दुरात्मे—आपण त्यांचा प्रतिकार कसा करू शकतो?
दुरात्मे—आपण त्यांचा प्रतिकार कसा करू शकतो?
“ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांस [देवाने] निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले.”—यहूदा ६.
१, २. दियाबल सैतान व दुरात्मे यांच्याविषयी कोणते प्रश्न उभे राहतात?
“सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो,” असा इशारा प्रेषित पेत्र देतो. (१ पेत्र ५:८) दुरात्म्यांविषयी प्रेषित पौल म्हणाला: “तुम्ही भुतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुमच्याने प्रभूचा प्याला व भुतांचाहि प्याला पिववत नाही; प्रभूच्या मेजावरचे व भुतांच्याहि मेजावरचे तुमच्याने खाववत नाही.”—१ करिंथकर १०:२०, २१.
२ परंतु दियाबल सैतान व दुरात्मे कोण आहेत? ते कसे आणि केव्हा अस्तित्वात आले? देवाने त्यांना बनवले का? ते मानवांवर पाडत असलेला प्रभाव किती शक्तिशाली आहे? त्यांच्यापासून संरक्षण मिळवण्याचा मार्ग आहे का आणि असेल तर तो कोणता आहे?
सैतान आणि दुरात्मे अस्तित्वात आले कसे?
३. देवाचा एक दूत दियाबल सैतान कसा बनला?
३ मानव इतिहासाच्या सुरुवातीला एदेन बागेत आदाम आणि हव्वा हे पहिले मानव राहत होते तेव्हा देवाचा एक दूत बंडखोर बनला. का? कारण यहोवाच्या स्वर्गीय संघटनेत त्याला देण्यात आलेल्या जबाबदारीत तो संतुष्ट नव्हता. आदाम आणि हव्वेची निर्मिती झाल्यानंतर त्याने, त्या दोघांचे लक्ष स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केला; आदाम आणि हव्वा खऱ्या देवाच्या आज्ञेत राहतील आणि त्याची उपासना करतील याऐवजी त्यांनी आपली उपासना करावी आणि आपल्या आज्ञेत राहावे, असा विचार त्याच्या मनात आला. देवाविरुद्ध बंड करण्याद्वारे व पहिल्या मानवी दांपत्याला पापी मार्गाक्रमण करायला भाग पाडून या देवदूताने स्वतःला दियाबल सैतान बनवले. कालांतराने, इतरही देवदूत या बंडाळीत सामील झाले. ते कसे?—उत्पत्ति ३:१-६; रोमकर ५:१२; प्रकटीकरण १२:९.
४. नोहाच्या दिवसांतील जलप्रलयाआधी काही बंडखोर देवदूतांनी काय केले?
४ ईश्वरप्रेरित शास्त्रवचने आपल्याला सांगतात, की नोहाच्या दिवसांतील जलप्रलयाच्या काही काळ आधी, काही देवदूत पृथ्वीवरील स्त्रियांमध्ये असाधारण आवड घेऊ लागले. एका चुकीच्या उद्देशाने हे ‘देवपुत्र मानवकन्यांकडे उत्पत्ति ६:२-४) त्यामुळे ज्या देवदूतांनी देवाची आज्ञा मोडली ते यहोवाविरुद्ध बंड करणाऱ्या सैतानाच्या टोळीत सामील झाले.
त्या सुंदर आहेत या दृष्टीने पाहू लागले आणि त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या’ असे बायबल आपल्याला सांगते. हा संयोग अनैसर्गिक होता व या संयोगामुळे त्यांना नेफिलीम म्हटली जाणारी संकरीत संतती उत्पन्न झाली. (५. यहोवाने महापुराद्वारे नाश आणला तेव्हा या बंडखोरांचे काय झाले?
५ यहोवाने जेव्हा मानवजातीवर पूर आणला तेव्हा त्यात नेफिलीम आणि त्यांना जन्म देणाऱ्या त्यांच्या पृथ्वीवरील आयांचा नाश झाला. आणि बंडखोर देवदूतांना, त्यांनी धारण केलेली मानवी शरीरे सोडून पुन्हा आत्मिक जगात जावे लागले. परंतु देवाबरोबर त्यांचे पूर्वी जे “अधिकारपद” होते ते पद ते पुन्हा घेऊ शकले नाहीत. त्याऐवजी त्यांना तार्तारोस म्हटल्या जाणाऱ्या ‘निबिड काळोखात’ टाकण्यात आले.—यहूदा ६; २ पेत्र २:४, पं.र.भा.
