जीवनात उद्देश असलेली शतायुषी
जीवनात उद्देश असलेली शतायुषी
एलिन. वय १०५. स्वीडनमध्ये अलिकडेच, १०५ किंवा त्याहूनही अधिक वयोमान असलेल्या किती व्यक्ती आहेत त्याची यादी करत असताना ६० लोक दिसून आले की जे या वर्गवारीत मोडतात. त्यांपैकी एक आहेत एलिन. त्या एका वृद्धाश्रमात राहतात. तरीपण, त्या यहोवाच्या सक्रिय साक्षीदारांपैकी एक आहेत. गेल्या ६० पेक्षा अधिक वर्षांआधी त्यांनी साक्षीदार होण्याचा निर्णय घेतला होता.
प्रेषित पौल ज्याप्रमाणे नजरकैदेत असतानाही, त्याला भेटायला येणाऱ्या सर्वांना प्रचार करीत होता त्याप्रमाणे भगिनी एलिन वृद्धाश्रमात राहून इतरांना प्रचार करतात. (प्रेषितांची कृत्ये २८:१६, ३०, ३१) साफसफाई करायला येणाऱ्यांबरोबर, दंतवैद्यांबरोबर, डॉक्टरांबरोबर, न्हाव्यांबरोबर, परिचारिकांबरोबर आणि वृद्धाश्रमात जे जे त्यांना भेटतात त्या सर्वांना भगिनी एलिन बायबलमधील सुवार्ता सांगतात. अधूनमधून एलिनच्या मंडळीतील बंधूभगिनी आपल्या बायबल विद्यार्थ्यांना त्यांना भेट देण्याचे उत्तेजन देतात जेणेकरून त्यांनाही एलिन यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा होऊ शकेल.
भगिनी एलिनच्या मंडळीतील सदस्य त्यांच्या सदा आनंदी व उत्सुक व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्याकडे आकृष्ट होतात. त्यांच्याविषयी एका बांधवाने असे म्हटले: “मंडळीत काय काय चाललं आहे, याचं त्यांना अजूनही भान आहे, ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांना मंडळीतल्या सर्व मुलांची नावं आणि मंडळीत कोणी नवीन आलं असेल तर त्यांचंही नाव आठवतं.” भगिनी एलिन, मोठ्या मनाची, विनोदबुद्धी असलेली व जीवनात नेहमी सकारात्मक असलेली म्हणून नावाजली जाते.
कोणती गोष्ट भगिनी एलिन यांना आपला आनंद टिकवून ठेवण्यास व जीवनातील उद्देशावर आपले लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत करत आहे? त्या दररोज, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे या पुस्तिकेतून एक शास्त्रवचन वाचतात. एका जाड भिंगाच्या साहाय्याने त्या दररोज बायबलचा एक भागही वाचून काढतात. भगिनी एलिन यहोवाच्या साक्षीदारांच्या दर आठवड्याला होणाऱ्या सभांना हजर राहू शकत नसल्या तरी, त्यांची तयारी मात्र त्या करतात आणि या सभांचा कार्यक्रम टेप करून आणला जातो तेव्हा त्या तो लक्ष देऊन ऐकतात. नित्यनियमाने बायबलचे व बायबल आधारित प्रकाशनांचे वाचन केल्याने व ख्रिस्ती सभांना न चुकता हजर राहिल्याने, आपले कितीही वय असले तरी आपण समाधानी व उद्देशपूर्ण जीवन जगू शकतो.—स्तोत्र १:२; इब्री लोकांस १०:२४, २५. (w०७ १/१५)