यहोवा कृतज्ञ देव आहे
यहोवा कृतज्ञ देव आहे
“तुमचे कार्य . . . आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—इब्री लोकांस ६:१०.
१. यहोवाला मवाबी रुथच्या गुणांची पारख होती, हे त्याने कसे दाखवून दिले?
जे यहोवाची इच्छा प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात त्यांची तो मनापासून कदर करतो आणि त्यांना प्रतिफळही देतो. (इब्री लोकांस ११:६) देवाचा विश्वासू सेवक बवाज याला परमेश्वराच्या व्यक्तिमत्त्वाचा हा सुरेख पैलू माहीत होता. म्हणूनच, आपल्या विधवा सासूची प्रेमळ काळजी घेणाऱ्या मवाबी रुथला तो असे म्हणाला: “परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. . . . परमेश्वर याच्या पंखांखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देवो.” (रूथ २:१२) देवाने रुथला आशीर्वादित केले का? होय! तिची जीवनकथा बायबलमध्ये लिहिण्यात आली आहे! शिवाय, तिने बवाजाशी विवाह केला आणि राजा दावीद व येशू ख्रिस्त यांची पूर्वज बनली. (रूथ ४:१३, १७; मत्तय १:५, ६, १६) हे बायबलमधील अनेक उदाहरणापैकी केवळ एक उदाहरण आहे ज्यावरून आपल्याला समजते, की यहोवा आपल्या सेवकांच्या चांगल्या कार्यांची कदर करतो.
२, ३. (क) यहोवा दाखवत असलेली कदर कोणत्या कारणामुळे उल्लेखनीय बनते? (ख) यहोवा मनापासून कदर का व्यक्त करू शकतो? उदाहरण देऊन सांगा.
२ यहोवाच्या मते, त्याने जर त्याच्या सेवकांची कदर केली नाही तर तो अन्याय ठरेल. इब्री लोकांस ६:१० मध्ये म्हटले आहे: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” हे विधान एका गोष्टीमुळे उल्लेखनीय बनते. भक्तिमान लोकांची देव कदर करतो; मग ते पापी व त्याच्या गौरवाला उणे पडत असले तरीसुद्धा त्याला त्यांच्या गुणांची पारख आहे.—रोमकर ३:२३.
३ अपरिपूर्णतेमुळे कदाचित आपण असा विचार करू, की आपण करत असलेली भक्तिमान कार्ये इतकी काही महत्त्वाची नाहीत आणि देवाचा आशीर्वाद मिळण्याच्या योग्यतेची नाहीत. परंतु यहोवाला आपले हेतू व आपली परिस्थिती पूर्णपणे कळते व पूर्ण जिवाने आपण करत असलेल्या सेवेची तो कदर करतो. (मत्तय २२:३७) हे समजण्यासाठी या उदाहरणाचा विचार करा: एका आईला टेबलावर तिच्यासाठी एक भेटवस्तू दिसते. तो एक खूप हलक्या प्रतीचा हार आहे. ती तो हार हातात घेऊन त्याची काही किंमत न करता बाजूला फेकून देऊ शकते. पण, या हाराच्या शेजारीच ठेवलेले एक कार्ड वाचल्यावर तिला समजते, की हा हार तिला तिच्या चिमुकलीने दिला आहे. तिने जितके पैसे साठवून ठेवले होते ते सर्व पैसे खर्च करून तिने तो विकत आणला आहे. आता आई त्या हाराकडे वेगळ्या दृष्टीने पाहते. कदाचित तिच्या डोळ्यांत पाणी येते आणि ती आपल्या मुलीला जवळ घेऊन मनापासून कदर व्यक्त करते.
४, ५. कदर दाखवण्याच्या बाबतीत येशूने यहोवाचे अनुकरण कसे केले?
४ आपले हेतू आणि आपल्या मर्यादा यांची यहोवाला पूर्ण जाणीव असल्यामुळे, आपण जेव्हा आपल्या परीने होईल तितका प्रयत्न करतो, लूक २१:१-४.
