व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

होशेय पुस्तकातील ठळक मुद्दे

होशेय पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

होशेय पुस्तकातील ठळक मुद्दे

उत्तरेकडील दहा गोत्रांच्या इस्राएल राज्यातून खरी उपासना जवळजवळ नाहीशीच झाली आहे. यराबाम दुसरा याच्या शासनकाळात इस्राएलमध्ये भौतिक समृद्धी असते परंतु राजाच्या मृत्यूनंतर ती लवकरच नाहीशी होते. यानंतरचा काळ उलथापालथीचा व राजकीय अस्थिरतेचा होता. यानंतर गादीवर आलेल्या सहा राजांपैकी चौघांची हत्या केली जाते. (२ राजे १४:२९; १५:८-३०; १७:१-६) याच अराजकतेच्या काळात, म्हणजे सा.यु.पू. ८०४ पासून पुढच्या ५९ वर्षांपर्यंत होशेयने संदेष्ट्याचे कार्य केले.

स्वच्छंदी इस्राएल राष्ट्राबद्दल यहोवाला कसे वाटत होते त्याचे चित्रण होशेयच्या वैवाहिक जीवनात जे घडले त्यावरून मिळते. इस्राएलच्या अपराधांबद्दल आणि इस्राएल तसेच यहुदाचे राज्य यांच्याविरुद्ध भविष्यसूचक न्यायदंड हे, होशेयच्या संदेशाचे विषय आहेत. आपल्याच नावाने असलेल्या या पुस्तकात होशेयने कोमल, भावस्पर्शी, जोरदार व सचित्र भाषेचा उपयोग केला आहे. हे पुस्तक देखील देवाच्या ईश्‍वरप्रेरित वचनाचा भाग असल्यामुळे त्यातील संदेश सजीव व सक्रिय आहे.—इब्री लोकांस ४:१२.

“एक जारिणी बायको करून घे”

(होशेय १:१–३:५)

यहोवा होशेयला सांगतो: “जा; एक जारिणी बायको करून घे.” (होशेय १:२) होशेय देवाचे ऐकतो आणि त्याला गोमेरकडून एक पुत्र होतो. यानंतर त्याच्या बायकोला झालेली दोन्ही मुले अनौरस असतात. लो-रुहामा आणि लो-अम्मी ही त्यांची नावे. यावरून, यहोवाने इस्राएलवर दया दाखवण्याचे थांबवले आहे आणि आपल्या अविश्‍वासू लोकांना त्याने त्यागले हे दिसून येते.

बंडखोर झालेल्या आपल्या लोकांबद्दल यहोवाला नेमके कसे वाटते? तो होशेयला सांगतो: “इस्राएल लोक अन्य देवांकडे वळतात . . . तरी त्यांच्यावर परमेश्‍वर प्रेम करितो; त्याप्रमाणे तू पुन: जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिजवर प्रेम कर.”—होशेय ३:१.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:१—होशेय त्याच्या सेवेदरम्यान यहुदावर राज्य करणाऱ्‍या सर्व चार राजांचा उल्लेख करतो पण इस्राएलवर राज्य करणाऱ्‍या केवळ एकाच राजाचे नाव सांगतो, असे का? कारण, दावीदाच्या कुळातून आलेल्या राजांनाच केवळ, देवाच्या निवडलेल्या लोकांचे न्याय्य शासक म्हणून मान्यता होती. उत्तरेकडील राज्याचे राजे दावीदाच्या कुळातले नव्हते; परंतु यहुदाचे राजे होते.

१:२-९—होशेयने खरोखरच जारिणी बायको केली का? होय, होशेयने अशा एका स्त्रीबरोबर विवाह केला जी नंतर एक जारिणी बनली. आपल्या खासगी जीवनाविषयी होशेयने जे काही सांगितले ते एक स्वप्न होते किंवा एक दृष्टांत होता, असे संदेष्टा होशेय सांगत नाही.

१:७—यहुदाच्या घराण्याला केव्हा दया दाखवून वाचवण्यात आले? सा.यु.पू. ७३२ मध्ये राजा हिज्कियाच्या दिवसांत याची पूर्णता झाली. त्यावेळी, यहोवाने एका रात्रीत फक्‍त एकाच देवदूताकरवी १,८५,००० शत्रू सैनिकांना ठार मारून जेरुसलेमला अश्‍शूरी लोक देत असलेल्या धमकीचा अंत केला. (२ राजे १९:३४, ३५) अशाप्रकारे यहोवाने “धनुष्य, तरवार, लढाई, घोडे अथवा स्वार यांच्या द्वारे” नव्हे तर एका देवदूताकरवी यहुदाचा उद्धार केला.

