वृद्धपणातही आध्यात्मिक फळ देत राहणे
वृद्धपणातही आध्यात्मिक फळ देत राहणे
“जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत . . . वृद्धपणातहि ते फळ देत राहतील.”—स्तोत्र ९२:१३, १४.
१, २. (क) वृद्धपणाचे वर्णन सहसा कसे केले जाते? (ख) आदामाकडून मिळालेल्या पापाच्या परिणामांच्या बाबतीत शास्त्रवचने आपल्याला कोणते अभिवचन देतात?
वृद्धपण म्हटले की तुमच्या मनात काय येते? त्वचेवरील सुरकुत्या? ऐकू कमी येणे? पायात बळ नसणे? की, उपदेशक पुस्तकाच्या १२ व्या अध्यायाच्या १-७ वचनांत अगदी स्पष्ट व सविस्तर वर्णन केलेल्या ‘अनिष्ट दिवसांचा’ दुसरा एखादा पैलू? असे आहे तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ती ही, की उपदेशकाच्या १२ व्या अध्यायातील उतरत्या पायरीस लागण्याचे वर्णन हे निर्माणकर्त्या यहोवा देवाने उद्देशिलेल्या जीवनाचे वर्णन नव्हे तर आदामाच्या पापाचे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामाचे वर्णन आहे.—रोमकर ५:१२.
२ वय वाढणे हे एक शाप नव्हे; कारण, जिवंत राहण्याकरता तर वर्षे सरली पाहिजेत. वास्तविक पाहता, वाढ आणि प्रौढता हे सर्व जिवंत प्राण्यांसाठी आवश्यक गुण आहेत. पाप आणि अपरिपूर्णतेमुळे सहा हजार वर्षांपासून जी हानी झालेली आपण आपल्या सभोवती पाहतो ती लवकरच इतिहासजमा होणार आहे. सर्व आज्ञाधारक मानव उद्देशिल्याप्रमाणे, वृद्धपणाच्या तक्रारींविना व मृत्यूविना जीवनाचा आनंद लुटतील. (उत्पत्ति १:२८; प्रकटीकरण २१:४, ५) तेव्हा, “‘मी रोगी आहे,’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) वृद्धांना त्यांचे “तारुण्याचे दिवस” पुन्हा प्राप्त होतील आणि त्यांची त्वचा “बालकापेक्षा टवटवीत” होईल. (ईयोब ३३:२५) पण तोपर्यंत आपल्या सर्वांना आदामाकडून वारशाने मिळालेल्या पापी अवस्थेत राहावे लागेल. असे असले तरी, यहोवाच्या सेवकांना ते जसजसे वृद्ध होत जातात तसतसे काही खास मार्गांनी फायदा मिळतो.
३. कोणकोणत्या मार्गांनी ख्रिस्ती ‘वृद्धपणातही फळ देत राहू शकतात’?
३ देवाचे वचन आपल्याला असे आश्वासन देते, की “जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत. ते . . . वृद्धपणातहि . . . फळ देत राहतील.” (स्तोत्र ९२:१३, १४) स्तोत्रकर्त्याने लाक्षणिक भाषेत हे मूलभूत सत्य सांगितले, की देवाचे विश्वासू सेवक शारीरिकरीत्या ढासळत चालले तरी आध्यात्मिकरीत्या ते प्रगती करीत राहू शकतात, समृद्ध होऊ शकतात व फलद्रुप होऊ शकतात. बायबलमधील व आधुनिक दिवसांतील अनेक उदाहरणे या गोष्टीची सत्यता पटवतात.
‘मंदिरात जाणे सोडले नाही’
४. वयोवृद्ध हन्नाने देवाबद्दलची तिची श्रद्धा कशी दाखवली आणि तिला याचे प्रतिफळ कसे मिळाले?
४ पहिल्या शतकातील हन्ना नावाच्या संदेष्ट्रीचे उदाहरण घ्या. चौऱ्याऐंशी वर्षांची असूनही ती “मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करुन रात्रंदिवस सेवा करीत असे.” तिचे वडील “आशेराच्या वंशातील” गैर-लेवी असल्यामुळे ती मंदिरात वास्तव्य करू शकत नव्हती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत होणाऱ्या सेवांच्या वेळी दररोज हजर राहण्याकरता मंदिरात येण्यासाठी तिला किती प्रयत्न करावे लागले असतील याची कल्पना करा. पण तिच्या भक्तीचे तिला प्रतिफळ मिळाले. योसेफ आणि मरियेने जेव्हा बाळ येशूला नियमशास्त्रात सांगितल्यानुसार मंदिरात यहोवाला सादर करण्याकरता आणले तेव्हा हन्ना तिथे होती. येशूला पाहिल्यानंतर हन्नाने हा बहुमान आपल्याला दिल्याबद्दल “देवाचे आभार मानिले आणि जे यरूशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस ती त्याच्याविषयी सांगू लागली.”—लूक २:२२-२४, ३६-३८; गणना १८:६, ७.
