व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपली एकमेव सौरमाला कशी अस्तित्वात आली?

आपली एकमेव सौरमाला कशी अस्तित्वात आली?

आपली एकमेव सौरमाला कशी अस्तित्वात आली?

अनेक कारणांमुळे विश्‍वातील आपली सौरमाला एकमेव बनते. आपली सौरमाला, सर्पिलाकारी आकाशगंगेच्या दोन भुजांमध्ये स्थित आहे जेथे खूप कमी तारे आहेत. रात्रीच्या वेळी आपण पाहत असलेले सर्व तारे आपल्यापासून इतक्या दूर आहेत की आपण त्यांना दुर्बीणीतून पाहिले तरी ते प्रकाशाचे केवळ एका टिंबाप्रमाणे दिसतात. आपली सौरमाला अशीच असावयास हवी का?

आपली सौरमाला, आकाशगंगेच्या मध्यभागाजवळ असती तर आपल्याला, दाट तारकापुंजाजवळ असल्यामुळे हानीकारक परिणाम भोगावे लागले असते. उदाहरणार्थ, पृथ्वीच्या कक्षेत बाधा आली असती आणि याचा मानवी जीवनावर परिणाम झाला असता. जणू हे सर्व आणि इतर धोके टाळण्यासाठी आपली सौरमाला आकाशगंगेत अतिशय उचित ठिकाणी आहे. इतर धोक्यांमध्ये, वायु ढगांमधून जाताना उष्णता वाढणे व स्फोट होणाऱ्‍या ताऱ्‍यांचा व इतर धोकेदायक किरणांचा परिणाम होणे, समाविष्ट आहे.

सूर्य हा एक अतिशय उत्तम प्रकारचा तारा आहे जो आपल्याला जिवंत राहण्यासाठी आवश्‍यक आहे. तो तप्त वायुचा प्रचंड आगीचा गोळा आहे जो शतकानुशतकांपासून अस्तित्वात आहे. त्याचा आकार प्रमाणापेक्षा मोठाही नाही किंवा त्याची उष्णता मानवांना जितकी लागते त्यापेक्षा अधिकही नाही. आपल्या आकाशगंगेतील बहुसंख्य तारे आपल्या सूर्यापेक्षा आकाराने लहान आहेत व ते पृथ्वीसारख्या ग्रहावरील जीवन टिकवून ठेवण्याकरता योग्य प्रकारचा प्रकाश परावर्तित करू शकत नाहीत किंवा उचित मात्रेत उष्णता देऊ शकत नाहीत. याशिवाय, बहुतेक तारे एक किंवा अधिक ताऱ्‍यांशी गुरुत्वाकर्षण शक्‍तीने जोडलेले आहेत व ते एकमेकांच्या भोवती फिरतात. परंतु आपला सूर्य हा स्वतंत्र आहे. आपल्या सौरमालेवर दोन अथवा अधिक सूर्यांच्या गुरुत्वाकर्षण शक्‍तीचा परिणाम झाला असता तर आपली सौरमाला कदाचित स्थिर राहिली नसती.

आणखी एका कारणामुळे आपली सौरमाला एकमेव बनते. ते हे की, आपल्या सौरमालेच्या बाहेरच्या भागात मोठमोठे ग्रह आहेत ज्यांच्या जवळजवळ गोल कक्षा आहेत आणि यांच्या गुरुत्वाकर्षण बलापासून लहान ग्रहांना कसलाही धोका नाही. * उलट हे बाहेरील ग्रह, सुरक्षा कवचांसारखे घातक पदार्थ शोषण्याचे व त्यांना परावृत्त करण्याचे काम करतात. “लघूग्रहांचा व धूमकेतुंचा आपल्यावर मारा होत असतो पण, आपल्या पलिकडे जुपिटर सारखा मोठा वायु ग्रह असल्यामुळे हा मारा अधिक प्रमाणात नसतो,” असे वैज्ञानिक पीटर डी. वॉर्ड आणि डॉनल्ड ब्राऊनली, रेअर अर्थ—वाय कॉम्प्लेक्स लाईफ इज अनकॉमन इन द युनिवर्स या पुस्तकात स्पष्टीकरण देतात. मोठे ग्रह असलेल्या इतर सौरमालांचा शोध लावण्यात आला आहे. परंतु बहुतेक मोठ्या ग्रहांच्या कक्षेपासून पृथ्वीसारख्या लहान ग्रहाला धोका संभवू शकतो.

