व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रेमळ मेंढपाळांच्या नम्रपणे अधीन व्हा

प्रेमळ मेंढपाळांच्या नम्रपणे अधीन व्हा

प्रेमळ मेंढपाळांच्या नम्रपणे अधीन व्हा

“आपल्या अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा.”—इब्री लोकांस १३:१७.

१, २. यहोवा आणि येशू प्रेमळ मेंढपाळ आहेत हे कोणती शास्त्रवचने दाखवून देतात?

यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त हे प्रेमळ मेंढपाळ आहेत. यशयाने अशी भविष्यवाणी केली: “पाहा, प्रभु परमेश्‍वर पराक्रम्यासारखा येत आहे; त्याचा भुज त्याचे प्रभुत्व चालवील; . . . मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील. कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील. आणि पोरे पाजणाऱ्‍यांस संभाळून नेईल.”—यशया ४०:१०, ११.

सा.यु.पू. ५३७ मध्ये यहुदी शेष यहूदास परतला तेव्हा पुनर्स्थापनेची ही भविष्यवाणी पहिल्यांदा पूर्ण झाली. (२ इतिहास ३६:२२, २३) महान कोरेश अर्थात येशू ख्रिस्ताने १९१९ मध्ये अभिषिक्‍त शेषांना ‘मोठ्या बाबेलीतून’ सोडवले तेव्हा पुन्हा एकदा या भविष्यवाणीची पूर्णता झाली. (प्रकटीकरण १८:२; यशया ४४:२८) येशू ख्रिस्त यहोवाचा “भुज” आहे जो प्रभुत्व चालवतो, मेंढरांना एकत्र करतो आणि त्यांची प्रेमळ काळजी घेऊन त्यांचे नेतृत्त्व करतो. स्वतः येशू असे म्हणाला: “मी उत्तम मेंढपाळ आहे; . . . जे माझे आहेत त्यांना मी ओळखितो व जे माझे आहेत ते मला ओळखतात.”—योहान १०:१४.

३. आपल्या मेंढरांना ज्याप्रकारे वागवले जात आहे त्याबद्दल यहोवा प्रेमळ काळजी कशी दाखवतो?

यहोवा किती कोमलतेने आपल्या लोकांचा सांभाळ करतो यावर यशया ४०:१०, ११ मधील भविष्यवाणी जोर देते. (स्तोत्र २३:१-६) आपल्या पृथ्वीवरील सेवेदरम्यान येशूने देखील आपल्या शिष्यांबद्दल आणि सर्वसामान्यपणे लोकांबद्दल प्रेमळ काळजी दाखवली. (मत्तय ११:२८-३०; मार्क ६:३४) इस्राएल राष्ट्रातील मेंढपाळ किंवा पुढारी, आपल्या कळपाकडे दुर्लक्ष करत होते, त्यांना फसवत होते; ही अतिशय लज्जास्पद गोष्ट होती. या पुढाऱ्‍यांच्या निष्ठुरतेबद्दल यहोवा आणि येशू या दोघांनी खेद व्यक्‍त केला. (यहेज्केल ३४:२-१०; मत्तय २३:३, ४, १५) यहोवाने असे वचन दिले: “मी आपल्या कळपाचा बचाव करीन, म्हणजे ते इतःपर दुसऱ्‍यांचे भक्ष्य होणार नाहीत; मी मेंढरामेंढरांमध्ये निवाडा करीन. त्यांवर मी एक मेंढपाळ नेमून त्यांस चारीन; तो कोण तर माझा सेवक दावीद; तो त्यास चारील; तो त्यांचा मेंढपाळ होईल.” (यहेज्केल ३४:२२, २३) युगाच्या समाप्तीच्या या काळात महान दावीद येशू ख्रिस्तच तो “एक मेंढपाळ” आहे ज्याला यहोवाने पृथ्वीवरील आपल्या सर्व सेवकांवर अर्थात आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांवर आणि ‘दुसऱ्‍या मेंढरांवर’ नेमले आहे.—योहान १०:१६.

