत हे पाहून, तिने न्यायाधीशासोबत बोलण्यासाठी आपले धैर्य एकवटले.

तिने न्यायाधीशाला विचारले, “सर, लवकरच या पृथ्वीवर न्यायाधीश आणि न्यायालयेही नसतील हे तुम्हाला माहीत आहे का?” अर्थातच, ती आजच्या न्यायाधीशांबद्दल बोलत होती.

आश्‍चर्यचकीत होऊन, काहीही उत्तर न देता न्यायाधीशाने फक्‍त तिच्याकडे पाहिले. इतक्यात न्यायालयातील कामकाज सुरु झाले. कामकाज संपल्यावर स्लाडयाना कागदपत्रावर सही करण्यासाठी उठून उभी राहिली तेव्हा न्यायाधीश तिच्याकडे थोडसं झुकून हलक्या आवाजात म्हणाला: “लवकरच या पृथ्वीवर न्यायाधीश आणि न्यायालयेही नसतील, हे तू मला इतक्यात सांगितलं होतं ते खरंच होईल का?”

स्लाडयानाने उत्तर दिले, “होय साहेब, मला पूर्ण खात्री आहे.”

“याविषयी तुझ्याकडे काय पुरावा आहे?” न्यायाधीशाने विचारले.

“याचा पुरावा बायबलमध्ये दिला आहे,” स्लाडयानाने उत्तर दिले.

न्यायाधीश म्हणाला की त्याला याविषयी वाचायला आवडेल, परंतु त्याच्याकडे बायबल नव्हते. मग त्याच्यासाठी एक बायबल घेऊन येईल असे स्लाडयानाने त्याला सांगितले. साक्षीदारांनी न्यायाधीशाची भेट घेऊन त्याला एक बायबल दिले आणि बायबल अभ्यास सुरु करण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले. न्यायाधीशाने हा प्रस्ताव स्वीकारला आणि लवकरच तो एक यहोवाचा साक्षीदार झाला.

स्तोत्र २:१० मधील भविष्यसूचक शब्द म्हणतात: “राजांनो, आता शहाणे व्हा, पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या.” अशाप्रकारचे लोक नम्रतेने यहोवाचे प्रेमळ मार्गदर्शन स्वीकारतात ही किती आनंदाची गोष्ट आहे! (w०६ १२/०१)

[३२ पानांवरील चित्र]

स्लाडयाना न्यायाधीशासोबत