चंद्राची भूमिका

फार पूर्वीपासून मानवाला चंद्राचे अप्रूप वाटत राहिले आहे. कवी आणि संगीतकारांनी चंद्रावर कविता व गाणी रचली आहेत. उदाहरणार्थ, एका प्राचीन हिब्रू कवीने म्हटले: “चंद्राप्रमाणे ते सर्वकाळ टिकेल; आकाशातील साक्षीदार विश्‍वसनीय आहे.”—स्तोत्र ८९:३७.

चंद्राचा पृथ्वीवर अनेक मार्गांनी परिणाम होतो. त्यापैकी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे, चंद्राच्या गुरुत्वीय बलामुळे समुद्राच्या पाण्यात सतत चढउतार (भरती-ओहोटी) होत असतात. हे चढउतार सागरी प्रवाहांसाठी महत्त्वपूर्ण आहेत; आणि सागरी प्रवाहांमुळे आपल्या हवामानात बदल होतात, असे मानले जाते.

आपल्या चंद्राचा आणखी एक मुख्य उद्देश म्हणजे, पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती भ्रमण करते तेव्हा चंद्राच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीचा अक्ष स्थिर राहतो. नेचर नावाच्या एका वैज्ञानिक मासिकानुसार, चंद्र नसता तर पृथ्वीचा अक्ष दीर्घ कालावधीदरम्यान “जवळजवळ ० [डिग्री] ते ८५ [डिग्री]” इतका बदलला असता. पृथ्वीचा अक्ष झुकलेला नसता तर काय झाले असते, याची कल्पना करा! आपल्याला ऋतूत होणाऱ्‍या बदलांचा आनंद लुटता आला नसता आणि पर्जन्यवृष्टीचा अभाव असता. पृथ्वीचा अक्ष झुकलेला आहे त्यामुळे हवामान अतिशय गरम किंवा अतिशय थंड होत नाही; यामुळे आपण जिवंत राहू शकतो. “आपल्या सध्याच्या हवामानाचे स्थैर्य एका असाधारण गोष्टीमुळे अर्थात चंद्रामुळे साध्य होते,” असे अवकाशयात्री झॅक लास्कर म्हणतात. हे स्थैर्य टिकवून ठेवण्याकरताच चंद्राचा आकार मोठा आहे. आपला चंद्र इतर मोठ्या ग्रहांना असलेल्या चंद्रापेक्षातरी मोठा आहे.

पृथ्वीच्या या नैसर्गिक उपग्रहाचे अर्थात चंद्राचे आणखी एक कार्य आहे. त्याविषयी बायबलमधील उत्पत्ति नावाच्या पुस्तकाच्या एका प्राचीन लेखकाने म्हटले, की चंद्र, रात्री प्रकाश देण्यासाठी आहे.—उत्पत्ति १:१६.

अचानक की एका उद्देशास्तव?

पृथ्वीवर आपण केवळ जिवंतच राहत नाही तर ते आनंददायक बनवण्यासाठी असलेल्या असंख्य कारणांचे आपण स्पष्टीकरण कसे देऊ शकतो? आपल्यापुढे दोन मार्ग आहेत, ज्यांच्याद्वारे आपण हे स्पष्टीकरण देऊ शकतो. एक स्पष्टीकरण असे, की या सर्व गोष्टी, एका उद्देशहीन अपघाताचे फलित आहेत. दुसरे स्पष्टीकरण असे, की या गोष्टी निर्माण करणारा एक बुद्धिमान सृष्टीकर्ता आहे.

