व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालत’ राहाल का?

तुम्ही ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालत’ राहाल का?

तुम्ही ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालत’ राहाल का?

“आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही.”—गलतीकर ५:१६.

१. आपल्या हातून पवित्र आत्म्याविरुद्ध पाप घडले असावे अशी चिंता मनातून काढून टाकण्याचा कोणता मार्ग आहे?

यहोवाच्या पवित्र आत्म्याविरुद्ध आपल्या हातून पाप घडले असावे अशी चिंता काढून टाकण्याचा एक मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे प्रेषित पौलाने जे म्हटले त्याप्रमाणे चालणे. त्याने म्हटले: “आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही.” (गलतीकर ५:१६) आपण जर देवाच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारले तर आपण अयोग्य देहवासनांच्या आहारी जाणार नाही.—रोमकर ८:२-१०.

२, ३. आपण जर आत्म्याच्या प्रेरणेने चालत राहिलो तर आपल्याला कोणता फायदा होऊ शकेल?

आपण जसजसे आत्म्याच्या प्रेरणेने चालत राहतो’ तसतसे यहोवाची कार्यकारी शक्‍ती आपल्याला त्याच्या आज्ञांचे पालन करण्यास प्रवृत्त करते. आपल्या सेवेमध्ये, मंडळीमध्ये, घरी आणि इतर ठिकाणी आपण त्याचे गुण प्रदर्शित करतो. आपल्या विवाहसोबत्याबरोबर, मुलांबरोबर, आपल्या बंधूभगिनींबरोबर आणि इतरांबरोबर आपण करत असलेल्या व्यवहारांतून दिसून येईल, की आपण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहोत.

‘आत्म्यात देवानुसार जगल्याने’ आपण पापापासून दूर राहू. (१ पेत्र ४:१-६) आपल्यावर जर पवित्र आत्म्याचा प्रभाव असेल तर आपल्या हातून अक्षम्य पाप निश्‍चितच घडणार नाही. पण आपण जर आत्म्याच्या प्रेरणेने चालत राहिलो तर आणखी कोणकोणत्या उत्तम मार्गांद्वारे आपल्याला लाभ होऊ शकेल?

देव आणि ख्रिस्त यांच्याबरोबर घनिष्ठ संबंध

४, ५. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालल्यामुळे येशूबद्दलचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो?

पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालत राहिल्यामुळे आपण देव आणि ख्रिस्त यांच्याबरोबर एक घनिष्ठ नातेसंबंध टिकवून ठेवू शकतो. आध्यात्मिक देणग्यांविषयी लिहिताना पौलाने करिंथ येथील सहविश्‍वासू बंधूभगिनींना असे लिहिले: “मी तुम्हास [आधी मूर्तिपूजक असलेल्यांस] कळवितो की, देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीहि माणूस ‘येशू शापभ्रष्ट आहे,’ असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्यावाचून कोणालाहि ‘येशू हा प्रभू आहे,’ असे म्हणता येत नाही.” (१ करिंथकर १२:१-३) येशू शापित आहे, असे म्हणावयास लोकांना केवळ दियाबल सैतानच प्रवृत्त करू शकतो. परंतु, आपण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे ख्रिस्ती आहोत आणि आपल्याला ही खात्री आहे, की यहोवाने येशूला मृतातून उठवले आणि इतर सर्व सृष्टीपेक्षा त्याला श्रेष्ठ बनवले आहे. (फिलिप्पैकर २:५-११) आपण ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास करतो आणि देवाने त्याला आपल्यावर प्रभू नियुक्‍त केले आहे असे आपण कबूल करतो.

सामान्य युगाच्या पहिल्या शतकात काही जण जे स्वतःला ख्रिस्ती म्हणत होते ते, येशू देहाने आला हे कबूल करत नव्हते. (२ योहान ७-११) या चुकीच्या दृष्टिकोनामुळे काहींनी, मशीहा असलेल्या येशूबद्दलची खरी शिकवण नाकारली. (मार्क १:९-११; योहान १:१, १४) पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालल्याने आपण अशा धर्मत्यागाला बळी पडत नाही. आपण आध्यात्मिकरीत्या सतर्क राहिलो तरच यहोवाची अपात्री कृपा आपल्यावर राहील आणि आपण ‘सत्याने चालत राहू शकू.’ (३ योहान ३, ४) यास्तव, आपल्या स्वर्गीय पित्यासोबत घनिष्ठ नातेसंबंध टिकवून ठेवण्याकरता आपण सर्वप्रकारचा धर्मत्याग नाकारण्याचा दृढनिश्‍चय करूया.

६. जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतात त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा कोणते गुण उत्पन्‍न करतो?

पौलाने धर्मत्यागी मूर्तिपूजा आणि गटबाजी यांना, व्यभिचार आणि अनैतिक वर्तन यांसारख्या ‘देहाच्या कर्मांमध्ये’ गणले. परंतु, “जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्‍यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे,” असे तो म्हणाला. (गलतीकर ५:१९-२१, २४, २५) जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनुसार जगतात व चालतात त्यांच्यामध्ये देवाची कार्यकारी शक्‍ती कोणते गुण उत्पन्‍न करते? पौलाने लिहिल्याप्रमाणे, “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ, प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन,” हे गुण उत्पन्‍न करते. (गलतीकर ५:२२, २३) आत्मिक फळाच्या या गुणांचा आपण विचार करूया.

‘एकमेकांवर प्रीती करा’

७. प्रीतीचा अर्थ काय होतो आणि प्रीतीची काही गुणलक्षणे कोणती आहेत?

आत्म्याच्या फळाचा एक गुण आहे प्रीती. प्रीती दाखवण्यामध्ये, इतरांबद्दल गाढ स्नेह असणे, त्यांच्याबद्दल निर्लोभ काळजी असणे आणि त्यांच्याबरोबर जवळीक असणे समाविष्ट आहे. देव प्रीतीचे साक्षात रूप असल्यामुळे शास्त्रवचनांत त्याच्याविषयी असे म्हटले आहे, की “देव प्रीति आहे.” देवाने व त्याच्या पुत्राने मानवजातीला जी महान प्रीती दाखवली ती, येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावरून दिसून येते. (१ योहान ४:८; योहान ३:१६; १५:१३; रोमकर ५:८) आपल्याला एकमेकांबद्दल असलेले प्रेम हे, आपण येशूचे अनुयायी असल्याचे चिन्ह आहे. (योहान १३:३४, ३५) किंबहुना, आपल्याला “एकमेकांवर प्रीति” करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. (१ योहान ३:२३) आणि पौल म्हणतो, की प्रीती सहनशील व कृपाळू आहे. ती हेवा करीत नाही; बढाई मारत नाही, गैरशिस्त वागत नाही किंवा स्वार्थ पाहत नाही. प्रीती चिडत नाही अथवा अपकार स्मरत नाही. ती अनीतीत आनंद मानीत नाही, तर सत्यासंबधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. शिवाय, प्रीती कधी अंतर देत नाही.—१ करिंथकर १३:४-८.

८. यहोवाच्या सहउपासकांवर आपण प्रेम का केले पाहिजे?

आपण जर देवाच्या आत्म्याला आपल्यात प्रीती उत्पन्‍न करू दिली तर, आपण देवावर आणि आपल्या शेजाऱ्‍यांवर प्रेम करू. (मत्तय २२:३७-३९) प्रेषित योहानाने असे लिहिले: “जो प्रीति करीत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करितो तो नरहिंसक आहे; आणि कोणाहि नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हांस माहीत आहे.” (१ योहान ३:१४, १५) ज्याच्या हातून मनुष्यवध झाला आहे तो, वध झालेल्या व्यक्‍तीचा द्वेष करत नसेल तरच तो इस्राएलच्या शरणपुरात आश्रय घेऊ शकत होता; पण त्याने जर जाणूनबुजून घात केला असेल तर त्याला या शरणपुरात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. (अनुवाद १९:४, ११-१३) आपण जर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालत असू तर, देव, सहउपासक आणि इतरांबद्दल आपल्याला प्रेम आहे हे आपण आपल्या कार्यांतून दाखवून देऊ.

‘यहोवाविषयीचा आनंद तोच आपला आश्रयदुर्ग’

९, १०. आनंद म्हणजे काय आणि कोणकोणत्या कारणांमुळे आपण आनंदित होतो?

