व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आजचे क्रूर जग

आजचे क्रूर जग

आजचे क्रूर जग

मारिया नावाच्या ६४ वर्षीय वृद्धा एकट्याच राहत होत्या. आपल्या राहत्या घरी त्या मृतावस्थेत आढळल्या. त्यांना मारहाण करण्यात आली होती व एका वायरने त्यांचा गळा आवळून त्यांना ठार मारण्यात आले होते.

एका संतप्त जमावाने तीन पोलिसांना बेदम मारले. त्यांनी दोन अज्ञान मुलांचे अपहरण केले असा त्यांच्यावर दोष लावण्यात आला होता. या जमावाने नंतर दोघा पोलिसांवर पेट्रोल ओतले आणि त्यांना आग लावली; यात दोघेही गतप्राण झाले. तिसरा पोलीस कसाबसा या जमावाच्या तावडीतून सुटला.

एका निनावी फोनकॉलमुळे एक धक्कादायक गोष्ट उजेडात आली. सुटीसाठी म्हणून आलेल्या चार पुरुषांची शरीरे एका बागेतून खोदून काढण्यात आली. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती, त्यांचे हात बांधण्यात आले होते. या चौघांनाही जिवंत पुरण्यात आले होते हे शवविच्छेदनात समजले.

मानवतेला काळीमा फासणाऱ्‍या या घटना, क्रूर व हिंसक भयपटांतील दृश्‍ये नव्हेत. तर या सर्व घटना सत्य कथा आहेत ज्या अलिकडेच एका लॅटिन अमेरिकन देशातील बातमीपत्रकात ठळक बातम्या म्हणून येत होत्या. पण या अशा घटना केवळ त्या एकाच राष्ट्रांत घडतात असे नाही.

क्रूर घटना आजकाल सर्वसामान्य झाल्या आहेत. बाँम्बस्फोट, दहशतवाद्यांचे हल्ले, खून, हल्ले, गोळीबार, बलात्कार हे, अशा घटनांतील केवळ काही प्रकार आहेत. प्रासारमाध्यमांत वारंवार क्रूरकृत्यांची इतकी भयंकर चित्रे दाखवली जातात की ती पाहून किंवा त्यांच्याविषयी ऐकून लोकांना आजकाल धक्काही बसत नाही.

तुमच्या मनात कदाचित असे प्रश्‍न येतील: ‘काय चालले आहे या जगात? इतरांच्या भावनांची कोणालाच काही किंमत राहिली नाही का? माणसाचा जीव इतका कवडीमोल झाला आहे का? अशा जगात आपण का म्हणून जगावे?’

आता ६९ वर्षीय हॅरी यांचे उदाहरण घ्या. त्यांना कॅन्सर आहे. त्यांच्या पत्नीला बहुतंत्रिका विकार (मल्टीपल स्क्लेरोसीस) आहे. पण त्यांचे शेजारी आणि मित्र त्यांच्या मदतीला अगदी धावून येतात. “हे लोक आमच्या मदतीला नसते, तर आम्ही काय केलं असतं, मला माहीत नाही,” असे हॅरी म्हणतात. हॅरी कॅनडात राहतात. कॅनडात एका अभ्यासात असे स्पष्ट झाले, की वरिष्ठ नागरिकांना मदत करणारे ५० टक्क्यांहून अधिक लोक, त्यांच्या नात्यागोत्यात नसलेल्या कोणालातरी मदत करत असतात. तुम्ही देखील अशा सर्वसामान्य लोकांना ओळखत असाल की जे वेळोवेळी अशी दयाळू व मानवतेची कृत्ये करतात. होय, मानवांमध्ये क्रूर होण्याऐवजी कनवाळूपणा व दयाळुपणा दाखवण्याची कुवत आहे.

आणि तरीपण मग इतक्या क्रूर घटना का घडतात? कशामुळे लोक इतके क्रूरपणे वागतात? इतरांशी क्रूरपणे वागणारे लोक बदलू शकतात का? क्रूरतेचा कधी अंत होईल का? आणि जर हो, तर तो कसा व केव्हा? (w०७ ४/१५)

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

रेल्वे: CORDON PRESS