१:१०, ११—सा.यु.पू. ७४० मध्ये इस्राएलचे उत्तरेकडील राज्य पडले, मग इस्राएल लोक आणि यहुदाचे लोक यांना कशाप्रकारे ‘एकत्र’ करण्यात आले? सा.यु.पू. ६०७ मध्ये यहुदातील लोकांना बॅबिलोनच्या बंदिवासात नेण्याआधी, उत्तर राज्यातील पुष्कळ जण यहुदात गेले होते. (२ इतिहास ११:१३-१७; ३०:६-१२, १८-२०, २५) सा.यु.पू. ५३७ मध्ये यहुदी लोक पुन्हा आपल्या मायदेशी परतले तेव्हा, इस्राएलच्या उत्तरेकडील राज्यातील यांचे वंशज या परतलेल्या लोकांपैकी होते.—एज्रा २:७०.

२:२१-२३—‘मी [इज्रेलला] आपणासाठी देशात पेरीन; मी तिच्यावर दया करीन,’ हे यहोवाचे शब्द काय भाकीत करतात? गोमेरकडून झालेल्या होशेयच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव इज्रेल होते. (होशेय १:२-४) या नावाचा अर्थ “देवाने पेरलेले बीज” असा होतो. यहोवा असे भाकीत करतो, की सा.यु.पू. ५३७ मध्ये तो एका विश्‍वासू शेष वर्गाला एकत्र करून यहुदामध्ये त्यांना बीजाप्रमाणे पेरेल. सत्तर वर्षांपासून ओसाड पडलेला प्रदेश आता धान्य पिकवेल, मधूर द्राक्षारस आणि तेल उत्पन्‍न करेल. मूळ भाषेत काव्यरुपात असलेल्या या भविष्यवाणीत म्हटले आहे, की या उत्तम गोष्टी जणू काय पृथ्वीला तिचा कस बाहेर सोडण्याची विनंती करतात आणि पृथ्वी आकाशाला पावसासाठी विनंती करेल. आणि आकाश, पावसाचे ढग पाठवण्यासाठी देवाला विनंती करेल. हे सर्व, परतणाऱ्‍या शेष लोकांच्या गरजांची विपुलमात्रेत काळजी घेण्याच्या उद्देशाने असेल. प्रेषित पौल आणि पेत्र होशेय २:२३ हे वचन, आध्यात्मिक इस्राएलच्या शेष वर्गाच्या एकत्रीकरणाला लागू करतात.—रोमकर ९:२५, २६; १ पेत्र २:१०.

आपल्याकरता धडे:

१:२-९; ३:१, २. देवाच्या इच्छेनुसार एका विवाहात टिकून राहण्याद्वारे होशेयने किती मोठा आत्म-त्याग केला याचा विचार करा! देवाची इच्छा पूर्ण करण्याच्या बाबतीत आपणही कितपत आत्म-त्याग करण्यास तयार आहोत?

१:६-९. यहोवाला जसा शारीरिक जारकर्माचा वीट आहे तसाच आध्यात्मिक जारकर्माचा देखील आहे.

१:७, १०, ११; २:१४-२३. इस्राएल व यहुदाविषयी यहोवाने जे भाकीत केले होते ते पूर्ण झाले. यहोवाचे वचन नेहमी खरे ठरते.

२:१६, १९, २१-२३; ३:१-४. मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना यहोवा क्षमा करण्यास तयार आहे. (नहेम्या ९:१७) यहोवाप्रमाणे आपणही इतरांबरोबर कनवाळूपणे व दयाळुपणे वागले पाहिजे.

‘यहोवा वाद करणार आहे’

(होशेय ४:१–१३:१६)

“परमेश्‍वर या देशाच्या रहिवाश्‍यांबरोबर वाद करीत आहे.” का? कारण “देशातून सत्य, दया व देवज्ञान ही नाहीतशी” झाली आहेत. (होशेय ४:१) इस्राएलचे विश्‍वासघातकी लोक लबाडी आणि रक्‍तपात करत आहेत आणि त्यांनी शारीरिक तसेच आध्यात्मिक जारकर्म केला आहे. देवाकडे मदतीसाठी वळण्याऐवजी ते “मिसराला हाक मारितात; अश्‍शुराकडे धाव घेतात.”—होशेय ७:११.

