व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यश तुमच्या मते याची व्याख्या काय?

यश तुमच्या मते याची व्याख्या काय?

यश तुमच्या मते याची व्याख्या काय?

जेसी लिव्हरमोर. काहींच्या मते, वॉल स्ट्रीट शेअर बाजारातील सर्वात यशस्वी आसामी. व्यापार क्षेत्रात सुज्ञ निर्णय घेणारा म्हणून त्याची ख्याती होती. त्यामुळे त्याने बक्कळ पैसा मिळवला होता. तो सर्वात उत्कृष्ट प्रतीचे सूट घालायचा, २९ खोल्यांच्या हवेलीत राहायचा आणि शोफर असलेल्या काळ्या रंगाच्या रोल्स-रॉईस नावाच्या ऐषआरामी गाडीत रुबाबात फिरायचा.

डेव्हीडलाही * यशस्वी होण्याचा ध्यास लागला होता. तो एका मोठ्या ग्रॅफिक्स कंपनीचा उपाध्यक्ष व प्रमुख व्यवस्थापक होता आणि लवकरच त्याला कंपनीचा विभागीय अध्यक्ष होण्याची संधी होती. समृद्धी व प्रतिष्ठा त्याला खुणावत होती. पण डेव्हीडने घेतलेल्या एका निर्णयामुळे त्याला कंपनीत राजीनामा द्यावा लागला. “मला माहीत आहे मी पुन्हा, अमाप पैसा मिळवून देणाऱ्‍या करिअरमध्ये प्रवेश करू शकणार नाही,” असे डेव्हीड म्हणतो. डेव्हीडने चूक केली, असे तुम्हाला वाटते का?

धनसंपत्ती, प्रसिद्धी किंवा प्रतिष्ठा मिळवण्यातच यश दडलेले आहे, असे पुष्कळ लोकांना वाटते. पंरतु अमाप भौतिक संपत्ती असूनही पुष्कळ लोकांना रिक्‍तपणा व जीवनात कसलाही अर्थ व उद्देश नसल्यासारखे वाटू शकते. श्री. लिव्हरमोर यांच्याबाबतीत असे झाले. त्यांच्याकडे भरपूर संपत्ती होती तरीपण त्यांचे जीवन निराशा, संकट आणि दुःख यांनीच भरले होते. त्यांना नैराश्‍याचा आजार होता. त्यांचे अनेक विवाह मोडले; त्यांच्या मुलांबरोबर त्यांचे नावापुरते संबंध होते. सरतेशेवटी, आपला भरपूर पैसा गेल्यावर एकेदिवशी श्री. लिव्हरमोर एका महागड्या हॉटेलमधील बारमध्ये दारू पीत त्यांना झालेल्या हानीचा विलाप करीत बसले होते. त्यांनी दारूची ऑर्डर दिली आणि आपल्या खिश्‍यातून चामड्याचे कव्हर असलेली एक छोटीशी वही काढून आपल्या पत्नीला निरोपसंदेश लिहिला. दारू पिऊन झाल्यावर ते, अंधुकसा प्रकाश असलेल्या क्लोकरूममध्ये गेले आणि स्वतःला गोळ्या घालून त्यांनी आपले जीवन संपवले.

आत्महत्येची कारणे जटील असली तरी, हा अनुभव बायबलमधील वाक्य किती सत्य आहे याचा पुरावा देतो: “जे धनवान होऊ पाहतात . . . त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.”—१ तीमथ्य ६:९, १०.

धनसंपत्ती, पद किंवा प्रतिष्ठा यानुसार यश मोजणारे लोक, चुकीचे माप वापरत असावेत का? तुम्ही स्वतःला यशस्वी समजता का? का समजता? कशाच्या आधारावर तुम्ही हे ठरवता? यशाविषयीच्या तुमच्या दृष्टिकोनावर कशाचा प्रभाव आहे? पुढील लेखात सर्व काळांना लागू होणाऱ्‍या सल्ल्याचे परीक्षण करण्यात आले आहे ज्याचा अवलंब केल्यामुळे कोट्यवधी लोकांना यशस्वी होण्यास मदत झाली आहे. तुम्ही यशस्वी कसे होऊ शकाल, ते आपण पाहूया. (w०७ १/१)

[तळटीप]

^ परि. 3 नाव बदलण्यात आले आहे.