पत्नींनो—आपल्या पतींचा मनापासून आदर करा
पत्नींनो—आपल्या पतींचा मनापासून आदर करा
“स्त्रियांनो, . . . आपआपल्या पतीच्या अधीन असा.”—इफिसकर ५:२२.
१. पतीचा आदर करणे बरेचदा जड का जाते?
बऱ्याच देशांत लग्नाच्या वेळी नवरी आपल्या पतीचा मनापासून आदर करण्याची शपथ घेते. पण ही शपथ पूर्ण करणे तिला जड जाते की सोपे जाते हे बरेचदा, तिचा पती तिच्याशी कशाप्रकारे वागतो यावर अवलंबून असते. मुळात मात्र विवाहाची अत्यंत सुरेख व आश्चर्यकारक रितीने स्थापना झाली होती. देवाने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढून तिच्यापासून स्त्रीला निर्माण केले. तिला पाहून आदाम म्हणाला: “ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे.”—उत्पत्ति २:१९-२३.
२. स्त्रिया व विवाह या बाबतीत अलीकडच्या काळात कोणत्या घडामोडी झाल्या आहेत?
२ विवाहाची अशी सुरेख सुरुवात झाली होती तरीही, १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिकेत स्त्रीमुक्ती नावाची एक चळवळ सुरू झाली. ही चळवळ स्त्रियांनी पुरुषांच्या जाचापासून मुक्त होण्याकरता सुरू केली होती. त्या २ तीमथ्य ३:१-५.
काळात आपल्या कुटुंबांना सोडून जाणाऱ्या पुरुषांच्या संख्येचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत ३००:१ इतके होते. १९६० च्या दशकाच्या शेवटापर्यंत हे प्रमाण १००:१ इतके झाले. आता तर असे दिसते, की मद्यपान, धूम्रपान आणि अनैतिक वर्तनाच्या बाबतीत स्त्रियाही पुरुषांची बरोबरी करू लागल्या आहेत. याचा अर्थ, आज स्त्रिया पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आहेत का? नाही. काही देशांत, जितके लोक लग्न करतात त्यांच्यापैकी निम्मे घटस्फोट घेतात. वैवाहिक जीवनात आपला दर्जा सुधारण्याच्या काही स्त्रियांनी केलेल्या प्रयत्नांमुळे परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे की वाईट?—३. विवाहाच्या संबंधाने मूळ समस्या काय आहे?
३ मुळात समस्या काय आहे? काही अंशी, ही समस्या एका विद्रोही देवदूताने अर्थात, ‘दियाबल व सैतान म्हटलेल्या जुनाट सापाने’ हव्वेला फसवले होते तेव्हापासूनच अस्तित्वात आली आहे. (प्रकटीकरण १२:९; १ तीमथ्य २:१३, १४) सैतानाने देवाच्या शिकवणुकींची विटंबना केली आहे. उदाहरणार्थ, दियाबल असे भासवण्याचा प्रयत्न करतो की विवाहाच्या संबंधाने असलेल्या देवाच्या शिकवणुकी अत्यंत अवाजवी आणि कठोर आहेत. सैतान या जगाचा सरदार आहे आणि त्यामुळे तो जगिक प्रसिद्धी माध्यमांतून असा प्रचार करतो की देवाचे मार्गदर्शन पक्षपाती व अगदीच जुनाट आहे. (२ करिंथकर ४:३, ४) पण वैवाहिक जीवनात स्त्रियांच्या भूमिकेविषयी देवाचा काय दृष्टिकोन आहे याचे जर आपण वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाने परीक्षण केले तर आपल्याला हे दिसून येईल की देवाच्या वचनाचा दृष्टिकोन अतिशय सुज्ञ आणि रास्त आहे.
विवाह करणाऱ्यांना ताकीद
४, ५. (क) विवाहाचा निर्णय विचारपूर्वक घेणे का महत्त्वाचे आहे? (ख) लग्नाच्या प्रस्तावाला होकार देण्याअगोदर एका स्त्रीने काय केले पाहिजे?
