रशियन संगीत रचनेत देवाचे नाव
रशियन संगीत रचनेत देवाचे नाव
सन १८७७ मध्ये, मोडेस्ट् मुसॉर्गस्की नावाच्या सुप्रसिद्ध रशियन संगीत रचनाकाराने बायबल प्रदेशांमध्ये घडलेल्या एका घटनेच्या आधारावर समूह गायनाची एक संगीत रचना प्रसिद्ध केली. त्याने आपल्या एका मित्राला असे लिहिले: “जीझस नविनस [यहोशवा] नावाचा एक बायबल प्रसंग, मी लिहिला आहे जो संपूर्णपणे बायबलवर आधारित आहे; एवढेच नव्हे तर नविनस कनानमध्ये ज्या मार्गाने विजय मिळवत गेला त्यावर देखील हा प्रसंग आधारित आहे.” मुसॉर्गस्कीने त्याच्या दुसऱ्या रचनांमध्ये बायबल विषयांचा आणि पात्रांचा वापर केला, ज्यात “सन्हेरीबाचा विध्वंस,” या रचनेचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, “जीझस नविनस,” तसेच १८७४ च्या “सन्हेरीबाचा विध्वंस” या आवृत्तीत मुसॉर्गस्कीने, रशियन उच्चारणाचा उपयोग करून देवाच्या नावाचा उल्लेख केला आहे. इब्री शास्त्रवचनांत चार व्यंजनांच्या—יהוה (YHWH)—रूपात देवाच्या नावाचा उल्लेख जवळ-जवळ ७,००० वेळा आढळतो.
याप्रकारे, मुसॉर्गस्कीच्या या संगीत रचना दाखवतात की बायबल मधील देवाचे यहोवा हे नाव, विसावे शतक सुरू होण्यापूर्वीच रशियन समाजात ज्ञात होते. ते अगदी योग्य आहे, कारण यहोवाने स्वतः मोशेला सांगितले होते की, “हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल.”—निर्गम ३:१५. (w०७ ९/१)
[३२ पानांवरील चित्र]
१९१३ मध्ये सेंट पीटर्झबर्ग कन्झर्वेटरी, जेथे मुसॉर्गस्कीच्या संगीत रचनेच्या छापील प्रती ठेवल्या आहेत
[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]
संगीत रचना असलेले पान: The Scientific Music Library of the Saint-Petersburg State Conservatory named after N.A. Rimsky-Korsakov; रस्त्यावरील दृश्य: National Library of Russia, St. Petersburg