तुम्ही यशस्वी कसे होऊ शकता?
तुम्ही यशस्वी कसे होऊ शकता?
पालक जशी आपल्या मुलांची काळजी घेतात व त्यांनी यशस्वी व्हावे अशी मनोकामना करतात तसेच आपला स्वर्गीय पिता आपली काळजी घेतो आणि आपण यशस्वी व्हावे असे त्याला वाटते. आपल्याबद्दल आपुलकी असल्यामुळे त्याने, यश-अपयश याविषयी आपल्याला बरेच काही सांगितले आहे. खरे पाहता, देवाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन त्यानुसार जो वागतो त्या मनुष्याविषयी बायबल अगदी खात्रीने असे म्हणते, की “जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.”—स्तोत्र १:३.
पण मग जर असे आहे तर, पुष्कळ लोकांना यशस्वी, आनंदी व समाधानी जीवन का मिळवता येत नाही? या स्तोत्राचे जवळून परीक्षण केल्याने आपल्याला उत्तर मिळू शकेल व आपणही यशस्वी कसे होऊ शकतो हे समजेल.
‘दुर्जनांची मसलत’
‘दुर्जनांच्या मसलतीने’ चालण्यात कोणता धोका आहे हे स्तोत्रकर्ता सांगतो. (स्तोत्र १:१) दुर्जनांचा अथवा ‘वाईट’ लोकांचा म्होरक्या दियाबल सैतान आहे. (मत्तय ६:१३) तो ‘ह्या जगाचा अधिपती’ आहे आणि “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे,” असे शास्त्रवचने आपल्याला सांगतात. (योहान १६:११; १ योहान ५:१९) त्यामुळे साहजिकच जगात मिळणाऱ्या बहुतेक सल्ल्यावर, त्या दुष्टाच्या विचारसरणीचा प्रभाव झाल्याचे दिसून येते.
दुर्जन कोणत्या प्रकारचा सल्ला देतात? सहसा, दुर्जन ‘देवाला तुच्छ मानतात.’ (स्तोत्र १०:१३) देवाला तुच्छ मानणाऱ्या किंवा त्याचा अनादर करणाऱ्या सल्ल्याला या जगात ऊत आला आहे. आधुनिक समाज “देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी” यांना बढावा देतो. (१ योहान २:१६) प्रसारमाध्यमे आपल्याला जीवनाचा पुरेपूर उपभोग घेण्याची प्रेरणा देतात. आपली उत्पादने विकत घेण्यास लोकांची मने वळवण्याकरता संपूर्ण जगभरातील जाहिरात कंपन्या दरवर्षी ५०० पेक्षा अधिक कोटी डॉलर (यु.एस.) जाहिरातींवर खर्च करतात. मग या वस्तुंची गिऱ्हाईकांना गरज असो अथवा नसो. या जाहिरातींनी लोकांच्या फक्त विकत घेण्याच्या सवयी बदललेल्या नाहीत तर यशस्वी होण्याचा जगाचा दृष्टिकोनच विकृत बनवला आहे.
यामुळे पुष्कळ लोकांकडे, ते खूप वर्षांपूर्वी ज्याचे फक्त स्वप्न पाहू शकत होते अशा वस्तू आल्यानंतरही त्यांच्या मनात भौतिक गोष्टी मिळवण्याची कधीही न संपणारी हाव आहे. जोपर्यंत तुमच्याजवळ या वस्तू नाहीत तोपर्यंत तुम्ही आनंद किंवा समाधानी होऊ शकत नाही, अशी लोकांची विचारसरणी झाली आहे. ही विचारसरणी खोटी आहे व ती ‘पित्यापासून नाही तर जगापासून आहे.’—१ योहान २:१६.
कोणत्या गोष्टीने आपण खरोखर यशस्वी होऊ शकतो, हे आपल्या निर्माणकर्त्याला ठाऊक आहे. त्याचा सल्ला आणि रोमकर १२:२, ईझी टू रीड व्हर्शन.