मंडळीला मिळालेली स्वर्गीय देणगी

४, ५. (क) पृथ्वीवरील आपल्या लोकांना यहोवाने कोणती अमूल्य देणगी दिली आहे? (ख) येशूने आपल्या मंडळीला कोणती देणगी दिली आहे?

पृथ्वीवरील आपल्या सेवकांवर “एक मेंढपाळ” अर्थात येशू ख्रिस्ताला नेमून यहोवाने ख्रिस्ती मंडळीला एक अमूल्य देणगी दिली आहे. स्वर्गीय नेत्याच्या या देणगीविषयी यशया ५५:४ मध्ये अशी भविष्यवाणी करण्यात आली होती: “पाहा, मी त्यास राष्ट्राचा साक्षी, राष्ट्राचा नेता व शास्ता नेमिले आहे.” अभिषिक्‍त ख्रिस्ती आणि ‘मोठ्या लोकसमुदायाचे’ सदस्य या दोघांना सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यांतून एकत्र केले जात आहे. (प्रकटीकरण ५:९, १०; ७:९) यांची एक आंतरराष्ट्रीय मंडळी बनते अर्थात “एक कळप” बनतो व त्यांच्यावर “एक मेंढपाळ” अर्थात येशू ख्रिस्त नेतृत्त्व करतो.

येशूनेही पृथ्वीवरील आपल्या मंडळीला एक अमूल्य देणगी दिली आहे. त्याने विश्‍वासू सहमेंढपाळ दिले आहेत जे यहोवा आणि येशूचे अनुकरण करून कळपाची प्रेमळपणे काळजी घेतात. इफिससमधील ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलाने या प्रेमळ देणगीचा उल्लेख केला. त्याने असे लिहिले: “त्याने उच्चस्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले व मानवांना [“मानवरूपी,” NW] देणग्या दिल्या.’ आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले; ते ह्‍यासाठी की, त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे.”—इफिसकर ४:८, ११, १२.

६. वडील वर्गात सेवा करणाऱ्‍या अभिषिक्‍त पर्यवेक्षकांचे प्रकटीकरण १:१६, २० मध्ये कशाप्रकारे चित्रण करण्यात आले आहे आणि दुसऱ्‍या मेंढरांपैकी नियुक्‍त केलेल्या वडिलांविषयी काय म्हणता येईल?

“मानवरूपी देणग्या” म्हणून असलेले हे पर्यवेक्षक किंवा वडील जन आहेत ज्यांना यहोवाने आपल्या पुत्रमार्फत, पवित्र आत्म्याद्वारे कळपाचे नेतृत्त्व कोमलतेने करण्यासाठी नियुक्‍त केले आहे. (प्रेषितांची कृत्ये २०:२८, २९) सुरुवातीला हे पर्यवेक्षक सर्व अभिषिक्‍त ख्रिस्ती पुरुष होते. अभिषिक्‍त मंडळीत वडील वर्गात सेवा करणाऱ्‍यांचे प्रकटीकरण १:१६, २० मध्ये “तारे,” किंवा ख्रिस्ताच्या उजव्या हातातील अर्थात त्याच्या अधिकाराधीन असलेले “दूत” असे चित्रण केले आहे. परंतु या अंत समयात पृथ्वीवरील अभिषिक्‍त पर्यवेक्षकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि मंडळ्यांतील बहुतेक ख्रिस्ती वडील जन दुसऱ्‍या मेंढरांतील आहेत. या वडिलांना नियमन मंडळाच्या प्रतिनिधींकरवी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे नियुक्‍त केले जात असल्यामुळे ते देखील उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्त याच्या उजव्या हाताखाली (किंवा, मार्गदर्शनाखाली) आहेत असे उचितपणे म्हणता येते. (यशया ६१:५, ६) आपल्या मंडळ्यांतील वडील जन, मंडळीचा मस्तक असलेल्या ख्रिस्ताच्या अधीन असल्यामुळे, ते आपले पूर्ण सहकार्य मिळण्यास पात्र आहेत.—कलस्सैकर १:१८.

