“जे मागतात त्यांस” यहोवा पवित्र आत्मा देतो
“जे मागतात त्यांस” यहोवा पवित्र आत्मा देतो
“तुम्ही वाईट असताहि तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” —लूक ११:१३.
१. आपल्याला पवित्र आत्म्याची गरज खासकरून केव्हा जाणवते?
‘मी स्वतःहून याला तोंड देऊ शकत नाही. फक्त पवित्र आत्म्याच्या मदतीनेच मी या कठीण प्रसंगाचा सामना करू शकेन.’ तुम्ही कधी अशाप्रकारे आपल्या मनःपूर्वक भावना व्यक्त केल्या आहेत का? बहुतेक ख्रिस्ती उपासकांनी केल्या आहेत. कदाचित तुम्हाला एखादा गंभीर रोग झाल्याचे कळले तेव्हा तुम्ही असे म्हटले असेल. किंवा बरीच वर्षे सुखाचा संसार केल्यानंतर तुमच्या विवाह जोडीदाराचा मृत्यू झाल्यामुळे तुम्हाला असे वाटले असेल. किंवा, डिप्रेशनसारख्या मनोविकारामुळे एकेकाळी आनंदी व उत्साही असणारे तुम्ही, अचानक विषण्णतेच्या गर्तेत सापडला तेव्हा वरील उद्गार तुमच्या तोंडून निघाले असावेत. जीवनातल्या त्या दुःखद क्षणांत, केवळ यहोवाच्या पवित्र आत्म्याने आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ पुरवल्यामुळेच आपण जिवंत राहिलो असे कदाचित तुम्हाला वाटले असेल.—२ करिंथकर ४:७-९; स्तोत्र ४०:१, २.
२. (क) खऱ्या ख्रिश्चनांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
२ खरे ख्रिस्ती या नात्याने आपल्याला या अभक्त जगाकडून दिवसेंदिवस अधिकाधिक दबाव व विरोध सहन करावा लागत आहे. (१ योहान ५:१९) शिवाय आपण ख्रिस्ताचे अनुयायी असल्यामुळे खुद्द दियाबल सैतानाने आपल्याला त्याचे लक्ष्य बनवले आहे. जे ‘देवाच्या आज्ञा पाळतात व येशूविषयी साक्ष देतात’ त्यांच्याविरुद्ध तो पूर्ण शक्तिनिशी लढत आहे. (प्रकटीकरण १२:१२, १७) तेव्हा, साहजिकच आपल्याला पूर्वी कधी नव्हती इतकी आज देवाच्या आत्म्याच्या साहाय्याची गरज आहे. पण, देवाचा पवित्र आत्मा आपल्याला मुबलक प्रमाणात मिळत राहावा म्हणून आपण काय केले पाहिजे? आणि कठीण प्रसंगांना तोंड देण्याकरता लागणारे साहाय्य व सामर्थ्य आपल्याला पुरवण्यास यहोवा तयार आहे, नव्हे, उत्सुक आहे याची आपण खात्री का बाळगू शकतो? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येशूने दिलेल्या दोन दृष्टान्तांत सापडतात.
सतत प्रार्थना करत राहा
३, ४. येशूने कोणता दृष्टान्त सांगितला आणि प्रार्थनेशी त्याचा कसा संबंध आहे हे त्याने कशाप्रकारे समजावून सांगितले?
३ येशूच्या शिष्यांपैकी एकाने त्याला एकदा अशी विनंती केली: ‘प्रभुजी, आम्हाला प्रार्थना करावयास शिकवा.’ (लूक ११:१) तेव्हा, येशूने आपल्या शिष्यांना दोन दृष्टान्त सांगितले. पहिला दृष्टान्त हा एका अशा मनुष्याविषयी आहे ज्याच्याकडे एक पाहुणा आला आहे आणि दुसरा दृष्टान्त आपल्या मुलाची मागणी पूर्ण करणाऱ्या एका पित्याविषयी आहे. या दोन्ही दृष्टान्तांचे आपण एकेक करून परीक्षण करुया.
४ येशूने म्हटले: “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे; कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ काही नाही; आणि तो आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नको; आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत; मी उठून तुला देऊ शकत नाही. मी तुम्हास सांगतो, तो त्याचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल.” मग येशूने हा दृष्टान्त प्रार्थनेशी कशाप्रकारे संबंधित आहे हे समजावून सांगितले. तो म्हणाला: “मी तुम्हास सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हास सापडेल; ठोका म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल.”—लूक ११:५-१०.
