व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वादळासमान कठीण समस्येतून तुम्ही बचावू शकता

वादळासमान कठीण समस्येतून तुम्ही बचावू शकता

वादळासमान कठीण समस्येतून तुम्ही बचावू शकता

या कठीण काळात अनेकजण वादळासमान समस्यांना तोंड देत आहेत. परंतु ख्रिश्‍चनांना, देवाविषयीचे प्रेम आणि त्याच्या सिद्धांताविषयीची एकनिष्ठा, समस्यांना हाताळण्यासाठी मदत करतात. कशाप्रकारे? याचे उत्तर येशूने दिलेल्या एका दाखल्यातून मिळते. त्याने त्याच्या आज्ञाधारक शिष्यांची तुलना अशा एका ‘सुज्ञ मनुष्यासोबत केली, ज्याने आपले घर खडकावर बांधले.’ येशूने म्हटले: “मग पाऊस पडला, पूर आला, वाराहि सुटला, व त्या घरास लागला; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता.”—मत्तय ७:२४, २५.

या दाखल्यातील मनुष्य सुज्ञ असला तरीही, त्याला मुसळधार पाऊस, पूर, आणि विध्वंसक वारा या गोष्टींनी चित्रित केलेल्या संकटांना तोंड द्यावे लागले याकडे लक्ष द्या. याद्वारे येशूने असे दर्शवले नाही की त्याच्या शिष्यांची कठीण परिस्थितीतून सुटका होईल आणि ते अखंड व उदंड शांती उपभोगतील. (स्तोत्र ३४:१९; याकोब ४:१३-१५) परंतु, त्याने असे सांगितले की त्याचे विश्‍वासू सेवक अशा वादळासमान संकटांना आणि कठीण परिस्थितीला तोंड देण्याची तयारी करू शकतात व ते या संकटांना तोंडही देऊ शकतील.

येशूने या दाखल्याची सुरुवात असे म्हणून केली: “ह्‍यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर खडकावर बांधले.” अर्थातच, येशू इथे शब्दशः घर कसे बांधावे याविषयी सांगत नव्हता तर, ख्रिस्ती व्यक्‍तिमत्त्व उभारण्याविषयी सांगत होता. जे येशूच्या या शब्दाकडे लक्ष देतात ते आपल्या विवेकबुद्धीचा उपयोग करतात आणि योग्य निर्णय घेतात. त्यांना जे काही शिकवण्यात आले ते जीवनात लागू करण्याद्वारे त्यांनी आपली प्रेरणा आणि कार्ये येशूच्या शिकवणूकींवर मजबूत उभे केले. विशेषतः हा लाक्षणिक खडक पृष्ठभागावर सापडत नाही. दाखल्यातील मनुष्याला खूप परिश्रम करून खडक लागेपर्यंत “खोल” खणण्याची गरज होती. (लूक ६:४८) त्याचप्रकारे, येशूचे शिष्य सहनशीलता विकसित करण्यासाठी खूप परिश्रम घेतात आणि त्यामुळे ते देवाच्या जवळ जाऊ शकतात.—मत्तय ५:५-७; ६:३३.

येशूच्या शिष्यांनी घातलेल्या ख्रिस्ती पायाची मजबुती जेव्हा वादळासमान कठीण परीक्षा पारखतात तेव्हा काय? येशूच्या शिकवणुकीला त्यांची ऐच्छिक आज्ञाधारकता आणि ख्रिस्ती गुण हे अशा कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी शक्‍ती मिळवण्याचा त्यांच्यासाठी स्रोत ठरतात; शेवटी हेच गुण येणाऱ्‍या हर्मगिदोनाच्या वादळासमान संकटातही मदतदायक ठरतील. (मत्तय ५:१०-१२; प्रकटीकरण १६:१५,१६) होय, येशूच्या शिकवणुकींचे पालन केल्याने अनेकजण वादळासमान संकटांना यशस्वीपणे तोंड देत आहेत. तुम्हीही असेच करू शकता.—१ पेत्र २:२१-२३. (w०७ १/१)