५, ६. कोणकोणत्या मार्गांनी आज अनेक वयोवृद्ध बंधूभगिनी हन्नासारखा आत्मा दाखवत आहेत?
५ आज आपल्यातील अनेक वयोवृद्ध बंधूभगिनी हन्नाप्रमाणे सभांना नियमित उपस्थित राहतात, खऱ्या उपासनेच्या वृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करतात आणि सुवार्तेचा प्रचार करण्याची त्यांची उत्कट इच्छा असते. आपल्या पत्नीबरोबर ख्रिस्ती सभांना नियमित हजर राहणारे एक बंधू आहेत ज्यांनी ८० वर्षे ओलांडली आहेत. ते म्हणतात: “आम्ही सभांना जाण्याची स्वतःला सवय लावून घेतली आहे. सभांच्या वेळात आम्हाला दुसरीकडे कुठेही जावेसे वाटत नाही. देवाचे लोक जिथं असतात तिथं आम्हाला जायला आवडतं. तिथं आम्हाला सुरक्षित वाटतं.” आपल्या सर्वांसाठी ही किती प्रोत्साहनदायक उदाहरणे आहेत!—इब्री लोकांस १०:२४, २५.
६ “खऱ्या उपासनेशी संबंधित असलेले कोणतेही काम असेल व ते मी करू शकत असेन, तर मला ते करायला आवडेल.” हे, जीन नावाच्या एका विधवा ख्रिस्ती भगिनीचे ब्रीदवाक्य आहे जिने ८० वर्षे ओलांडली आहेत. हीच भगिनी पुढे म्हणते: “अर्थात माझेही दुःख आहेच. पण मी दुःखी असताना, माझ्या आजूबाजूला असणाऱ्यांनीसुद्धा का म्हणून दुःखी व्हावं?” उभारणीकारक आध्यात्मिक समारोहांसाठी ती वेगवेगळ्या देशात कशी जाऊन आली त्याबद्दल सांगताना तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात एकप्रकारची चमक असते. एका अलिकडच्या दौऱ्याविषयी तिने तिच्याबरोबर प्रवास करणाऱ्या सोबत्यांना म्हटले: “आता मला महालं पाहण्यात काही रस उरला नाही; मला क्षेत्र सेवेत जावसं वाटतं!” तिला स्थानीय भाषा येत नव्हती तरीपण ती बायबलच्या संदेशात लोकांमध्ये आवड निर्माण करू शकली. तसेच, कित्येक वर्षांपर्यंत ती एका मंडळीत सेवा करीत होती जिथे साहाय्याची गरज होती. यासाठी तिला नवीन भाषा शिकावी लागली आणि सभांना येता-जाता तिला एक-एक तास प्रवास करावा लागत होता.
मन सक्रिय ठेवणे
७. मोशेने त्याच्या वाढत्या वयात यहोवाबरोबर नातेसंबंध वाढवण्याची आपली इच्छा कशी व्यक्त केली?
७ काळ जसजसा सरत जातो तसतसे अनुभवाचे गाठोडे वाढत राहते. (ईयोब १२:१२) परंतु दुसऱ्या बाजूला पाहता, वाढत्या वयाबरोबर आध्यात्मिक प्रगतीही आपोआप होते असे नाही. त्यामुळे, केवळ गतकाळात संपादन केलेल्या ज्ञानसाठ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा देवाचे एकनिष्ठ सेवक जसजशी वर्षे सरत जातात तसतसे ‘ज्ञान वाढवण्याचा’ प्रयत्न करतात. (नीतिसूत्रे ९:९) यहोवाने जेव्हा मोशेवर एक जबाबदारी सोपवली तेव्हा तो ८० वर्षांचा होता. (निर्गम ७:७) त्याच्या काळातील विशिष्ट वयोमर्यादेच्या तुलनेत तो सर्वसामान्यपणे इतरांपेक्षा जरा जास्तच काळ जिवंत राहिला होता; कारण त्याने असे लिहिले: “आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ति असल्यास फार तर ऐंशी वर्षे” असते. (स्तोत्र ९०:१०) तरीपण, मोशेला केव्हाही, आता हे काय शिकायचे वय आहे का, असे वाटले नाही. यहोवाची अनेक दशकांपर्यंत सेवा केल्यानंतर, अनेक विशेषाधिकारांचा आनंद लुटल्यानंतर व अनेक भारी जबाबदाऱ्या पेलल्यानंतर त्याने यहोवाला अशी विनंती केली: “तुझे मार्ग मला दाखीव ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल.” (निर्गम ३३:१३) यहोवाबरोबर नातेसंबंध वाढवण्याची मोशेची नेहमी इच्छा होती.