५. मित्राने भाकरी देईपर्यंत पुन्हा पुन्हा मागत राहणाऱ्या या माणसाकडून आपण कशा मनोवृत्तीने प्रार्थना करावी याविषयी काय शिकतो?
५ मित्राने भाकरी देईपर्यंत पुन्हा पुन्हा मागत राहणाऱ्या या माणसाच्या दृष्टान्तावरून आपण कशा मनोवृत्तीने प्रार्थना केली पाहिजे हे आपल्याला समजते. येशूने म्हटल्याप्रमाणे या माणसाला “त्याच्या आग्रहामुळे” हव्या असणाऱ्या वस्तू मिळवता आल्या. (लूक ११:८) “आग्रहामुळे” असे भाषांतर केलेला मूळ ग्रीक शब्द बायबलमध्ये केवळ या एकाच ठिकाणी आढळतो आणि त्याचा शब्दशः अर्थ “निर्लज्जपणा” असा आहे. सहसा निर्लज्जपणा हा वाईट गुण समजला जातो. पण एखाद्या चांगल्या उद्देशासाठी जेव्हा निर्लज्जपणा दाखवला जातो किंवा नेटाने एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केला जातो, तेव्हा याला एक चांगला गुण म्हणता येते. सदर दृष्टान्तातील माणसाच्या बाबतीत हेच दिसून येते. आपल्याला आवश्यक असलेली गोष्ट मागण्यास त्याला लाज वाटली नाही. येशूने आपल्याला या माणसाचे उदाहरण दिले त्याअर्थी आपणही त्याच्यासारखीच पुन्हा पुन्हा, किंवा सतत प्रार्थना केली पाहिजे. यहोवाची इच्छा आहे की आपण मागत राहावे, शोधत राहावे, व ठोकत राहावे. असे केल्यास, ‘जे मागतात त्यास तो पवित्र आत्मा’ अवश्य देईल.
६. येशूच्या काळात, पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याविषयी लोकांचा कसा दृष्टिकोन होता?
६ येशूने केवळ पुन्हा पुन्हा व सतत प्रार्थना करावी इतकेच शिकवले नाही तर आपण का प्रार्थना करावी हे देखील त्याने स्पष्ट केले. आपल्याकडे आलेल्या पाहुण्याचा आतिथ्यसत्कार करण्याकरता मित्राकडे पुन्हा पुन्हा भाकरी मागणाऱ्या माणसाचा दृष्टान्त येशूने सांगितला तेव्हा तो ऐकणाऱ्या उत्पत्ति १८:२-५; इब्री लोकांस १३:२) एखाद्याला पाहुण्यांचे आदरातिथ्य करता आले नाही तर ती लाजिरवाणी गोष्ट समजली जायची. (लूक ७:३६-३८, ४४-४६) हे लक्षात घेऊन, आता पुन्हा एकदा येशूने सांगितलेल्या गोष्टीकडे वळुया.
येशूच्या श्रोत्यांचा आतिथ्यसत्काराविषयी कसा दृष्टिकोन होता हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण यामुळे आपल्याला येशूने दिलेला धडा आणखी स्पष्टपणे समजून घेण्यास मदत होईल. शास्त्रवचनांतील बऱ्याच अहवालांवरून हे दिसून येते की बायबल लिहिण्यात आले होते त्या काळात, घरी आलेल्या पाहुण्याची चांगल्याप्रकारे काळजी घेणे ही एक अतिशय महत्त्वाची परंपरा होती. विशेषतः देवाच्या सेवकांमध्ये, पाहुण्यांच्या आदरसत्काराला विशेष महत्त्व दिले जाई. (७. येशूच्या दृष्टान्तातला माणूस कशाचीही पर्वा न करता आपल्या मित्राला झोपेतून का उठवतो?
