व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क्रूरतेचा कधी अंत होईल का?

क्रूरतेचा कधी अंत होईल का?

क्रूरतेचा कधी अंत होईल का?

अप्पलपोटीपणा हे आजच्या जगातील क्रूरतेचे मुख्य कारण आहे, याजशी पुष्कळजण सहज सहमत होतील. मी-पणाच्या पिढीने अनेक दशकांआधी पेरलेल्या बीजांनी असा एक समाज उत्पन्‍न केला आहे की ज्यांतील बहुतेकांना केवळ स्वतःचीच चिंता असते. स्वतःला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला पोहंचून क्रूर कृत्ये करतात. हे केवळ लोकांच्या बाबतीतच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रांच्या बाबतीतही खरे आहे.

सहमानवांच्या जीवनाला कसलीही किंमत राहिलेली नाही. काही लोकांना तर क्रूरता आवडते. गुन्हेगार जसे, फक्‍त मजा म्हणून इतरांना इजा पोहंचवल्याची कबूली देतात त्याप्रमाणे लोकांना एकप्रकारचा विकृत आनंद मिळतो. आणि लोकांना हिंसा आणि क्रूरता असलेले चित्रपट आवडत असल्यामुळे, चित्रपट निर्मात्यांना अशाचप्रकारचे चित्रपट काढून बराच फायदा होतो. चित्रपटांतील व बातम्यांमधील क्रूरकृत्ये पाहून पाहून अनेकांच्या भावना बोथट होऊन जातात.

क्रूरतेमुळे व्यक्‍तीची मानसिकता बिघडते आणि मग एका दुष्ट चक्रास सुरुवात होते. क्रूरतेमुळे होणाऱ्‍या हिंसेला संबोधून, नॅश्‍नल ऑटोनोमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिको येथे शिकवणाऱ्‍या नोअमी डिआस मारोकीन म्हणतात: “हिंसा शिकली जाते, ती आपल्या संस्कृतीचा भाग आहे. . . . आपल्या आजूबाजूच्या परिसरामुळे हिंसा करण्यास वाव मिळतो, उत्तेजन मिळते तेव्हा आपण हिंसक मार्गांनी कार्य कसे करायचे ते शिकतो.” त्यामुळे, ज्यांना गैरवागणूक देण्यात आली होती तेही सहसा इतरांशी गैरपणे वागतात; कधीकधी त्याचप्रकारे ज्याप्रकारे त्यांना वागवण्यात आले होते.

इतर बाबतीत, जे मादक पेयांचा व औषधांचा दुरुपयोग करतात ते क्रूर कृत्ये करतात. लोकांच्या गरजा पूर्ण करू न शकणाऱ्‍या सरकारवर नाराज असलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यांतील काही जण, आपली मते व्यक्‍त करण्याकरता क्रूर कृत्ये करतात व दहशत निर्माण करतात; यांत सहसा जे निष्पाप असतात त्यांचाच बळी जातो.

पण तुमच्या मनात असा प्रश्‍न येत असेल: ‘लोक स्वतःहून क्रूर कृत्ये करण्यास शिकलेत का? सध्याच्या परिस्थितीमागे कोणाचा हात आहे?’

क्रूरतेमागे खरोखर कोणाचा हात आहे?

बायबल आपल्याला सांगते, की दियाबल सैतानाचा या जगावर जबरदस्त पगडा आहे. ते त्याला ‘या युगाचे दैवत’ म्हणते. (२ करिंथकर ४:४) दियाबल सैतान विश्‍वातील सर्वात अप्पलपोटी व क्रूर व्यक्‍ती आहे. येशूने म्हणूनच अगदी उचितरीत्या त्याला “मनुष्यघातक” आणि “लबाडीचा बाप” म्हटले आहे.—योहान ८:४४.

आदाम आणि हव्वेने देवाची आज्ञा मोडल्यापासून मानवजात सैतानाच्या मुठीत आली आहे. (उत्पत्ति ३:१-७, १६-१९) पहिल्या मानवी दांपत्याने यहोवाकडे पाठ फिरवून सुमारे १५ शतके उलटल्यानंतर बंडखोर देवदूतांनी मानव शरीरे धारण केली, स्त्रियांबरोबर संबंध ठेवले आणि नेफिलीम नावाची संकरीत जात उत्पन्‍न केली. या नेफिलीम जातीची सर्वसाधारण मानवांपेक्षा वेगळी गुणलक्षणे काय होती? त्यांच्या नावातच याचे उत्तर आहे. नेफिलीमचा अर्थ “पाडणारे” किंवा “जे दुसऱ्‍यांना खाली पाडतात” असा होतो. या हिंसक लोकांनी इतकी क्रूरता व अनैतिकता माजवली की फक्‍त देवाकडून आलेल्या नाशानेच त्यांचा नाश होऊ शकला. (उत्पत्ति ६:४, ५, १७) महापुरात नेफिलीमांचा नाश झाला; परंतु त्यांना जन्म देणारे त्यांचे बाप मानव शरीरे टाकून पुन्हा आत्मिक जगात गेले पण यावेळेस ते अदृश्‍य दुरात्मे बनले.—१ पेत्र ३:१९, २०.