हजारो वर्षांपूर्वी, पवित्र शास्त्रवचनांमध्ये असे लिहिण्यात आले, की एका निर्माणकर्त्याच्या अर्थात सर्वसमर्थ देवाच्या मनात विश्‍व बनवण्याची कल्पना आली आणि त्याने आपली कल्पना वास्तवात उतरवली. हे जर खरे आहे तर याचा अर्थ, आपल्या सौरमालेत अस्तित्वात असलेली परिस्थिती, अचानक आली नाही तर ही परिस्थिती मुद्दाम कोणीतरी रचली. पृथ्वीवर जीवन शक्य करण्यासाठी त्याने काय काय केले त्याचा पुरावा म्हणून निर्माणकर्त्याने याविषयीचा जणू काय लेखी वृत्तांत लिहून ठेवला आहे. तुम्हाला हे ऐकून आश्‍चर्य वाटेल, की हा रिपोर्ट सुमारे ३,५०० वर्षांपूर्वीचा असला तरी, विश्‍वाच्या इतिहासाबद्दल त्यात दिलेली माहिती आणि आज वैज्ञानिक, नेमके काय झाले असावे असे जे मानतात, त्याजशी जुळतो. हा रिपोर्ट बायबलमधील उत्पत्तिच्या पुस्तकात आढळतो. त्यात काय म्हटले आहे ते पाहा.

उत्पत्ति पुस्तकातील सृष्टीचा अहवाल

“प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्‍न केली.” (उत्पत्ति १:१) बायबलचे हे सुरुवातीचे शब्द आपल्या सौरमालेच्या निर्मितीबाबत आहेत. यात, आपल्या पृथ्वीग्रहाचा आणि आपले विश्‍व ज्या कोट्यवधी आकाशगंगांचे मिळून बनले आहे त्यांचा समावेश होतो. बायबलनुसार, पृथ्वीचा पृष्ठभाग “आकारविरहित व शून्य” होता. त्यावर कोणतेही खंड नव्हते किंवा उपजाऊ जमीन नव्हती. पण पुढील शब्द एका महत्त्वाच्या गोष्टीवर जोर देतात. ग्रहावर जीवन टिकवण्यासाठी जी महत्त्वाची गोष्ट आवश्‍यक आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुबलक पाणी होते. देवाचा आत्मा “जलावर तळपत” होता.—उत्पत्ति १:२.

पृथ्वीवरील पाणी द्रव्य रुपात टिकून राहण्याकरता पृथ्वी ही सूर्यापासून उचित अंतरावर असणे आवश्‍यक आहे. “मार्स अतिशय थंड आहे आणि व्हिनस अतिशय तप्त आहे परंतु पृथ्वीचे वातावरण अगदी योग्य आहे,” असे वर्णन ग्रहांचे वैज्ञानिक ॲण्ड्रू इंगरसोल देतात. तसेच, वनस्पतींच्या वाढीसाठी पुरेसा प्रकाश असला पाहिजे. बायबल अहवालानुसार, सृष्टीच्या काळाच्या सुरुवातीच्या काळात देवाने सूर्यप्रकाशाला, एका बाळाच्या भोवती जसे बाळंते गुंडाळलेले असते तसे महासागराला गुंडाळलेल्या पाण्याच्या वाफेचे दाट अभ्रांचे “बाळंते” पार करायला लावले.—ईयोब ३८:४, ९; उत्पत्ति १:३-५.

उत्पत्तिच्या पुढील वचनांत आपण वाचतो की निर्माणकर्त्याने बायबल ज्याला “अंतराळ” म्हणते ते निर्माण केले. (उत्पत्ति १:६-८) हे अंतराळ अनेक वायुंनी भरले आहे ज्यामुळे पृथ्वीचे वातावरण बनते.

यानंतर बायबल म्हणते, की देवाने आकार नसलेल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाची कोरडी जमीन बनवली. (उत्पत्ति १:९, १०) त्याने कदाचित पृथ्वीचे कवच वाकवून ते हलवले असावे. परिणामतः, खोल चरे पडून महासागरात विविध खंड पडले असावेत.—स्तोत्र १०४:६-८.