४ बायबलमध्ये एक ताकीद देण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे की दियाबलाच्या शासनाखाली असलेल्या या जगात ज्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी झाले आहे त्यांना देखील “हालअपेष्टा” भोगाव्या लागतील. त्याअर्थी विवाह ही देवाने स्थापन केलेली व्यवस्था असली तरीसुद्धा जे विवाह करण्याचा निर्णय घेतात त्यांना बायबल ताकीद देते. ज्या स्त्रीच्या पतीचा मृत्यू झाला आहे आणि त्याअर्थी जी पुनर्विवाह करण्यास मोकळी आहे अशा स्त्रीविषयी बायबलच्या एका प्रेरित लेखकाने असे म्हटले: “जर ती तशीच राहील तर . . . ती अधिक सुखी होईल.” येशूनेही असा सल्ला दिला की ज्यांना अविवाहित राहणे “स्वीकारता येते” त्यांनी ते स्वीकारावे. तथापी, जर कोणी लग्न करण्याचा निर्णय घेतलाच तर त्याने केवळ “प्रभूमध्ये” अर्थात देवाला समर्पण करून बाप्तिस्मा घेतलेल्या उपासकाशीच लग्न करावे.—१ करिंथकर ७:२८, ३६-४०; मत्तय १९:१०-१२.
५ आपण कोणाशी विवाह करू इच्छितो याचा विशेषतः एका स्त्रीने आधीच विचार करणे आवश्यक आहे कारण बायबलनुसार, “विवाहित स्त्री नियमशास्त्राने [आपल्या पतीला] बांधलेली असते.” फक्त त्याचा मृत्यू झाल्यास अथवा त्याने व्यभिचार केल्यामुळे त्या दांपत्याचा घटस्फोट झाल्यास तिची “पतिबंधनातून सुटका होते.” (रोमकर ७:२, ३) पाहताक्षणीच प्रेमात पडण्याची भावना काही काळापर्यंत सुखावह वाटेल, पण केवळ या भावनेच्या आधारावर आनंदी वैवाहिक जीवन उभारता येत नाही. तेव्हा, अविवाहित स्त्रीने स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, ‘मी या पुरुषाच्या बंधनात राहण्यास तयार आहे का?’ आणि या प्रश्नावर विचार तिने लग्नानंतर नव्हे, तर लग्नाआधी केला पाहिजे.
६. आज बऱ्याच स्त्रियांना कोणता निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे आणि हे इतके महत्त्वाचे का आहे?
६ आज जगातल्या बऱ्याच भागांत, लग्नाच्या प्रस्तावाला होकार अथवा नकार देण्याचे स्त्रीला स्वातंत्र्य असते. तरीपण, याबाबतीत सुज्ञपणाने निर्णय घेणे हे एका स्त्रीकरता अत्यंत कठीण असू शकते. कारण स्वभावतःच स्त्रियांना वैवाहिक जीवनातील जवळीक आणि प्रेम मिळवण्याची ओढ असते. यासंदर्भात एका लेखकाने लिहिले: “आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट करण्याची प्रबळ इच्छा असते तेव्हा सहसा आपण त्याबाबतीत पूर्ण माहिती न काढता बऱ्याच गोष्टी गृहीत धरून आणि फक्त आपल्याकरता अनुकूल असलेल्या माहितीकडेच लक्ष देऊन निर्णय घेण्याची गाढ शक्यता आहे—मग ही लग्न करण्याची इच्छा असो अथवा एखाद्या पर्वतावर चढण्याची इच्छा असो.” पर्वतावर चढण्याच्या बाबतीत पाहिल्यास, वस्तूस्थितीकडे दुर्लक्ष करून घेतलेल्या निर्णयामुळे गिर्यारोहकाला आपल्या प्राणास मुकावे लागू शकते; त्याप्रकारे, लग्नाच्या बाबतीत अविचारीपणे घेतलेला निर्णयसुद्धा अतिशय विनाशकारी ठरू शकतो.
७. विवाह जोडीदार निवडण्याच्या बाबतीत कोणता सुज्ञ सल्ला देण्यात आला आहे?
७ ज्या पुरुषाने आपल्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे त्याच्या नियमांच्या बंधनाखाली येण्यात काय काय समाविष्ट असू शकेल याचा त्या स्त्रीने गांभीर्याने विचार करावा. बऱ्याच
वर्षांपूर्वी, एका भारतीय तरुणीने असे कबूल केले: “आईवडील आपल्यापेक्षा वयाने व अनुभवाने मोठे असतात आणि आपली जितक्या सहजासहजी फसगत होऊ शकते तितकी त्यांच्याबाबतीत होऊ शकत नाही . . . माझ्या हातून अगदी सहज चूक होऊ शकते.” आईवडील व इतरजण याबाबतीत जी मदत देतात ती अतिशय मोलाची असते. एक सुज्ञ सल्लागार अनेक वर्षांपासून विवाहेच्छुक तरुणतरुणींना एकमेकांच्या आईवडिलांची ओळख करून घेण्याचे, तसेच भावी पती अथवा पत्नी आपल्या आईवडिलांशी व कुटुंबातील इतर सदस्यांशी कसे वागतो किंवा वागते याचे लक्षपूर्वक निरीक्षण करण्याचे प्रोत्साहन देतात.येशूने कशाप्रकारे अधीनता दाखवली?