या बंडखोर देवदूतांची क्रूर मानसिकता, येशूच्या दिवसांतील एका दुरात्म्याने पछाडलेल्या मुलाच्या बाबतीत दिसून येते. तो दुरात्मा वारंवार त्या मुलाला झटके आणत होता, त्याला ठार मारण्यासाठी तो त्याला विस्तवात व पाण्यात टाकत होता. (मार्क ९:१७-२२) यावरून स्पष्ट होते, की हे ‘दुरात्मे’ त्यांचा क्रूर अधिपती दियाबल सैतान याच्या सारखी निर्दय मनोवृत्ती दाखवतात.—इफिसकर ६:१२.

आजही दुरात्मे मानवांना क्रूरकृत्ये करण्यास प्रवृत्त करतात. याविषयी बायबलमध्ये असे भाकीत केले होते: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे . . . बढाईखोर, गर्विष्ठ, . . . उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील.”—२ तीमथ्य ३:१-५.

बायबलमधील भविष्यवाण्या हे स्पष्टपणे दाखवून देतात, की आपण जगत असलेला काळ विशेषकरून कठीण आहे कारण १९१४ मध्ये येशू ख्रिस्ताद्वारे देवाचे राज्य स्थापन झाले तेव्हा सैतान आणि त्याच्या दुरात्मिक सैन्याला स्वर्गातून हाकलून लावण्यात आले. बायबल त्याविषयी असे सांगते: “म्हणून स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्‍यांनो, उल्लास करा; पृथ्वी व समुद्र ह्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हांकडे आला आहे.”—प्रकटीकरण १२:५-९, १२.

याचा अर्थ परिस्थितीत सुधार होणे शक्य नाही? आधी उल्लेखण्यात आलेल्या डिआस मारोकीन म्हणतात, की “लोकांमध्ये अप्रिय वागणूक बदलण्याची क्षमता आहे.” परंतु सैतानाचा प्रभाव आज संपूर्ण पृथ्वीवर असल्यामुळे, जोपर्यंत एक व्यक्‍ती एका वेगळ्या, श्रेष्ठ शक्‍तीला आपल्या विचारसरणीवर आणि कार्यांवर प्रभाव पाडण्यास अनुमती देत नाही तोपर्यंत ती आपली हिंसक प्रवृत्ती बदलू शकणार नाही. पण ही कोणती शक्‍ती आहे?

बदल करणे शक्य आहे—कसे?

देवाचा पवित्र आत्मा सर्वात शक्‍तिशाली आहे जो कोणत्याही दुरात्मिक प्रभावावर मात करू शकतो. हा पवित्र आत्मा प्रेम आणि मानवांच्या कल्याणाला बढावा देतो. देवाच्या पवित्र आत्म्याने भरण्याकरता, जी व्यक्‍ती यहोवाला संतुष्ट करू इच्छिते तिने क्रूरता सदृश्‍य असलेले वर्तन देखील टाळले पाहिजे. यासाठी, एखाद्याला त्याचे व्यक्‍तिमत्त्व देवाच्या इच्छेशी जुळवणे आवश्‍यक आहे. आणि देवाची इच्छा काय आहे? हीच की आपण होता होईल तितक्या जवळून देवाच्या मार्गांचे अनुकरण करावे. याचा अर्थ देव जसे लोकांना पाहतो त्याप्रमाणे त्यांना पाहणे.—इफिसकर ५:१, २; कलस्सैकर ३:७-१०.