६. दुरात्मे लोकांची फसगत कशी करत आहेत?
६ या दुष्ट देवदूतांनी “आपले [मूळ] अधिकारपद” गमावल्यापासून ते सैतानाचे दुरात्मे बनले आहेत आणि ते त्याच्याच दुष्ट इच्छा पूर्ण करत आहेत. तेव्हापासून दुरात्म्यांजवळून मानव शरीर धारण करण्याची शक्ती काढून घेण्यात आली आहे. परंतु, ते पुरुष व स्त्रियांना नाना प्रकारच्या विकृत लैंगिक कृत्यांत भाग घेण्यास भुरळ पाडू शकतात. हे दुरात्मे मानवांना, भुताटकीद्वारे देखील सक्रियपणे फसवत आहेत. भुताटकीत, जादूचे मंत्र, व्हूडू आणि तांत्रिक यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. (अनुवाद १८:१०-१३; २ इतिहास ३३:६) दियाबल सैतानाचे शेवटी जे होणार आहे तेच या दुष्ट आत्मिक देवदूतांचे देखील होणार आहे—चिरकालिक नाश. (मत्तय २५:४१; प्रकटीकरण २०:१०) पण हे होईपर्यंत आपण भक्कम राहून त्यांचा प्रतिकार केला पाहिजे. सैतान किती शक्तिशाली आहे आणि आपण त्याचा आणि त्याच्या दुरात्म्यांचा यशस्वीरीत्या प्रतिकार कसा करू शकतो, यावर विचार करून आपण सुज्ञपणा दाखवू शकतो.
सैतान किती शक्तिशाली आहे?
७. सैतानाचा जगावर कितपत कब्जा आहे?
७ सैतानाने संपूर्ण मानव इतिहासात यहोवाची निंदा केली आहे. (नीतिसूत्रे २७:११) आणि त्याने बहुतांश मानवजातीवर आपला प्रभाव पाडला आहे. १ योहान ५:१९ म्हणते: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” म्हणून दियाबल सैतान येशूला ‘जगातील सर्व राज्यांचा’ अधिकार व गौरव देण्याचे आमीष दाखवू शकला. (लूक ४:५-७) सैतानाविषयी प्रेषित पौलाने म्हटले: “परंतु आमची सुवार्ता आच्छादिलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादिलेली आहे. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.” (२ करिंथकर ४:३, ४) सैतान वास्तविकतेत “लबाड व लबाडीचा बाप आहे” परंतु तो ‘तेजस्वी देवदूत’ असल्याचे भासवत राहतो. (योहान ८:४४; २ करिंथकर ११:१४) जगाच्या शासकांची व त्यांच्या अनुयायांची मने अंधळी करण्याची त्याच्याजवळ शक्ती आहे आणि वेगवेगळ्या पद्धती देखील आहेत. चुकीची माहिती, धार्मिक मिथ्या आणि लबाडी यांच्याद्वारे तो मानवजातीची दिशाभूल करत आला आहे.
८. सैतानाच्या प्रभावाविषयी बायबल काय सूचित करते?
८ आपल्या सामान्य युगाच्या सुमारे पाच शतके आधी अर्थात संदेष्टा दानीएल याच्या काळात जे घडले त्यावरून, सैतानाजवळ किती शक्ती आहे आणि तो लोकांना कितपत प्रभावीत करू शकतो ते दिसून येते. यहोवाने दानीएलाला प्रोत्साहनकारक संदेश देण्याकरता एका देवदूताला धाडले तेव्हा “पारसाच्या राज्याचा [आत्मिक] अधिपति” या देवदूताच्या आडवा आला. “मुख्य अधिपतीपैकी एक मीखाएल” त्याच्याकडून साहाय्य येईपर्यंत या देवदूताला २१ दिवसांपर्यंत अडवण्यात आले होते. तोच अहवाल पुढे ‘ग्रीसच्या [दुरात्मिक] अधिपतिविषयी’ देखील सांगतो. (दानीएल १०:१२, १३, २०) आणि प्रकटीकरण १३:१, २ मध्ये सैतानाला “अजगर” असे चित्रित करण्यात आले आहे जो राजकीय श्वापदाला “आसन व मोठा अधिकार” देतो.
९. ख्रिश्चनांना कोणाविरुद्ध लढा द्यावा लागतो?