आनंद ही, हर्ष व समाधानाची स्थिती आहे. यहोवा “आनंदी देव” आहे. (१ तीमथ्य १:११, NW; स्तोत्र १०४:३१) पुत्राला त्याची इच्छा पूर्ण करण्यास आनंद वाटतो. (स्तोत्र ४०:८; इब्री लोकांस १०:७-९) आणि यहोवाविषयीचा ‘आनंद आपला आश्रयदुर्ग’ आहे.—नहेम्या ८:१०.

१० कष्ट, दुःख किंवा छळ होत असूनही आपण जेव्हा देवाची इच्छा पूर्ण करतो तेव्हा देवाकडून मिळणाऱ्‍या आनंदामुळे आपल्याला अत्यंत समाधान मिळते. ‘देवाविषयीच्या ज्ञानामुळे’ अवर्णनीय आनंद मिळतो. (नीतिसूत्रे २:१-५) देवाविषयीचे आणि येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाचे अचूक ज्ञान व त्यांच्यावरील आपला विश्‍वास या गोष्टींच्या आधारावर आपण देवाबरोबर आनंदी नातेसंबंध जोडतो. (१ योहान २:१, २) एकमात्र खऱ्‍या बंधूसमाजाचा भाग बनणे देखील आणखी एक आनंदाचे कारण आहे. (सफन्या ३:९; हाग्गय २:७) आपल्याला मिळालेली राज्य आशा आणि सुवार्ता घोषित करण्याचा महान सुहक्क यांच्यामुळे देखील आपण आनंदी होतो. (मत्तय ६:९, १०; २४:१४) तसेच, सार्वकालिक जीवनाच्या आशेमुळेसुद्धा आपण हर्षित होतो. (योहान १७:३) आपल्यासमोर इतकी अद्‌भुत आशा असताना आपल्याला “अत्यानंद” झाला पाहिजे.—अनुवाद १६:१५.

शांतीप्रिय व सहनशील असा

११, १२. (क) तुम्ही शांतीची व्याख्या कशी कराल? (ख) देवाकडून मिळणाऱ्‍या शांतीचा आपल्यावर कोणता प्रभाव पडतो?

११ आत्म्याच्या फळाचा आणखी एक गुण आहे शांती. शांती ही, स्वस्थतेची व गोंधळापासून मुक्‍त अशी एक स्थिती आहे. आपला स्वर्गीय पिता शांतीचा देव आहे आणि आपल्याला असे आश्‍वासन देण्यात आले आहे की “परमेश्‍वर आपल्या लोकांस शांतीचे वरदान देईल.” (स्तोत्र २९:११; १ करिंथकर १४:३३) येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “मी तुम्हास शांति देऊन ठेवितो; मी आपली शांति तुम्हास देतो.” (योहान १४:२७) याचा त्याच्या अनुयायांना कोणता फायदा होणार होता?

१२ येशूने आपल्या शिष्यांना जी शांती दिली त्यामुळे त्यांची हृदये व त्यांची मने स्वस्थ झाली; त्यांच्या मनातील भीती कमी झाली. त्यांना जेव्हा, वचन दिल्याप्रमाणे पवित्र आत्मा मिळाला तेव्हा त्यांनी खासकरून शांती अनुभवली. (योहान १४:२६) आत्म्याच्या प्रभावामुळे व आपल्या प्रार्थनांचे उत्तर म्हणून आज आपण ‘देवाने दिलेली निरुपम शांती’ अनुभवतो, जिच्यामुळे आपले हृदय व आपले मन स्वस्थ राहते. (फिलिप्पैकर ४:६, ७) शिवाय, यहोवाचा आत्मा आपल्याला आपल्या सहउपासकांबरोबर आणि इतरांबरोबर शांतीने व गुण्यागोविंदाने राहण्यास मदत करतो.—रोमकर १२:१८; १ थेस्सलनीकाकर ५:१३.

१३, १४. सहनशीलता म्हणजे काय, आणि आपण सहनशील का असले पाहिजे?

१३ सहनशीलता आणि शांती हे दोन्ही गुण एकमेकांशी संबंधित आहेत. सहनशीलतेचा अर्थ अन्यायाचा सामना करताना किंवा राग आणून देणाऱ्‍या परिस्थितीत धीर धरणे आणि परिस्थिती बदलेल अशी आशा न सोडणे. देव सहनशील आहे. (रोमकर ९:२२-२४) येशू ठायी देखील हा गुण आहे. यामुळे आपल्याला देखील फायदा होऊ शकतो; कारण पौलाने असे लिहिले: “ते युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्‍वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली.”—१ तीमथ्य १:१६.