मग तो कमी असो अथवा जास्त, यहोवा आपल्या प्रयत्नांची कदर करतो. येशूने याबाबतीत आपल्या पित्याचे हुबेहूब अनुकरण केले. बायबलमधील विधवेच्या दमडीच्या अहवालाची आठवण करा. येशूने “दृष्टि वर करुन धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारांत टाकतांना पाहिले. त्याने एका दरिद्री विधवेलाहि तेथे दोन टोल्या टाकतांना पाहिले; तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, ह्या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानांत टाकले; हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे.”—५ येशूला या स्त्रीची परिस्थिती माहीत असल्यामुळे अर्थात ती विधवा व गरीब आहे हे माहीत असल्यामुळे त्याला तिच्या देणगीचे खरे मूल्य समजले व त्याने तिची कदर केली. हेच यहोवाविषयी देखील म्हणता येते. (योहान १४:९) तेव्हा, तुमची कोणतीही परिस्थिती असली तरी तुम्ही कदर बाळगणारा आपला देव आणि त्याचा पुत्र यांची कृपापसंती मिळवू शकता, हे किती प्रोत्साहनदायक आहे, नाही का?
एका देव-भिरू इथियोपियनला यहोवा प्रतिफळ देतो
६, ७. यहोवाने एबद-मलेखची कदर का व कशी केली?
६ जे यहोवाच्या इच्छेनुसार वागतात त्यांची तो कदर करतो, हे शास्त्रवचनांत वारंवार दाखवण्यात आले आहे. एबद-मलेख नावाच्या एका देव-भिरू इथियोपियनबरोबर त्याने कशाप्रकारे व्यवहार केला ते पाहा. एबद-मलेख हा यिर्मयाच्या काळातला व यहुदाचा अविश्वासू राजा सिद्कीया याच्या घराण्यातला एक सेवक होता. यहुदाच्या राजपुत्रांनी संदेष्टा यिर्मयाविरुद्ध एक कट रचून त्याच्यावर खोटा दोषारोप लावला आणि त्याला एका विहिरीत टाकले जेणेकरून तो तिथे उपासमारीने मरून जाईल, हे एबद-मलेखला समजले. (यिर्मया ३८:१-७) यिर्मया प्रचार करत असलेल्या संदेशामुळे राजपुत्र त्याचा इतका कडा द्वेष करत होतेत, हे एबद-मलेखला माहीत असूनही त्याने आपला जीव धोक्यात घालून राजाकडे यिर्मयाला सोडवण्याची भीक मागितली. तो राजाला अगदी निडरतेने असे म्हणाला: “स्वामीमहाराज, या लोकांनी यिर्मया संदेष्ट्याला जे सर्व केले ते फार वाईट केले; त्यांनी त्याला विहिरीत टाकिले; तो आहे तेथे उपासमार होऊन मरेल.” मग राजाने त्याला आज्ञा दिल्यानंतर एबद-मलेखने ३० माणसे सोबत नेऊन देवाच्या संदेष्ट्याला विहिरीतून बाहेर काढले.—यिर्मया ३८:८-१३.
७ एबद-मलेखने यहोवावर भिस्त ठेवल्यामुळेच तो आपल्या भीतीवर मात करू शकला, हे यहोवाने पाहिले. त्यामुळे यहोवाने त्याची कदर करून यिर्मयाद्वारे त्याला सांगितले: “मी आपल्या वचनाप्रमाणे या नगराचे हित नव्हे तर अहित होईल असे करीन; त्या दिवशी तुझ्यादेखत ती वचने पूर्ण होतील. तुला तर त्या दिवशी मी मुक्त करीन. . . . ज्यांची तुला भीती वाटते त्यांच्या हाती तुला देणार नाहीत. मी खात्रीने तुझा बचाव करीन; . . . तू जिवानिशी सुटशील; कारण तू मजवर भिस्त ठेविली.” (यिर्मया ३९:१६-१८) होय, यहोवाने एबद-मलेख आणि यिर्मया या दोघांनाही यहुदाच्या दुष्ट राजपुत्रांच्या आणि नंतर जेरुसलेमला जमीनदोस्त केलेल्या बॅबिलोन्यांच्या हातून सोडवले. स्तोत्र ९७:१० म्हणते: “[यहोवा] आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करितो; तो त्यांस दुर्जनाच्या हातांतून सोडवितो.”—स्तोत्र ९७:१०.
“तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल”
८, ९. येशूने दाखवल्याप्रमाणे कोणत्या प्रार्थनांची यहोवा कदर करतो?
८ यहोवा आपल्या धार्मिक कार्यांची कदर करतो याचा आणखी एक पुरावा बायबलमध्ये प्रार्थनेविषयी जे काही म्हटले आहे त्यावरून दिसून येतो. “सरळाची प्रार्थना [देवाला] आनंदविते,” असे सुज्ञ शलमोनाने लिहिले. (नीतिसूत्रे १५:८) येशूच्या दिवसांत अनेक धार्मिक पुढारी चौकात उभे राहून प्रार्थना करीत असत. ते खरोखरच धार्मिक होते म्हणून नव्हे तर फक्त दिखावा म्हणून असे करत होते. येशूने त्यांच्याविषयी असे म्हटले: “ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.” आपल्या अनुयायींना त्याने असे सांगितले: “तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करितोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल.”—मत्तय ६:५, ६.
९ अर्थात येशू जनसमुदायात प्रार्थना करणे चूक आहे असे म्हणत नव्हता. कारण त्याने स्वतः अनेक प्रसंगी लोकांत प्रार्थना केली. (लूक ९:१६) इतरांना दाखवण्यासाठी म्हणून नव्हे तर प्रांजळ मनाने केलेल्या प्रार्थनेची यहोवा खूप कदर करतो. किंबहुना आपल्या वैयक्तिक प्रार्थनांवरून, देवाबद्दल आपल्या मनात किती प्रेम आहे आणि त्याच्यावर आपला किती भरवसा आहे हे दिसून येईल. म्हणूनच येशूने सहसा वैयक्तिक प्रार्थना करण्यासाठी खासगी जागा शोधली. एकदा तर त्याने अजूनही अंधार होता तेव्हा “मोठ्या पहाटेस उठून” प्रार्थना केली. दुसऱ्या प्रसंगी तो “प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला.” आणि, १२ प्रेषित निवडण्याआधी तर येशूने संपूर्ण रात्र प्रार्थनेत घालवली.—मार्क १:३५; मत्तय १४:२३; लूक ६:१२, १३.
१०. आपण जेव्हा प्रामाणिक मनाने व आपल्या अगदी आंतरिक भावना यहोवापुढे मांडतो तेव्हा कोणत्या गोष्टीची खात्री बाळगू शकतो?
१० आपल्या पुत्राच्या हृदयापासून व्यक्त केलेल्या भावना यहोवाने किती लक्ष देऊन ऐकल्या असतील! कधीकधी तर येशूने “मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली.” (इब्री लोकांस ५:७; लूक २२:४१-४४) आपणही जेव्हा प्रामाणिक मनाने व आपल्या अगदी आंतरिक भावना यहोवापुढे मांडतो तेव्हा आपला स्वर्गीय पिता आपल्या प्रार्थना लक्षपूर्वक ऐकतो आणि त्यांची कदर करतो ही खात्री आपण बाळगू शकतो. होय, “जे खऱ्या भावाने [यहोवाचा] धावा करितात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.”—स्तोत्र १४५:१८.
११. आपण खासगीत काय करतो याविषयी यहोवाला कसे वाटते?
११ आपण गुप्तपणे केलेल्या प्रार्थनांची जर यहोवा कदर बाळगतो तर आपण गुप्तपणे त्याच्या आज्ञांचे पालन करतो तेव्हाही तो आपली कदर करणार नाही का? होय, आपण खासगीत काय करतो त्याची यहोवाला जाणीव असते! (१ पेत्र ३:१२) एकांतात असताना विश्वासू व आज्ञाधारक राहणे हे, यहोवाची आपण “सात्विक चित्ताने” सेवा करत असल्याचे चिन्ह आहे. सात्विक चित्ताने म्हणजे, आपले हेतू शुद्ध असतात व जे बरोबर आहे त्याच्याबद्दल आपण दृढ आहोत. (१ इतिहास २८:९) आपले हे वर्तन यहोवाचे मन किती आनंदित करते!—नीतिसूत्रे २७:११; १ योहान ३:२२.