आज्ञेत राहणे व अधीन असणे

७. ख्रिस्ती पर्यवेक्षकांबद्दल आपण कोणती मनोवृत्ती बाळगली पाहिजे याविषयी प्रेषित पौलाने काय सल्ला दिला?

आपले स्वर्गीय मेंढपाळ यहोवा देव आणि येशू ख्रिस्त आपल्याकडून अशी अपेक्षा करतात, की मंडळीमध्ये त्यांनी ज्यांना जबाबदारपदी नियुक्‍त केले आहे त्या सहमेंढपाळांच्या आपण आज्ञेत राहिले पाहिजे व अधीन असले पाहिजे. (१ पेत्र ५:५) ईश्‍वरप्रेरणेने प्रेषित पौलाने असे लिहिले: “जे तुमचे अधिकारी होते ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा. आपल्या अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करितात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.”—इब्री लोकांस १३:७, १७.

८. पौल आपल्याला कोणती गोष्ट ‘लक्षात आणण्याचे’ उत्तेजन देतो व आपण “आज्ञेत” कसे राहू शकतो?

पौल आपल्याला या वडिलांच्या विश्‍वासू वर्तणुकीचा परिणाम “लक्षात आणून” अर्थात त्याची काळजीपूर्वक दखल घेऊन विश्‍वासाच्या ह्‍या उत्तम उदाहरणांचे अनुकरण करण्यास सांगतो, याची नोंद घ्या. शिवाय, तो आपल्याला या नियुक्‍त पुरुषांच्या आज्ञेत राहण्यास व त्यांच्याकडून येणाऱ्‍या मार्गदर्शनाच्या अधीन राहण्यास सांगतो. बायबल विद्वान आर. टी. फ्रान्स सांगतात, की “आज्ञेत राहा” असे ज्याचे भाषांतर केले आहे तो मूळ ग्रीक भाषेतला शब्द, “आज्ञेत राहण्याविषयी जो शब्द सहसा वापरला जातो तो नसून अक्षरशः अर्थाने ‘पटवणे’ या अर्थाचा शब्द आहे ज्यावरून आपल्या नेत्याचा स्वखुषीने स्वीकार करणे हा अर्थ सूचित होतो.” आपण वडिलांच्या आज्ञेत फक्‍त यासाठीच राहत नाही कारण देवाचे वचन आपल्याला त्यांच्या आज्ञेत राहण्यास सांगते तर आपल्याला असे पटवून देण्यात आले आहे, की या वडिलांना आपल्या आध्यात्मिकतेची आणि आपल्या कल्याणाची काळजी आहे. आपण त्यांच्या नेतृत्त्वाचा आनंदाने स्वीकार केला तर आपण निश्‍चितच आनंदी होऊ.

९. आज्ञेत राहण्याबरोबर “अधीन” असणे देखील का आवश्‍यक आहे?

परंतु एखाद्या विशिष्ट गोष्टीत वडिलांचे मार्गदर्शन उचित असेल, याची आपल्याला खात्री नसते तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया दाखवावी? अशाप्रसंगी आपण अधीनता दाखवली पाहिजे. सर्वकाही स्पष्ट असते आणि आपल्यालाही सर्व काही पटते तेव्हा आज्ञेत राहणे सोपे असते परंतु वडिलांनी दिलेले मार्गदर्शन कधीकधी आपल्याला समजत नाही तेव्हा सुद्धा आपण ते कबूल करून दाखवून देतो की आपण त्यांच्या अधीन आहोत. पेत्र जो नंतर एक प्रेषित बनला त्याने अशाप्रकारची अधीनता दाखवली.—लूक ५:४, ५.

आनंदाने सहकार्य देण्याकरता चार कारणे

१०, ११. कोणत्याप्रकारे पर्यवेक्षकांनी पहिल्या शतकात आपल्या सहख्रिश्‍चनांना “देवाचे वचन सांगितले” आणि आजही ‘सांगत’ आहेत?