९ प्रेषित पौलाने लिहिले: “आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या इफिसकर ६:१२) आजही, दियाबल सैतानाच्या प्रभावाखाली हे दुरात्मे अदृश्यपणे मानवी शासकांवर प्रभाव पाडून त्यांना, जातीसंहार, दहशतवाद आणि हत्या यासारखी अवर्णनीय कृत्ये करायला भाग पाडतात. या शक्तिशाली प्राण्यांचा आपण यशस्वीरीत्या प्रतिकार कसा करू शकतो याचे आता आपण परीक्षण करूया.
दुरात्म्यांबरोबर आहे.” (दुरात्म्यांपासून संरक्षण मिळवण्याचे मार्ग कोणते?
१०, ११. आपण सैतान व त्याच्या दुरात्म्यांचा प्रतिकार कसा करू शकतो?
१० आपल्या स्वतःच्या शारीरिक अथवा मानसिक हिकमतीवर आपण सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांचा प्रतिकार करू शकत नाही. पौल आपल्याला असा सल्ला देतो: “प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा.” संरक्षण मिळण्यासाठी आपण यहोवाकडे वळाले पाहिजे. पौल पुढे म्हणतो: सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची [“संपूर्ण,” NW] शस्त्रसामग्री धारण करा. . . . तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करिता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या.”—इफिसकर ६:१०, ११, १३.
११ पौल दोनदा सहख्रिश्चनांना ‘देवाची [संपूर्ण] शस्त्रसामग्री धारण करण्यास’ आर्जवतो. ‘संपूर्ण’ या शब्दावरून, दुरात्म्यांच्या हल्ल्याचा अर्ध्या मनाने नव्हे तर संपूर्ण मनाने प्रतिकार करण्याची गरज आहे हे सूचित होते. तेव्हा, दुरात्म्यांचा प्रतिकार करण्याकरता आज ख्रिश्चनांनी आध्यात्मिक शस्त्रसामग्रीतील कोणकोणती महत्त्वाची शस्त्रे तातडीने धारण करणे आवश्यक आहे?
‘दृढ उभे राहा’—कसे?
१२. ख्रिस्ती आपली कंबर सत्याने कशी कसू शकतात?
१२ पौल म्हणतो: “आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा.” (इफिसकर ६:१४) येथे उल्लेख करण्यात आलेली दोन शस्त्रे, एक कमरपट्टा आणि दुसरे उरस्त्राण आहे. सैनिकाला आपल्या कटिबंधाचे (कंबर, जांघ आणि ओटीपोटाचे) संरक्षण करण्याकरता व आपल्या भारी तलवारीचे वजन पेलण्याकरता कमरपट्टा घालावाच लागत होता. तसेच, आपण बायबल सत्ये जणू काय आपल्या भोवती घट्ट बांधले पाहिजे जेणेकरून आपण त्यांच्यानुसार जीवन व्यतीत करू. बायबलचे नियमित वाचन करण्यासाठी आपण आराखडा बनवला आहे का? संपूर्ण कुटुंब मिळून बायबल वाचन करतो का? कुटुंब मिळून दैनिक वचन वाचण्याचा आपला नित्यक्रम आहे का? याशिवाय, ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ पुरवत असलेल्या प्रकाशनांतील अद्ययावत स्पष्टीकरणाशी आपण परिचित आहोत का? (मत्तय २४:४५) या सर्व गोष्टी आपण करत असू तर त्याचा अर्थ आपण पौलाच्या सल्ल्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. शास्त्रवचनीय मार्गदर्शन पुरवण्याकरता आपल्याजवळ व्हिडीओ आणि डीव्हिडी देखील आहेत. सत्याला घट्ट चिकटून राहिल्याने आपण सुज्ञ निर्णय घेऊ शकू आणि चुकीच्या मार्गावर जाण्यापासून आपले संरक्षण होऊ शकेल.
१३. आपण आपल्या लाक्षणिक हृदयाचे संरक्षण कसे करू शकतो?
