व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘वृद्धपणातही फळ देत राहणे’

‘वृद्धपणातही फळ देत राहणे’

‘वृद्धपणातही फळ देत राहणे’

भूमध्य प्रदेशांतील अनेक लोक आपल्या अंगणात खजुराची झाडे लावतात. ही झाडे दिसायला अतिशय डौलदार असतात आणि यांची फळे अतिशय गोड अशी असतात. शिवाय, ती शंभरपेक्षा अधिक वर्षे फळ देत राहतात.

प्राचीन इस्राएलच्या शलमोन राजाने काव्य रुपात एका देखण्या शुनेमकरीण मुलीच्या बांध्याची तुलना तालवृक्षाशी केली. (गीतरत्न ७:७) बायबल काळांतील वृक्षवल्ली (इंग्रजी) नावाच्या एका पुस्तकात असे म्हटले आहे: “येथे ज्याचे भाषांतर तालवृक्ष असे करण्यात आले आहे तो इब्री शब्द आहे, ‘तमार.’ . . . तो शब्द, यहुदी लोकांचा सौंदर्य आणि लावण्याचे प्रतिक बनला आणि सहसा यावरून मुलींची नावे ठेवली जात.” उदाहरणार्थ, शलमोनाच्या सावत्र बहिणीचे नाव तामार होते; ती दिसायला अतिशय सुंदर होती. (२ शमुवेल १३:१) आजही काही पालक आपल्या मुलींना हे नाव देतात.

पण फक्‍त सुंदर स्त्रियांचीच तुलना तालवृक्षांशी करण्यात आलेली नाही. स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. जे परमेश्‍वराच्या घरात रोवलेले आहेत. ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातहि ते फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील.”—स्तोत्र ९२:१२-१४.

लाक्षणिक अर्थाने, वृद्धपणातही देवाची सेवा करणारे आणि ऐटीत उभे असलेले खजुरीचे झाड यांच्यात अनेक गोष्टी साम्य आहेत. “पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; धर्ममार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो,” असे बायबल म्हणते. (नीतिसूत्रे १६:३१) वाढत्या वयामुळे वृद्धांची शक्‍ती नाहीशी झालेली असली तरीसुद्धा देवाचे वचन बायबल याच्या नियमित अभ्यासातून पोषण प्राप्त करून ते आपली आध्यात्मिक शक्‍ती टिकवून ठेवू शकतात. (स्तोत्र १:१-३; यिर्मया १७:७, ८) वृद्ध विश्‍वासू बंधूभगिनी आपल्या मधूर शब्दांमुळे व उत्तम उदाहरणामुळे इतरांसाठी उत्तेजनाचा मोठा स्रोत ठरू शकतात आणि वर्षानुवर्षे फळ देत राहू शकतात. (तीत २:२-५; इब्री लोकांस १३:१५, १६) खजुराच्या झाडाप्रमाणे वृद्ध जन ‘वृद्धपणातही फळ देत राहू’ शकतात. (w०७ ९/१५)