व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही “देवविषयक बाबतीत धनवान” आहात का?

तुम्ही “देवविषयक बाबतीत धनवान” आहात का?

तुम्ही “देवविषयक बाबतीत धनवान” आहात का?

“जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करितो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.”—लूक १२:२१.

१, २. (क) लोक कोणत्या कारणासाठी मोठमोठे त्याग करण्यास तयार होतात? (ख) ख्रिश्‍चनांना कोणत्या आव्हानांना व धोक्यांना तोंड द्यावे लागते?

हजारो वर्षांपासून मानवाने धन मिळवण्याच्या हव्यासापोटी उरफोड केली आहे. उदाहरणार्थ, १९ व्या शतकात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि संयुक्‍त संस्थाने येथे सोने मिळत असल्यामुळे, काही लोक आपले घरदार, प्रिय जन यांना सोडून, अनोळखी आणि कधीकधी अगदी प्रतिकूल देशांत, आपल्याही हाती काही धन लागते का म्हणून गेले. होय, पुष्कळ लोक त्यांच्या मनात असलेल्या धनसंपत्तीचे स्वप्न पूर्ण करण्याकरता आपला जीव धोक्यात घालण्यास व पुष्कळ त्याग करण्यासही तयार असतात.

आज बहुतेक लोक खऱ्‍याखुऱ्‍या अर्थाने अशाप्रकारे धनाच्या शोधात निघत नसले तरीसुद्धा, संसाराचा गाडा चालवण्यासाठी त्यांना काबाडकष्ट करावे लागतात. सध्याच्या युगात उदरनिर्वाह चालवणे अतिशय कठीण, शिणवून व पिळवटून टाकणारे असू शकते. एखादी व्यक्‍ती, अन्‍न, वस्त्र व निवारा यांच्या चिंतेने इतकी ग्रासून जाऊ शकते, की अधिक महत्त्वाच्या गोष्टींकडे तिचे दुर्लक्ष होऊ शकते, नव्हे तिला त्यांचा विसरही पडू शकतो. (रोमकर १४:१७) येशूने असा एक दाखला दिला जो अगदी अचूकरीत्या या मानवप्रवृत्तीचे वर्णन करतो. तो दाखला लूक १२:१६-२१ या वचनांत आपल्याला वाचायला मिळतो.

३. लूक १२:१६-२१ मधील येशूने दिलेल्या दाखल्याचे थोडक्यात वर्णन करा.

येशू जेव्हा लोभाच्या धोक्यापासून सावध राहण्याविषयी बोलला तेव्हा त्याचप्रसंगी त्याने धनवान मनुष्याचा दाखला दिला ज्याचा काही भाग आपण मागील लेखात पाहिला. लोभाविषयी इशारा दिल्यानंतर येशू एका धनवानाविषयी बोलला, ज्याच्याकडे आधीपासूनच चांगल्या-चांगल्या वस्तूंनी भरलेली कोठारे होती पण त्यात तो समाधानी नव्हता. हा धनवान मनुष्य आणखी चांगल्या वस्तू साठवता याव्यात म्हणून आधीची कोठारे पाडून आणखी मोठी कोठारे बांधतो. आता आपण निवांतपणे जीवनाचा आनंद लुटू शकतो, असा विचार करत असतानाच देव त्याला म्हणतो, की त्याचे जीवन संपुष्टात येणार आहे व त्याने साठवलेल्या सर्व वस्तू दुसऱ्‍यांना मिळतील. आणि मग येशू शेवटी असे म्हणतो: “जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करितो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.” (लूक १२:२१) या दाखल्यावरून आपण कोणता धडा शिकतो? हा धडा आपण स्वतःच्या जीवनात कसा लागू करू शकतो?

समस्या असलेला मनुष्य

४. येशूने आपल्या दाखल्यात वर्णन केलेल्या मनुष्याविषयी आपण काय म्हणू शकतो?