एका अनिश्‍चित काळानंतर देवाने महासागरातील अतिसूक्ष्म शेवाळ बनवले. सूर्याच्या उर्जेचा वापर करून ही स्वयं-उत्पादक एक-कोशिका जीवसृष्टी कार्बन-डायऑक्साईडचे रुपांतर अन्‍नात करू लागली आणि हवेत ऑक्सीजन सोडू लागली. तिसऱ्‍या सृष्टीच्या काळात जमिनीवर पसरलेल्या वनस्पतींची निर्मिती झाल्यानंतर ही अद्‌भुत प्रक्रिया झपाट्याने वाढत गेली. अशाप्रकारे हवेतील ऑक्सीजनचे प्रमाण वाढले ज्यामुळे मानव आणि प्राणी श्‍वास घेऊन जिवंत राहणे शक्य झाले.—उत्पत्ति १:११, १२.

जमिनीचा कस वाढवण्याकरता निर्माणकर्त्याने जमिनीत राहणारे विविध सूक्ष्मजीव बनवले. (यिर्मया ५१:१५) हे लहान जीवजंतू, मृत पदार्थांना कुजवण्याची क्रिया करतात व यामुळे वनस्पती वाढतील असे घटक जमिनीत पुन्हा तयार होतात. जमिनीतील विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया हवेतून नायट्रोजन घेतात ज्यामुळे वनस्पतींची भरभरून वाढ होते. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, साधारण मूठभर सुपीक जमिनीत सहाशे कोटी सूक्ष्मजीव असू शकतात!

उत्पत्ति १:१४-१९ वचनांमध्ये चवथ्या सृष्टीच्या कालावधीत सूर्य, चंद्र आणि ताऱ्‍यांच्या निर्मितीचे वर्णन आहे. सुरुवातीला हे शास्त्रवचनात आधी दिलेल्या वर्णनाच्या विरोधात वाटेल. परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की उत्पत्ति अहवालाचा लेखक मोशे याने उत्पत्तिचा अहवाल, उत्पत्तिच्या वेळी जणू काय एखादा मनुष्य अस्तित्वात होता, त्या दृष्टीने लिहिला आहे. त्या वेळेला पृथ्वीच्या वातावरणातून सूर्य, चंद्र आणि तारे पाहता येत होते.

उत्पत्तिच्या अहवालानुसार, पाचव्या सृष्टीच्या कालावधीत समुद्रातील जलचरांची व पृथ्वीवर संचार करणाऱ्‍या प्राण्यांची निर्मिती करण्यात आली आणि सहाव्या सृष्टीच्या कालावधीत मनुष्याची निर्मिती करण्यात आली.—उत्पत्ति १:२०-३१.

उपभोग घ्यावा म्हणून निर्मिण्यात आली

उत्पत्तिच्या अहवालात वर्णन केल्यानुसार पृथ्वीवरील जीवन हे मानवांनी उपभोगावे म्हणून निर्माण करण्यात आले आहे असे तुम्हाला वाटत नाही का? तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की तुम्ही सकाळी उठता तेव्हा बाहेर लख्ख प्रकाश पडला आहे, आसमांतील शुद्ध हवा तुमच्या फुफ्फुसात शिरते तेव्हा तुम्हाला, तुम्ही जिवंत असल्याबद्दल आनंद वाटला का? तेव्हा कदाचित तुम्ही तुमच्या बागेत गेला असाल आणि उमललेल्या फुलांकडे पाहून उर भरेपर्यंत त्यांचा सुंगध घेतला असेल. किंवा, तुम्ही कदाचित एखाद्या फळबागेत जाऊन, काही रसरशीत फळे गोळा केली असावीत. (१) पृथ्वीवर मुबलक पाणी नसते, (२) सूर्यापासून योग्य मात्रेत उष्णता आणि प्रकाश नसता, (३) आपल्या हवामानात विविध वायुंचे उचित प्रमाणात मिश्रण नसते आणि (४) जमीन सुपीक नसती तर या सर्व गोष्टी आपल्याला उपभोगता आल्या नसत्या.