‘दुर्जनांची मसलत’ यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. यास्तव, जगाच्या दृष्टीत जो यशाचा मार्ग आहे त्यावर चालत चालत देवाच्या आशीर्वादाची अपेक्षा करणे हे एकाच वेळी दोन भिन्न भिन्न मार्गांवर चालण्यासारखे आहे. हे कदापि शक्य नाही. म्हणूनच तर बायबल अशी ताकीद देते: “या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका.”—जगाला तुमच्यावर प्रभाव पाडू देऊ नका
सैतानाच्या प्रभावाखाली असलेले हे जग, त्याला आपल्या कल्याणाची काळजी आहे असे भासवण्याचा प्रयत्न करते. परंतु आपण याबाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. सैतानाने त्याचे स्वतःचे हित साधण्याकरता पहिली स्त्री हव्वा हिला फसवले, हे आठवा. मग त्याने आदामाला पापाच्या मार्गावर येण्याची गळ घालण्यासाठी तिचा उपयोग केला. आज सैतान आपली दुष्ट विचारसरणी पसरवण्याकरता मानवांचा देखील उपयोग करतो.
उदाहरणार्थ, मागच्या लेखात उल्लेखण्यात आलेल्या डेव्डीडकडून त्याच्या कंपनीने, त्याने ओव्हरटाईम करावा आणि कामाच्या निमित्ताने सतत बाहेरगावी जावे, अशी मागणी केली. तो म्हणतो: “मी सोमवारी पहाटे निघायचो आणि गुरुवारी संध्याकाळीच घरी यायचो.” जगात यश प्राप्त करायचे असेल तर असे त्याग केलेच पाहिजेत हे समजणाऱ्या डेव्डीडच्या प्रामाणिक मित्रांनी, कुटुंबातील सदस्यांनी व सहकर्मचाऱ्यांनी त्याला असे प्रोत्साहन दिले: “तुला हे सर्व आपल्या कुटुंबासाठी केलेच पाहिजे.” ही फक्त काही वर्षांची गोष्ट आहे; जोपर्यंत तुझा जम बसत नाही तोपर्यंतच तुला असे करावे लागेल, अशी सर्वांनी त्याची समजूत काढली. डेव्हीड म्हणतो: “त्यांनी अशी कारणमीमांसा केली, की हे माझ्याच कुटुंबाच्या फायद्यासाठी होते. मी घरी बक्कळ पैसा आणू शकेन, मी यशस्वी होऊ शकेन. मी माझ्या कुटुंबाबरोबर राहत नव्हतो तरीपण माझ्या मित्रांनी माझी अशी समजूत घातली, की मी खरं तर माझ्या कुटुंबाला जास्त पैसे पुरवत होतो.” डेव्हीडप्रमाणे पुष्कळ लोक, आपल्या प्रिय जनांना ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत असे त्यांना वाटते त्या सर्व देण्याकरता रक्ताचे पाणी करतात. परंतु हा सल्ला अनुसरल्याने यश मिळते का? कुटुंबातल्या सदस्यांना नेमके काय हवे असते?
आपल्या कुटुंबाला खरोखरच कशाची गरज आहे, हे डेव्डीडला, असेच एकदा तो कामाच्या निमित्ताने बाहेर गेला होता तेव्हा समजले. तो म्हणतो: “मी माझ्या मुलीबरोबर, ॲन्जलिकाबरोबर फोनवर बोलत होतो तेव्हा ती मला म्हणाली: ‘पप्पा, तुम्हाला आमच्याबरोबर घरी का राहावसं वाटत नाही?’ तिच्या या शब्दांनी मी अस्वस्थ झालो.” डेव्डीच्या मुलीने काढलेल्या उद्गारांमुळे, राजीनामा देण्याची त्याची इच्छा आणखी प्रबळ झाली. त्याच्या कुटुंबाला त्याची गरज होती; आणि ही गरज पूर्ण करण्याचे त्याने ठरवले.
देवाच्या सल्ल्याचे पालन केल्याने यश मिळते
या जगात ज्या नकारात्मक माहितीचा भडिमार केला जातो तिचा तुम्ही प्रतिकार कसा करू शकता? स्तोत्रकर्ता आपल्याला सांगतो, की जो मनुष्य “परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो,” तो यशस्वी व आनंदी असतो.—स्तोत्र १:२.
देवाने जेव्हा यहोशवाला इस्राएल राष्ट्राचा नेता म्हणून निवडले तेव्हा त्याला असे सांगण्यात आले: ‘[देवाच्या वचनाचे] तू रात्रंदिवस मनन कर.’ होय, देवाचे वचन वाचून त्यावर मनन करणे आवश्यक होते. पण यहोशवाने ‘त्यात जे काही लिहिले होते त्याचे काळजीपूर्वक पालनही’ करणे आवश्यक होते. बायबलचे वाचन केल्याने तुम्ही आपोआप यशस्वी होणार नाही. तर तुम्ही जे काही वाचता यहोशवा १:८.