१० इब्री लोकांस १३:७, १७ मध्ये वर सांगितल्याप्रमाणे प्रेषित पौल आपल्याला, आपण ख्रिस्ती पर्यवेक्षकांच्या आज्ञेत व अधीन का असले पाहिजे याची चार कारणे देतो. पहिले कारण हे आहे, की त्यांनी आपल्याला “देवाचे वचन सांगितले” आहे. येशूने मंडळीला दिलेल्या ‘मनुष्यरुपी देणग्या’ ‘पवित्र जनांस सिद्ध करण्याकरता’ आहेत याची आठवण करा. (इफिसकर ४:११, १२) विश्‍वासू सहमेंढपाळांच्याद्वारे त्याने पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांची विचारसरणी व वर्तन सुधारले; यांपैकी काही मेंढपाळांना निरनिराळ्या मंडळ्यांना पत्र लिहिण्याची प्रेरणा देण्यात आली. अशा आत्म्याने अभिषिक्‍त पर्यवेक्षकांचा उपयोग त्याने आरंभिच्या ख्रिश्‍चनांना मार्गदर्शन देण्यासाठी व त्यांची उभारणी करण्यासाठी केला.—१ करिंथकर १६:१५-१८; २ तीमथ्य २:२; तीत १:५.

११ आज, येशू आपल्याला ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ मार्गदर्शन देतो. नियमन मंडळ आणि नियुक्‍त वडील हे या विश्‍वासू व बुद्धिमान दासाचे प्रतिनिधीत्व करतात. (मत्तय २४:४५) “मुख्य मेंढपाळ” येशू ख्रिस्त याच्याबद्दल आपल्याला आदर असल्यामुळे आपण पौलाने दिलेला हा सल्ला अनुसरतो: “तुम्हामध्ये जे श्रम करितात, प्रभूमध्ये तुम्हावर असतात व तुम्हास बोध करितात त्यांचा तुम्ही सन्मान करावा.”—१ पेत्र ५:४; १ थेस्सलनीकाकर ५:१२; १ तीमथ्य ५:१७.

१२. पर्यवेक्षक “[आपल्या] जिवांची राखण करितात” ती कशी?

१२ ख्रिस्ती पर्यवेक्षकांना सहकार्य देण्याचे दुसरे कारण हे आहे की, ते “[आपल्या] जिवांची राखण करितात.” आपल्या मनोवृत्तीत किंवा वर्तनात त्यांना असे काही आढळून आले की ज्यामुळे आपल्या आध्यात्मिकतेस धोका पोहंचू शकतो तर ते लगेच आपली सुधारणूक करण्याच्या हेतूने आपल्याला आवश्‍यक तो सल्ला देतात. (गलतीकर ६:१) “राखण” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा अक्षरशः अर्थ “जागे राहणे” असा होतो. एका बायबल विद्वानानुसार तो शब्द, “मेंढपाळांची अविरत दक्षता” सूचित करतो. आध्यात्मिक दक्षता टिकवून ठेवण्यासोबतच आपल्या आध्यात्मिक आरोग्याच्या काळजीमुळे कधीकधी वडिलांना झोप लागत नसेल. “मेंढरांचा महान मेंढपाळ” येशू ख्रिस्त याच्या कोमल काळजीचे अनुकरण करण्याचा कसोशीने प्रयत्न करणाऱ्‍या अशा प्रेमळ सहमेंढपाळांना आपण आनंदाने सहकार्य देऊ नये का?—इब्री लोकांस १३:२०.

१३. पर्यवेक्षकांना व सर्व ख्रिश्‍चनांना कोणाला व कशाप्रकारे जाब द्यायचा आहे?