येशूने दिलेला दाखला अनेक देशांतील लोकांच्या परिचयाचा आहे. आपण पाहतो, की येशूने या दाखल्याची सुरुवात फक्‍त अशी म्हणून केली: “कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले.” या मनुष्याने फसवणूकीने किंवा बेकायदेशीररीत्या धन गोळा केले होते, असे येशूने म्हटले नाही. दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे तर, हा मनुष्य दुष्ट किंवा वाईटही नव्हता. खरे तर, येशूने त्याच्याविषयी दाखल्यात जे सांगितले त्यावरून हा मनुष्य कष्टाळू होता, असा विचार करायला हरकत नाही. निदान तो, भविष्याचा विचार करून पैसे साठवून ठेवणारा होता; त्याला कदाचित त्याच्या कुटुंबाच्या कल्याणाची चिंता होती. तर, जगिक दृष्टीतून पाहिल्यास हा मनुष्य कष्टाळू व कर्तव्यदक्ष होता.

५. येशूने दिलेल्या दाखल्यातील मनुष्याची कोणती समस्या होती?

काहीही असो. येशूने दिलेल्या दाखल्यातील मनुष्य धनवान होता म्हणजे त्याच्याजवळ आधीपासूनच भरपूर भौतिक संपत्ती होती. परंतु येशूने वर्णन केल्याप्रमाणे या धनवान मनुष्याची एक समस्या होती. त्याच्या शेतातून, त्याने अपेक्षा देखील केली नव्हती, किंवा त्याला जितके लागत होते त्याच्यापेक्षा कैक पटीने किंवा त्याला सांभाळताही येत नव्हते इतका उपज निघाला. या मनुष्याने काय करायला हवे होते?

६. आज देवाच्या अनेक सेवकांना कोणते निर्णय घ्यावे लागतात?

आज यहोवाच्या अनेक सेवकांना या धनवान मनुष्यासारख्या परिस्थितींना तोंड द्यावे लागते. खरे ख्रिश्‍चन प्रामाणिक, कामासू असण्याचा प्रयत्न करतात. ते अंग चोरत नाहीत. (कलस्सैकर ३:२२, २३) ते दुसऱ्‍याच्या हाताखाली काम करत असले किंवा त्यांचा स्वतःचा धंदा असला तरी सहसा ते त्यांच्या कामात यशस्वी होतात; पुष्कळदा तर ते इतरांपेक्षा वरचढही ठरतात. त्यांच्यासमोर जेव्हा बढतीच्या किंवा व्यापाराच्या नवीन संधी येतात तेव्हा त्यांना निर्णय घ्यावा लागतो. जसे की बढती स्वीकारून जास्त पैसा कमवायचा की नाही? तसेच, अनेक तरुण साक्षीदार शाळेत इतर विद्यार्थ्यांपेक्षा हुशार असतात. त्यामुळे, त्यांना पदके दिली जातात किंवा प्रतिष्ठित संस्थांमध्ये पुढील शिक्षणासाठी त्यांना स्कॉलरशिप दिली जाते. चारचौघांप्रमाणे, चालून आलेली संधी स्वीकारून पुढे जायचे की नाही, हे त्यांना ठरवावे लागते.

७. येशूने दिलेल्या दाखल्यातील मनुष्याने त्याची समस्या सोडवण्यासाठी कोणती योजना केली?

येशूने दिलेल्या दाखल्याकडे आपण पुन्हा एकदा वळू या. धनवान मनुष्याच्या शेतात जेव्हा भरपूर उपज निघाला व त्याला तो उपज साठवून ठेवण्यासाठी जागा उरली नाही तेव्हा त्याने काय केले? त्याने जुनी कोठारे पाडून मोठी कोठारे बांधायचे ठरवले, जेणेकरून त्याला अतिरिक्‍त धान्य व चांगल्या वस्तू साठवून ठेवता येतील. या योजनेमुळे त्याला सुरक्षिततेची व समाधानाची जाणीव झाली. त्यामुळे तो स्वतःशी असा विचार करू लागला: “मी आपल्या जिवाला म्हणेन, ‘हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.’”—लूक १२:१९.

“मूर्ख” का?