८, ९. (क) देवाला अधीन राहण्याविषयी येशूचा कसा दृष्टिकोन होता? (ख) अधीन राहिल्याने कोणता चांगला परिणाम होऊ शकतो?
८ कोणाच्या अधीन राहणे सोपे नसले तरी स्त्रिया याला एक बहुमान म्हणून लेखू शकतात. येशूनेही असेच केले. देवाच्या अधीन राहण्याकरता त्याला बरेच दुःख सहन करावे लागले, इतकेच काय त्याला वधस्तंभावर खिळून जिवे मारण्यात आले तरीसुद्धा देवाला अधीन राहण्यात येशूने आनंद मानला. (लूक २२:४१-४४; इब्री लोकांस ५:७, ८; १२:३) स्त्रिया येशूकडे एक आदर्श म्हणून पाहू शकतात कारण बायबल सांगते की “स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे.” (१ करिंथकर ११:३) पण, स्त्रिया केवळ लग्न केल्यावरच पुरुषांच्या मस्तकपदाच्या अधीन येतात असे नाही.
९ बायबल स्पष्ट सांगते की स्त्रिया, मग त्या विवाहित असोत वा अविवाहित, त्यांनी ख्रिस्ती मंडळीत देखरेख करणाऱ्या व आध्यात्मिक पात्रता असणाऱ्या पुरुषांच्या मस्तकपदाच्या अधीन राहिले पाहिजे. (१ तीमथ्य २:१२, १३; इब्री लोकांस १३:१७) देवाच्या या मार्गदर्शनाचे स्त्रिया पालन करतात तेव्हा खरे तर त्या देवाच्या संघटनेतील व्यवस्थेत देवदूतांकरता अनुकरणीय असा आदर्श पुरवतात. (१ करिंथकर ११:८-१०) शिवाय, वयस्क विवाहित स्त्रिया आपल्या उत्तम उदाहरणाच्या व उपयुक्त सल्ल्याच्या माध्यमाने तरुण स्त्रियांना ‘आपआपल्या नवऱ्याच्या अधीन राहण्यास’ शिकवतात.—तीत २:३-५.
१०. येशूने अधीनतेच्या बाबतीत कशाप्रकारचे उदाहरण पुरवले?
१० अधीन राहणे किती महत्त्वाचे आहे याची येशूला जाणीव होती. एकदा, त्याने प्रेषित पेत्राला सांगितले की त्या दोघांच्या वतीने पेत्राने अधिकाऱ्यांना कर द्यावा. कर देण्याकरता आवश्यक असलेली रक्कमही त्याने पेत्राला मिळवून दिली. कालांतराने पेत्राने लिहिले: “प्रभूकरिता तुम्ही, माणसांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा.” (१ पेत्र २:१३; मत्तय १७:२४-२७) येशू अधीनतेचे सर्वात उल्लेखनीय उदाहरण आहे. त्याच्याविषयी आपण असे वाचतो: “त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने . . . मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.”—फिलिप्पैकर २:५-८.
११. ज्यांचे पती विश्वासात नाहीत अशा स्त्रियांना देखील पेत्राने आपआपल्या पतींच्या अधीन राहण्याचे प्रोत्साहन का दिले?
११ या जगाच्या कठोर, अन्यायी अधिकाऱ्यांच्याही अधीन राहण्याचे ख्रिश्चनांना प्रोत्साहन देताना पेत्राने असे स्पष्ट केले: “तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१) येशूला किती यातना सहन कराव्या लागल्या आणि त्याने कशाप्रकारे निमूटपणे सर्व सहन करण्याद्वारे अधीनता दाखवली याचे वर्णन केल्यावर पेत्राने विश्वासात नसलेल्या पुरुषांच्या पत्नींना असे प्रोत्साहन दिले: “तसेच स्त्रियांनो, तुम्हीहि आपआपल्या पतीच्या अधीन असा; ह्यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.”—१ पेत्र ३:१, २.