८. दानीएलाने नव्वदी ओलांडली होती तरीपण त्याने त्याचे मन कशाप्रकारे सक्रिय ठेवले आणि याचा काय फायदा झाला?
८ संदेष्टा दानीएल, याने आपली नव्वदी ओलांडली होती तरीपण पवित्र लिखाणांवर तो मनन करत असल्याचे आढळून आले. ‘शास्त्रग्रंथाच्या’ अभ्यासातून तो जे काही शिकला त्यामुळे तो यहोवाला कळकळीने प्रार्थना करून त्याचे मार्गदर्शन मिळवण्यास प्रवृत्त झाला. या ग्रंथांमध्ये कदाचित, लेवीय, यशया, यिर्मया, होशे व आमोस, या पुस्तकांचा समावेश असावा. (दानीएल ९:१, २) मशिहाच्या आगमनाविषयी आणि शुद्ध उपासनेच्या भवितव्याविषयी ईश्वरप्रेरित माहिती देऊन त्याच्या या प्रार्थनेचे उत्तर देण्यात आले.—दानीएल ९:२०-२७.
९, १०. काहींनी आपले मन गुंतवून ठेवण्याकरता काय केले आहे?
९ मोशे आणि दानीएल यांच्याप्रमाणे आपणही, आपल्याला जोपर्यंत जमते तोपर्यंत आध्यात्मिक गोष्टींवर आपले मन एकाग्र करून आपले मन सक्रिय ठेवू शकतो. अनेक जण असे करत आहेत. ऐंशी वर्षे ओलांडलेले बंधू वर्थ, ख्रिस्ती वडील आहेत. ते ‘विश्वासू व बुद्धिमान दासवर्गाकडून’ येणाऱ्या आध्यात्मिक माहितीशी अद्ययावत राहण्याचा प्रयत्न करतात. (मत्तय २४:४५) ते म्हणतात: “मी तर सत्याच्या जणू काय प्रेमातचं पडलोय. सत्याचा प्रकाश कसा उत्तरोत्तर वाढत जातो हे मला पाहायला खूप आवडतं.” (नीतिसूत्रे ४:१८) तसेच, पूर्ण वेळेच्या सेवेत ६० पेक्षा अधिक वर्षे घालवलेल्या बंधू फ्रेड यांना सहविश्वासू बंधूभगिनींबरोबर बायबल विषयांवर चर्चा सुरु करणे प्रेरणादायक वाटते. ते म्हणतात: “मला बायबलला माझ्या मनात जिवंत ठेवलं पाहिजे. तुम्हाला जर बायबलला जिवंत करता आले, म्हणजे ते अर्थपूर्ण करता आले व तुम्ही ज्या गोष्टी शिकत आहात त्यांचा, ‘सुवचनांच्या नमुन्याशी’ तुम्हाला मेळ बसवता आला तर मग तुमच्यासमोर एक रत्नजडीत अलंकार तयार झाल्याचे दिसून येते. बायबलमधील प्रत्येक सत्य हे एका रत्नासारखे आहे. प्रत्येक रत्नाला जेव्हा त्याच्या योग्य जागी कोंदले जाते तेव्हा तो कसा चमकतो त्याप्रमाणे बायबलमधील प्रत्येक सत्याचा जेव्हा तुम्ही इतर सत्यांशी मेळ बसवता तेव्हा तुमच्यासमोर एक सुरेख अलंकार तयार झाल्याचे दिसून येते.”—२ तीमथ्य १:१३.