देवाची कार्य करण्याची पद्धत कशी आहे याचा अभ्यास केल्यावर तुमची खात्री पटेल, की यहोवाने कधीही इतरांमध्ये नावड दाखवली नाही. त्याने कोणत्याही मनुष्याला इतकेच काय तर पशूलाही अन्यायीपणे वागवले नाही. * (अनुवाद २२:१०; स्तोत्र ३६:७; नीतिसूत्रे १२:१०) तो क्रूरतेचा आणि जे क्रूरता करतात त्यांचा धिक्कार करतो. (नीतिसूत्रे ३:३१, ३२) ख्रिश्‍चनांनी नवीन व्यक्‍तिमत्त्व धारण करावे, अशी यहोवा त्यांच्याकडून अपेक्षा करतो. या नव्या व्यक्‍तिमत्त्वामुळे ते इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजतात आणि त्यांचा आदर करतात. (फिलिप्पैकर २:२-४) या नव्या ख्रिस्ती व्यक्‍तिमत्त्वात, “करूणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता” या गुणांचा समावेश होतो. आणि एक गुण आहे ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तो गुण आहे, प्रीती; कारण प्रीती “पूर्णता करणारे बंधन” आहे. (कलस्सैकर ३:१२-१४) हे जग या अशा गुणांनी ओतप्रोत भरलेले असते तर ते किती वेगळे असते, नाही का?

पण मग तुमच्या मनात असा प्रश्‍न येईल, की एखाद्या व्यक्‍तीच्या व्यक्‍तिमत्त्वात कायमचे बदल होणे शक्य आहे का? तर, पुढील सत्य घटनेचा विचार करा. मार्टिन * आपल्या पत्नीवर अगदी त्यांच्या मुलांसमोरही ओरडायचा, तिला बेदम मारहाण करायचा. एकदा घरातील वातावरण इतके बिघडले की मुलांना मदतीसाठी शेजाऱ्‍यांना बोलवायला पळावे लागले. अनेक वर्षांनंतर हे कुटुंब यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करू लागले. आपण कोणत्या प्रकारची व्यक्‍ती असले पाहिजे आणि आपण इतरांना कसे वागवले पाहिजे हे मार्टिन शिकला. मग त्याने स्वतःत बदल केले का? त्याची पत्नी काय उत्तर देते पाहा: “पूर्वी, माझ्या नवऱ्‍याला राग यायचा तेव्हा त्याचे रुपच बदलायचे. यामुळे किती तरी वर्षांपर्यंत आमच्या कौटुंबिक जीवनाची घडी विस्कटली होती. पण यहोवानं मार्टिनला बदलण्यास मदत केली; त्याचे आभार मानायला माझ्याजवळ पुरेसे शब्द नाहीत. आता मार्टिन एक उत्तम पिता आहे आणि उत्कृष्ट पती आहे.”

हे केवळ एक उदाहरण आहे. संपूर्ण जगभरात असे कोट्यवधी लोक आहेत ज्यांनी यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास केल्यानंतर क्रूरता थांबवली आहे. होय, बदल करणे शक्य आहे.

सर्व क्रूरतेचा नाश जवळ येत आहे

नजीकच्या भवितव्यात, देवाचे राज्य संपूर्ण पृथ्वीवर आपला राज्यकारभार चालवील. हे एक असे सरकार आहे जे आता स्वर्गात स्थापन करण्यात आले आहे व त्याचा कनवाळू शासक, ख्रिस्त येशू आहे. या सरकारने क्रूरतेचा उगम असलेल्या सैतानाला आणि त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून हाकलून स्वर्गाची स्वच्छता केली. लवकरच देवाचे राज्य पृथ्वीवरील शांतीप्रिय प्रजेच्या सर्व गरजा पूर्ण करील. (स्तोत्र ३७:१०, ११; यशया ११:२-५) हाच जगाच्या समस्यांवर एकमात्र खराखुरा उपाय आहे. पण या राज्याची वाट पाहत असताना तुम्हीच स्वतः जर क्रूरतेला बळी पडला तर काय?

सूड उगवल्याने प्रश्‍न सूटणार नाही. उलट त्याने प्रकरण आणखीन चिघळेल. बायबल आपल्याला यहोवावर भरवसा ठेवण्याचे आमंत्रण देते. यहोवा आपल्या ठरलेल्या वेळी “प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ” देईल. (यिर्मया १७:१०) (“आपल्याशी कोणी क्रूरतेने वागतो तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया दाखवावी,” हा सोबतचा चौकोन पाहा.) एखाद्या क्रूर गुन्ह्याला बळी पडल्यामुळे तुम्हाला अतोनात यातना होतील हे कबूल आहे. (उपदेशक ९:११) तरीपण देव क्रूरतेचे परिणाम, होय मृत्यू देखील काढून टाकण्यास समर्थ आहे. त्याने वचन दिले आहे, की क्रूर कृत्यांमुळे मरण पावलेले जे त्याच्या स्मरणात आहेत त्या सर्वांना तो पुन्हा जिवंत करणार आहे.—योहान ५:२८, २९.