८. येशूने दिलेल्या दाखल्यातील मनुष्याच्या ध्यानातून कोणती महत्त्वाची गोष्ट निसटली होती?

पण, येशूने हा दाखला ज्याप्रकारे सांगितला, त्यावरून दिसून येते, की या धनवान मनुष्याच्या योजनांमुळे त्याला सुरक्षिततेची खोटी आशा वाटत होती. ही योजना व्यावहारिक वाटत असली तरीही यात एक महत्त्वाची गोष्ट नव्हती. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाची इच्छा. हा धनवान मनुष्य केवळ स्वतःपुरताच विचार करत होता. आपण, आरामशीर खाऊन-पिऊन सुखाने कसे राहू शकतो, याचाच तो विचार करत होता. त्याने असा विचार केला, की आपल्याजवळ खूप चांगला “माल” आहे त्याअर्थी आपल्याजवळ “पुष्कळ वर्षे” देखील आहेत. परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे, त्याने जशी योजना केली तसे घडले नाही. येशूने आधी देखील असे बोलून दाखवले होते: “कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” (लूक १२:१५) ज्या दिवशी या धनवान मनुष्याने सुरक्षित भविष्याची योजना केली अगदी त्याच रात्री त्याच्या सर्व प्रयत्नांना पूर्णविराम लागला. देवाने त्याला म्हटले: “अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे, ते कोणाचे होईल?”—लूक १२:२०.

९. दाखल्यातील मनुष्याला मूर्ख का संबोधण्यात आले आहे?

येथे आपण येशूने दिलेल्या दाखल्यातील मुख्य मुद्द्‌याकडे येतो. देवाने या धनवानाला मूर्ख म्हटले. द एक्सेजिटिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टामेंट या पुस्तकात असे म्हटले आहे, की मूर्ख या शब्दासाठी ग्रीक भाषेत वापरण्यात आलेली रूपे, “नेहमी समंजसपणाची उणीव दर्शवतात.” तोच कोश पुढे असेही म्हणतो, की या दाखल्यात देवाने जो शब्द वापरला आहे तो, “धनवानाच्या भवितव्याच्या योजनांचा पोकळपणा” उघड करतो. तो शब्द, बौद्धिक कमतरता असणाऱ्‍याला सूचित होत नाही तर, “आपण देवावर निर्भर असले पाहिजे हे कबूल न करणाऱ्‍याला” सूचित करतो. येशूने धनवान मनुष्याच्या केलेल्या वर्णनावरून, पहिल्या शतकात आशिया मायनर मधील लावदिकीया मंडळीतील ख्रिश्‍चनांना त्याने नंतर जे म्हटले त्याची आठवण होते. त्याने त्यांना असे म्हटले: “‘मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे, व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस;’ पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही.”—प्रकटीकरण ३:१७.

१०. एखाद्याजवळ खूप चांगला “माल” असल्याने “पुष्कळ वर्षे” जगण्याची गॅरेंटी का मिळत नाही?

१० आपण या धड्यावर मनन केलेच पाहिजे. आपण दाखल्यातील मनुष्याप्रमाणे तर नसू? आपल्याजवळ खूप चांगला “माल” असावा म्हणून आपण काबाडकष्ट करतो, पण “पुष्कळ वर्षे” जगण्याची आशा प्राप्त करण्याकरता आवश्‍यक असलेल्या गोष्टी करण्यास चुकत असू. (योहान ३:१६; १७:३) बायबल म्हणते: “क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही,” आणि “जो आपल्या धनावर भरवसा ठेवितो तो पडेल.” (नीतिसूत्रे ११:४, २८) यास्तव, “जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करितो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे,” असा सल्ला देऊन येशू हा दाखला संपवतो.—लूक १२:२१.

११. भौतिक संपत्तीवर आशा ठेवणे किंवा भौतिक संपत्तीमुळे आपले भवितव्य सुरक्षित होईल असा विचार करणे व्यर्थ का आहे?