१० वाढलेले वय, नवीन व कठीण विचार शिकण्यास पायबंद घालते असे नाही. साठीत, सत्तरीत आणि ऐंशी वर्षे ओलांडलेल्या लोकांनी निरक्षरतेवर मात केली आहे किंवा त्यांनी नवीन भाषा शिकली आहे. यहोवाच्या साक्षीदारांनी, विविध देशांतील लोकांना राज्याची सुवार्ता सांगता यावी या हेतूने असे केले आहे. (मार्क १३:१०) हॅरी आणि त्यांची पत्नी हे दोघेही सत्तरी गाठणार होते तेव्हा त्यांनी पोर्तुगीज क्षेत्रात हातभार लावण्याचे ठरवले. हॅरी म्हणतात: “पाहूया तरी काय होते ते. वय वाढल्यावर कोणतेही काम तसे कठीण असते.” तरीपण, प्रयत्न आणि चिकाटी यांमुळे हे पतीपत्नी पोर्तुगीज भाषेत बायबल अभ्यास चालवू शकले. आता तर हॅरी, त्यांच्या नवीन भाषेत प्रांतीय अधिवेशनांतील भाषणे देखील देतात.
११. इतर विश्वासू वयोवृद्ध बंधूभगिनींनी जे साध्य केले त्याची आपण चर्चा का केली पाहिजे?
११ अर्थात सर्वांचे आरोग्य किंवा परिस्थिती त्यांना अशाप्रकारची आव्हाने स्वीकारयची मोकळीक देत नाही. मग, ज्यांनी स्वीकारली आहेत त्यांची चर्चा करून काय उपयोग? सर्वांनीच अशा गोष्टी साध्य केल्या पाहिजेत, हे सुचवण्याकरता नव्हे तर त्यांचे अनुकरण करण्याकरता त्यांची चर्चा करण्यात आली आहे. प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्चनांना मंडळीतील विश्वासू वडिलांविषयी असे लिहिले: “त्यांच्या वर्तणुकीचा इब्री लोकांस १३:७) अशा आवेशी उदाहरणांवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्यालाही या वयोवृद्ध बंधूभगिनींना देवाची सेवा करण्यास ज्या विश्वासाने प्रवृत्त केले त्या मजबूत विश्वासाचे अनुकरण करण्यास प्रोत्साहन मिळते. आधी उल्लेख करण्यात आलेले हॅरी आता ८७ वर्षांचे आहेत; तर कोणती गोष्ट त्यांना प्रेरणादायक ठरली याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले: “मला माझं उरलेलं आयुष्य सुज्ञपणे घालवायचं आहे आणि यहोवाच्या सेवेत मला शक्य तितकं उपयोगी ठरायचं आहे.” पूर्वी ज्यांचा उल्लेख करण्यात आला त्या बंधू फ्रेड यांनाही आपली बेथेल नेमणूक पार पाडण्यात खूप समाधान मिळते. ते म्हणतात: “तुम्ही यहोवाची होता होईल तितक्या उत्तमरीत्या सेवा कशी करू शकता हे तुम्हाला शोधून काढलं पाहिजे आणि मग त्या मार्गात टिकून राहिलं पाहिजे.”
परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.” (बदललेल्या परिस्थितीतही आवेशी
१२, १३. बर्जिल्ल्यने बदललेल्या परिस्थितीतही ईश्वरी भक्ती कशी दाखवली?
१२ शरीर जेव्हा साथ देण्याचे सोडून देते तेव्हा ते खूप कठीण असते. तरीपण, बदललेल्या परिस्थितीतही आवेश दाखवणे शक्य आहे. याबाबतीत बर्जिल्ल्य गिलादी हा एक उत्तम उदाहरण आहे. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्याने, अबशालोमने दावीदाविरुद्ध बंड पुकारले तेव्हा, दावीद आणि त्याच्या सैन्याला अन्न व निवारा देऊन खूप आदरातिथ्य दाखवले. दावीद जेव्हा जेरुसलेमेस पुन्हा जात असतो तेव्हा बर्जिल्ल्य त्यांच्याबरोबर संरक्षण म्हणून यार्देन नदीपर्यंत जातो. तेव्हा दावीद बर्जिल्ल्यला आपल्या महालात येऊन राहा असे म्हणतो. बर्जिल्ल्य काय उत्तर देतो? तो म्हणतो: “आज मी ऐंशी वर्षांचा आहे; . . . आपला दास जे काही खातोपितो त्याचा स्वाद त्याला कळतो काय! गाणाऱ्यांचा व गाणारणीचा शब्द मला ऐकू येतो काय? . . . पण आपला दास किम्हाम हा हजर आहे. त्याला माझ्या स्वामीराजांबरोबर पलीकडे जाऊ द्या; मग आपणाला वाटेल ते त्याचे करा.”—२ शमुवेल १७:२७-२९; १९:३१-४०.