१२. येशूने अधीनता दाखवल्यामुळे कोणते चांगले परिणाम घडून आले?
१२ आपली थट्टा केली जाते किंवा आपला अपमान केला जातो तेव्हा देखील कोणाच्या अधीन राहणे हे दुबळेपणाचे लक्षण आहे असे समजले जाते. पण येशूचा असा दृष्टिकोन नव्हता. पेत्राने लिहिले: “त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही.” (१ पेत्र २:२३) ज्यांनी येशूला दुःख सहन करताना पाहिले त्यांच्यापैकी काहीजणांनी निदान काही प्रमाणात त्याच्यावर विश्वास ठेवला. उदाहरणार्थ, येशूच्या बाजूला वधस्तंभावर खिळलेला लुटारू आणि येशूला मृत्यूदंड देताना उपस्थित असणारा शताधिपती. (मत्तय २७:३८-४४, ५४; मार्क १५:३९; लूक २३:३९-४३) त्याचप्रकारे, पेत्राने सुचवले की विश्वासात नसलेले काही पती—अगदी, जे आपल्या पत्नींना छळतात ते देखील आपल्या पत्नींची अधीनता व चांगली वर्तणूक पाहून ख्रिस्ती बनतील. आपण अशी कित्येक उदाहरणे पाहिली आहेत.
पत्नी आपल्या पतीचे मन कसे जिंकू शकते?
१३, १४. विश्वासात नसणाऱ्या पतींना अधीन राहिल्यामुळे कोणते चांगले परिणाम दिसून आले आहेत?
१३ विश्वासात असणाऱ्या अनेक पत्नींनी ख्रिस्ताचे अनुकरण केल्यामुळे, आपल्या चांगल्या वर्तणुकीने पतींचे मन जिंकले आहे. यहोवाच्या साक्षीदारांच्या अलीकडे झालेल्या एका प्रांतीय अधिवेशनात एका पतीने आपल्या ख्रिस्ती पत्नीविषयी असे म्हटले: “मी तिच्याशी खूपच दुष्टपणे वागलो. तरीपण ती माझ्याशी अतिशय आदराने वागायची. एकदाही कधी तिने माझा अपमान केला नाही. स्वतःचे विश्वास माझ्यावर लादण्याचाही तिने कधी प्रयत्न केला नाही. उलट ती अतिशय प्रेमळपणे माझी काळजी घ्यायची. तिला संमेलनाला जायचे असल्यास ती आधीच सगळा स्वयंपाक आणि घरातले सर्व काम उरकायची. तिच्या अशा वागणुकीमुळेच माझ्या मनात बायबलविषयी कुतूहल निर्माण झाले. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासमोर उभा आहे!” हा पती त्याच्या पत्नीच्या उत्तम वागणुकीमुळे ‘वचनावाचून मिळवून घेतला गेला.’
१४ पेत्राने खुलासा केल्याप्रमाणे, सहसा पत्नीच्या बोलण्यामुळे नव्हे तर तिच्या कृतींमुळे उत्तम परिणाम दिसून येतात. एका स्त्रीच्या उदाहरणावरून हेच दिसून येते. बायबलमधील सत्याचे ज्ञान मिळाल्यावर तिने ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याचा निश्चय केला. एकदा ती सभेला जायला निघाली तेव्हा तिचा पती ओरडून म्हणाला: “ॲग्नेस, त्या दारातून बाहेर पाऊल ठेवलंस तर सांगून ठेवतो, पुन्हा घरात यायचं नाही!” त्याने सांगितल्याप्रमाणे ती “त्या दारातून” बाहेर न जाता दुसऱ्या दारातून गेली. पुढच्या आठवडी ती सभेला जायला निघाली तेव्हा तो म्हणाला: “परत येशील तेव्हा मी घरात नसेन.” आणि खरच ती परत आली तोपर्यंत तो निघून गेला होता. तीन दिवस तो घरी परत आला नाही. शेवटी जेव्हा तो परत आला तेव्हा तिने अगदी प्रेमाने त्याला विचारले: “भूक लागली असेल, वाढू का?” ॲग्नेसने यहोवाच्या भक्तीविषयी कधीही कोणतीच तडजोड केली नाही. शेवटी तिचा पती बायबल अभ्यास करण्यास तयार झाला आणि कालांतराने तो एक पर्यवेक्षक बनला व अनेक जबाबदाऱ्याही त्याच्यावर सोपवण्यात आल्या.