१३ पर्यवेक्षकांना आपण आनंदाने सहकार्य देण्याचे तिसरे कारण हे आहे, की “आपणास हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते” आपल्या जिवांची राखण करितात. पर्यवेक्षकांना ही गोष्ट सतत आठवणीत असते, की ते स्वर्गीय मेंढपाळ यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांच्याबरोबर सेवा करणारे सहमेंढपाळ आहेत. (यहेज्केल ३४:२२-२४) यहोवा मेंढरांचा मालक आहे. या मेंढरांना त्याने “आपल्या पुत्राच्या रक्‍ताने विकत घेतले आहे.” नियुक्‍त पर्यवेक्षकांना यहोवाच्या कळपाची “दयामाया” असली पाहिजे; कारण ते ज्याप्रकारे त्याच्या कळपाशी व्यवहार करतात त्याबद्दल तो त्यांच्याकडून हिशेब मागणार आहे. (प्रेषितांची कृत्ये २०:२८ NW, २९) त्यामुळे यहोवाने दिलेल्या मार्गदर्शनाला आपण ज्याप्रकारे प्रतिसाद देतो त्याबद्दल आपल्या प्रत्येकाला त्याला जाब द्यायचा आहे. (रोमकर १४:१०-१२) मंडळीचा मस्तक असलेल्या ख्रिस्ताच्या आपण अधीन आहोत याचा पुरावा आपण, नियुक्‍त वडिलांच्या आज्ञेत राहून देतो.—कलस्सैकर २:१९.

१४. कोणत्या कारणांमुळे ख्रिस्ती पर्यवेक्षक ‘कण्हू’ लागतील व यामुळे काय होईल?

१४ पौल आपल्याला, आपण ख्रिस्ती पर्यवेक्षकांच्या नम्रपणे अधीन का असले पाहिजे त्याचे चवथे कारण देतो. तो लिहितो: “ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.” (इब्री लोकांस १३:१७) ख्रिस्ती वडिलांवर शिकवण्याची, मेंढरांचे पालन करण्याची, प्रचार कार्यात पुढाकार घेण्याची, स्वतःच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याची आणि मंडळीतील समस्या सोडवण्याची भारी जबाबदारी आहे. (२ करिंथकर ११:२८, २९) आपण त्यांना सहकार्य दिले नाही तर आपण त्यांच्या ओझ्यात आणखी भर पाडू. यामुळे ते ‘कण्हू’ लागतील. आपण जर वडिलांना सहकार्य दिले नाही तर यहोवाला वाईट वाटेल आणि हे आपल्या हिताचे होणार नाही. याऐवजी आपण वडिलांचा योग्य आदर करतो, त्यांना सहकार्य देतो तेव्हा त्यांना आपली कर्तव्ये आनंदाने पार पाडता येतात व यामुळे ऐक्य वाढते आणि राज्याच्या प्रचारकार्यात सर्वजण आनंदाने भाग घेतात.—रोमकर १५:५, ६.

आपण अधीन आहोत हे दाखवणे

१५. आपण आज्ञेत आहोत व अधीन आहोत हे कसे दाखवू शकतो?

१५ नियुक्‍त पर्यवेक्षकांना सहकार्य देण्याचे अनेक व्यवहारी मार्ग आहेत. क्षेत्रातील नवीन परिस्थितीशी जुळावे म्हणून वडिलांनी क्षेत्र सेवेच्या सभा अशा दिवशी व वेळेला ठेवल्या आहेत का की ज्यामुळे आपल्या दिनक्रमात आपल्याला बदल करावे लागतील? नवीन व्यवस्थांना सहकार्य देण्याचा आपण आपल्या परीने प्रयत्न करू या. यामुळे कदाचित आपल्याला अनपेक्षित लाभ मिळतील. सेवा पर्यवेक्षक आपल्या मंडळीच्या पुस्तक अभ्यासाला भेट देणार आहेत का? मग त्या आठवडी आपण प्रचार कार्यात पूर्ण सहभाग घेऊ या. ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत आपल्याला एखाद्या भाषणाची नेमणूक मिळाली आहे का? तेव्हा आपण प्रशालेत हजर राहून ती नेमणूक पूर्ण करण्याचा प्रयत्न करू या. मंडळीच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांनी, राज्य सभागृहाच्या स्वच्छतेची आपल्या गटाची पाळी आहे असे घोषित केले आहे का? मग आपण आपल्या तब्येतीनुसार व शक्‍तीनुसार पूर्ण पाठिंबा देऊ या. हे आणि इतर असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे आपण यहोवाने व येशूने कळपाची काळजी घेण्यासाठी नियुक्‍त केलेल्या पुरुषांना अधीनता दाखवू शकतो.