१३ उरस्त्राणामुळे सैनिकाची छाती, हृदय आणि इतर महत्त्वाचे अंग सुरक्षित राहत असत. देवाच्या धार्मिक स्तरांबद्दल प्रेम विकसित करून व या स्तरांनुसार जीवन व्यतीत करून ख्रिस्ती आपल्या लाक्षणिक हृदयाचे—आंतरिक मनुष्याचे—संरक्षण करू शकतात. लाक्षणिक उरस्त्राण, देवाचे वचन जे सांगते त्याचे गांभीर्य कमी करण्यापासून आपले संरक्षण करू शकते. आपण जसजसे ‘वाईटाचा द्वेष करून बऱ्याची आवड धरू लागू’ तसतसे आपण आपली पावले ‘प्रत्येक वाईट मार्गापासून आवरू’ शकू.—आमोस ५:१५; स्तोत्र ११९:१०१.
१४. “शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा” या वाक्यांशाचा काय अर्थ होतो?
इफिसकर ६:१५) याचा अर्थ आपण कार्य करण्यास सज्ज आहोत. प्रत्येक सुयोग्य प्रसंगी देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्यास आपण तयार असतो. (रोमकर १०:१३-१५) ख्रिस्ती सेवेत सक्रिय राहिल्याने सैतानाच्या ‘डावपेचांपासून’ आपले संरक्षण होते.—इफिसकर ६:११.
१४ रोमन सैनिक सहसा आपल्या पायात चांगल्याप्रकारची पादत्राणे घालत यामुळे ते रोमन साम्राज्यात पसरलेल्या उभ्या-आडव्या महामार्गांवरून शेकडो मैलांचा प्रवास पायी करू शकत होते. “शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा” या वाक्यांशाचा ख्रिश्चनांसाठी काय अर्थ होतो? (१५. (क) विश्वासाची मोठी ढाल महत्त्वाची आहे हे कशावरून कळते? (ख) कोणकोणत्या ‘जळत्या बाणांचा’ आपल्या विश्वासावर हानीकारक प्रभाव पडू शकतो?
१५ पौल पुढे म्हणतो: “या सर्वांवर ज्या विश्वासरूपी [मोठ्या] ढालीने त्या दुष्टाचे सर्व जळते बाण तुम्हाला विझवता येतील ती धरून उभे राहा.” (इफिसकर ६:१६, पं.र.भा.) विश्वासाची ढाल हाती घेण्याचा सल्ला देण्याआधी “या सर्वांवर” हा वाक्यांश वापरण्यात आला आहे. यावरून, हे शस्त्र अतिशय महत्त्वाचे असल्याचे सूचित होते. आपल्या विश्वासात कसलीही कमतरता असता कामा नये. एका मोठ्या संरक्षणात्मक ढालीप्रमाणे आपला विश्वास सैतानाच्या ‘जळत्या बाणांपासून’ आपले संरक्षण करतो. आज जळते बाण कदाचित काय असू शकतात? ते, आपला विश्वास कमकुवत बनवण्याकरता शत्रूंनी व धर्मत्यागी लोकांनी आपला केलेला मर्मभेदक अपमान, आपल्याविषयी पसरवलेल्या लबाड्या आणि अर्ध-सत्ये असू शकतात. याशिवाय, हे “बाण” धनसंपत्ती मिळवण्याचे मोह देखील असू शकतात. या मोहांमुळे आपण वस्तू गोळा करण्यात गुंग होऊन जातो; इतकेच नव्हे तर जे अशा दिखावा करण्याच्या जीवनशैलीच्या पाशात पडले आहेत त्यांची बरोबरी करण्यास आपण कदाचित प्रवृत्त होऊ. दिखावा करणारे लोक मोठमोठ्या व सगळ्या सुखसोयी असलेल्या बंगल्यांत आणि भारी मोटारगाड्यांमध्ये आपले पैसे गुंतवतात किंवा आपले किंमती दागदागिने व अत्याधुनिक फॅशन्सचे कपडे घालून मिरवत असतात. इतर लोक काहीही करोत, आपला विश्वास मात्र, हे “जळते बाण” चुकवण्याइतपत भक्कम असला पाहिजे. आपण आपला विश्वास भक्कम करून तो तसाच कसा टिकवून ठेवू शकतो?—१ पेत्र ३:३-५; १ योहान २:१५-१७.
१६. कोणत्या गोष्टीने आपण आपला विश्वास भक्कम करू शकतो?