क्रूरतेला बळी पडण्याची शक्यता अजूनही असली तरीपण आपण देवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंध जोडू शकतो आणि त्याने दिलेल्या अभिवचनांवर पक्का विश्‍वास ठेवून सांत्वन मिळवू शकतो. साराचे उदाहरण घ्या. तिने आपल्या पतीच्या मदतीविना आपल्या दोन मुलांना लहानाचे मोठे केले; त्यांना चांगले शिक्षण मिळेल याची खात्री केली. पण तिच्या म्हातारपणी तिच्या मुलांनी तिला सोडून दिले. त्यांनी तिला आर्थिक मदत दिली नाही किंवा ती आजारी असताना तिच्याकडे लक्ष दिले नाही. सारा आता एक ख्रिस्ती भगिनी आहे. ती म्हणते: “मला या गोष्टींचं अजूनही वाईट वाटत राहतं पण यहोवानं मला सोडलं नाही. माझे आध्यात्मिक बंधूभगिनी, माझी काळजी त्यांना कशी घेता येईल, हे सारखं पाहत असतात. यामुळं मला जाणवतं, की यहोवा माझ्या पाठीशी उभा आहे. माझा हा पक्का विश्‍वास आहे, की लवकरच तो फक्‍त माझेच नव्हे तर जे त्याच्या शक्‍तीवर भरवसा ठेवतात आणि त्याच्या आज्ञा पाळतात त्या सर्वांचे प्रश्‍न सोडवणार आहे.”

साराने उल्लेख केलेले आध्यात्मिक बंधूभगिनी कोण आहेत? ते तिचे ख्रिस्ती सोबती आहेत जे यहोवाचे साक्षीदार आहेत. यहोवाच्या साक्षीदारांचा एक विश्‍वव्यापी बंधूसमाज आहे जो कनवाळू लोकांचा मिळून बनलेला आहे. या सर्वांना ही खात्री आहे की लवकरच क्रूरतेचा अंत होणार आहे. (१ पेत्र २:१७) क्रूरतेसाठी प्रामुख्याने जबाबदार असलेला सैतान किंवा त्याच्याप्रमाणे वागणारा एकही जण तेव्हा नसेल. एका लेखकाने लिहिल्याप्रमाणे, “निर्दयीपणाचे हे युग” इतिहासजमा होईल. तेव्हा, यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधून या आशेविषयी आणखी माहीत करून घ्यायला काय हरकत आहे? (w०७ ४/१५)

[तळटीपा]

^ परि. 16 देवाचे गुण आणि त्याचे व्यक्‍तिमत्त्व याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले यहोवाजवळ या (इंग्रजी) हे पुस्तक पाहा.

^ परि. 17 काही नावे बदलण्यात आली आहेत.

[६ पानांवरील चौकट]

आपल्याशी कोणी क्रूरतेने वागतो तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया दाखवावी

आपल्याशी जेव्हा कोणी क्रूरतेने वागतो तेव्हा आपण कोणती प्रतिक्रिया दाखवावी यासंबंधाने देवाचे वचन व्यावहारिक सल्ला देते. पुढील सूज्ञ सल्ल्याचा तुम्ही अवलंब कसा करू शकता ते पाहा:

“वाईटाचा बदला मी घेईन असे म्हणू नको; परमेश्‍वरावर भरवसा ठेवून राहा म्हणजे तो तुला साहाय्य करील.”—नीतिसूत्रे २०:२२.

“दरिद्र्‌याचे पीडन आणि न्याय व न्यायीपण यांचे हरण बलात्काराने झालेले जर तू . . . पाहिले तर यामुळे विस्मित होऊ नको; कारण वरिष्ठावर जो वरिष्ठ तो नजर ठेवतो.”—उपदेशक ५:८, पं.र.भा.

“जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.”—मत्तय ५:५.

“लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.”—मत्तय ७:१२.

“वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे प्रभु म्हणतो.”—रोमकर १२:१७-१९.

“ख्रिस्तानेहि तुम्हांसाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हांकरिता कित्ता घालून दिला आहे; . . . त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही; तर यथार्थ न्याय करणाऱ्‍याकडे स्वतःला सोपवून दिले.”—१ पेत्र २:२१-२३.

[७ पानांवरील चित्रे]

यहोवाने अनेकांना क्रूर वर्तन सोडून देण्यास शिकवले आहे