१५. पेत्र ख्रिस्ती पत्नींना कशारितीने स्वतःस ‘शोभविण्यास’ सांगतो?
१५ प्रेषित पेत्राने स्त्रियांना स्वतःला एका विशेष अर्थाने ‘शोभविण्याचे’ प्रोत्साहन दिले आणि वरील उदाहरणांतील स्त्रियांनी स्वतःला असेच शोभवले होते. ही शोभा “केसाचे गुंफणे” किंवा “उंची पोषाख करणे” यात नाही. उलट पेत्राने म्हटले: “जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा असावी.” हा आत्मा स्त्रीच्या आवाजावरून व बोलण्याच्या पद्धतीवरून दिसून येतो. हा आत्मा असलेली ख्रिस्ती स्त्री पतीला आव्हान देण्याच्या किंवा आपले हक्क मागण्याच्या अविर्भावात बोलणार नाही. अशारितीने ती आपल्या पतीबद्दल मनःपूर्वक आदर दाखवते.—१ पेत्र ३:३, ४.
शिकण्यासारखी उदाहरणे
१६. सारा ख्रिस्ती पत्नींकरता कशाप्रकारे एक उत्तम उदाहरण आहे?
१६ पेत्राने लिहिले: “पूर्वी, देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाहि आपआपल्या पतीच्या अधीन राहून आपणांस शोभवीत असत.” (१ पेत्र ३:५) या स्त्रियांना जाणीव होती की यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन करून त्याचे मन आनंदित केल्याने कौटुंबिक जीवनात आनंद आणि सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ मिळते. पेत्र अब्राहामची पत्नी सारा हिच्या उदाहरणाचा उल्लेख करतो. ती “अब्राहामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली.” साराने आपल्या देवभीरू पतीच्या निर्णयांना पाठिंबा दिला. देवाने त्याला एका दूर देशी जाण्याची आज्ञा दिली होती. साराने आपल्या आरामदायी जीवनशैलीचा त्याग केला, आणि आपला जीव देखील धोक्यात घातला. (उत्पत्ति १२:१, १०-१३) साराच्या निर्भय उदाहरणाबद्दल पेत्राने तिची प्रशंसा केली आणि ख्रिस्ती स्त्रियांना तिचे अनुकरण करण्यास सांगितले: “तुम्ही चांगले करीत राहिल्यास व कोणत्याहि भयप्रद गोष्टीला न घाबरल्यास, तुम्ही तिची मुले झाला आहा.”—१ पेत्र ३:६.
१७. ख्रिस्ती पत्नींना सल्ला देताना कदाचित पेत्राच्या मनात अबीगईलचे उदाहरण असण्याचीही का शक्यता आहे?
१७ अबीगईल ही देखील एक निर्भय स्त्री होती जिने देवावर विश्वास ठेवला आणि कदाचित पेत्राच्या मनात तिचे उदाहरण असावे. ती “बुद्धिमती” होती पण तिचा पती नाबाल हा “कठोर व वाईट चालीचा होता.” नाबालाने दावीद व त्याच्या माणसांना मदत करण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी नाबाल व त्याच्या संपूर्ण घराण्याचा खातमा करायचे ठरवले. पण अबीगईलने आपल्या घराण्याला वाचवण्याकरता लगेच पाऊल उचलले. तिने बरेच खाद्यपदार्थ गाढवांवर लादले आणि दावीद व त्याच्या माणसांना वाटेतच गाठले. दावीदाला पाहताच ती गाढवावरून उतरली, व त्याच्यापुढे जमिनीवर उपडी पडून तिने दंडवत घातले. तिच्या या कृतीमुळे दाविदाच्या मनावर परिणाम झाला. तो म्हणाला: “ज्याने तुला आज माझ्या भेटीस पाठविले तो इस्राएलाचा देव परमेश्वर धन्य! धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची!”—१ शमुवेल २५:२-३३.
१८. परपुरुषाने भुरळ पाडण्याचा प्रयत्न केल्यास, पत्नी कोणाच्या उदाहरणावर मनन करू शकतात आणि का?