१४ इतर जण जेव्हा आपल्याला उद्देशून अविचारीपणे बोलतात किंवा आपले मन दुखेल अशाप्रकारे वागतात तेव्हा सहनशीलता आपल्याला सर्व गोष्टी सहन करण्यास मदत करते. पौलाने सहख्रिश्‍चनांना असे आर्जवले: “सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.” (१ थेस्सलनीकाकर ५:१४) आपण सर्वजण अपरिपूर्ण आहोत व आपण चुका करतो त्यामुळे, लोकांनी आपल्याबरोबर सहनशीलतेने वागावे, त्यांचे मन दुखेल अशाप्रकारचे एखादे कृत्य आपल्या हातून घडले असेल तर त्यांनी आपल्याला क्षमा करावी, असे आपल्याला वाटते. यास्तव आपणही ‘आनंदासह सहनशक्‍ती’ दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.—कलस्सैकर १:९-१२.

दयाळुपणा व चांगुलपणा दाखवा

१५. दयाळुपणा म्हणजे काय, व दयाळुपणाची काही उदाहरणे सांगा.

१५ मैत्रिपूर्ण व साहाय्यकारी शब्दांद्वारे व कृतींद्वारे इतरांमध्ये आवड बाळगून आपण दयाळुपणा दाखवतो. यहोवाप्रमाणे त्याचा पुत्र देखील दयाळू आहे. (रोमकर २:४; २ करिंथकर १०:१) देवाच्या व ख्रिस्ताच्या सेवकांकडून अशी अपेक्षा केली जाते की त्यांनी देखील दयाळू असले पाहिजे. (मीखा ६:८; कलस्सैकर ३:१२) देवाची उपासना न करणाऱ्‍यांनी देखील “विशेष उपकार” केले अर्थात दयाळुपणा दाखवला. (प्रेषितांची कृत्ये २७:३; २८:२) तेव्हा, आपण देवाच्या पवित्र “आत्म्याच्या प्रेरणेने” चालत असल्यामुळे आपणही दयाळुपणा दाखवलाच पाहिजे.

१६. दयाळुपणा दाखवता येणाऱ्‍या काही परिस्थिती कोणत्या आहेत?

१६ एखाद्याच्या अविचारी बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे आपल्याला त्या व्यक्‍तीचा राग येत असला तरी आपण दयाळुपणा दाखवू शकतो. पौलाने म्हटले: “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सुर्य मावळू नये, आणि सैतानाला वाव देऊ नका. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा.” (इफिसकर ४:२६, २७, ३२) जे परीक्षांचा सामना करतात अशांना दयाळुपणा दाखवणे खासकरून योग्य आहे. परंतु, जर मंडळीतील एखादी व्यक्‍ती ‘चांगुलपण, नीतिमत्व व सत्याचा’ मार्ग सोडून देत असल्याचे उघडउघड दिसत असतानाही एक ख्रिस्ती वडील या व्यक्‍तीच्या भावना दुखावू नये म्हणून तिला शास्त्रवचनांतून सल्ला देत नसतील तर हे वडील त्या व्यक्‍तीला दयाळुपणा दाखवत आहेत असे म्हणता येणार नाही.—इफिसकर ५:९.

१७, १८. चांगुलपणा म्हणजे काय, व आपण आपल्या जीवनात हा गुण का दाखवला पाहिजे?

१७ चांगुलपणा हा एक सद्‌गुण आहे; तो नैतिक श्रेष्ठता किंवा चांगले असण्याचा गुण अथवा एक अवस्था आहे. यहोवा पूर्णार्थाने चांगला आहे. (स्तोत्र २५:८; जखऱ्‍या ९:१७) येशू सद्‌गुणी आहे आणि त्याच्या ठायी नैतिक श्रेष्ठता आहे. तरीपण, एकदा कोणीतरी त्याला “उत्तम गुरुजी” असे संबोधले तेव्हा त्याने “उत्तम” किंवा चांगला ही पदवी स्वीकारली नाही. (मार्क १०:१७, १८) हे उचित होते कारण देव चांगुलपणाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे, हे त्याला माहीत होते.