१२, १३. आपण आपल्या मनाचे व हृदयाचे संरक्षण कसे करू शकतो आणि नथनेल या विश्वासू शिष्याप्रमाणे कसे होऊ शकतो?
१२ परिणामतः, विश्वासू ख्रिस्ती मन व हृदय दूषित करू शकणाऱ्या गुप्त पापांपासून दूर राहतात; अर्थात गुप्तपणे अश्लील व हिंसा दाखवणारी चित्रे ते पाहत इब्री लोकांस ४:१३; लूक ८:१७) यहोवाचे मन दुःखित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्याने आपला विवेक शुद्ध राहतो आणि आपल्यावर देवाची मर्जी आहे, ही खात्री आपण बाळगू शकतो. यात जराही शंका नाही, की “जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो” अशा व्यक्तीची यहोवा मनापासून कदर करतो.—स्तोत्र १५:१, २.
नाहीत. काही पातके मानवांपासून लपवून ठेवता येऊ शकतात परंतु आपल्याला माहीत आहे, की “[देवाच्या] दृष्टीला अदृश्य अशी कोणतीहि निर्मिति नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे.” (१३ परंतु दुष्टाईने तुडुंब भरलेल्या जगात आपण आपल्या मनाचे व हृदयाचे संरक्षण कसे करू शकतो? (नीतिसूत्रे ४:२३; इफिसकर २:२) आपला विश्वास मजबूत करण्यासाठी यहोवा देत असलेल्या सर्व आध्यात्मिक तरतूदींचा फायदा उचलण्याव्यतिरिक्त आपण, जे वाईट आहे त्याला नकार देण्याचा व जे चांगले आहे ते करण्यासाठी हरएक प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनात अयोग्य इच्छा मूळ धरून पापाला जन्म द्यायच्या आधी आपण त्या लवकरात लवकर मनातून उपटून टाकल्या पाहिजे. (याकोब १:१४, १५) येशूने नथनेलाविषयी जे म्हटले ते जर त्याने तुमच्याविषयी म्हटले तर तुम्हाला कसे वाटेल, याची कल्पना करा. येशूने त्याला म्हटले: “पाहा हा खराखुरा इस्राएली आहे; ह्याच्याठायी कपट नाही!” (योहान १:४७) नथनेलाला बर्थलमय असेही नाव होते. त्याला नंतर येशूच्या १२ प्रेषितांपैकी एक होण्याचा सुहक्क मिळाला!—मार्क ३:१६-१९.
“दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक”
१४. मरीयेच्या कृत्यावर येशूने दाखवलेली प्रतिक्रिया इतरांच्या तुलनेत कशी होती?
१४ यहोवाचे ‘अदृश्य प्रतिरुप’ असलेला येशू नेहमी, जे शुद्ध मनाने देवाची सेवा करतात त्यांची कदर करण्यात आपल्या पित्याचे हुबेहूब अनुकरण करतो. (कलस्सैकर १:१५) उदाहरणार्थ, आपले जीवन बहाल करण्याच्या पाच दिवसाआधी येशू आणि त्याचे काही शिष्य बेथानी येथील शिमोन नावाच्या मनुष्याच्या घरी पाहुणे म्हणून होते. एके दिवशी संध्याकाळी, लाजरची व मार्थेची बहीण मरीया हिने “अर्धा शेर शुद्ध जटामासीचे मोलवान सुगंधी तेल” येशूच्या डोक्यास व चरणास लावले. हे तेल अतिशय महाग (एक वर्षाच्या वेतनाच्या बरोबरीचे) होते. (योहान १२:३) तेव्हा, काहींनी येशूला म्हटले: “हा नाश कशाला?” परंतु येशूने मरीयेचे हे कृत्य एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले. त्याच्या येऊ घातलेल्या उत्तरकार्याच्या दृष्टिने ही मोठी उदारता होती व महत्त्वपूर्ण कार्य होते. त्यामुळे मरीयेची टीका करण्याऐवजी येशूने तिचा सन्मान केला. तो म्हणाला: “सर्व जगात जेथे ही सुवार्ता गाजवितील तेथे तेथे हिने जे केले तेहि हिच्या स्मरणार्थ सांगतील.”—मत्तय २६:६-१३.
