व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“कृपया माझी ही लहानशी भेट स्वीकारा”

“कृपया माझी ही लहानशी भेट स्वीकारा”

“कृपया माझी ही लहानशी भेट स्वीकारा”

रशियातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला मिळालेल्या एका पत्रातील हे शब्द आहेत. हे पत्र एका मोठ्या बॉक्सबरोबर आले होते. हा बॉक्स लोकरीच्या पायमोज्यांनी भरला होता.

रशियाच्या उत्तरेस दूरवर असलेल्या एका मंडळीत सेवा करणाऱ्‍या ६७ वर्षांच्या ॲला नावाच्या एका यहोवाच्या साक्षीदार भगिनीने ही भेट पाठवली होती. ॲला गेल्या दहापेक्षा अधिक वर्षांपासून यहोवाची सेवा करत आहे व राज्याच्या सुवार्तेचा आवेशाने प्रचार करीत आहे. पण, अचानक तिला अर्धांगवायू झाला. तरीसुद्धा प्रेमाने प्रवृत्त होऊन ॲलाने पहिल्या शतकातील दुर्कस नावाच्या ख्रिस्ती स्त्रीचे अनुकरण केले जी सहउपासकांना वस्त्रे बनवून देत असे.—प्रेषितांची कृत्ये ९:३६, ३९.

आपल्या पत्रात ॲला म्हणते: “मला माझे पाय हलवता येत नसले तरी मी हात हालवू शकते. मग मी पत्र लिहून प्रचार करते. मी विचार केला, माझे हात शाबूत आहेत तोपर्यंत मी पायमोज्यांच्या काही जोड्या विणू शकते. माझी इच्छा आहे, की हे पायमोजे अशा बंधूभगिनींना मिळावेत जे रशियाच्या पूर्वेस दूरवर व सायबेरियात राज्य सभागृह बांधकामासाठी जातात.”

आपल्या खऱ्‍या अनुयायांविषयी येशू ख्रिस्ताने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) ॲलाने दाखवलेले प्रेम हे येशूच्या खऱ्‍या शिष्यांचे एक ओळखचिन्ह आहे. (w०७ ११/१५)