व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या मनोरम पृथ्वीचा आनंद लुटा

आपल्या मनोरम पृथ्वीचा आनंद लुटा

आपल्या मनोरम पृथ्वीचा आनंद लुटा

खगोल शास्त्रज्ञांच्या मते, मानवाचे वस्तीस्थान असलेली पृथ्वी ही, प्रचंड विश्‍वातील केवळ एक लहानशा कणाप्रमाणे आहे. भौतिक विश्‍वात इतर कोणत्याही ग्रहावर सजीव सृष्टी आढळलेली नाही. केवळ पृथ्वीवरच असे वातावरण आहे जे जिवंत राहण्याकरता सुयोग्य आहे.

तसेच आपण केवळ या मनोरम पृथ्वीगोलावर फक्‍त जिवंतच राहत नाही तर जीवनाचा आनंद देखील लुटू शकतो. कडाक्याची थंडी पडलेल्या दिवशी सूर्याची ऊब किती सुखदायक वाटते! सूर्योदय किंवा सूर्यास्ताचा देखावा पाहून ज्याचे मन हरखून जात नाही, असा विरळच कोणी असेल. अर्थात आपला सूर्य केवळ आपल्या ज्ञानेंद्रियांनाच सुखावत नाही तर, आपले अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे.

असंख्य वर्षांपासून सूर्याच्या गुरुत्वीय बलाने पृथ्वी आणि इतर ग्रहांना स्थिर कक्षेत धरून ठेवले आहे. आणि शाळेत विद्यार्थ्यांना शिकवले जाते त्याप्रमाणे, संपूर्ण सौरमाला आपल्या मंदाकिनीच्यामध्ये आपल्या कक्षेत फिरते. परंतु, आपल्या आकाशगंगेत सूर्य हा केवळ, १०० कोटी ताऱ्‍यांपैकी एक तारा आहे जो आकाशगंगेच्या केंद्राभोवती इतर ताऱ्‍यांसोबत परिभ्रमण करतो.

आपली आकाशगंगा ही, गुरुत्वीय बलाने सुमारे ३५ आकाशगंगांच्या समूहाशी बांधलेली आहे. मोठ्या आकाशगंगांमध्ये हजारो आकाशगंगा असतात. आपली सौरमाला ही जर, आकाशगंगांच्या मोठ्या व दाट गुच्छात असती तर ती स्थिर राहिली नसती. परंतु, नाहीतरी, विश्‍वातील फार कमी प्रदेश “आपल्या पृथ्वीप्रमाणे जटील जीवनासाठी सुयोग्य आहेत,” असे गिलयेरमो गोन्सालीझ आणि जे डेब्ल्यू. रिचड्‌र्स आपल्या अनोखा ग्रह या पुस्तकात लिहितात.

पृथ्वीग्रहावरील जीवन हे अचानक किंवा एका मोठ्या स्फोटामुळे अर्थात ‘बिग बँगमुळे’ अस्तित्वात आले का? की, एका श्रेष्ठ उद्देशाकरता या मनोरम पृथ्वीग्रहावरील जीवनाची सुरुवात झाली?

आपला पृथ्वीगृह खास जीवन टिकवण्यासाठी निर्माण करण्यात आला होता असा अनेकांनी निष्कर्ष काढला आहे. * अनेक शतकांआधी, एका हिब्रू कवीने पृथ्वी व स्वर्गाकडे लोकांचे लक्ष वेधले. त्याने असे लिहिले: “आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्‍यांच्याकडे पहावे तर मर्त्य मनुष्य तो काय?” (स्तोत्र ८:३, ४) या सृष्टीचा एक निर्माणकर्ता असलाच पाहिजे, असा या कवीचा विश्‍वास होता. आपल्या वैज्ञानिक युगात हा निष्कर्ष तर्कशुद्ध वाटतो का? (w०७ २/१५)

[तळटीप]

^ परि. 7 स्तोत्रसंहिता पुस्तक पाहा, खासकरून ८ वे स्तोत्र.

[३ पानांवरील चौकट/चित्र]

“अंतराळाच्या काळोखात पृथ्वी दूरून एका नीलमणीसारखी दिसते,” असे द इलस्ट्रेटेड सायन्स एन्सायक्लोपिडिआ—अमेझिंग प्लॅनेट अर्थ या पुस्तकात म्हटले आहे.

[चित्राचे श्रेय]

पृथ्वीचा गोल: U.S. Fish & Wildlife Service, Washington, D.C./NASA