७ या दृष्टान्तातल्या माणसाच्या घरी मध्यरात्री एक पाहुणा येतो. तेव्हा साहजिकच त्या माणसाला आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचे आगतस्वागत करावेसे वाटते, पण ‘त्याला वाढावयास त्याच्याजवळ काही नसते.’ साहजिकच, तो काळजीत पडतो! कसेही करून, आलेल्या पाहुण्याच्या जेवणाची व्यवस्था त्याला करायची असते. त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. म्हणून तो आपल्या मित्राकडे जातो आणि कसलीही पर्वा न करता त्याला झोपेतून उठवतो. आपल्या मित्राला हाक मारीत तो म्हणतो, “मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे.” आणि त्या भाकरी मिळेपर्यंत तो पुन्हा पुन्हा विनवणी करत राहतो. शेवटी, भाकरी मिळाल्यावर त्याला हायसे होते, कारण आता तो आपल्या पाहुण्याचा व्यवस्थित आतिथ्यसत्कार करू शकतो.
जितकी जास्त गरज—तितकी जास्त विनवणी
८. पवित्र आत्म्याकरता सतत प्रार्थना करत राहण्याकरता कोणती गोष्ट आपल्याला प्रवृत्त करेल?
८ या दृष्टान्तावरून आपण सतत प्रार्थना का करावी याचे कोणते कारण आपल्याला सापडते? तो माणूस भाकरी मागत राहिला कारण आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा आतिथ्यसत्कार करण्यासाठी त्याच्या मते, त्या भाकरी मिळवणे अत्यावश्यक होते. (यशया ५८:५-७) भाकरींशिवाय तो आपल्या पाहुण्याचा चांगल्यारितीने पाहुणचार करू शकत नव्हता. त्याचप्रकारे, खरे ख्रिस्ती या नात्याने आपले सेवाकार्य पार पाडण्याकरता देवाचा आत्मा अत्यावश्यक आहे याची आपल्याला जाणीव असल्यामुळे आपण देवाला सतत प्रार्थना करत राहतो आणि पुन्हा पुन्हा त्याच्या आत्म्याकरता विनवणी करत राहतो. (जखऱ्या ४:६) त्याच्या आत्म्याच्या साहाय्याशिवाय आपण आपले सेवाकार्य व्यवस्थित पार पाडू शकणार नाही. (मत्तय २६:४१) या दृष्टान्तावरून आपण कोणता महत्त्वाचा निष्कर्ष काढू शकतो हे तुमच्या लक्षात आले का? देवाच्या आत्म्याची आपल्याला अत्यंत गरज आहे असा जर आपला दृष्टिकोन असेल, तर आपोआपच आपण सतत, पुन्हा पुन्हा, त्याच्याकरता विनंती करत राहू.
९, १०. (क) देवाला आपण त्याच्या आत्म्याकरता वारंवार प्रार्थना का केली पाहिजे हे उदाहरण देऊन सांगा. (ख) आपण स्वतःला कोणता प्रश्न विचारावा व का?
९ हाच दृष्टान्त सध्याच्या परिस्थितीतल्या एखाद्या दृश्यात बसवून पाहायचे झाल्यास, अशी कल्पना करा की तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याची मध्यरात्री तब्येत बिघडली. तुम्ही मदतीकरता एखाद्या डॉक्टरला झोपेतून उठवाल का? जर रुग्णाची साधीशीच तक्रार असेल तर तुम्ही असे करणार नाही. पण समजा त्याला हृदयविकाराचा झटका आला असेल तर निश्चितच तुम्ही डॉक्टरला बोलवायला संकोचणार नाही. का? कारण ही आणीबाणीची परिस्थिती आहे. डॉक्टरची मदत मिळणे अत्यावश्यक आहे हे तुम्हाला माहीत आहे. जर तुम्ही मदत मागितली नाही तर रुग्णाचा जीव जाऊ शकतो. त्याचप्रकारे, खरे ख्रिस्ती सध्याच्या काळात एकार्थाने सतत आणीबाणीच्या परिस्थितीत जगत आहेत. सैतान “गर्जणाऱ्या सिंहासारखा” आपल्याला गिळंकृत करण्याकरता फिरत आहे. (१ पेत्र ५:८) आध्यात्मिकरित्या जिवंत राहण्याकरता देवाच्या आत्म्याचे साहाय्य अत्यावश्यक आहे. देवाच्या मदतीची विनंती न केल्यास आपल्याला आध्यात्मिक मृत्यू येऊ शकतो. म्हणूनच आपण कोणताही संकोच न बाळगता देवाकडे त्याचा पवित्र आत्मा देण्याची सतत विनंती करतो. (इफिसकर ३:१४-१६) असे केल्यानेच केवळ आपल्याला ‘शेवटपर्यंत टिकून राहण्याचे’ सामर्थ्य मिळू शकेल.—मत्तय १०:२२; २४:१३.