या सर्व अद्‌भुत गोष्टी ज्या मार्स, व्हिनस आणि आपल्या पृथ्वीग्रहाशेजारील ग्रहांवर नाहीत; त्या अचानक आल्या नाहीत. तर पृथ्वीवरील जीवन सुखावह बनवण्याकरता त्या एका निर्माणकर्त्याने चपखलपणे बनवल्या. बायबलमध्ये असेही सांगण्यात आले आहे, की निर्माणकर्त्याने आपला देखणा पृथ्वीग्रह चिरकाल टिकावा म्हणून निर्माण केला आहे. याविषयी पुढील लेखात चर्चा करण्यात आली आहे. (w०७ २/१५)

[तळटीप]

^ परि. 5 आपल्या सौरमालेत आतल्या बाजूला असलेल्या ग्रहांना अर्थात मर्क्यूरी, व्हीनस, पृथ्वी आणि मार्स यांना टेरेसट्रियल म्हटले जाते कारण त्यांचा पृष्ठभाग खडकाळ आहे. ज्युपिटर, सॅटन, युरेनस आणि नेप्यचून यासारख्या मोठ्या ग्रहांना वायुगोळे म्हटले जाते कारण ते बहुतांश वायुने भरलेले आहेत.

[६ पानांवरील चौकट]

“भूवैज्ञानिक म्हणून मला जर कोणी, पृथ्वीच्या उगमाविषयीचे आणि तिच्यावरील जीवनाच्या उत्पत्तीविषयीचे आपल्या आधुनिक विचारांचे संक्षिप्त स्पष्टीकरण, उत्पत्तीचे पुस्तक ज्यांना उद्देशून लिहिले आहे अशा साध्या, खेड्यात राहणाऱ्‍या लोकांना देण्यास सांगितले तर माझ्यापुढे, बायबलमधील उत्पत्ति पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाची जी भाषा आहे त्याच भाषेत वर्णन करून सांगण्याव्यतिरिक्‍त इतर उत्तम मार्ग नसेल.”—भूवैज्ञानिक वॉलस प्रॅट.

[७ पानांवरील चौकट/चित्र]

खगोलशास्त्राचा अभ्यास करण्याचे सुयोग्य ठिकाण

सूर्य जर आपल्या आकाशगंगेत इतर ठिकाणी असता तर आपल्याला ताऱ्‍यांचे इतके स्पष्ट दर्शन घडले नसते. द प्रीव्हलेज्ड प्लॅनेट नावाच्या पुस्तकात असे म्हटले आहे: “आपली सौरमाला . . . धुळकट, प्रकाश-प्रदुषित भागांपासून खूप दूर आहे. यामुळे फक्‍त जवळचे तारे नव्हे तर विश्‍वाच्या दूरवर असलेल्या भागांचे देखील आपल्याला स्पष्ट दर्शन घडते.”

तसेच, चंद्राचा आकार आणि पृथ्वीपासूनचे त्याचे अंतर इतके अचूक आहे, की सूर्यग्रहणाच्या दिवशी चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकतो. या दुर्मिळ, भयप्रेरक घटनांमुळे खगोलशास्त्रज्ञांना सूर्याचा अभ्यास करणे शक्य होते. अशा अभ्यासांमुळे त्यांना, तारे कसे चमकतात त्याबद्दलच्या अनेक गूढ गोष्टींचा उलगडा होतो.

[५ पानांवरील चित्र]

पृथ्वीचा अक्ष स्थिर ठेवण्याइतपत चंद्राची राशी मोठी आहे

[७ पानांवरील चित्रे]

पृथ्वीवरील जीवन कशामुळे शक्य होते? मुबलक पाणी, उचित प्रमाणात प्रकाश व उष्णता, हवामान आणि सुपीक जमीन यांच्यामुळे

[चित्राचे श्रेय]

पृथ्वीचा गोल: Based on NASA Photo; गहू: Pictorial Archive (Near Eastern History) Est.