यहोवा आपला न्यायदंड घोषित करताना म्हणतो: “इस्राएलास गिळून टाकिले” पाहिजे. (होशेय ८:८) यहुदाचे राज्यही अपराध करण्यात कमी नाही. होशेय १२:२ मध्ये म्हटले आहे, की, “परमेश्‍वराचा यहूदाबरोबर वाद आहे, तो याकोबाला त्याच्या आचरणाप्रमाणे शासन करील; त्याच्या कर्माप्रमाणे तो त्याला प्रतिफळ देईल.” परंतु जे देवाशी विश्‍वासू आहेत त्यांचे पुनर्वसन हे खचित आहे; कारण देव असे वचन देतो: ‘अधोलोकाच्या तावडीतून मी त्यांना उद्धरीन. मृत्यूपासून मी त्यांना मुक्‍त करीन.’—होशेय १३:१४.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

६:१-३—“चला, आपण परमेश्‍वराकडे परत जाऊ,” असे कोण म्हणत होते? अविश्‍वासू इस्राएली लोक पुन्हा यहोवाकडे वळण्यास कदाचित एकमेकांना प्रोत्साहन देत असावेत. असे जर असेल तर ते फक्‍त पश्‍चात्ताप केल्याचा दिखावा करत होते. त्यांची प्रेमळ-दया, “सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उडून जाणाऱ्‍या दहिवराप्रमाणे” तात्पुरती व क्षणिक होती. (होशेय ६:४) किंवा कदाचित, होशेय लोकांना पुन्हा यहोवाकडे वळण्याची गळ घालत असावा. काहीही असो, इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राज्यांतील स्वच्छंदी रहिवाशांनी खरा पश्‍चात्ताप दाखवून यहोवाकडे खरोखर वळणे आवश्‍यक होते.

७:४—व्यभिचारी इस्राएली कशाप्रकारे “तापविलेल्या भट्टीसारखे” होते? इस्राएली लोकांची तुलना तापवलेल्या भट्टीबरोबर करून, त्यांच्या हृदयात खदखदत असलेल्या दुष्ट इच्छांची तीव्रता दाखवली जाते.

आपल्याकरता धडे:

४:१, ६. आपल्याला जर यहोवाच्या कृपापसंतीत राहायची इच्छा असेल तर आपण त्याच्याबद्दलचे ज्ञान घेत राहून, शिकत असलेल्या गोष्टींचे आचरण करीत राहिले पाहिजे.

४:९-१३. लैंगिक अनैतिकता व अशुद्ध उपासना आचरणाऱ्‍यांचा यहोवा झाडा घेणार आहे.—होशेय १:४.

५:१. देवाच्या लोकांमध्ये पुढाकार घेणाऱ्‍यांनी धर्मत्यागापासून चारहात दूरच राहिले पाहिजे. नाहीतर, ते काहींना खोट्या उपासनेत गोवतील व अशाप्रकारे त्यांच्यासाठी एक ‘पाश व जाळे’ बनतील.

६:१-४; ७:१४, १६. केवळ शब्दांद्वारे पश्‍चात्ताप दाखवणे हा दांभिकपणा आहे व हे निरर्थकही आहे. देवाची दया प्राप्त करण्याकरता अपराध करणाऱ्‍याने आपल्या कार्यातून मनापासून पश्‍चात्ताप दाखवला पाहिजे. त्याने “परात्पराकडे” परत आले पाहिजे अर्थात त्याच्या उदात्त उपासनेकडे पुन्हा वळाले पाहिजे. त्याची कार्ये देवाच्या उच्च दर्जांच्या सुसंगत असली पाहिजेत.—होशेय ७:१६.

६:६. जी व्यक्‍ती पाप करीत राहते ती, तिला देवाबद्दल एकनिष्ठ प्रेमाची उणीव आहे हे दाखवून देते. या व्यक्‍तीने कितीही आध्यात्मिक त्याग केले तरी ते त्याग ही उणीव भरून काढू शकत नाहीत.

८:७, १३; १०:१३. “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल” हे तत्त्व मूर्तीपूजक इस्राएली लोकांच्या बाबतीत खरे ठरले.—गलतीकर ६:७.

८:८; ९:१७; १३:१६. उत्तर राज्याच्या राजधानीवर अर्थात शोमरोनावर अश्‍शूऱ्‍यांनी कब्जा केला तेव्हा उत्तर राज्याविषयीच्या भविष्यवाण्या खऱ्‍या ठरल्या. (२ राजे १७:३-६) देवाने जे काही म्हटले आहे ते तो निश्‍चित पूर्ण करेल, अशी आपण खात्री बाळगू शकतो.—गणना २३:१९.

