व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुणांसाठी महत्त्वपूर्ण धडे

तरुणांसाठी महत्त्वपूर्ण धडे

तरुणांसाठी महत्त्वपूर्ण धडे

ग्लॅडिस, अर्जेंटिनातील मेंडोझा येथील एका शाळेत काम करते. एके दिवशी ती एका वर्गाच्या शेजारून जात असताना तिने पाहिले, की एक शिक्षिका तिच्या चवथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसमोर बायबल कथांचं माझं पुस्तक यातून काहीतरी वाचून दाखवत होती. * ग्लॅडिस या शिक्षिकेकडे गेली आणि म्हणाली, की ती एक यहोवाची साक्षीदार आहे व या पुस्तकातून होता होईल तितका अधिक फायदा कसा प्राप्त करायचा ते ती तिला दाखवेल. ग्लॅडिसने दिलेल्या माहितीमुळे ही शिक्षिका खूप प्रभावीत झाली. शाळेच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा नियमित उपयोग करण्याची तिची इच्छा होती. परंतु आधी तिला शाळेच्या व्यवस्थापनाची परवानगी घ्यावी लागणार होती. आनंदाची गोष्ट म्हणजे, तिला परवानगी मिळाली.

नंतर, शाळेतील एका पुस्तक दिन कार्यक्रमात या शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यांना, शाळामित्रांसमोर या पुस्तकातील एक अध्याय वाचून दाखवण्यास सांगितले. या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे या शिक्षिकेला एका स्थानीय दूरदर्शन कार्यक्रमात पाहुणे म्हणून आमंत्रण मिळाले. शाळेच्या मुलांच्या वर्तनाचा विषय निघाला तेव्हा दूरदर्शन कार्यक्रम चालवणाऱ्‍या व्यक्‍तीने शिक्षिकेला विचारले: “तुम्ही तुमच्या वर्गातील मुलांना चांगले वागण्यास कसे काय शिकवता?” शिक्षिकेने सांगितले, की ती बायबल कथांचं माझं पुस्तक नावाच्या प्रकाशनाचा उपयोग करत होती. ती नंतर असेही म्हणाली, की ती शाळेत धर्माविषयी शिकवत नव्हती परंतु या पुस्तकाद्वारे ती मुलांच्या मनावर आदर, सहनशीलता, एकता, सहकार्य, आज्ञाधारकता, प्रेम यांसारखे नैतिक मूल्ये बिंबवत होती. हे मुलांसाठी खरोखरच महत्त्वपूर्ण धडे आहेत, यावर सर्वांचे एकमत झाले.

तुम्ही आपल्या मुलांमध्ये अशाप्रकारची मूल्ये बिंबवू इच्छिता का? बायबल कथांचं माझं पुस्तक या आकर्षक प्रकाशनाची एक प्रत तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांकडून मागू शकता. (w०७ ७/१)

[तळटीप]

^ परि. 2 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.