१० तेव्हा आपण वेळोवेळी थोडे थांबून स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे: ‘मी खरोखरच, सातत्याने प्रार्थना करतो का?’ आपल्याला देवाच्या मदतीची गरज आहे याची पुरेपूर जाणीव असली तरच आपण पवित्र आत्म्याकरता सतत प्रार्थना करू.
आपण खात्रीपूर्वक प्रार्थना का करू शकतो?
११. बापाच्या व मुलाच्या उदाहरणाचा येशूने प्रार्थनेशी कशाप्रकारे संबंध लावला?
११ पुन्हा पुन्हा मित्राला विनवणी करणाऱ्या माणसाचा दृष्टान्त प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीच्या अर्थात यहोवाच्या उपासकाच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकतो. दुसरा दृष्टान्त मात्र प्रार्थना ऐकणाऱ्याच्या, अर्थात यहोवा देवाच्या भूमिकेवर प्रकाश टाकतो. येशूने विचारले: “तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो, आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल?” मग येशूने या शब्दांचा अर्थ स्पष्ट केला: “तुम्ही वाईट असताहि तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?”—लूक ११:११-१३.
१२. आपल्या मुलाची मागणी पूर्ण करणाऱ्या पित्याच्या उदाहरणावरून, यहोवा आपल्या प्रार्थना ऐकून आपल्याला मदत करण्यास उत्सुक आहे हे कशाप्रकारे दिसून येते?
१२ आपल्या मुलाची मागणी पूर्ण करणाऱ्या बापाचे उदाहरण देऊन येशूने हे स्पष्ट केले की प्रार्थना करण्याद्वारे यहोवाची मदत मागणाऱ्या व्यक्तीकडे यहोवा कशा दृष्टीने पाहतो. (लूक १०:२२) सर्वप्रथम, या दोन दृष्टान्तांतील फरक लक्षात घ्या. पहिल्या दृष्टान्तातला मित्र मदत करण्यास तितका उत्सुक नव्हता. पण यहोवा त्या मित्रासारखा नाही. उलट तो एखाद्या प्रेमळ पालकासारखा आहे जो आपल्या मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यास उत्सुक आहे. (स्तोत्र ५०:१५) यहोवा आपल्या प्रार्थना ऐकून आपल्याला मदत करण्यास किती उत्सुक आहे हे स्पष्ट करण्यासाठी येशू एका मानवी पित्याचे उदाहरण देऊन सुरुवात करतो. तो म्हणतो की जर, आदामापासून आलेल्या उपजत पापी मनुष्यस्वभावामुळे “वाईट” असणारा मानवी पितासुद्धा आपल्या मुलाला चांगल्या वस्तू देऊ शकतो, तर मग आपला स्वर्गीय पिता जो उदार मनाचा आहे, तो त्याच्या उपासकांना पवित्र आत्मा अवश्य देईल अशी आपण अपेक्षा करू शकत नाही का?—याकोब १:१७.
१३. यहोवाला प्रार्थना करताना आपण कशाची खात्री बाळगू शकतो?
१३ यात आपल्याकरता कोणता धडा आहे? आपण ही खात्री बाळगू शकतो की जेव्हा आपण आपल्या स्वर्गीय पित्याकडे पवित्र आत्मा देण्याची विनंती करतो तेव्हा तो आपली ही विनंती पूर्ण करण्यास केवळ तयारच नसतो तर उत्सुक असतो. (१ योहान ५:१४) आपण यहोवाला पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो तेव्हा तो आपल्याला कधीही असे म्हणणार नाही, की “मला त्रास देऊ नको; आता दार लावले आहे.” (लूक ११:७) उलट येशूने म्हटले: “मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हास सापडेल; ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल.” (लूक ११:९, १०) होय, जे यहोवाचा “धावा करितात, त्या सर्वांना [तो] जवळ आहे.”—स्तोत्र १४५:१८.
१४. (क) संकटांना तोंड देत असताना काही जणांना कोणते अयोग्य विचार सतावतात? (ख) परीक्षांना तोंड देताना आपण यहोवाला आत्मविश्वासाने प्रार्थना का करू शकतो?