१८ वारशाने मिळालेल्या पापामुळे, चांगुलपण दाखवण्यात आपण कमी पडतो. (रोमकर ५:१२) तरीपण, आपण यहोवाला, आपल्याला चांगुलपण शिकवण्यास प्रार्थना करून हा गुण आपल्या व्यवहारात दाखवू शकतो. पौलाने रोममधील सहविश्‍वासू बांधवांना असे सांगितले: “तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्‍न झालेले व एकमेकांना बोध करावयाला समर्थ आहा अशी तुम्हाविषयी माझी स्वतःचीहि खातरी झाली आहे.” (रोमकर १५:१४) ख्रिस्ती पर्यवेक्षक “चांगुलपणाची आवड धरणारा” असला पाहिजे. (तीत १:७, ८) आपण जर देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालत राहिलो तर, आपण चांगुलपणा दाखवणारे म्हणून ख्याती मिळवू आणि आपण ‘दाखवलेल्या चांगुलपणाचे यहोवा स्मरण करील.’—नहेम्या ५:१९; १३:३१.

‘निष्कपट विश्‍वास’

१९. इब्री लोकांस ११:१ नुसार विश्‍वास म्हणजे काय?

१९ विश्‍वास, हा गुण देखील आत्म्याच्या फळापैकी एक आहे. तो, “आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्‍या गोष्टींबद्दलची खातरी आहे.” (इब्री लोकांस ११:१) आपल्याला जर विश्‍वास असेल तर, यहोवाने जे काही वचन दिले आहे ते पूर्ण झालेच, अशी आपल्याला खात्री असते. विश्‍वास देखील न पाहिलेल्या गोष्टींच्या खात्रीलायक पुराव्यांइतकाच ठोस असतो. उदाहरणार्थ, निर्मित गोष्टी पाहून आपली खात्री पटते, की एक निर्माणकर्ता आहे. हा अशाप्रकारचा विश्‍वास आहे जो आपण, देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालत राहिल्यास दाखवू.

२०. “सहज गुंतविणारे पाप” काय आहे व आपण ते आणि देहाची कामे कशी टाळू शकतो?

२० विश्‍वासाची कमतरता “सहज गुंतविणारे पाप” आहे. (इब्री लोकांस १२:१) आपला विश्‍वास कमजोर करू शकणारी देहाची कामे, भौतिकवाद आणि खोट्या शिकवणी टाळण्याकरता आपण देवाच्या पवित्र आत्म्यावर अवलंबून राहिले पाहिजे. (कलस्सैकर २:८; १ तीमथ्य ६:९, १०; २ तीमथ्य ४:३-५) यहोवाचा पवित्र आत्मा त्याच्या आधुनिक काळातल्या सेवकांमध्ये, ख्रिस्त पूर्व काळातल्या व बायबल अहवाल नमूद केलेल्या इतर साक्षीदारांसारखा विश्‍वास उत्पन्‍न करतो. (इब्री लोकांस ११:२-४०) आणि आपला ‘निष्कपट विश्‍वास’ पाहून इतरांचा विश्‍वास मजबूत होऊ शकतो.—१ तीमथ्य १:५; इब्री लोकांस १३:७.

सौम्यपणा व आत्मसंयम दाखवा

२१, २२. सौम्यपणा म्हणजे काय आणि आपण सौम्यतेने का वागले पाहिजे?

२१ सौम्यपणा म्हणजे मृदू चित्तवृत्ती आणि वागणूक. देवाच्या गुणांपैकी एक गुण आहे, सौम्यपणा. यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाचे हुबेहुब प्रतिबिंब असलेला येशू देखील मनाचा सौम्य होता. (मत्तय ११:२८-३०; योहान १:१८; ५:१९) मग देवाचे सेवक यानात्याने आपल्याकडून काय अपेक्षा केली जाते?