१५, १६. येशू पृथ्वीवर मानव म्हणून आल्यामुळे व देवाची सेवा केल्यामुळे आपल्याला कोणता फायदा झाला?
१५ आपण किती सन्मानित लोक आहोत! आपला पुढारी येशू कदर बाळगणारा पुढारी आहे. येशू पृथ्वीवर मानव म्हणून आल्यामुळे, यहोवाने त्याच्यासाठी राखून ठेवलेले कार्य करण्यास अर्थात पहिल्यांदा अभिषिक्त जनांच्या मंडळीकरता आणि नतंर संपूर्ण जगाकरता प्रमुख याजक आणि राजा या नात्याने कार्य करण्यास तो जणू काय तयार झाला.—कलस्सैकर १:१३; इब्री लोकांस ७:२६; प्रकटीकरण ११:१५.
१६ पृथ्वीवर येण्याआधीपासून येशूला मानवजातीच्या हिताची काळजी होती आणि मानवजातीविषयी त्याला विशेष प्रेम होते. (नीतिसूत्रे ८:३१) मानव म्हणून राहिल्यानंतर त्याला, देवाची सेवा करताना आपल्याला कोणकोणत्या परीक्षांना तोंड द्यावे लागते हे आणखी चांगल्याप्रकारे समजले. प्रेषित पौलाने लिहिले: “त्याला सर्व प्रकारे ‘आपल्या बंधुसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, . . . त्याने . . . दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. कारण ज्याअर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगिले त्याअर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करावयास तो समर्थ आहे.” येशूला ‘आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी . . . सहानुभूति वाटू शकते’ कारण तो “सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.”—इब्री लोकांस २:१७, १८; ४:१५, १६.
१७, १८. (क) आशिया मायनरमधील सात मंडळ्यांना पाठवलेल्या पत्रांतून येशूला तेथील बंधूभगिनींची कितपत कदर होती हे कसे दिसून येते? (ख) अभिषिक्त ख्रिश्चनांना कशासाठी तयार केले जात होते?
१७ आपल्या अनुयायांना तोंड द्याव्या लागणाऱ्या परीक्षांची येशूला खूप चांगल्याप्रकारे जाणीव होती, हे प्रकटीकरण २:८-१०.
त्याचे पुनरुत्थान झाल्यानंतर स्पष्ट झाले. आशिया मायनरमधील सात मंडळ्यांना उद्देशून प्रेषित योहानाकडून त्याने लिहून घेतल्या पत्रांचा विचार करा. स्मुर्णा येथील मंडळीला येशूने म्हटले: “तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे.” दुसऱ्या शब्दांत येशू असे म्हणत होता: ‘मला तुमच्या समस्या चांगल्याप्रकारे कळतात; तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात, ते मी चांगल्याप्रकारे समजू शकतो.’ स्वतःही मृत्यूचा सामना केला असल्यामुळे त्याने दयाळुपणे व पूर्ण खात्रीने असे म्हटले: ‘मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुम्हाला जीवनाचा मुगूट देईन.’—१८ सात मंडळ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रांत, आपल्या शिष्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याची येशूला पूर्ण जाणीव असल्याचे तसेच त्यांच्या एकनिष्ठेबद्दल त्याने मनापासून कदर केल्याचे उद्गार वारंवार वाचायला मिळतात. (प्रकटीकरण २:१–३:२२) येशूने ज्यांना ही पत्रे लिहिली ते त्याच्याबरोबर स्वर्गात राज्य करण्याची आशा असलेले अभिषिक्त ख्रिस्ती होते, हे लक्षात ठेवा. त्यांच्या प्रभूप्रमाणे त्यांनाही एक सर्वोच्च भूमिका पार पाडण्यासाठी तयार केले जात होते. दुःखाने जर्जर झालेल्या मानवजातीला ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाचे फायदे अगदी कनवाळूपणे लागू करण्याची भूमिका त्यांना पार पाडायची आहे.—प्रकटीकरण ५:९, १०; २२:१-५.