त्याचे तुम्हाला पालन करावे लागेल. यहोशवाला सांगण्यात आले होते: “म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ति घडेल.”—कल्पना करा: एक मूल आपल्या पालकाच्या मांडीवर बसले आहे आणि दोघेही एक आवडती गोष्ट वाचत आहेत. मूल अतिशय आनंदी आहे. त्यांनी ती गोष्ट पूर्वी कितीही वेळा वाचली असली तरीसुद्धा एकमेकांच्या सहवासातील हे क्षण त्यांना अमोल वाटतात. तसेच, देवावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला बायबलचे दररोज वाचन करणे आनंदविणारा अनुभव वाटतो—आपल्या स्वर्गीय पित्याच्या सहवासात घालवलेले ते क्षण त्याला हवेहवेसे वाटतात. यहोवाच्या सल्ल्याचे व मार्गदर्शनाचे पालन करण्याद्वारे अशी व्यक्ती ‘पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखी होते; आणि जे काही ती हाती घेते ते सिद्धीस जाते.’—स्तोत्र १:३.
स्तोत्रकर्त्याने वर्णन केलेले झाड आपोआप उगत नाही. तर शेतकरी ते मुद्दामहून पाण्याच्या प्रवाहाजवळ लावतो आणि त्याची काळजी घेतो. त्याचप्रकारे आपला स्वर्गीय पिता शास्त्रवचनांतील सल्ल्याद्वारे आपल्या विचारसरणीत बदल व सुधार करतो. यामुळे आपण बहरु लागतो आणि देवाच्या मार्गदर्शनाच्या अनुषंगात असलेले गुण उत्पन्न करतो.
परंतु “दुर्जन तसे नाहीत.” ते काही काळासाठी टवटवीत दिसतील पण शेवटी त्यांचा नाशच होणार आहे. “न्यायसमयी [ते] टिकावयाचे नाहीत.” तर “दुर्जनांचा मार्ग नष्ट” होणार आहे.—स्तोत्र १:४-६.
यास्तव जगाला तुमच्या ध्येयांवर आणि तुमच्या मूल्यांवर प्रभाव पाडू देऊ नका. तुम्ही गुणसंपन्न असाल आणि जगात यशस्वी होण्याची तुमची कुवत असली तरी, तुम्ही तुमच्या कौशल्यांचा कसा उपयोग करत आहात किंवा जगाला तुमच्या कौशल्यांचा कसा उपयोग करू देत आहात याबाबतीत खबरदारी बाळगा. निरर्थक, भौतिक ध्येयांमुळे एक व्यक्ती ‘कोमेजून’ जाऊन शकते. दुसरीकडे पाहता, देवाबरोबर चांगला नातेसंबंध जोडल्यास खरे यश आणि खरा आनंद मिळतो.
तुम्ही यशस्वी कसे होऊ शकता?
एक व्यक्ती जेव्हा देवाच्या सल्ल्याचे पालन करते तेव्हा जे काही ती हाती घेते ते सिद्धीस जाते, असे का? स्तोत्रकर्ता येथे, या जगात यशस्वी होण्याविषयी बोलत नव्हता. एका धार्मिक व्यक्तीच्या यशाची तुलना तो देवाची इच्छा पूर्ण करतो याजशी करण्यात आली आहे; आणि देवाची इच्छा नेहमी सिद्धीस जाते. बायबल तत्त्वांचा अवलंब केल्यामुळे तुम्ही यशस्वी कसे होता ते आपण पाहू या.
कुटुंब: शास्त्रवचनांत पतींना “आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी,” आणि ख्रिस्ती पत्नींनी “आपल्या पतीची भीड राखावी” असा सल्ला देण्यात आला आहे. (इफिसकर ५:२८, ३३) पालकांना आपल्या मुलांबरोबर वेळ घालवण्याचे, त्यांच्याबरोबर हसण्या-खेळण्याचे, जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टी त्यांना शिकवण्याचे उत्तेजन देण्यात आले आहे. (अनुवाद ६:६, ७; उपदेशक ३:४) देवाचे वचन पालकांना असाही सल्ला देते: “आपल्या मुलांना चिरडीस आणू नका.” पालक जेव्हा या सल्ल्याचा अवलंब करतात तेव्हा मुलांनाही “आपल्या आईबापांच्या आज्ञेत” व ‘आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राखायला’ आवडते. (इफिसकर ६:१-४) देवाकडून आलेल्या या सल्ल्याचे पालन केल्याने कौटुंबिक जीवन सुखी व यशस्वी होते.