८:१४. सा.यु.पू. ६०७ मध्ये यहोवाने, बॅबिलोन्यांकरवी यहुदाच्या “नगरांवर अग्नि” पाठवून जेरुसलेम आणि यहुदाचा भाकीत केल्याप्रमाणे नाश केला. (२ इतिहास ३६:१९) देवाचे वचन केव्हाही निष्फळ ठरत नाही.—यहोशवा २३:१४.

९:१०. इस्राएली लोक खऱ्‍या देवाला समर्पित होते तरीपण “ते बआलपौराकडे आले आणि त्यांनी लज्जास्पद मूर्तीला आपणास वाहून घेतले.” त्यांच्या वाईट उदाहरणातून जर आपण धडा शिकलो आणि यहोवाला आपण केलेले समर्पण कोणत्याही प्रकारे तुटू नये म्हणून खबरदारी घेतली तर आपण सुज्ञ होऊ.—१ करिंथकर १०:११.

१०:१, २, १२. आपण निष्कपट मनाने देवाची उपासना केली पाहिजे. ‘आपण जेव्हा धार्मिकतेची पेरणी करतो तेव्हा देवाच्या प्रेमळदयेची कापणी करू.’

१०:५. बेथआवेन (“दुष्कर्माचे घर”) हे बेथेलला (“देवाचे घर”) दिलेले अपमानास्पद नाव आहे. बेथआवेनच्या वासराची मूर्ती जेव्हा बंदिवासात नेण्यात आली तेव्हा शोमरोनातले रहिवासी, त्यांच्या उपासनेचे प्रतिक गमावल्याचे दुःख करीत राहिले. स्वतःची सुद्धा रक्षा करता येत नाही अशा निर्जीव मूर्तीवर भरवसा ठेवणे किती मूर्खपण आहे!—स्तोत्र १३५:१५-१८; यिर्मया १०:३-५.

११:१-४. यहोवा नेहमी आपल्या लोकांबरोबर प्रेमळपणे वागतो. देवाच्या अधीन राहणे कधीही तापदायक नसते.

११:८-११; १३:१४. आपल्या लोकांना खरी उपासना पुन्हा सुरू करता येईल, याविषयी यहोवाने जे वचन दिले होते ते ‘पूर्ण झाल्यावाचून त्याच्याकडे विफल होऊन परत गेले नाही.’ (यशया ५५:११) सा.यु.पू. ५३७ मध्ये, बॅबिलोनचा बंदिवास समाप्त झाला आणि काही शेष लोक पुन्हा जेरुसलेमेस परतले. (एज्रा २:१; ३:१-३) आपल्या संदेष्ट्यांकरवी यहोवाने जी जी वचने दिली आहेत ती सर्व न चुकता पूर्ण होतीलच.

१२:६. आपण नेहमी, प्रेमळ-दया दाखवण्याचा, न्यायाने वागण्याचा व यहोवावर भाव ठेवण्याचा पक्का निश्‍चय केला पाहिजे.

१३:६. इस्राएली लोक “तृप्त झाले तेव्हा त्यांचे हृदय उन्मत्त झाले.” म्हणूनच ते यहोवाला “विसरले.” आपला जर गर्विष्ठपणाकडे कल जात असेल तर त्याबाबतीत आपण खबरदारी घेतली पाहिजे.

“परमेश्‍वराचे मार्ग सरळ आहेत”

(होशेय १४:१-९)

होशेय अशी विनवणी करतो: “हे इस्राएला, परमेश्‍वर तुझा देव याजकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस.” तो लोकांना यहोवाला असे म्हणण्यास आर्जवतो: “आमचा सर्व अधर्म दूर कर; कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू.”—होशेय १४:१, २.

पश्‍चात्ताप करणाऱ्‍या अपराध्याने यहोवाकडे येऊन, त्याच्या मार्गांचा स्वीकार करून त्याला स्तुतीचे यज्ञ अर्पण केले पाहिजेत. का? कारण “परमेश्‍वराचे मार्ग सरळ आहेत; त्यांनी धार्मिक चालतील.” (होशेय १४:९) पुष्कळ जण, “कालांती भीतीने कंपित होऊन परमेश्‍वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आश्रय करितील,” हे ऐकून आपल्याला किती आनंद वाटतो!—होशेय ३:५. (w०७ ९/१५)