१९, २०. ‘मोठ्या लोकसमुदायाचे’ सदस्य, यहोवा आणि त्याचा पुत्र यांच्याबद्दल त्यांना असलेली कृतज्ञता कशाप्रकारे व्यक्त करतात?
१९ अर्थात येशूला केवळ त्याच्या अभिषिक्त अनुयायांवरच नव्हे तर त्याच्या एकनिष्ठ ‘दुसऱ्या मेंढरांवरही’ प्रेम आहे. लाखोंच्या घरात असलेली ही दुसरी मेंढरेच ‘सर्व राष्ट्रांतून आलेला मोठा लोकसमुदाय आहेत’ जे येऊ घातलेल्या “मोठ्या संकटातून” वाचतील. (योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९, १४) मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य येशूच्या बाजूने उभे राहतात कारण ते त्याच्या खंडणी बलिदानाबद्दल व सार्वकालिक जीवनाची त्यांना असलेल्या आशेबद्दल कृतज्ञ आहेत. ते आपली कृतज्ञता कशाप्रकारे व्यक्त करतात? “अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा” करण्याद्वारे ते आपली कृतज्ञता व्यक्त करतात.—प्रकटीकरण ७:१५-१७.
२० सन २००६ मध्ये संपूर्ण जगभरात जे कार्य करण्यात आले ते, हे विश्वासू सेवक खरोखरच यहोवाची “अहोरात्र” सेवा करत असल्याचा पुरावा आहे. खरे पाहता, त्या एका वर्षात त्यांनी, त्यांच्या मानाने कमी संख्येच्या अभिषिक्त ख्रिश्चनांबरोबर एकूण १,३३,३९,६६,१९९ तास सार्वजनिक सेवेत खर्च केलेत; हे तास १,५०,००० पेक्षा अधिक वर्षांच्या तुल्य आहेत!
कृतज्ञता दाखवत राहा!
२१, २२. (क) कृतज्ञता दाखवण्याच्या बाबतीत ख्रिश्चनांनी खासकरून आज सतर्क का राहिले पाहिजे? (ख) पुढील लेखात कोणत्या विषयाची उजळणी केली जाईल?
२१ अपरिपूर्ण मानवांबरोबर व्यवहार करताना, यहोवाने व त्याच्या पुत्राने कदर दाखवण्याच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट उदाहरण मांडले आहे. परंतु, बहुतांश मानव देवाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्याच हितांकडे जास्त लक्ष देतात, ही दुःखाची गोष्ट आहे. ‘शेवटल्या काळात’ राहणाऱ्या लोकांचे वर्णन करताना पौलाने लिहिले: ‘लोक केवळ स्वतःवर प्रेम करतील. ते लोकांशी कृतघ्न होतील.’ (२ तीमथ्य ३:१-५, सुबोध भाषांतर.) परंतु या लोकांमध्ये आणि खऱ्या ख्रिश्चनांमध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे. खरे ख्रिस्ती प्रार्थना करण्याद्वारे, आनंदाने आज्ञाधारक राहण्याद्वारे व पूर्ण जिवाने सेवा करण्याद्वारे, देवाने त्यांच्यासाठी जे जे केले आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ असल्याचे दाखवतात.—स्तोत्र ६२:८; मार्क १२:३०; १ योहान ५:३.
२२ पुढील लेखात आपण यहोवाने आपल्यासाठी केलेल्या अनेक प्रेमळ आध्यात्मिक तरतूदींपैकी काहींची उजळणी करणार आहोत. या ‘उत्तम देणग्यांवर’ मनन करताना आपली कृतज्ञता आणखी वाढो!—याकोब १:१७. (w०७ २/१)
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• यहोवाने हे कसे दाखवून दिले आहे, की तो गुणांची पारख असलेला देव आहे?
• एकांतात असताना आपण यहोवाचे मन आनंदित कसे करू शकतो?
• येशूने लोकांबद्दल कदर कशी दाखवली?
• मानव बनल्यामुळे येशूला कनवाळू व गुणांची पारख असलेला शासक बनण्यास कशी मदत झाली?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२२ पानांवरील चित्र]
मुलाचे मनःपूर्वक आविर्भाव पालकाला आवडतात; तसेच आपण मनापासून करत असलेल्या सेवेची यहोवा कदर करतो