११ येशूने दिलेल्या दाखल्याच्या शेवटी, “तो तसाच आहे,” असे म्हणून हे दाखवून दिले, की जे लोक आपल्या जीवनात फक्‍त भौतिक संपत्तीवर आशा ठेवतात, भौतिक संपत्ती असेल तरच आपले भवितव्य सुरक्षित असेल असा विचार करतात, अशा लोकांची गत दाखल्यातील धनवानासारखीच होईल. “द्रव्यसंचय” करण्यात काही चूक नाही, पण “देवविषयक बाबतीत धनवान” न होणे चुकीचे आहे. शिष्य याकोबाने काहीसा असाच इशारा दिला. त्याने लिहिले: ‘ऐका, जे तुम्ही म्हणता: ‘आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू,’ त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही.’ पण मग काय करणे आवश्‍यक आहे? त्यांनी असे म्हटले पाहिजे: “प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू.” (याकोब ४:१३-१५) एखादी व्यक्‍ती कितीही श्रीमंत असली किंवा तिच्याजवळ कितीही भौतिक संपत्ती असली तरीसुद्धा जर, ती देवविषयक बाबतीत श्रीमंत नाही तर सर्व काही व्यर्थ ठरेल. पण मग देवविषयक बाबतीत श्रीमंत होणे म्हणजे नेमके काय?

देवविषयक बाबतीत श्रीमंत होणे

१२. काय केल्याने आपण देवविषयक बाबतीत श्रीमंत होऊ शकू?

१२ येशूने जे म्हटले त्यावरून, देवविषयक बाबतीत श्रीमंत होणे हे, स्वतःसाठी द्रव्यसंचय करणे अथवा आर्थिकरीत्या श्रीमंत होणे याच्याविरुद्ध आहे. त्यामुळे, येशू असे म्हणू इच्छित होता, की जीवनातील आपली मुख्य चिंता, भौतिक मालमत्ता मिळवणे किंवा आपल्याजवळ असलेल्या संपत्तीचा आनंद लुटणे, ही नसावी. उलट, यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध आणखी वाढवण्यासाठी किंवा आणखी बळकट करण्यासाठी आपण आपल्या संपत्तीचा उपयोग केला पाहिजे. असे केल्याने आपण निश्‍चितच देवविषयक बाबतीत श्रीमंत होऊ शकू. का? कारण यामुळे अनेक आशीर्वादांसाठी मार्ग खुला होतो. बायबल आपल्याला असे सांगते: “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.”—नीतिसूत्रे १०:२२.

१३. यहोवाचा आशीर्वाद कशाप्रकारे “समृद्धि देतो”?

१३ यहोवा जेव्हा आपल्या लोकांवर आशीर्वादांचा वर्षाव करतो तेव्हा तो नेहमी त्यांना जे उत्तम आहे ते देतो. (याकोब १:१७) उदाहरणार्थ, यहोवाने इस्राएली लोकांना राहण्याकरता जागा दिली तेव्हा तो ‘दुधामधाचे प्रवाह वाहणारा देश’ होता. मिसर अर्थात ईजिप्त देशाचे वर्णन देखील असेच करण्यात आले होते तरीसुद्धा यहोवाने इस्राएली लोकांना दिलेला देश निदान एका बाबतीत तरी वेगळा होता. “तुझा देव परमेश्‍वर त्या देशाची काळजी वाहतो,” असे मोशेने इस्राएल लोकांना सांगितले. दुसऱ्‍या शब्दांत, यहोवा त्यांचा सांभाळ करणार असल्यामुळे त्यांची भरभराट होणार होती. जोपर्यंत इस्राएली लोक यहोवाशी विश्‍वासू राहिले तोपर्यंत त्यांनी यहोवाच्या विपुल आशीर्वादांचा आनंद उपभोगला आणि त्यांचे जीवन, त्यांच्या आजूबाजूच्या सर्व राष्ट्रांपेक्षा सर्वश्रेष्ठ होते, हे स्पष्ट दिसत होते. होय, यहोवाचा आशीर्वाद “समृद्धि देतो.”—गणना १६:१३; अनुवाद ४:५-८; ११:८-१५.