१४ येशूने दिलेले प्रेमळ बापाचे उदाहरण आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधते, ते म्हणजे, यहोवाचे चांगुलपण हे कोणत्याही मानवी पालकाने दाखवलेल्या चांगुलपणापेक्षा कित्येक ईयोब ४:१, ७, ८; योहान ८:४४) आपण स्वतःला आपल्या संकटांकरता दोषी ठरवावे असे बायबल कोठेही सांगत नाही. यहोवा कधीही ‘वाईट गोष्टींनी’ आपली परीक्षा पाहात नाही. (याकोब १:१३) तो आपल्या हातात सापासारखी किंवा विंचवासारखी परीक्षा देत नाही. उलट, आपल्या स्वर्गीय पित्याजवळ ‘जे मागतात त्यांना तो चांगल्या देणग्या’ देतो. (मत्तय ७:११; लूक ११:१३) तेव्हा, यहोवाचा चांगुलपणा आणि आपल्याला मदत करण्याची त्याची उत्सुकता आपण जितक्या चांगल्याप्रकारे समजून घेऊ तितक्याच आत्मविश्वासाने त्याला प्रार्थना करण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल. आणि असे केल्यामुळे स्तोत्रकर्त्याच्या या शब्दांतून आपल्यालाही आपल्या भावना व्यक्त करता येतील: “देवाने ऐकलेच आहे. माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे.”—स्तोत्र १०:१७; ६६:१९.
पटीने जास्त आहे. तेव्हा, आपल्यावर संकटे आली याचा अर्थ देव आपल्याला कशाची तरी शिक्षा देत आहे असा आपण कधीही विचार करू नये. आपला सर्वात मोठा शत्रू सैतान आपल्याला असा विचार करायला लावतो. (पवित्र आत्मा कशाप्रकारे साहाय्य करतो
१५. (क) येशूने पवित्र आत्म्याविषयी कोणते आश्वासन दिले? (ख) पवित्र आत्मा आपल्याला कोणत्या एका मार्गाने साहाय्य करतो?
१५ येशूच्या मृत्यूच्या काही काळाआधी त्याने या दृष्टान्तांद्वारे दिलेले आश्वासन पुन्हा एकदा दिले. पवित्र आत्म्याच्या संदर्भात बोलताना त्याने आपल्या प्रेषितांना सांगितले: ‘मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी देईल, अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सदासर्वदा राहावे.’ (योहान १४:१६) येशूने आश्वासन दिले की कैवारी अर्थात पवित्र आत्मा त्याच्या अनुयायांसोबत येणाऱ्या काळात, म्हणजेच आपल्या काळात सुद्धा राहील. कोणत्या महत्त्वाच्या मार्गाने आपण पवित्र आत्म्याचे साहाय्य अनुभवू शकतो? पवित्र आत्मा आपल्याला निरनिराळ्या परीक्षांना तोंड देण्यास साहाय्य करतो. ते कसे? प्रेषित पौल, ज्याला स्वतःला अनेक परीक्षांना तोंड द्यावे लागले होते, त्याने करिंथकर बांधवांना लिहिलेल्या एका पत्रात, देवाच्या आत्म्याने कशाप्रकारे त्याला साहाय्य केले याचे वर्णन केले. त्याने लिहिलेला मजकूर आपण थोडक्यात विचारात घेऊया.
१६. आपली परिस्थिती कोणत्या अर्थाने पौलासारखी असू शकते?
१६ सर्वप्रथम पौलाने अगदी उघडपणे आपल्या सहविश्वासू बांधवांजवळ, आपल्या “शरीरात एक काटा” असल्याचे अर्थात, आपण एका परीक्षेला तोंड देत असल्याचे कबूल केले. मग त्याने म्हटले: “हा माझ्यापासून दूर व्हावा म्हणून मी प्रभूला तीनदा विनंती केली.” (२ करिंथकर १२:७, ८) पौलाने देवाला आपली ही समस्या दूर करण्याची विनंती केली तरीसुद्धा त्याची समस्या नाहीशी झाली नाही. कदाचित तुम्हीही सध्या अशाप्रकारच्या परिस्थितीत असाल. पौलाप्रमाणेच तुम्ही देखील वारंवार, खात्रीपूर्वक यहोवाला ही परीक्षा दूर करण्याची विनंती केली असेल. पण पुन्हा पुन्हा याचना करूनही तुमची समस्या कायम असेल. मग याचा अर्थ यहोवाने तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले नाही किंवा त्याचा आत्मा तुम्हाला साहाय्य करत नाही असा होतो का? मुळीच नाही! (स्तोत्र १०:१, १७) प्रेषित पौलाने पुढे काय म्हटले याकडे लक्ष द्या.