१८ पत्नींकरता आणखी एक चांगले उदाहरण एका शुलेमकरीण तरुणीचे आहे. कारण ज्याच्याशी तिची मागणी झाली होती त्या गरीब मेंढपाळाला ती विश्वासू राहिली. एक श्रीमंत राजा तिच्या प्रेमात पडला आणि तिचे मन जिंकण्याकरता त्याने हरतऱ्हेने प्रयत्न केला तरीसुद्धा ती जराही डळमळली नाही. आपल्या प्रियकराबद्दल आपल्या मनातल्या भावना व्यक्त करीत तिने म्हटले: “आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे मला आपल्या बाहूंवर ठेव; कारण प्रेम मृत्यूसारखे प्रबळ आहे . . . प्रेम महाजलांच्यानेहि विझवणार नाही; महापुरांनाहि ते बुडवून टाकिता येणार नाही.” (गीतरत्न ८:६, ७) शुलेमकरिणीप्रमाणेच, लग्नाचा प्रस्ताव स्वीकारणाऱ्या प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीला एकनिष्ठ राहण्याचा व त्याचा मनापासून आदर करण्याचा निश्चय केला पाहिजे.
देवाकडून आणखी मार्गदर्शन
१९, २०. (क) पत्नींनी आपल्या पतींच्या अधीन का असावे? (ख) पत्नींकरता कोणते उत्तम उदाहरण पुरवण्यात आले आहे?
१९ शेवटी, या लेखाच्या मुख्य शास्त्रवचनाच्या संदर्भाकडे इफिसकर ५:२२) हे का आवश्यक आहे? “कारण,” हे वचन पुढे सांगते, “जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पति पत्नीचे मस्तक आहे.” या कारणास्तव पत्नींना असा आग्रह केला आहे की “मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीहि सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे.”—इफिसकर ५:२३, २४, ३३.
लक्ष द्या: “स्त्रियांनो, . . . आपआपल्या पतीच्या अधीन असा.” (२० या आज्ञेचे पालन करण्याकरता पत्नींनी ख्रिस्ताच्या अभिषिक्त अनुयायांच्या मंडळीचे परीक्षण करून त्यांच्या उदाहरणाचे अनुकरण करावे. कृपया २ करिंथकर ११:२३-२८ वाचा आणि या मंडळीच्या एका सदस्याने अर्थात प्रेषित पौलाने आपले मस्तक येशू ख्रिस्त याच्या अधीन राहण्याकरता काय काय सहन केले हे जाणून घ्या. पौलाप्रमाणे स्त्रियांनी तसेच सबंध मंडळीने एकनिष्ठपणे येशूला अधीन राहिले पाहिजे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या अधीन राहण्याद्वारे असे करतात.
२१. कोणत्या गोष्टी स्त्रियांना आपल्या पतीच्या अधीन राहण्याचे प्रोत्साहन देऊ शकतात?
२१ आजच्या काळात बऱ्याच स्त्रियांना आपल्या पतीच्या अधीन राहण्याची संकल्पना रुचत नाही पण एक सुज्ञ स्त्री याच्या फायद्यांकडे लक्ष देते. उदाहरणार्थ, विश्वासात नसलेल्या पतीच्या अधीन राहून देवाच्या कायद्यांच्या किंवा तत्त्वांच्या विरोधात नसलेल्या त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याद्वारे एका स्त्रीला ‘आपल्या पतीला तारण्याचे’ अद्भुत प्रतिफळ मिळू शकते. (१ करिंथकर ७:१३, १६) शिवाय, तिला हे जाणून समाधान मिळेल की आपल्या पतीच्या अधीन राहिल्यामुळे यहोवा देवाला आनंद वाटतो आणि त्याच्या प्रिय पुत्राचे अनुकरण केल्याबद्दल तो तिला विपूल आशीर्वाद देईल. (w०७ २/१५)
तुम्हाला आठवते का?
• पत्नीला आपल्या पतीच्या अधीन राहणे जड का जाऊ शकते?
• विवाहाचा प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय इतका गंभीर का आहे?
• येशू हा स्त्रियांकरता एक उत्तम आदर्श का आहे आणि त्याच्या आदर्शाचे अनुकरण केल्याने कोणते फायदे मिळू शकतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील चित्र]
लग्नाचा प्रस्ताव स्वीकारावा की नाही हे ठरवण्याचा निर्णय इतका गंभीर का आहे?
[१७ पानांवरील चित्र]
विवाहित स्त्रिया अबीगईल हिच्यासारख्या बायबलमधील उदाहरणांतून काय शिकू शकतात?