१४. देवाच्या नजरेत धनवान असलेले कशाचा आनंद उपभोगतात?

१४ “देवविषयक बाबतीत श्रीमंत” होणे या वाक्यांशाचे भाषांतर, ‘देवाच्या दृष्टीने धनवान’ होणे (ईझी-टू-रीड व्हर्शन) असेही करण्यात आले आहे. जे भौतिकरीत्या श्रीमंत असतात त्यांना, इतरजण आपल्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात याची सहसा चिंता असते. हे त्यांच्या जीवनशैलीवरून दिसून येते. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे, “संसाराविषयीची फुशारकी” मारून हे लोक इतरांवर प्रभाव पाडायचा प्रयत्न करतात. (१ योहान २:१६) पण, जे देवाच्या नजरेत धनवान असतात त्यांच्यावर विपुलमात्रेत देवाची कृपापसंती, त्याची मर्जी, त्याची अपात्री कृपा असते आणि त्याच्याबरोबर त्यांचा अगदी घनिष्ठ प्रेमळ नातेसंबंध असतो. आणि या अशा मौल्यवान स्थितीत असल्यामुळे त्यांना निश्‍चितच आनंद व सुरक्षिततेची भावना जाणवते. हा आनंद व ही सुरक्षिततेची भावना भौतिक धनसंपत्ती कधीही देऊ शकत नाही. (यशया ४०:११) पण मग आपल्या मनात असा प्रश्‍न येतो, की देवाच्या नजरेत धनवान होण्याकरता आपण काय केले पाहिजे?

देवाच्या नजरेत धनवान

१५. देवाच्या नजरेत धनवान होण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१५ येशूने दिलेल्या दाखल्यातील मनुष्याने स्वतःला आणखी धनी बनवण्याकरता योजना आखल्या, परिश्रमही घेतले. तरीपण त्याला मूर्ख म्हणण्यात आले. यास्तव, आपल्याला जर देवाच्या नजरेत धनवान व्हायचे आहे तर आपण देवाच्या नजरेत खरोखरच मौल्यवान व अर्थपूर्ण असलेल्या कार्यांत परिश्रम घेतले पाहिजेत, नव्हे त्यात स्वतःला झोकून दिले पाहिजे. यांपैकी एक कार्य आहे ज्याच्याविषयी येशूने आपल्याला अशी आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.” (मत्तय २८:१९) आपला वेळ, आपली शक्‍ती आणि आपली कौशल्ये, स्वतःच्या समृद्धीपेक्षा राज्य प्रचार कार्याच्या व शिष्य बनवण्याच्या बढतीसाठी उपयोगात आणणे हे पैसे गुंतवण्यासारखे आहे. ज्यांनी असे केले आहे त्यांना आध्यात्मिक अर्थाने खूप लाभ मिळाले आहेत. पुढील अनुभव त्यांची साक्ष देतात.—नीतिसूत्रे १९:१७.

१६, १७. देवाच्या नजरेत धनवान बनवणारी जीवनशैली दाखवण्याकरता तुम्ही कोणते अनुभव सांगाल?

१६ कंप्युटर टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्‍या एका ख्रिस्ती बांधवाचे उदाहरण घ्या. त्याला लठ्ठ पगाराची नोकरी होती. त्याचे काम त्याचा सर्व वेळ खात होते; यामुळे आपण आध्यात्मिकरीत्या कुपोषित आहोत, असे त्याला वाटू लागले. सरतेशेवटी, कामात आणखी पुढे जाण्याऐवजी त्याने ते काम सोडून दिले आणि आईस्क्रीम बनवण्याचे काम सुरू केले. आईस्क्रीम बनवून ती तो रस्त्यांवर विकू लागला. यामुळे त्याला आपल्या आध्यात्मिक गरजा आणि जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यासाठी वेळ मिळू लागला. त्याचे पूर्वीचे सहकर्मचारी त्याची टिंगल करू लागले. पण या बांधवाने जो निर्णय घेतला त्याचा परिणाम काय झाला? तो म्हणतो: “पूर्वी मी जेव्हा कंप्युटर्सचं काम करायचो तेव्हा माझ्याकडे बक्कळ पैसा होता, पण मी आनंदी नव्हतो. आज मी आनंदी आहे कारण मला माझ्या आधीच्या कामात जे टेन्शन किंवा चिंता होती ती नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मला यहोवाच्या जवळ असल्यासारखं वाटतं.” हा ख्रिस्ती बांधव काम बदलल्यामुळे पूर्ण वेळेच्या सेवेत उतरू शकला. आणि आता तो त्याच्या देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात सेवा करत आहे. यहोवाचे आशीर्वाद खरोखरच “समृद्धि” देतात.