मित्र: पुष्कळ लोकांना मित्र हवे असतात. आपल्या सर्वांमध्ये प्रेम करण्याची व प्रेम मिळवण्याची मानसिक व भावनिक क्षमता आहे. येशूने आपल्या अनुयायांना “एकमेकांवर प्रीति” करा, असे सांगितले. (योहान १३:३४, ३५) या अनुयायांमध्ये आपल्याला असे मित्र सापडतील की ज्यांच्यावर आपण प्रेम करू शकतो, भरवसा ठेवू शकतो; इतका की आपण त्यांना आपल्या मनाच्या अंतरंगातील विचार व भावना देखील सांगू शकतो. (नीतिसूत्रे १८:२४) याहूनही महत्त्वाचे म्हणजे, बायबलच्या तत्त्वांचे पालन केल्यामुळे आपण “देवाजवळ” येऊ शकतो; एवढेच नव्हे तर अब्राहामाप्रमाणे त्याचे “मित्र” देखील बनू शकतो!—याकोब २:२३; ४:८.
जीवनातील उद्देश: केवळ आलेल्या दिवसापुरते अर्थहीन जीवन जगण्यापेक्षा जे खरोखर यशस्वी आहेत त्यांना जीवनात अर्थ व उद्देश मिळतो. त्यांचे जीवन या व्यवस्थीकरणाच्या अस्थिर परिस्थितीवर अवलंबून नाही. जीवनात त्यांनी मांडलेल्या ध्येयांमुळे त्यांना खरे व दीर्घकालीन समाधान मिळते कारण ही ध्येये जीवनाच्या खऱ्या उद्देशावर केंद्रित असतात. एका व्यक्तीला जीवनात खरा उद्देश केव्हा मिळतो? “देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उपदेशक १२:१३.
आशा: देवाला आपला मित्र बनवल्याने आपल्या भवितव्यासाठी आशा देखील मिळते. प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना असे आर्जवले: ‘चंचल धनावर आशा ठेवू नका, तर जो जिवंत देव त्याच्यावर आशा ठेवावी.’ याद्वारे ते “खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा” करू शकतील. (१ तीमथ्य ६:१७-१९) देवाचे स्वर्गीय राज्य लवकरच या पृथ्वीवर नंदनवनाची स्थापना करेल तेव्हा हे खरे जीवन वास्तवात उतरेल.
तुम्ही जर बायबल तत्त्वांचा अवलंब केला तर तुम्ही सर्व समस्यांतून मुक्त व्हाल असे नाही. तर दुष्ट लोक स्वतःवर ओढवून घेत असलेले पुष्कळ दुःख आणि शोक तुम्ही टाळू शकाल. आधी उल्लेख केलेला डेव्हीड आणि त्याच्यासारखे कोट्यवधी लोक बायबल तत्त्वांचा आपल्या जीवनात अवलंब करणे किती महत्त्वाचे आहे हे शिकले आहेत. अनुरुप अशी कामाची वेळ असलेली नोकरी मिळाल्यावर डेव्हीड म्हणाला: “माझ्या पत्नीबरोबर व मुलाबाळांबरोबर माझा संबंध चांगला राहिला आणि मंडळीत वडील या नात्याने मला यहोवाची सेवा करण्याचा विशेषाधिकार मिळाला म्हणून मी आभारी आहे.” देवाच्या सल्ल्याकडे लक्ष देणाऱ्या व्यक्तीबद्दल स्तोत्रकर्त्याने जे म्हटले ते किती खरे आहे, याची प्रचिती होते: “जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते!” (w०७ १/१)
[६ पानांवरील तक्ता]
यश मिळवण्याची पाच पावले
१ जगाच्या नीतिमूल्यांचा तुमच्यावर प्रभाव पडू देऊ नका.
२ देवाच्या वचनाचे दररोज वाचन व मनन करा.
३ बायबलमधील सल्ल्याचा आपल्या जीवनात अवलंब करा.
४ देवाला आपला मित्र बनवा.
५ खऱ्या देवाचे भय धरा आणि त्याच्या आज्ञा पाळा.
[७ पानांवरील चित्रे]
यश मिळवण्याच्या कानमंत्राचे तुम्ही पालन करीत आहात का?