१७. यहोवाने पौलाच्या प्रार्थनांचे कशाप्रकारे उत्तर दिले?
१७ पौलाच्या प्रार्थनेचे उत्तर देताना देवाने त्याला असे सांगितले: “माझी कृपा तुला पुरे आहे. कारण अशक्तपणातच [माझी] शक्ति पूर्णतेस येते.” पौलाने म्हटले: “ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी [“ख्रिस्ताच्या सामर्थ्याने तंबूप्रमाणे माझ्यावर छाया करावी,” NW] म्हणून मी विशेषकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन.” (२ करिंथकर १२:९; स्तोत्र १४७:५) ख्रिस्ताद्वारे देवाचे सामर्थ्य तंबूप्रमाणे आपल्यावर छाया करत असल्याचे पौलाने अनुभवले. आजही यहोवा अशाचप्रकारे आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतो. तो आपल्या सेवकांवर त्याच्या संरक्षणाची छाया ठेवतो.
१८. आपण परीक्षांना कशामुळे तोंड देऊ शकतो?
१८ अर्थात, तंबू पावसाला किंवा वाऱ्याला थांबवू शकत नाही, पण वाऱ्यावादळापासून तो काही प्रमाणात संरक्षण पुरवतो. त्याचप्रकारे “ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया” आपल्यावर आहे याचा अर्थ आपल्यावर कोणत्याही परीक्षा येणार नाहीत, किंवा आणल्या जाणार नाहीत असा नाही. पण या जगाच्या दुष्ट प्रभावांपासून व या जगाचा अधिपती सैतान याच्या हल्ल्यांपासून निश्चितच आपल्याला संरक्षण मिळते. (प्रकटीकरण ७:९, १५, १६) त्याअर्थी, जरी तुम्ही एखाद्या परीक्षेला तोंड देत असाल व जरी ती तुमच्यापासून ‘दूर’ झाली नसेल तरी तुम्ही ही खात्री बाळगू शकता की यहोवाला तुमच्या कठीण परिस्थितीची जाणीव आहे आणि त्याने तुमच्या ‘धाव्याच्या शब्दाला’ प्रतिसाद दिला आहे. (यशया ३०:१९; २ करिंथकर १:३, ४) पौलाने लिहिले: “देव विश्वसनीय आहे तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.”—१ करिंथकर १०:१३; फिलिप्पैकर ४:६, ७.
१९. तुमचा निर्धार काय आहे व का?
१९ सध्याच्या अभक्त जगाच्या ‘शेवटल्या काळी, दिवस कठीण’ आहेत हे खरे आहे. (२ तीमथ्य ३:१) तरीसुद्धा, देवाच्या सेवकांकरता या काळाला तोंड देणे अशक्य आहे अशातला भाग नाही. का नाही? कारण देवाच्या पवित्र आत्म्याचे साहाय्य आणि संरक्षण आपल्या पाठीशी आहे. आणि जे सातत्याने व आत्मविश्वासाने यहोवाजवळ विनंती करतात त्यांना तो विपुल प्रमाणात आपला पवित्र आत्मा देतो. तेव्हा, आपण दररोज पवित्र आत्म्याकरता प्रार्थना करत राहण्याचा निर्धार केला पाहिजे.—स्तोत्र ३४:६; १ योहान ५:१४, १५. (w०६ १२/१५)
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• देवाचा पवित्र आत्मा मिळवण्याकरता आपण काय करण्याची गरज आहे?
• पवित्र आत्म्याकरता केलेल्या आपल्या प्रार्थनांना यहोवा उत्तर देईल याची आपण खात्री का बाळगू शकतो?
• पवित्र आत्मा आपल्याला परीक्षांना तोंड देण्यास कशाप्रकारे साहाय्य करतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१३ पानांवरील चित्र]
पुन्हा पुन्हा भाकरी मागणाऱ्या माणसाबद्दलच्या येशूने दिलेल्या दृष्टान्तावरून आपण काय शिकतो?
[१४ पानांवरील चित्र]
तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याकरता सातत्याने प्रार्थना करता का?
[१५ पानांवरील चित्र]
प्रेमळ बापाच्या उदाहरणावरून आपण यहोवाबद्दल काय शिकतो?