१७ आणखी एक उदाहरण एका स्त्रीचे आहे जी, शिक्षणाला अतिशय महत्त्व देत असलेल्या कुटुंबात लहानाची मोठी झाली. तिने फ्रान्स, मेक्सिको, स्वीत्झर्लंड येथील विद्यापीठांत शिक्षण घेतले आणि तिच्यासमोर भरपूर यश मिळवण्याचा वाव असलेल्या व्यवसायात उतरण्याची आशा होती. “यश माझ्या पायाशी लोळण घेत होते; माझ्याजवळ प्रतिष्ठा होती, लोक माझा आदर करायचे; पण माझ्या हृदयात एक पोकळी होती, मी समाधानी नव्हते.” मग तिला यहोवाविषयी शिकायची संधी मिळाली. ती म्हणते: “मी जसजशी आध्यात्मिक प्रगती करू लागले तसतसे यहोवाला संतुष्ट करण्याच्या आणि त्याने मला जे काही दिले होते त्यातील निदान थोडेतरी त्याला देण्याच्या माझ्या इच्छेमुळे मला योग्य मार्ग स्पष्टपणे पाहण्यास अर्थात पूर्ण वेळेची सेवा सुरू करण्यास मदत मिळाली.” तिने आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर लवकरच तिचा बाप्तिस्मा झाला. गेल्या २० वर्षांपासून ती पूर्ण वेळेच्या सेवेत आनंदाने सेवा करत आहे. ती म्हणते: “काहींना असे वाटते, की मी माझी कौशल्ये वाया घालवली. पण मी आनंदी आहे हे ते पाहतात व मी ज्या तत्त्वांनुसार जगते त्यांचे त्यांना कौतुक वाटते. मी दररोज यहोवाला, मला नम्र राहण्यास मदत कर, अशी प्रार्थना करत असते. मी जर नम्र राहिले तर त्याची कृपा माझ्यावर राहील.”

१८. पौलाप्रमाणे आपणही देवाच्या नजरेत धनवान कसे बनू शकतो?

१८ शौल जो नंतर पौल झाला त्याच्यापुढे भरपूर यश मिळवण्याचा वाव होता. तरी, तो नंतर असे लिहितो: “ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे.” (फिलिप्पैकर ३:७, ८) पौलाच्या मते, ख्रिस्ताद्वारे त्याने मिळवलेले धन हे, जग देऊ करत असलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा वरचढ होते. आपणही, स्वार्थी महत्त्वाकांक्षांना लाथाडण्याद्वारे व ईश्‍वरी भक्‍तीचे जीवन स्वीकारून देवाच्या नजरेत समृद्ध असलेले जीवन उपभोगू शकतो. देवाचे वचन आपल्याला असे आश्‍वासन देते: “नम्रता व परमेश्‍वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय.”—नीतिसूत्रे २२:४. (w०७ ८/१)

तुम्ही समजावून सांगू शकाल का?

• येशूने दिलेल्या दाखल्यातील मनुष्याची कोणती समस्या होती?

• दाखल्यातील मनुष्याला मूर्ख का संबोधण्यात आले?

• देवाच्या नजरेत धनवान असण्याचा काय अर्थ होतो?

• आपण देवाच्या नजरेत धनवान कसे बनू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]