१३ बर्जिल्ल्यची परिस्थिती बदलली होती. तरीपण त्याने यहोवाच्या नियुक्त राजाला पाठिंबा देण्याचा आपल्यापरीने प्रयत्न केला. पूर्वीप्रमाणे आपण खातपित नाही, आपली श्रवणशक्ती देखील कमजोर झाली आहे, याची त्याला जाणीव झाली असली तरी त्याच्या मनात कटू भावना आल्या नाहीत. उलट, त्याला देऊ केलेले लाभ किम्हामला मिळावेत असे निःस्वार्थपणे सुचवून त्याने, त्याचे आंतरिक मनुष्यत्व प्रकट केले. बर्जिल्ल्यप्रमाणे अनेक वयोवृद्ध बंधूभगिनी आज निःस्वार्थ व उदार आत्मा दाखवतात. खऱ्या उपासनेला पाठिंबा देण्याकरता ते आपल्यापरीने प्रयत्न करतात; कारण त्यांना माहीत आहे, की “अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.” एकनिष्ठ बंधूभगिनी आपल्यामध्ये असणे खरोखरच किती मोठा आशीर्वाद आहे!—इब्री लोकांस १३:१६.
१४. स्तोत्र ३७:२३-२५ मधील शब्द, त्यात दावीदाच्या वाढत्या वयाचा उल्लेख आल्यामुळे भावस्पर्शी कसे झाले?
१४ दावीदाची परिस्थिती त्याच्या जीवनकाळात अनेकदा बदलली तरीसुद्धा, यहोवा आपल्या एकनिष्ठ सेवकांची काळजी घेण्याचे सोडत नाही, हा त्याचा आत्मविश्वास कायम होता. आपल्या जीवनाच्या शेवटल्या काळात दावीदाने आज ज्याला ३७ वे स्तोत्र म्हटले जाते ते रचले. कल्पना करा: दावीद मनन करण्याच्या मनःस्थितीत आहे. त्याच्या हातात वीणा आहे आणि तो असे गातो: “परमेश्वर मनुष्याची गति स्थिर करितो, आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही; कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतति भिकेस लागलेली मी पाहिली नाही.” (स्तोत्र ३७:२३-२५) या ईश्वरप्रेरित स्तोत्रात दावीदाच्या वयाचा उल्लेख करणे यहोवाला योग्य वाटले. या स्तोत्रातील मनापासून काढलेले उद्गार किती भावस्पर्शी वाटतात!
१५. परिस्थिती बदललेली असतानाही व वयही वाढले होते तरीसुद्धा प्रेषित योहानाने विश्वासूपणाचे उत्तम उदाहरण कसे मांडले?
१५ परिस्थिती बदलली आणि वयही वाढले तरी, विश्वासू राहिल्याचे आणखी एक उत्तम उदाहरण प्रेषित योहानाचे प्रकटीकरण १:९) तरीपण त्याचे काम संपले नाही. उलट, योहानाने लिहिलेली बायबलमधील सर्व पुस्तके त्याने त्याच्या जीवनाच्या उतारवयात लिहिलीत. पात्म बेटावर असताना त्याला प्रकटीकरणाचा भयप्रेरक दृष्टांत देण्यात आला जो त्याने अगदी काळजीपूर्वक लिहून ठेवला. (प्रकटीकरण १:१, २) रोमन सम्राट नेर्वा याच्या कारकीर्दीत योहानाची बंदिवासातून सुटका झाली असे सहसा समजले जाते. त्यानंतर, सा.यु. ९८ च्या सुमारास जेव्हा योहान कदाचित ९० किंवा १०० वर्षांचा असावा तेव्हा त्याने शुभवर्तमान आणि त्याच्या नावाने असलेली तीन पत्रे लिहिली.
आहे. जवळजवळ ७० वर्षांपर्यंत देवाची सेवा केल्यानंतर योहानाला “देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्यांखातर” पात्म बेटावर बंदिवासात पाठवण्यात आले. (सहनशीलतेची अवीट नोंद
१६. संभाषण करू न शकणारे यहोवाबद्दल श्रद्धा कशी दाखवू शकतात?