२२ ख्रिस्ती यानात्याने आपण ‘सर्व माणसांबरोबर सौम्यतेने वागावे,’ अशी आपल्याकडून अपेक्षा केली जाते. (तीत ३:२) सेवेमध्ये आपण सौम्यपणा दाखवतो. आध्यात्मिक पात्रता असलेल्यांना असा सल्ला देण्यात आला आहे, की त्यांनी चूक करणाऱ्‍यांना “सौम्य वृत्तीने” ताळ्यावर आणावे. (गलतीकर ६:१) “पूर्ण नम्रता, सौम्यता” दाखवण्याद्वारे आपण सर्वजण ख्रिस्ती ऐक्याला व शांतीला हातभार लावू शकतो. (इफिसकर ४:१-३) आपण जर सतत पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालत राहिलो व आत्मसंयम दाखवत राहिलो तर आपण सौम्यतेने वागू.

२३, २४. आत्मसंयम म्हणजे काय आणि या गुणाचा आपल्याला कशाप्रकारे लाभ होतो?

२३ इंद्रियदमन अर्थात, आत्मसंयमामुळे आपण आपल्या विचारांवर, बोलण्यावर व कृतींवर नियंत्रण ठेवू शकतो. जेरुसलेमला ओसाड बनवणाऱ्‍या बॅबिलोनी लोकांबरोबर व्यवहार करताना यहोवाने “स्वतःला आवरिले.” (यशया ४२:१४) त्याच्या पुत्रानेसुद्धा त्याला सहन कराव्या लागणाऱ्‍या हालअपेष्टांत आत्मसंयम दाखवण्याद्वारे आपल्यासाठी एक “कित्ता घालून दिला.” आणि प्रेषित पेत्राने सहख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: “तुम्ही . . . ज्ञानात इंद्रियदमनाची . . . भर घाला.”—१ पेत्र २:२१-२३; २ पेत्र १:५-८

२४ ख्रिस्ती वडिलांनी आत्मसंयमी असले पाहिजे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. (तीत १:७, ८) खरे तर, जे जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतात ते सर्व आत्मसंयम बाळगू शकतात व अनैतिक वर्तन, गलिच्छ भाषा किंवा यहोवाला असंतुष्ट करणाऱ्‍या सर्व गोष्टी टाळू शकतात. देवाच्या पवित्र आत्म्याला आपण आपल्यात आत्मसंयम निर्माण करू दिला तर आपल्या बोलण्यावरून व वागवण्यावरून हे इतरांना दिसून येईल.

आत्म्याच्या प्रेरणेने चालत राहा

२५, २६. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याने सध्या, लोकांबरोबरच्या आपल्या नातेसंबंधावर कसा परिणाम होऊ शकतो आणि भविष्यात आपल्याला कोणता फायदा मिळेल?

२५ आपण जर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालत राहिलो तर आपण आवेशी राज्य प्रचारक बनू. (प्रेषितांची कृत्ये १८:२४-२६) आपण स्नेही मित्र बनू आणि यामुळे ईश्‍वरी भक्‍ती आचरणाऱ्‍यांना खासकरून आपल्याबरोबर संगती करायला देखील आवडेल. आपल्याला पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळत असल्यामुळे आपण यहोवाच्या सहउपासकांना आध्यात्मिक उत्तेजन देऊ. (फिलिप्पैकर २:१-४) सर्व ख्रिश्‍चनांना याउपर आणखी काय हवे?

२६ सैतानाच्या कह्‍यात असलेल्या या जगात पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणे इतके सोपे नाही. (१ योहान ५:१९) तरीपण, कोट्यवधी लोक असे करत आहेत. आपण जर पूर्ण अंतःकरणाने यहोवावर भरवसा ठेवला तर आपण आताही जीवनाचा आनंद लुटू शकू आणि भविष्यात, पवित्र आत्म्याचा प्रेमळ दाता याच्या धार्मिक मार्गांत सदासर्वकाळ चालत राहू शकू.—स्तोत्र १२८:१; नीतिसूत्रे ३:५, ६. (w०७ ७/१५)

तुमचे काय उत्तर आहे?

• ‘पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यामुळे’ देव आणि त्याचा पुत्र यांच्याबरोबरच्या आपल्या नातेसंबंधावर कसा परिणाम होतो?

• पवित्र आत्म्याच्या फळात कोणकोणते गुण आहेत?

• देवाच्या पवित्र आत्म्याच्या फळाचे गुण दाखवण्याचे काही मार्ग कोणते आहेत?

• पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालल्यामुळे आपल्या सध्याच्या आणि भविष्याच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]