१६. एखादे वडील मार्गदर्शनानुसार कार्य करत नसतील तर आपल्याला बंड करण्यास सूट का मिळत नाही?

१६ कधीकधी, एखादे वडील विश्‍वासू दास वर्ग आणि त्याच्या नियमन मंडळाच्या मार्गदर्शनानुसार कार्य करत नसतील. ते असेच वागत राहिले तर त्यांना “[आपल्या] जिवांचा मेंढपाळ व संरक्षक” यहोवा देव याला जाब द्यावा लागेल. (१ पेत्र २:२५) परंतु विशिष्ट वडील योग्य ते करण्यात उणे पडत असतील किंवा चुका करत असतील तर यामुळे आपल्याला आज्ञांचे पालन न करण्याची सूट मिळते असे नाही. जे अवज्ञाकारी व बंडखोर आहेत त्यांच्यावर यहोवाचा आशीर्वाद नसतो.—गणना १२:१, २, ९-११.

आनंदाने सहकार्य देणाऱ्‍यांना यहोवा आशीर्वादित करतो

१७. आपल्या पर्यवेक्षकांबद्दल आपली कोणती मनोवृत्ती असली पाहिजे?

१७ यहोवा देवाला माहीत आहे, की त्याने ज्यांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्‍त केले आहे ते अपरिपूर्ण आहेत. तरीपण तो त्यांचा वापर करून घेत आहे आणि आपल्या पवित्र आत्म्याकरवी तो पृथ्वीवरील आपल्या लोकांची काळजी घेत आहे. वडिलांच्या बाबतीत—नव्हे आपल्या सर्वांच्याबाबतीत—“सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून . . . नाही.” (२ करिंथकर ४:७) यास्तव, आपल्या विश्‍वासू पर्यवेक्षकांच्याद्वारे तो जे काही साध्य करत आहे त्याबद्दल आपण त्याचे आभारी असले पाहिजे आणि या पर्यवेक्षकांना आपण आनंदाने सहकार्य दिले पाहिजे.

१८. आपल्या पर्यवेक्षकांच्या अधीन राहण्याद्वारे आपण वास्तविकतेत काय करत असतो?

१८ या शेवटल्या दिवसांतील यहोवाच्या कळपावर देखरेख करण्यासाठी त्याने नियुक्‍त केलेल्या मेंढपाळांच्या वर्णनानुसार जगण्याचा पर्यवेक्षक मनःपूर्वक प्रयत्न करीत आहेत. यिर्मया ३:१५ मध्ये हे वर्णन देण्यात आले आहे: “मी तुम्हास माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन; ते तुम्हास ज्ञान व अक्कल ह्‍यांनी तृप्त करितील.” खरेच, आपल्यातील वडीलजन यहोवाच्या मेंढरांना शिकवण्याचे व त्यांचे संरक्षण करण्याचे काम अतिशय उत्तमरीत्या करत आहेत. तेव्हा त्यांना आनंदाने सहकार्य देऊन, त्यांच्या आज्ञेत राहून व त्यांना अधीनता दाखवून आपण त्यांच्या कठीण परिश्रमांबद्दल आपली कृतज्ञता दाखवत राहू या. असे करून आपण आपले स्वर्गीय मेंढपाळ यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांना आपली कृतज्ञता दाखवू शकतो. (w०७ ४/१)

उजळणी

• यहोवा देवाने व येशू ख्रिस्ताने कसे दाखवून दिले की ते प्रेमळ मेंढपाळ आहेत?

• आज्ञेत राहण्यासोबतच अधीनता दाखवणे देखील आवश्‍यक का आहे?

• कोणकोणत्या व्यावहारिक मार्गांद्वारे आपण अधीनता दाखवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२८ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती वडील ख्रिस्ताच्या नेतृत्त्वाच्या अधीन आहेत

[३० पानांवरील चित्रे]

यहोवाच्या नियुक्‍त मेंढपाळांना अधीनता दाखवण्याचे अनेक मार्ग आहेत