१६ वाढत्या वयाबरोबर आलेल्या मर्यादा या अनेक स्वरुपाच्या व विविध प्रमाणात असू शकतात. उदाहरणार्थ, काही वृद्धांना संभाषण करणे कठीण जाते. तरीपण देवाच्या प्रीतीच्या व अपात्री कृपेच्या गोड आठवणी त्यांच्याजवळ असतात. आपल्या तोंडाने ते इतके बोलू शकत नसले तरी, आपल्या हृदयात मात्र ते यहोवाला असे म्हणत असतात: “अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो.” (स्तोत्र ११९:९७) आणि यहोवाला, “त्याच्या नामाचे चिंतन करणारे” माहीत आहे व हे लोक, त्याच्या मार्गांची जराही काळजी नसलेल्या बहुसंख्य मानवांपेक्षा किती वेगळे आहेत, हे त्याला कळते. (मलाखी ३:१६; स्तोत्र १०:४) आपण आपल्या हृदयात करत असलेल्या चिंतनावर यहोवा संतुष्ट होतो, हा विचार किती सांत्वन देणारा आहे!—१ इतिहास २८:९; स्तोत्र १९:१४.
१७. अनेक दशकांपासून यहोवाची सेवा करणाऱ्यांनी कोणती अनोखी गोष्ट साध्य केलेली असते?
१७ एक गोष्ट अशी आहे की जिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ती ही, की दशकांपासून यहोवाची विश्वासूपणे सेवा करणाऱ्यांनी एक अनोखी व इतर कोणत्याही मार्गाने साध्य करता येत नाही अशी एक गोष्ट मिळवलेली असते. ती आहे—सहनशीलतेची अवीट नोंद. येशूने म्हटले: “तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल.” (लूक २१:१९) सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता धीर किंवा सहनशीलतेची आवश्यकता आहे. जे ‘देवाच्या इच्छेप्रमाणे वागले’ आहेत आणि ज्यांनी आपल्या जीवनक्रमाद्वारे आपली एकनिष्ठा सिद्ध केली आहे ते “वचनानुसार फलप्राप्ति” मिळण्याची वाट पाहू शकतात.—इब्री लोकांस १०:३६.
१८. (क) वृद्ध जनांच्या सेवेच्या बाबतीत यहोवा कोणत्या गोष्टीने संतुष्ट होतो? (ख) पुढील लेखात आपण कोणत्या विषयाची चर्चा करणार आहोत?
२ करिंथकर ४:१६, पं.र.भा.) गतकाळात तुम्ही जे काही साध्य केले आहे त्याची यहोवाला किंमत आहे, यात काहीच शंका नाही. पण ही गोष्टही धुतलेल्या तांदळासारखी स्पष्ट आहे, की तुम्ही सध्या त्याच्या नावासाठी जे काही करता त्याचीही तो कदर करतो. (इब्री लोकांस ६:१०) पुढील लेखात, आपण अशा विश्वासूपणाच्या दूरगामी परिणामांची चर्चा करणार आहोत. (w०७ ६/१)
१८ तुम्ही यहोवाची सेवा किती जास्त किंवा किती कमी करता हे तो पाहत नाही तर तुम्ही मनापासून करत असलेल्या सेवेची तो कदर करतो. जसजसे वय वाढते तसतसे ‘आपला बाहेरील माणूस’ क्षय पावत असला तरी, आपला “आतील माणूस” दिवसागणिक नवा होत जातो. (तुम्ही कसे उत्तर द्याल?
• हन्नाने आजच्या दिवसांतील वयोवृद्ध ख्रिस्ती बंधूभगिनींसाठी कोणते उत्तम उदाहरण मांडले?
• वाढत्या वयामुळे एखादी व्यक्ती तिच्या साध्यतांमध्ये मर्यादित होतेच असे का नाही?
• वृद्ध जन आपली श्रद्धा कशी दाखवत राहू शकतात?
• वयोवृद्ध जन करत असलेली सेवा यहोवा कशी लेखतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२३ पानांवरील चित्र]
वयोवृद्ध दानीएलला यहुदाच्या बंदिवासाच्या कालमर्यादेविषयी “शास्त्रग्रंथावरून” समजले
[२५ पानांवरील चित्रे]
अनेक वयोवृद्ध बंधूभगिनी, सभांना नियमितरीत्या हजर राहून, आवेशाने प्रचारकार्यात भाग घेऊन व शिकवण्याची उत्सुकता दाखवून उत्तम उदाहरण मांडत आहेत