व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

समाधानकारक उत्तरे कोठे सापडतील?

समाधानकारक उत्तरे कोठे सापडतील?

समाधानकारक उत्तरे कोठे सापडतील?

चांगले आरोग्य कसे टिकवता येईल?

कौटुंबिक जीवन आणखी सुखकारक कसे बनवता येईल?

नोकरी टिकवून ठेवण्यासाठी काय करता येईल?

तुम्ही कधी या प्रश्‍नांवर विचार केला आहे का? मग, तुम्हाला त्यांची समाधानकारक, आणि व्यवहारोपयोगी ठरलेली उत्तरे सापडलीत का? दर वर्षी या व अशाच इतर महत्त्वाच्या विषयांवर सल्ला देणारी जवळजवळ २,००० वेगवेगळी पुस्तके प्रकाशित केली जातात. जीवनातल्या निरनिराळ्या आव्हानांना कसे तोंड द्यायचे याविषयी सल्ला देणाऱ्‍या पुस्तकांवर वाचक, एकट्या ब्रिटनमध्येच वर्षाला जवळजवळ ८ कोटी पौंड खर्च करतात. संयुक्‍त संस्थानांत या सल्लाविषयक पुस्तकांची जवळजवळ ६० कोटी डॉलर्सची वार्षिक उलाढाल आहे. तेव्हा, तुमच्यासारखेच आज असंख्य लोक दैनंदिन जीवनातील समस्यांना कसे तोंड द्यावे याविषयी चांगला सल्ला शोधत आहेत.

पण पुस्तकांच्या या महापुरात जो सल्ला दिला जातो, त्याविषयी एका लेखकाने असे म्हटले: “सहसा नवी पुस्तके विशिष्ट विषयावर जे पूर्वी लिहिण्यात आले होते त्याचीच पुनरुक्‍ती करतात.” खरे पाहता, या पुस्तकांमध्ये आढळणाऱ्‍या बऱ्‍याचशा सल्ल्यात जगातल्या सर्वात जुन्या ग्रंथापैकी असलेल्या एका ग्रंथातील सुज्ञानाचे पडसाद आहेत. हा ग्रंथ निर्विवादपणे जगातला सर्वात जास्त वितरित ग्रंथ असून, आजवर त्याचे एकतर संपूर्ण अथवा काही भागांचे भाषांतर जवळ २,४०० भाषांत झाले आहे. एकंदर, सबंध जगात या ग्रंथाच्या ४.६ अब्ज प्रती मुद्रित करण्यात आल्या आहेत. अर्थात हा ग्रंथ म्हणजे बायबल.

बायबल अगदी स्पष्ट सांगते: “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६) खरे पाहता, बायबल हे एखाद्या सल्लाविषयक पुस्तकाच्या रूपात लिहिण्यात आले नव्हते. त्याचा मुख्य उद्देश हा मानवजातीकरता देवाचा संकल्प प्रकट करणे हा होता. तरीसुद्धा, आपल्या सर्वांच्यासमोर ज्या समस्या येतात त्यांना आपण तोंड कसे देऊ शकतो याविषयी बायबल बरेच काही सांगते. तसेच जे बायबलमधील मार्गदर्शनाचे पालन करतील ते स्वतःचे भले करून घेण्यास शिकतील असेही ते आश्‍वासन देते. (यशया ४८:१७, १८) एखादी व्यक्‍ती कोणत्याही जातीची, संस्कृतीची असो अथवा तिची शैक्षणिक पात्रता काहीही असो, पण या व्यक्‍तीने बायबलमधील मार्गदर्शनाचे पालन केल्यास, त्यातील व्यवहारोपयोगी सल्ला कोणत्याही परिस्थितीत उपयुक्‍तच ठरतो. तेव्हा पुढील लेखात आरोग्य, कौटुंबिक जीवन आणि नोकरी व्यवसाय यांसारख्या विषयांवर बायबल काय सांगते याचे परीक्षण करून त्यातील सल्ला खरोखरच उपयोगी आहे किंवा नाही हे तुम्ही स्वतःच का ठरवत नाही? (w०७ ४/१)