१६ आपण नियमित व्यक्तिगत बायबल अभ्यास आणि मनःपूर्वक प्रार्थना यांद्वारे देवाच्या समीप जाऊ शकतो. आपला विश्वास भक्कम करण्यासाठी आपण यहोवाला विनंती करू शकतो आणि आपल्या प्रार्थनांच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्ये देखील करू शकतो. जसे की, दर आठवडी होत असलेल्या टेहळणी बुरूज अभ्यासाच्या वेळी टिपणी देता यावी या उद्देशाने आपण त्या लेखाची काळजीपूर्वक तयारी करतो का? आपण बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनांचा अभ्यास केला तर आपला विश्वास भक्कम होईल.—इब्री लोकांस १०:३८, ३९; ११:६.
१७. आपण ‘तारणाचे शिरस्त्राण’ कसे घेऊ शकतो?
१७ आध्यात्मिक शस्त्रसामग्रीचे वर्णन दिल्यानंतर पौल आपल्या सल्ल्याच्या समारोपात असे म्हणतो: “तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या.” (इफिसकर ६:१७) शिरस्त्राणामुळे सैनिकाचे डोके आणि निर्णयक्षमतेचे केंद्र असलेला मेंदू सुरक्षित राहत असे. त्याचप्रकारे, आपली ख्रिस्ती आशा आपल्या मानसिक क्षमतांचे संरक्षण करते. (१ थेस्सलनीकाकर ५:८) आपले मन जगिक ध्येयांनी व भौतिक स्वप्नांनी भरण्याऐवजी आपण येशूने केले त्याप्रमाणे देवाने आपल्याला दिलेल्या आशेवर आपले विचार केंद्रित करावे.—इब्री लोकांस १२:२.
१८. नियमित बायबल वाचनाच्या परिपाठाकडे आपण का दुर्लक्ष करता कामा नये?
१८ सैतान आणि त्याच्या दुरात्म्याच्या प्रभावापासून आपल्याला सुरक्षा देणारे शेवटले शस्त्र आहे देवाचे वचन अर्थात बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आलेला संदेश. हे आणखी एक कारण आहे, की आपण आपल्या नियमित बायबल वाचनाकडे दुर्लक्ष का करू नये. देवाच्या वचनाचे अचूक व सखोल ज्ञान, सैतानाच्या लबाड्यांपासून, दुरात्मे करत असलेल्या भडिमारापासून आणि धर्मत्यागी लोकांच्या कटू प्रकाशनांपासून आपले संरक्षण करते.
‘सर्व प्रसंगी प्रार्थना करा’
१९, २०. (क) सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांचे काय होणार आहे? (ख) कोणती गोष्ट आपल्याला आध्यात्मिकरीत्या मजबूत करू शकते?
१९ सैतान, त्याचे दुरात्मे आणि या दुष्ट जगाचे फार कमी दिवस उरले आहेत. “आपला काळ थोडा आहे,” हे सैतानाला माहीत आहे. जे “देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे” आहेत त्यांच्यावर तो अत्यंत क्रोधीत आहे व त्यांच्याशी तो लढा देतो. (प्रकटीकरण १२:१२, १७) त्यामुळे आपण सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांचा प्रतिकार करणे आवश्यक आहे.
२० देवाकडून मिळत असलेली संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करण्याविषयी आपल्याला मिळत असलेल्या सल्ल्याबद्दल आपण किती कृतज्ञ असले पाहिजे! पौल, आध्यात्मिक शस्त्रसामग्रीची चर्चा या सल्ल्याने समाप्त करतो: “सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा.” (इफिसकर ६:१८) प्रार्थना आपल्याला आध्यात्मिकरीत्या मजबूत करू शकते आणि जागृत राहण्यास मदत करू शकते. तेव्हा आपण पौलाच्या शब्दांचा आपल्यावर परिणाम होऊ देऊ व सर्व प्रसंगी प्रार्थना करीत राहूया कारण यामुळेच आपल्याला सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळेल. (w०७ ३/१५)
तुम्ही काय शिकलात?
• सैतान आणि त्याचे दुरात्मे अस्तित्वात कसे आले?
• दियाबल किती शक्तिशाली आहे?
• सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांपासून संरक्षण मिळण्याकरता आपल्याजवळ काय आहे?
• आपण देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री कशी धारण करू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१७ पानांवरील चित्रे]
“मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले”
[१९ पानांवरील चित्र]
आपल्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीतील सहा शस्त्रे कोणकोणती आहेत हे तुम्हाला सांगता येईल का?
[२० पानांवरील चित्रे]
या कार्यांत भाग घेतल्याने सैतान व त्याच्या दुरात्म्यांपासून आपले संरक्षण कसे होते?